फायर ..एक करणे

अत्रन्गि पाउस's picture
अत्रन्गि पाउस in काथ्याकूट
10 Feb 2015 - 10:13 pm
गाभा: 

इंटर्विह्यू धाग्यावर फायर कारणे ह्या विषयी उल्लेख होता म्हणून हा धागा...
एक अत्यंत अप्रिय असे हे कर्तव्य असते परंतु बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये अतिशय कॉमन गोष्ट ... माझ्या आयुष्यातील ह्या बाबतीतील काही ठळक आठवणी ...

१. ऑन साईट कस्टमर कम्प्लेंट
माझ्या टीम मधली एक मुलगी कस्टमर साईट वर काम शिकत होती (transition)..शिकतांना ती विचारत असलेल्या प्रश्नांनी कस्टमर अस्वस्थ झाला ..इतके बेसिक प्रश्न म्हणजे तिला फार टेक्निकल नॉलेज नाही असे लक्षात आले ..परंतु मी इथे इंडियात ती तिथे परदेशी ...तत्काळ परदेशी असलेल्या दुसर्या मानेजर(माझ्या मित्राला) ला एक क़्विक असीस्मेंत करायला सांगितले ..कस्टमर बरोबर होता आणि आमची चूक होती..तिला रातोरात टिकेट बुक करून काही अर्जंट काम आहे असे सांगून बोलावून घेतले .. बाकीचे ४०-४५ जण परदेशात होते त्यांना त्यांच्या लेव्हल नुसार माहिती दिली आणि त्यांचे मोरल एनशुअर केले ..
आता मुख्य काम ती इथे आल्यावर

सगळ्यात पहिले तिची रिप्लेसमेंट (कम्प्लेंट आल्या पासून ७२ तासात) कस्टमरला देऊन काम पुढे चालू केले त्यामुळे प्रोजेक्ट सुरळीत सुरु राहिले आणि कस्टमर कोन्फिडन्स राखला

तिला पहिल्यांदा कस्टमर feedback स्पष्टपणे सांगितला ..तिचे पुन:मुल्यांकन होईल असे सांगितले २-३ दिवस वेग वेगळ्या टेक्निकल सिनियर्स कडून तिचे असेसमेंट केले आणि सर्व मुल्यांकन तिच्या समोर लिखित स्वरुपात ठेवले ..शेवटी तिच्या माहितीची पुन्हा छाननी करून घेतली ... आता असे लक्षात आले कि तिचा मूळ रेझ्युमेच फेक होता ...आता एच आर ला ह्यात ओढले ...सिस्टीमटिकली तिला १ महिना सुधारण्याची संधी दिली त्यात तिने कोणतेही एक काम नीटस पणे संपूर्ण जबाबदारी घेऊन करण्याची जबाबदारी टाकली ह्या सगळ्या महिन्यात संपूर्णपणे वेगळे लोक तिच्याशी डील करीत होते (पूर्वग्रह रहित कार्यवाही साठी)..अपेक्षेप्रमाणे ती काहीहि करू शकली नाही तेव्हा तिला एच आर ने समोर बोलावून राजीनामा किंवा बडतर्फी असे २ पर्याय ठेवले ..आणि साहजिक राजीनामा पर्याय निवडल्यावर अक्षरश: १ तासात तिला रिलीव्ह केले ..
ह्या संपूर्ण प्रकरणात मी मनेजर असल्याने माझ्यावर व्यक्तिगत आरोप करण्याचा प्रयत्न झाला परंतु माझी वरिष्ठ एक स्त्री होती ती स्वत: आणि टीम मधल्या बाकीच्या स्त्री पुरुषांनी माझ्या मागे खंबीर उभे राहून जोरदार पाठींबा दिल्याने एच आर पुढे त्या मुलीचे काही चालले नाही...
परंतु हे एक सव्वा महिना मी प्रचंड मानसिक अस्वस्थ्यातून घालवले पण शेवटी पार पडले सगळे सुखरूप...पण एक महत्वाची जबाबदारी यशस्वी पणे पार पडल्याबद्दल पाठ थोपटली गेली ...

...क्रमश: ???

प्रतिक्रिया

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

10 Feb 2015 - 11:01 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

रेस्युमे फेक असणं गुन्हा नाही का?

चिमिचांगा's picture

10 Feb 2015 - 11:38 pm | चिमिचांगा

तुम्ही विशिष्ट राज्यातले असाल तर बहुधा रेझ्युमे फेक 'नसणे' गुन्हा आहे.

रेवती's picture

11 Feb 2015 - 12:42 am | रेवती

अगदी हेच म्हणते! ;)
त्यातही आता त्यांच्या राज्याचे दोन भाग झालेत. कोणत्या राज्याबद्दल बोलताय ते ठरवा. ;)

अत्रन्गि पाउस's picture

11 Feb 2015 - 7:07 am | अत्रन्गि पाउस

:)

टवाळ कार्टा's picture

11 Feb 2015 - 11:43 am | टवाळ कार्टा

"गुल्टी" का? :)

काळा पहाड's picture

11 Feb 2015 - 4:00 pm | काळा पहाड

त्यांना गुल्टे का म्हणतात माहीतीये का? gu-l-te.

