आपला मिपा वार्ताहर : ठाणे दि १७ मे २०१५ - श्री. मोदकरावांनी दाखवलेल्या सायकलचा आणि तदनुषंगाने तंदुरुस्तीचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या महन्मंगल कार्यास आपणही थोडा हातभार लावावा (आणि आपला पृथ्वीवरचा भार जमेल तितका कमी करावा) या हेतूने मिपावरचे सध्याचे आकर्षणकेंद्रबिंदू श्री. टका यांच्या साथीने "सायकलरजनीफेरी" काल रात्री चालू होती (आमचे अहोभाग्य हो !!). आम्ही इकडच्या तिकडच्या गप्पा मारत असताना टकाच्या भ्रमणध्वनीवर डॉ. खरे यांचा फोन आला (तो त्यांचा फोन आहे हे मला नंतर कळले ). त्यांनी टकाला " उद्या सकाळी ७ वाजता एक छोटा कट्टा ठाण्यात आयोजित केलेला आहे … तू येऊ शकशील का?" असे विचारले असावे (मला नक्की फोनवर काय बोलणं चाललंय हे कळले नाही कारण टका इकडून जे काही बोलत होता त्या आवाजावरून पलीकडे त्याच्या कोणी नातेवाईकापासून एखाद्या विवाहोत्सुक मुलीपर्यंत कोणीही असण्याची शक्यता होती). ते म्हणणे ऐकून घेऊन टकाने " मामलेदार सुद्धा माझ्याबरोबर आहे " असे सांगितले मग मला कळले की आपल्या मिपा परीवारापैकीच कोणीतरी असावे. पलीकडे डॉक होते. त्यांनी कट्ट्याचा कार्यक्रम थोडक्यात मला सांगितला. मी तसाही अट्टल कट्टेकरी व्हायची दीक्षा घेतलेलीच असल्यामुळे नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता. कार्यक्रम अगदी छोटासाच होता. श्री सर्वसाक्षी यांच्या ठाण्यातल्या घरी जमून त्यांच्या खिडकीतून समोरच हाकेच्या अंतरावर असलेले पोपट आणि इतर पक्षांचे निरीक्षण , थोडा खाऊ पिऊचा सहभाग ( रात्रकट्टेकर्यांनी नसते दृकश्राव्य चित्रपट डोळ्यांसमोर आणू नयेत हि णम्र इनंती !) आणि नेहमीप्रमाणेच असीमित गप्पा असा ढोबळ कार्यक्रम होता. अजून कोण कोण येणार आहे ते काही कळले नाही पण ते विचारायची गरज कधी नसतेच हे आता मला चांगलेच कळले आहे. फोन ठेवल्यानंतर टकाला विचारले त्यावर तो "हो… जायचंच !!! आपण सायकलच घेऊन जाऊ " असं म्हणाला. सकाळी लवकर उठायचे असल्यामुळे सायकलरजनीफेरी आटोपती घेऊ असे टका आणि मी ठरवले आणि सकाळी ६. ३० ला भेटायचे ठरवून आपापल्या घरी गेलो.
आजची सकाळ झाल्यावर उठल्या उठल्या ६. ०० वाजता ठरल्याप्रमाणे टकाला फोन केला. एकदा बेल वाजून संपली. म्हटले उचलेल नंतर…. पण कसचे काय…. ६. ३० झाले तरी त्याचा पत्ता नाही ( त्याचा भ्रमणध्वनी मात्र माझ्यावर वैतागला असणार त्याची रैवारची झोप मी मोडली म्हणून ). डॉकना "कायप्पा"वर सांगितले कि टका काहीच प्रतिसाद देत नाही ( इथे मिपावर तर त्याचे प्रतिसाद उतू जात असतात !!) मग जाणवले की बहुतेक टकाचा "टांगारु" झाला असावा. मग मीही सायकलचा कार्यक्रम रद्द केला आणि सरळ यांत्रिक वाहनस्वारी केली (ये दोस्ती हम नाही तोडेंगे…. !!) . सकाळी बरोबर ७ वाजता मी डॉकनी दिलेल्या पत्त्यावर क्याडबरी जंक्शनला पोचलो तर तिथे कोणीच नव्हते. थोड्या वेळाने माझ्या शेजारून एक काका चालत गेले. त्यांना पाहून मला वाटले कि मी आधी यांना भेटलोय पण कुठे ते आठवेना. थोड्याच वेळात एका बाईकवर डॉक, दुसर्या बाईकवर मदनबाण आणि त्याच्या मागे मगाचचे माझ्या शेजारून चालत गेलेले काका होते (तेव्हा माझी ट्यूब पेटली की ते रामदासकाका होते…. अर्रर्रर … काका, आय माय स्वारी… ).