टवाळ कार्टा's picture

11 Feb 2015 - 4:03 pm | टवाळ कार्टा

म्हैत है म्ह्णून्च विचारले ;)

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Feb 2015 - 11:43 pm | डॉ सुहास म्हात्रे

"...क्रमश: ???" यातले "???" डिलीट करा आणि तुमचे अनुभव जरूर टाका.

काहींना ते उद्बोधक आणि उपयोगी ठरतील, तर इतरांना कमीत कमी रोचक तरी नक्कीच वाटतील.

नगरीनिरंजन's picture

11 Feb 2015 - 5:26 am | नगरीनिरंजन

अनुभव वर्णन आवडले. रिक्रूटमेंट प्रोसेसचे पोस्ट-मॉर्टेम केले की नाही ते लिहीलेच नाहीत पण. अशा फेक रेझ्युमेवाल्यांचे पितळ पहिल्याच मुलाखतीत उघडे पडायला हवे ना?

लॉरी टांगटूंगकर's picture

11 Feb 2015 - 4:00 pm | लॉरी टांगटूंगकर

अशा फेक रेझ्युमेवाल्यांचे पितळ पहिल्याच मुलाखतीत उघडे पडायला हवे ना?
असेच म्हणतो.

काळा पहाड's picture

11 Feb 2015 - 9:59 pm | काळा पहाड

एकदा मी आणि माझी एक कलीग इंटर्व्ह्यू घेत होतो. इंटर्व्ह्यू ला आलेला प्राणी एका क्लायंटच्या प्रोजेक्ट बद्दल बोलत होता (थर्ड पार्टी व्हेंडर तर्फे काम केल्याचं दाखवून) आणि त्याला हे माहीती नव्हतं की माझी कलीग पण त्याच प्रोजेक्ट वर टीमलीड होती (दुसर्‍या थर्ड पार्टी व्हेंडरतर्फे काम करून). आम्ही इंटर्व्ह्यू च्या शेवटी अर्ध्या तासानंतर त्याला हे सांगितलं.
बाकी टेलिफोनिक राऊंडमध्ये हे समजणं बर्‍याचदा अवघड जातं की या माणसानं खरंच काम केलंय की नाही, कारण समोरचा माणूस उत्तर सरळ देतच नाही. उगीच हवेत बोलतो. मग आम्ही काही प्रॅक्टीकल प्रॉब्लेम विचारतो. तिथे ततपप केलं की समजायचं.

बाप रे ! रेझ्युमे फेक होता तर या मुलीने मुलाखत कशी निभावून नेली?

फेक रेझ्युमेच्याही पुढे जाउन आता फेक टेलिफोन इंटरव्ह्यू प्रकार बरेच झाले आहेत - खास करुन contract पोझिशन्ससाठी.
चांगले आणि प्रामणिक उमेदवार मात्र त्यामुळे चांगल्या संधींना मुकतात.

पण तिला कस्टमर साइटवर पाठवण्याआधीच हे कसं कुणाच्याच लक्ष्यात आलं नाही?

शीर्षक असं का? उगीच काही पडलेले हिंदी चित्रपट आठवले.

खोट्या स्किल्सेटच्या जोरावर कुणी थेट कस्टमरसाईटवर सुद्धा जाउन पोहोचू शकतो हे वाचून अंमळ मौज वाटली.
कुणीतरी वर प्रतीसादात म्हटलंय की मुळात ती मुलगी निवडली कशी गेली ह्याचा शहनिशा केला होता का नाही हे बघायला पाहिजे. करोत बापडे. निदान तेव्हढं तरी काही भरीव कामं करतील लोक :)
तर ते एक असो. ह्या वरून आठवलं - अनेक दर्जेदार (बेस्ट वर्कप्लेसेस ह्या अर्थाने) कंपन्यामधे - विशेषतः सॉफ्टवेअर मध्ये- इंटरव्हयु फार सोपा असतो - उमेदवाराला एका ऑफिसात बसवतात. समोर लॅपटॉप असतो. कुणीतरी येऊन काही प्रोग्रॅम देऊन जातो - वेळेचे बंधन नसते आणि उमेदवारापुढे एकच चॉईस असतो - तुम और तुम्हारी तनहाई अक्कल - दोनो मिलकर वो अल्गोरिदम लिखो. जमला तर पुढच्या राउंडला प्रवेश(तिथेसुध्दा हाच प्रकार). नाहीतर "शुभास्ते पंथानः सन्तु !" अश्या १०-१२ राउंड झाल्यावर एचआर येतो आणि ऑफर देतो. बात खतम.
अशा प्रक्रियेतून निवडलेल्या उमेदवाराला पुढे कधी तोकड्या टेक्निकल ज्ञानामुळे "परफॉर्मन्स असेसमेंट" वगैरे वायफळ आणि वेळखाऊ गोष्टींची गरज पडत नाही आणि शिवाय त्या उमेदवाराने "बेसिक" प्रश्न विचारले तर कुणी हवालदिलसुद्धा होत नाही.
असो. एक मजेदार किस्सा आठवला तो सांगितला. सरसकटीकरणाच्या वादात मला पडायची इच्छा नाहिये.

टवाळ कार्टा's picture

11 Feb 2015 - 11:45 am | टवाळ कार्टा

ऑन्साईटला जाण्यासाठी ट्क्निकल माहिती नसली तरी चालते...क्लाएंटसमोर बोलबच्चन आणि म्हानेजरसमोर लाळघोटेपणा पाहिजे...टेक्निकल माहितीवाले ऑफशोर वरून ऑनसाईटवाल्यांना "सपोर्ट" द्यायला ठेवलेले असतात

मदनबाण's picture

11 Feb 2015 - 11:52 am | मदनबाण

@ टका
अगदी... बोल बच्चन अमिताभ बच्चन असले तरी काम होते...
बाकी सध्या आयबीएम चर्चेत आहे :- Which IBM Layoff Numbers Add Up?
कोण म्हणतयं रिसेशन येतय ?
Companies Cutting the Most Job

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Ek दो Teen चार Otthukkadi... ;) :- { Anjaan }

बाकी सध्या आयबीएम चर्चेत आहे :- Which IBM Layoff Numbers Add Up?

ह्म्म... बेंगलोरला म्हणे लोक नुसते नोकर्‍या शोधतायत.. कंपनीने जा म्हणून सांगायच्या अगोदर आपणच गेलेले बरे म्हणून :)

हे फायर कधी बॅक-फायर होतं का हो?

अत्रन्गि पाउस's picture

11 Feb 2015 - 11:06 am | अत्रन्गि पाउस

अहो म्हणून तर कागदोपत्री मजबूत पुरावे तयार करून मगच 'कृती' केली जाते ...
...वरील उदाहरणात ओपन and शट केस असूनही १ सव्वा महिना पूर्ण केस बिल्ड करून मग कृती केली

कपिलमुनी's picture

11 Feb 2015 - 11:26 am | कपिलमुनी

पोरगीने हा मॅनेजर माझा 'गैरफायदा' घेतो अशी लेखी कंप्लेट टाकली तर बॅक-फायर होण्याची शक्यता असते !त्यामुले बरेच जण ताक फुंकून पितात की माझ्या प्रोजेक्ट मधून जा बाकी एच आर बघेल

काळा पहाड's picture

11 Feb 2015 - 3:56 pm | काळा पहाड

आम्ही घेतच नाही. आधी त्यांचे बरेच कन्स्ट्रेन्ट्स असतात. चेन्नई ला नको, गुरगाव ला नको. लांबच्या ऑफिसात नको. त्यात लहान मूल असेल तर कामात काँसन्ट्रेट करणं किंवा जास्त वेळ थांबणं शक्य नसतं. मग इतर लोकांना ते काम करावं लागतं आणि ते नाराज होतात. त्यांना शिव्या घालणं शक्य नसतं. जास्त शिकण्याची इच्छा किंवा एनर्जी किंवा वेळ किंवा हे सगळं नसतं. शनिवारी रविवारी बोलावता येत नाही. रात्री फोन करून हे आत्ता कर म्हणून सांगता येत नाही. बरेच प्रॉब्लेम आहेत. त्यात अशा वृत्तीची एखादी निघाली तर संपलंच. त्यापेक्षा नकोच.

अत्रन्गि पाउस's picture

11 Feb 2015 - 8:18 pm | अत्रन्गि पाउस

जेन्डर दिस्क्रीमिनेष्ण ची भीती नाही वाटत?
आमच्या कडे तर हे इक्वल ओपोर्चुनिती फोर ऑल वगैरे फार पाहावे लागते ...

काळा पहाड's picture

11 Feb 2015 - 9:50 pm | काळा पहाड

अहो मी आमच्या ग्रुपबद्दल बोलतोय. ऑर्गनायझेशन आहे ना इ.ऑ.फॉ.ऑ. साठी. लाखांनी एम्प्लॉयी असताना कुठे ते चेक ठेवत बसणार आहेत. बाकीचे प्रोजेक्ट्/ग्रुप करतील इ.ऑ.फॉ.ऑ. आमचा ग्रुप स्पेसिफिक स्किल्सचा आहे. त्यात डेव्हलपर्स आणि टेस्टर्स प्रोजेक्ट पुरते ये जा करतात. त्यांना घेताना किंवा स्पेसिफिक स्किल च्या ऑर्गनायझेशन च्या व्यक्तीला घेताना आम्ही हे पडताळून बघतो की ही व्यक्ती किती फ्लेक्झिबल आहे. तसा मी स्त्रियांनी काम करण्याच्या बिलकुल विरूद्ध नाहीये. फक्त त्यांनी दुसर्‍या ग्रुप्/प्रोजेक्ट मध्ये काम करावं.