मग आम्ही सगळेच श्री सर्वसाक्षी यांच्या घरी पोचलो. यापूर्वी मी त्यांना कधीही भेटलो नव्हतो. एक अत्यंत प्रसन्न व्यक्तिमत्व !! त्यांनी मनापासून सगळ्यांचे आगत स्वागत केले. तिथे पोचल्या पोचल्या समोरच त्यांच्या सहाव्या मजल्यावरच्या घराच्या खिडकीतून समोरच दुर्मिळ असा निसर्ग, झाडे आणि किलबिलाट करणारे पोपट आणि इतर पक्षी पाहूनच मन प्रसन्न झाले( काही वर्षांनंतर हे सगळे फक्त फोटोतच पहायला मिळणार की काय असे उगाच वाटून गेले) ते पाहून सगळ्यांनी आपापले क्यामेरे सरसावले आणि खिडकीकडे धाव घेतली. तितक्यात मागाहून विमे आणि प्रास हेही येउन पोचले. मग काय… बाहेर झाडावर हिरवे पोपट आणि आता घरात मनाने हिरवे (एवरग्रीन हो… )असणारे मिपावृक्षावरचे पोपट यांचा एकदमच किलबिलाट सुरु झाला …"आणि मिपाच्या किल्लेदारांनी मजल्यावरच्या सगळ्यांना जाग आणली" !! पोपट किती ओरडतात, काय खातात याबाबत श्री सर्वसाक्षी माहिती देत होते. पोपटांच्या अनुषंगाने सुरु झालेला विषय पुढे हळूहळू फ्लेमिंगो , बुलबुल, सनबर्ड यावरून पुढे सरकत होता. दरम्यान मदनबाणने सगळ्यांना मोगरा अत्तर लावले ( आक्षी गुर्जींची आठवण झाली वो !!!). त्यानंतर पहिल्या चहाचा आणि बिस्किटांचा राउंड पार पडला. मिपाकर एकत्र बसल्यावर त्यांना कोणताही विषय वर्ज्य नसतो ह्याचा प्रत्यय नेहमीप्रमाणे आलाच ! कबुतर कावळे यावरून गप्पांची गाडी चतुष्पादांवर ( कुत्रा, कोल्हा ) वगैरेवरून पुढे जाऊ लागली. मग नागा आणि मिझोराम मध्ये कुत्रे कसे खातात , आदिवासी पाड्यात उंदीर कसे मारून खातात याचीही वर्णने झाली. तिथून ही मिपागप्पा रेल्वेगाडी वेगवेगळ्या विषयांच्या थांब्यांवर थांबून पुन्हा सुसाट धावत होती. शेतीविषयक सल्ले , ऑफिसातले चहावाले आणि चहा पिणारे यांच्या विविध कहाण्या आणि अनुभव, कामगारांचे स्वभाव, सुकाणूचक्र चालक उर्फ ड्रायव्हर यांचा माज … एकूणच मराठी माणसाची त्याच्याच मुळावर येणारी निष्क्रियता, संध्यानंदच्या बातम्या, कायप्पाचे फोरवर्ड वगैरे गप्पा झडू लागल्या. एव्हाना विमेने "किसन शिंदे येत आहे" असे जाहीर केले आणि तेवढ्यात तोही आलाच… (एक सल्लागार मंडळ सदस्य आणि एक संपादक यांच्या बरोबर पुन्हा गप्पा सुरु झाल्या मात्र ह्यावेळी गप्पांचे विषय वेगळे होते. मिपावरच्या अलीकडच्या बर्याचशा घडामोडींचे संदर्भ येऊ लागले. त्यात " मिपावर एक साचलेपण आले आहे का" असाही प्रश्न आला. त्यावर सगळ्यांचेच एकमत झाले. यातून बाहेर पडण्यासाठी काहीतरी प्रयत्न करायला हवेत असे सगळ्यांचेच म्हणणे होते. तेवढ्यात चहाचा दुसरा राउंड झाला. बोलण्या बोलण्यात "अखिलमिपाकरटोपीघालू संघटनेचे अध्यक्ष"यांचे असीमगुणगौरववर्णन सुरु झाले आणि जुने जाणते लोक त्यांचे अनुभव कथन करू लागले. अस्मादिकांसकट सगळी नवीन मंडळी ( मिपाची नवीन पिल्लं…. गोजिरवाणी गं ती … ) त्या भयकहाण्या आश्चर्य आणि कुतूहलाच्या नजरेने आ वासून ऐकू लागली. किसंद्येव, प्रास आणि रामदास काका यांच्यात विमेवरून बराच खल झाला. त्याचा प्रत्यास म्हणून किसंद्येवाने प्रास आणि विमेला शेपरेट सुरुचीमध्ये मिसळ खायला न्यायचे कबूल केले ( नंतर गेले असणार !!) मग पुढे मिपावर धागे टाकायला प्रतिसाद द्यायला समस्त मंडळींना इतका वेळ कुठून मिळतो हा एक चर्चेचा अतर्क्य विषय समोर आला. हा विषय कधीही न संपणारा असल्याने तसेच त्याचे मूळ व कुळ दोन्ही न सापडणारे असल्याने थोडक्या वेळातच त्याच्यावर पडदा पाडून( वेळ लिमिटेड होता हो !!) सगळेजण इतर विषयांकडे वळले. तिथून पुढे विविध रोग, त्यावरचे उपचार आणि स्वयंघोषित डॉक्टरांचा सुळसुळाट यावर डॉकनी त्यांचे अनुभव सांगितले. दरम्यानच्या काळात सौ सर्वसाक्षी यांनी बरीच धावपळ करून सगळ्यांसाठी पोहे केले आणि त्याच्या बशा बाहेर येऊ लागल्या. सगळेचजण मग गप्पांसकट पोह्यांचा समाचार घेऊ लागले.