अत्रन्गि पाउस's picture

11 Feb 2015 - 10:28 pm | अत्रन्गि पाउस

तसा मी स्त्रियांनी काम करण्याच्या बिलकुल विरूद्ध नाहीये. फक्त त्यांनी दुसर्‍या ग्रुप्/प्रोजेक्ट मध्ये काम करावं.

आता तर बरेच जण असे करतातच कि ...

पिलीयन रायडर's picture

12 Feb 2015 - 4:21 pm | पिलीयन रायडर

अरेरे… अजुनही १८५७ जमान्यातले लोक पाहून वाईट वाटलं…
१. कोणताही कुटुंबवत्सल माणुस घरदार उचलून परगावी न्यायला लगेच तयार होत नसतो. गुरगावला तर कोणतीही शहाणी मुलगी आधी नाही म्हणेल… चेन्नैला जायला अनेक पुरुष नाही म्हणतील……
२. अहो तुम्हाला "वर्क फ्रोम होम / पार्ट टाईम / फ्लेक्सी टायमिंग " असं काही माहिती नाही का? प्रोजेक्ट डिलिव्हरी पेक्षा बायकांच्या डिलिव्हरी जगासाठी जास्त महत्वाच्या आहेत. त्यासाठी "संपुर्ण समाजाने" सपोर्ट केला पाहिजे. कंपनी करते त्यात काही उपकार नाहीत. कारण असा सपोर्ट फक्त काहीच दिवस हवा असतो. आयुष्यभर नाही.
३. जगात पुष्कळ म्हणजे पुष्कळच मुली आहेत ज्यांना आपल्या कामाची प्रचंड काळजी असते. त्यासाठी त्या वीकांताला सुद्धा येतात. उशीरा पर्यंत थांबतात. रात्री २ला कॉल घेऊन टेस्ट सेलचे इस्श्यू बघणार्या मुली दाखवू का? कामाला कटकट करणारे पुरुष दाखवू का? हपापलेल्या नजरेने रिपोर्टीला पाहणारे मेनेजर्स दाखवू का?

तुम्हाला मुली नको असतील, त्याहून जास्त मुलींना तुमच्या सारखे मेनेजर्स नको आहेत… त्यामुळे काळजी नसावी…
धन्यवाद…

(मुलींचे मुद्दे समजून न घेणार्या लोकांना एखादं ट्रेनिंग देण्याचा विचार करणारे आमचे डायरेक्टर आठवले… लोक उगाच मोठे होत नाहीत… )

सविता००१'s picture

12 Feb 2015 - 4:46 pm | सविता००१

+१०००

जाऊ दे गं पिरा… आम्ही फक्त पुरुषांनाच घेतो … दिवसातून १७न्दा स्मोक ब्रेक आणि कॉफी ब्रेक घेत असले म्हणून काय झालं? नवीन आलेल्या पोरींना कशाही नजरेनी बघितलं म्हणून काय झालं? ते चेन्नई आणि गुरगाव ला जायला तयार असतात. कधीही फोन करा, कामाला तयार असतात. त्यांच्याकडे पोरांची नाकं पुसायला आणि आजारी आई / वडिलांचं करायला बायका असतात ना घरी!

अत्रन्गि पाउस's picture

12 Feb 2015 - 5:09 pm | अत्रन्गि पाउस

अहो काही देशांमध्ये आई + वडील मिळून ५-६ वर्षे हा सपोर्ट मिळतो तो देखील भरपगारी ... जिथे शक्य तिथे तो तसा मिळाला पाहिजे हे हि अगदी खरे
पण चार आण्यासाठी वाटेल ती तडजोड करणाऱ्या आपल्या महान देशात, जिथे बेसिक्स ची बोंब आहे, तिथे इतका परिपक्व दृष्टीकोन अशक्य आहे ...
एमेंसी मध्ये पितृत्वाची रजा हि संकल्पना आहे पण ह्याला 'मूर्खपणा /अनुत्पादक खूळ/ वेस्टर्न fad .. वगैरे वगैरे' अशा रीतीने संबोधित केले जाते बऱ्याच एतद्देशीय कंपन्यांमध्ये

पिलीयन रायडर's picture

12 Feb 2015 - 6:09 pm | पिलीयन रायडर

There are issues.. To everybody..
Main problem is this attitude... Men are very productive Vs Women are just bunch of lost people with no aspirations as such.. They are just cost to the company and headache to the manager.. This is the tone of above reply by Kala Pahad..
There is a reason industry is thinking about Gender Diversity.. Google..
There are many many women at upper management level who started as engineers and even with same issues of family, maternity, kids, traveling restrictions, they are on the TOP... and there is a reason to that...
We are also professionals in a business.. not beggars in some charity.. We got these jobs by qualification and just by chance.. It is very disturbing to see such foolish thoughts on Public Forum..
Anyways.. it was necessary to tell people that there are problems, but also there are solutions alerady found for them.. Yeah.. Welcome to 2015!!

काळा पहाड's picture

12 Feb 2015 - 7:41 pm | काळा पहाड

Madam, I am not a Male Chauvanist Pig. You are un-necessarily pouring criticism on me. You are telling to find solutions to the problems of women. Best of luck from me.The problem is, you are saying that I am wrong BECAUSE I am not willing to accomodate the problems of women. I guess this should be a matter of choice. Women can go to upper management, can become successful, why would I have a problem with that? All I am saying is, there should not be any concessions for women (being women). I have nothing to say about begging or charity. I have not uttered any of those words. I am all for women empowerment. What I am saying is that I will not stop after 8 PM to do the work of a woman colleague BECAUSE she must be sent home. Unfortunately that does not happen. And that is the reason we prefer male colleagues. Simple!

बॅटमॅन's picture

12 Feb 2015 - 7:44 pm | बॅटमॅन

There are many female chauvinist sow's who won't bat an eyelid before labeling men as being chauvinistic pigs. Not that I am implying anyone to be such; simply added my observation, that's all.

दुश्यन्त's picture

12 Feb 2015 - 5:17 pm | दुश्यन्त

@पिलीयन रायड :सही! एक नंबर!

अरेरे… अजुनही १८५७ जमान्यातले लोक पाहून वाईट वाटलं…

नाही मॅडम, मी स्वतः मुलींनी सगळ्या नोकर्‍या (अगदी आर्मी मध्ये वॉरफ्रंट जाऊनसुद्धा) कराव्या अशा मताचा आहे. फक्त त्यांनी त्यात कन्सेशन मागू नये. दुर्दैवाने बरेच नवे ट्रेनीज (पुरूष आणि स्त्रिया असं करायला तयार नसतात). स्त्रिया लग्न झाल्यावर/मुलांसाठी जी वेगवेगळी कारणे देतात त्यामुळे पुरूष सहकार्‍यांवर ताण येतो. अर्थात हे सरसकटीकरण आहे हे मलाही मान्य आहे पण इथे "बहुतांश" केसेस मध्ये असं होतं. असे नखरे करणारे पुरुष अर्थातच काँपिटिटीव्ह फिल्ड मध्ये टिकत नाहीत.

१. कोणताही कुटुंबवत्सल माणुस घरदार उचलून परगावी न्यायला लगेच तयार होत नसतो. गुरगावला तर कोणतीही शहाणी मुलगी आधी नाही म्हणेल… चेन्नैला जायला अनेक पुरुष नाही म्हणतील……

मी इंटरव्ह्यू घेताना, दोन्ही केसेस मध्ये असं असेल तर कँडिडेटला सिलेक्ट करत नाही. जग बदललंय आणि जे बदलायला तयार नसतील त्यांना डार्विनचे नियम लागू होतात.

२. अहो तुम्हाला "वर्क फ्रोम होम / पार्ट टाईम / फ्लेक्सी टायमिंग " असं काही माहिती नाही का? प्रोजेक्ट डिलिव्हरी पेक्षा बायकांच्या डिलिव्हरी जगासाठी जास्त महत्वाच्या आहेत. त्यासाठी "संपुर्ण समाजाने" सपोर्ट केला पाहिजे. कंपनी करते त्यात काही उपकार नाहीत. कारण असा सपोर्ट फक्त काहीच दिवस हवा असतो. आयुष्यभर नाही.

अर्थातच माझ्या कंपनीत व.फ्रॉ.हो. आहे, फ्ले.टा. आहे. आणि मी ते वापरतो सुद्धा. पण जेव्हा हवं होतं तेव्हा मी दोन दोन दिवस पण न झोपता काम केलेलं आहे. प्रोजेक्ट डिलिव्हरी पेक्षा बायकांच्या डिलिव्हरी महत्वाच्या नाहीत. कारण कस्टमर इज किंग. साम्यवाद आणि समाजवाद संपला आहे. भांडवलशाहीत असंच असतं. कंपनी करते त्यात उपकार नाहीत हे खरंय पण मग त्यांनी कंपनीचे नियमही पाळायला हवेत. ते नियम असं सांगतं की कंपनीच्या कामाला बाकी सगळ्यापेक्षा प्रायॉरिटी असते.

३. जगात पुष्कळ म्हणजे पुष्कळच मुली आहेत ज्यांना आपल्या कामाची प्रचंड काळजी असते. त्यासाठी त्या वीकांताला सुद्धा येतात. उशीरा पर्यंत थांबतात. रात्री २ला कॉल घेऊन टेस्ट सेलचे इस्श्यू बघणार्या मुली दाखवू का? कामाला कटकट करणारे पुरुष दाखवू का? हपापलेल्या नजरेने रिपोर्टीला पाहणारे मेनेजर्स दाखवू का?