भारतात रस्त्यांवरचा ड्रायव्हिंगचा अनुभव ह्यावर गप्पा पोचल्यावर हिरिरीने सर्वजण चर्चेत उतरले. मदनबाण आणि विमेने आपापले आलेले अनुभव आणि त्या अनुषंगाने मनात येणारे खुनशी विचार यावर भाष्य केले. समोरचा कितीही शहाणा असला तरी तो मूर्ख आहे , तो आपल्या रस्त्यात येणारच आणि आपल्याला त्याच्याशी न भांडता आपले मूळ विहित कार्य आणि उद्दिष्ट (जसे की बेस्टचे आहे… आपले उद्दिष्ट ३. ५ किमी प्रतिलिटर… बाकी आजूबाजूची वाहने किती का बोम्बलेनात आपल्या नावाने ) लक्षात घेऊन ड्रायव्हिंग करणे गरजेचे आहे असा निष्कर्ष निघाला. इतके सगळे गप्पाष्टक होईपर्यंत जवळपास १०. ३० झाले होते ( ९ ला कट्टा आटोपता घ्यायचा असे अगोदर ठरले होते ). सगळी मंडळी गडबडीने निघायला उठली. सौ सर्वसाक्षी यांनी सगळ्यांची ओळख करून घेतली ( बरोबरच आहे… कोण कोण येउन गेलं कळायला तरी नको का ?? वर्णनावर किती मिपाकर ओळखता येतील शंकाच असते नाहीतरी… )
सगळ्यांनी एकमेकांचा निरोप घेऊन आपापली यांत्रिक वाहने इच्छित स्थळाच्या दिशेने मार्गस्थ केली पण आजच्या रविवारच्या सकाळचा एक आगळाच गंध कायम मनात दरवळत राहील…. प्रत्यक्षातले पोपट पुढे भविष्यात दिसोत न दिसोत, मिपाकरांचा किलबिलाट कायमच होत राहणार हे नक्की !!( पुढचा कट्टा तुमचंही घर असू शकतं… चला… कामाला लागा !!)
वि. सू -- "फटू, फाटू" अशा प्रतिक्रिया देऊन भुणभूणु नका … फटू प्रतिसादात येतीलच !! ते पाहून …. जळावे,असाच लोभ असावा ही विनंती !!
वाचने
25328
प्रतिक्रिया
64
मिसळपाव
प्रतिक्रिया
फटू ;)
फटूमध्ये आता पक्षी आणि
आज सक्काळी मी इतक्या गाढ
अरेच्चा!!! कट्टा वृत्तांत
मिपाकरांचा किलबिलाट कायमच होत
मस्त वृतांत.
वृत्तांत आवडला
अहो, पण इतक्या मिपाकरांचे
In reply to वृत्तांत आवडला by श्रीरंग_जोशी
यावरून आठवले
In reply to अहो, पण इतक्या मिपाकरांचे by अन्या दातार
फोटो न्हाय . . तर कट्टा न्हाय
झाले तयार एकाच कट्ट्यात
In reply to फोटो न्हाय . . तर कट्टा न्हाय by अद्द्या
व्हय . . अगदी पहिल्या २
In reply to झाले तयार एकाच कट्ट्यात by यशोधरा
मी सांगू का...
डॉक साहेबांनी फोनवले आणि या
मा झा प्र ति सा द को णी उ ड व
नाराज..... :(
अरे हे काय ...