आणि अशा पुरुषांना आम्ही आयटी मध्ये असून शिव्या घालतो. ते काम "झालं म्हणजे झालंच" पाहिजे नाहीतर घरी जावू नको असं सांगतो. मला मान्य आहेत की असे पुरुषही आहेत. पण तो प्रश्नच नाहीये. एखाद्या "एक्स्पेक्टेड" मुलीला अशा प्रकारे थांबवता आणि बोलता येत नाही हा मेन प्रॉब्लेम आहे. आणि आम्ही प्रॉब्लेम सोल्व्हर्स आहोत.

तुम्हाला मुली नको असतील, त्याहून जास्त मुलींना तुमच्या सारखे मेनेजर्स नको आहेत… त्यामुळे काळजी नसावी…धन्यवाद…

१. मी मॅनेजर नाहीये. मॅनेजर म्हणजे बॉस म्हणजे "वरचा" ही भारतातली संकल्पना आहे. मी कुणालाही मॅनेज करत नाही. मी एक नॉलेज-वर्कर आहे. मला सगळे कलीग्ज आहेत. काही ज्युनियर तर काही सिनियर. जर ते मला असाईन होणार असतील आणि जर त्यांची जबाबदारी माझ्यावर टाकली तर आणि तरच मी कुणाला माझ्या टीम मध्ये घ्यायचं ते ठरवतो (पर्याय असतील तर). नंतर मला त्यांना ट्रेन करावं लागतं जी एक महिनाभराची प्रक्रिया आहे. आणि त्यानंतर त्यांना हळू हळू जबाबदारी द्यावी लागते. जर मला नंतर त्रास होणार असेल तर मी तो कशासाठी करून घ्यावा?
२. माझ्या सारखे म्हणजे काय हे मला कळलं नाही. उगीच मुलींच्या मागे करून त्यांची कामं करून देणं मला जमत नाही. मी मुलींना त्रास द्यायला जात नाही. फक्त जी कामं ज्या वेळेत करायला हवीत ती त्याच वेळेत व्हायला हवीत यावर माझा कटाक्ष असतो.

जिन्गल बेल's picture

13 Feb 2015 - 3:51 pm | जिन्गल बेल

+१००००००

मधुरा देशपांडे's picture

12 Feb 2015 - 5:17 pm | मधुरा देशपांडे

किती सरसकटीकरण.
हे गाव नको, ते गाव नको असे अनेक मुलांचेही म्हणणे असते. फक्त स्त्रिया असे करतात असे काही नाही.

त्यांना शिव्या घालणं शक्य नसतं.

म्हणजे फक्त शिव्या घालून कामं केली जातात का? लोकांना कामावर घेताना शिव्या घालता याव्यात म्हणून घेता का? शिव्या न घालताही कामं होऊ शकतात. होतात.

जास्त शिकण्याची इच्छा किंवा एनर्जी किंवा वेळ किंवा हे सगळं नसतं. शनिवारी रविवारी बोलावता येत नाही. रात्री फोन करून हे आत्ता कर म्हणून सांगता येत नाही.

यावरही असहमत. मुळात गरज असताना जास्त काम करणे आणि वेळी अवेळी कामावर आले पाहिजे असा नोकरीचा निकष असणे वेगळे. असे काही जॉब्स असतात की जिथे कामाच्या वेळा अडनिड असतात. पण सर्वसाधारणपणे कुठल्याही कंपनीतील नोकरी साठी जेव्हा ऑन पेपर ८ तास असा करार आहे, तिथे देखील जर वेळी अवेळी, शनि रवि येणार नाही हाच निकष लावायचा असेल तर तो चुकीचा आहे. आता हे ऑन पेपर आणि प्रत्यक्षात वेगळं असतं याचीही कल्पना आहे. प्रत्येक वेळी झाले ८ तास म्हणुन निघुन जाता येत नाही. आणि अशी गरज पडली तर घरून काम करून, प्रत्यक्ष येउन काम करणाऱ्या अनेक मैत्रिणी आहेत. मी पण केले आहे. पण मुळात रात्री अपरात्री फोन आले तर नाही म्हणणे यात आक्षेप घेण्यासारखे काय आहे?

अशाही मैत्रिणी आहेत ज्या दोन अडीच वर्षाच्या मुलाला घरी ठेवुन महिनाभरासाठी ऑनसाईट सुद्धा गेल्या आहेत. आणि अशा वेळी सगळ्यात महत्वाचा सहभाग असतो तो घरात नवर्‍याचा सपोर्ट असणे. महिनाभर "मी माझ्या वेळा जमवेल मुलासाठी" असे म्हणणारा नवरा आणि घरातले लोक हवेत.
हे साधारण आयटी किंवा तत्सम कंपनीतले. इतर पण बरीच प्रोफेशन्स आहेत. डॉक्टर स्त्रीया, नर्सेस, शिक्षिका यांनाही बरेचदा रोजच्या वेळेपेक्षा अधिक वेळ कामासाठी द्यावा लागतो. शाळांची स्नेह्संमेलन असतील, परीक्षा असतील तर प्रसंगी घरातली लग्न कार्य बाजुला ठेवुन आपले काम बजावणार्‍या पण बायका आहेत. रात्री २ आणि अडीच वाजता दवाखान्यात इमर्जन्सीला जाणार्‍या आहेत. अजुन किती उदाहरणे देता येतील.

तेव्हा तुम्ही म्हणताय तशा काही केसेस असतील, एकुण प्रतिसाद पटला नाही.

मूळ धाग्याबद्दल, ती मुलगी निवडली कशी गेली हा प्रश्न मलाही पडला. बरे जर फक्त बोलबच्चन टाकून निवडली गेली असेल, तर तिच्या टीम मधल्या ज्या कुणी तिला पाठवले, त्यालाही जाब विचारायला हवा. फेक रेझ्युमी वगैरे म्हणजे कहरच आहे.

भाग २ मध्ये उत्तर आहे.

मधुरा देशपांडे's picture

12 Feb 2015 - 7:00 pm | मधुरा देशपांडे

ओके. तुम्ही दिलेली कारणे असतीलही.

काळा पहाड's picture

12 Feb 2015 - 7:24 pm | काळा पहाड

हे गाव नको, ते गाव नको असे अनेक मुलांचेही म्हणणे असते. फक्त स्त्रिया असे करतात असे काही नाही.

हो पण जायचं तर जा नाहीतर निघा असं कंपनी मुलांना सांगू शकते. महिलांना नाही. निदान मला तरी असं कुणाला पाठवलेलं माहीती नाही. मुद्दा इथे जबरदस्तीनं पाठवता येतं की नाही हा आहे. महिलांना चॉईस द्यावा लागतो. मुलांना दिला जात नाही.

म्हणजे फक्त शिव्या घालून कामं केली जातात का? लोकांना कामावर घेताना शिव्या घालता याव्यात म्हणून घेता का? शिव्या न घालताही कामं होऊ शकतात. होतात.

सॉरी, तुम्ही काँग्रेसच्या प्रवक्त्यांसारखं काहीही विचारताय. शिव्या न घालताही कामं होतात. पण काहीजणांसाठी शिव्या लागतातच. बाकी शिव्या याचा अर्थ बर्‍याचदा लिटरल नसतो. पण डेडलाईन दिलेली असताना जर ती पूर्ण करायची इच्छा नसेल तर कडक भाषेचा वापर केला जातोच. तुम्ही असं म्हणत नाही की बायकांना सुद्धा असंच कडक बोला. तुम्ही म्हणताय की कामं "करून घ्या". असं होत नाही मॅडम. पब्लीक मधले काही जण "बसता लाथ उठता बुक्की" (पुन्हा शब्दशः घेवू नये) प्रकारचे असतात. बायकांना असं वागवताच काय बोलता सुद्धा येत नाही.

पण मुळात रात्री अपरात्री फोन आले तर नाही म्हणणे यात आक्षेप घेण्यासारखे काय आहे?

बघा तुम्ही माझ्या म्हणण्याला पुष्टी देताय. नाही, आक्षेप बरोबर आहे. पण इश्श्यू सॉल्व्ह करणं महत्वाचं की तुमच्या भावना महत्वाच्या? मग अशा वेळी असा माणूस ज्याला कधीही उठवलं जावू शकतं त्यालाच निवडलं जाणार ना? की कस्टमर ला सांगायचं की आमचा एम्प्लॉयी झोपलाय म्हणून? कंपनीनं करायचं काय?

प्रसंगी घरातली लग्न कार्य बाजुला ठेवुन आपले काम बजावणार्‍या पण बायका आहेत.

तुम्ही मला सांगताय ते बहुतांशी अपवाद आहेत. उदाहरण देतो. मी सपोर्ट मध्ये काम करत असताना (फार पूर्वी), एस्कलेशन झालं की यूएस मॅनेजर (पुरुष) ला उठवावं लागायचं (जो दिवसभर काम करायचाच). आणि हे आठवडयातून ३ दिवस व्हायचं. कारण सिस्टीम अन्स्टेबल होती. हे साधारण सहा महिने. इथे जर एखादी भारतीय महिला असती तर तिनं हे केलं असतं? खरं उत्तर द्या. दुसरं. महिला एम्प्लॉयीजना रात्री ठराविक वेळानंतर टॅक्सी द्यावी लागते. असं झालं की त्यामुळे सहानंतर त्यांचं निम्मं लक्ष कामात आणि निम्मं घरी फोन करून सांगण्यात, कॅब बुक करण्यात इ. गोष्टीत असतं. प्रोजेक्ट जर "लाल" झाला असेल तर मॅनेजरनं (सुदैवाने मी या जबाबदारीतून मुक्त आहे) काय करणं अपेक्षित आहे? पुरुषांना दररोज थांबवून महिलांना ८ ला जा म्हणून सांगणं? आणि या केसेस प्रत्येक प्रोजेक्ट मध्ये आहेत. प्रोजेक्ट मॅनेजर ना याचा दररोज त्रास होतो.