फोटो नाय तर कट्टा नाय, विषय
+१
In reply to फोटो नाय तर कट्टा नाय, विषय by सूड
पुढचा कट्टा तुमचंही घर असू
नाय ब्वा.....पुणं पण असू शकतं....
In reply to पुढचा कट्टा तुमचंही घर असू by सूड
बादवे, काय काय दिसतं तुमच्या
In reply to नाय ब्वा.....पुणं पण असू शकतं.... by माम्लेदारचा पन्खा
ते सर्व हे दाखवणार आहेत!
In reply to बादवे, काय काय दिसतं तुमच्या by सूड
ते सर्व हे दाखवणार आहेत!
In reply to ते सर्व हे दाखवणार आहेत! by अत्रुप्त आत्मा
बरं! :p
In reply to ते सर्व हे दाखवणार आहेत! by सूड
चालु द्या निरर्थक अत्मरंजन!!!
In reply to बरं! :p by अत्रुप्त आत्मा
ही म्हणजे स्वमतांध दांभिकता
In reply to बरं! :p by अत्रुप्त आत्मा
हा शब्द समहाऊ अगदी सनावृतेची
In reply to ही म्हणजे स्वमतांध दांभिकता by सूड
झकास लिखाण
आरोप एकदम मान्य.....
In reply to झकास लिखाण by पैसा
श्री. मोदकरावांनी दाखवलेल्या
In reply to आरोप एकदम मान्य..... by माम्लेदारचा पन्खा
टकाशेट...तीच प्रेरणा तुम्हालाही मिळो ही परमेश्वराचरणी प्रार्थना
In reply to श्री. मोदकरावांनी दाखवलेल्या by टवाळ कार्टा
@ माम्लेदारचा पन्खा , तुमची
मनापासून आभारी आहे
In reply to @ माम्लेदारचा पन्खा , तुमची by पिंपातला उंदीर
मस्त वृत्तांत.
काय दिसतं तुमच्या घरातून?
परत येकदा वाचीलं.. आनी आम्मी
वर्णन मस्त ! पण फटू पायजेतच
प ण मा झा प्र ति सा द गे ला
सेल्फी नाहि का काढ्ला ?
शिंदे सरकार आणि प्रास
नेहमीप्रमाणे इथेही विमेचा
In reply to शिंदे सरकार आणि प्रास by सुबोध खरे
विमे चक्क ठाण्याला आला?
In reply to नेहमीप्रमाणे इथेही विमेचा by किसन शिंदे
'मुंबईच्या' (एकेकाळच्या)
In reply to विमे चक्क ठाण्याला आला? by सूड
आपण व्यनिव्यनि किंवा व्हॉट्सअ
In reply to 'मुंबईच्या' (एकेकाळच्या) by अन्या दातार
म्हणजे तु अन्याबरोबर हे सगळे
In reply to आपण व्यनिव्यनि किंवा व्हॉट्सअ by सूड
तुला का चवकश्या?
In reply to म्हणजे तु अन्याबरोबर हे सगळे by टवाळ कार्टा
तु जाहिरपणे लिल्हे म्ह्णून
In reply to तुला का चवकश्या? by सूड
आता उत्तर मिळणार नाही, हेही
In reply to तु जाहिरपणे लिल्हे म्ह्णून by टवाळ कार्टा
जाहिर संभाषणाबद्दल आभार आणि
In reply to आता उत्तर मिळणार नाही, हेही by सूड
तु मात्र एकदम हिरो दिसतोय पण
In reply to नेहमीप्रमाणे इथेही विमेचा by किसन शिंदे
भेटत जा आम्हाला पण
In reply to तु मात्र एकदम हिरो दिसतोय पण by गणेशा
हिरवट आजोबांचा १९७५ सालचा
In reply to शिंदे सरकार आणि प्रास by सुबोध खरे
पोपट बुलबुल
जेपी संन्यासग्रस्त असल्या
सत्कार धाग्याची पन्नाशी
In reply to जेपी संन्यासग्रस्त असल्या by टवाळ कार्टा
"नाना-माई-माईंचे हे"
In reply to सत्कार धाग्याची पन्नाशी by टवाळ कार्टा
मित्रहो
आता पुढचा ठाणे कट्टा जंगी झाला पाहिजेच असे मी प्रस्तावीत करतो...
In reply to मित्रहो by सुबोध खरे
कट्टा+बघण्यासाठी काही असे
धन्यवाद
मला नै जमले उठायला...नेक्ष्ट
In reply to धन्यवाद by सर्वसाक्षी
सर्व साक्षी साहेब
In reply to धन्यवाद by सर्वसाक्षी
यानंतर अधिक मोठा कट्टा करु
In reply to सर्व साक्षी साहेब by सुबोध खरे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Shake It Off... ;) :- Taylor Swift >