पिशी अबोली's picture

12 Feb 2015 - 8:58 pm | पिशी अबोली

गम्मत वाटते. आधी मुली अशा आणि तशा असं सरसकटीकरण करायचं आणि मग प्रत्यक्षात काम करणाऱ्या असंख्य बायकांची उदाहरणं दाखवली, की त्यांना 'अपवाद' या एकाच लेबल खाली टाकून द्यायचं.

तुमच्या 'प्रोफेशनल' प्रकारच्या कामात माझं काम येत नाही. पण पुण्याहून नागपूरला सर्व सुखसोयीवाल्या जॉब ला 'मला तिथलं वातावरण सोसणार नाही' म्हणून नाकारणारे, साध्या बोर्डवर टाचणी लावायला 'माझी बोटं दुखतात' म्हणून टाळाटाळ करणारे पुरुष पाहिलेत. (अजून माझ्या लिमिटेड अनुभवातलि पण असंख्य उदाहरणं आहेत, पण असो) आणि सातपुडा आणि अंदमान सारख्या ठिकाणी जाऊन वर्षानुवर्ष उन्हातान्हात फिल्डवर्क करणाऱ्या बायका पाहिल्यायत. तुम्ही म्हणताय ती त्या त्या व्यक्तीची tendency आहे. ती एका स्त्रीवर्गाची मग्रुरी नाही.

असो. प्रत्येक उदाहरणाला 'अपवाद' म्हणून डोळ्यांआड करायच्या प्रकाराचं हसू आलं आणि हे आठवलं. बाकी काही नाही.

मधुरा देशपांडे's picture

12 Feb 2015 - 9:12 pm | मधुरा देशपांडे

महिलांना चॉईस द्यावा लागतो. मुलांना दिला जात नाही.

नाही दिला जात याचिही अनेक उदाहरणे आहेत. अत्यंत अनिच्छेने मी दोन महिन्यांची ऑनसाईट असाईनमेंट स्वीकारली होती. मुलगी म्हणुन जाण्याला विरोध नव्हता. काही पर्सनल रीझन्स होती. अन्यथा नोकरी सोडणे हा पर्याय होता. चॅलेंज म्हणुन मी ती घेतली आणि यशस्वीपणे पुर्ण केली. माझ्या एका मैत्रिणिने साऊथ आफ्रिकेत सलग दोन वर्षं काम केलं होतं. तिथेच एका सहकार्‍याला गन पॉईंट वर ठेवले गेले होते. रोजच भितीचे वातावरण असायचे. पुरुष सहकर्मचारी देखील नाही म्हणायचे. अशा ठिकाणी तिने दोन वर्षं यशस्वीपणे पार पाडली. अशाच अजुन इतर मैत्रिणीदेखील आहेत. एकीला ऑफिसचे काम आहे म्हणुन लग्नाची तारीख बदलायला लावली होती. लग्नानंतर देखील कधीतरी परगावी जाणार्‍या. यात आता परदेशात काम कमी असते, पैसा मिळतो असे प्रतिवाद होऊ शकतात. पण वस्तुस्थिती वेगळी असते. काही देश सोडले तर इतरत्र १२-१४ तास काम करावे लागते. पुण्याहुन कामानिमित्त दिल्लीला जाणारी एक मैत्रीण आहे. २-३ महिन्यातुन एकदा आठ-पंधरा दिवसांसाठी जाते. आता उद्या तिला मुल झाले तर निदान ते गर्भातले बाळ योग्य वाढावे आणि जन्म होऊन नंतर त्याचे किमान काही महिन्यांचे संगोपन यात तर तिला सवलती घ्याव्याच लागणार. आणि त्या आवश्यक आहेत. आता कन्सेशन्स घ्यायचे नाहीत म्हणजे मग मुल होऊ द्यायचे नाही का? पुन्हा मुद्दा मग समानता म्हणजे काय नि अजुन कशावर येईल. तो विषय आत्ता नको.
माझा अनुभव फार नाही तरी गेली ७-८ वर्षे भारत आणि परदेशातही काम केले आहे. जर माझ्या सोबतच्या एवढ्या मुली अशा दिसल्या तर मग इतरत्रही असतील याबाबत खात्री आहे. एकही दिवस सुट्टी न घेता सलग महिनाभर काम मी केले आहे. हे असतानाही माझ्या आई बाबांना, नवर्‍याला एक फोन करणे, त्यांच्याशी बोलणे यात मी काहिही झाले तरी वेळ काढेलच. आणि कधीतरी एवढे काम केले याचा अर्थ असा नाही की रोज मी हे करेल. कुणा पुरुषानेही केलेले पटत नाही. का ते पुढे लिहिते. (काही प्रोफेशन्सची तशी गरज असेल, काही वेळा अपवाद असतील ते बाजुला ठेवुन.)

शिव्यांचा अर्थ मी लिटरली शिव्या असा मुळीच घेतला नाही. माझा आक्षेप हा शिव्या देऊ शकत नाही यावरुन पात्रता ठरवण्यावर आहे. जर कुणी काम केले नाही, तर कडक भाषेत सुनवावेच लागते हे माहिती आहे. परंतु आधीपासुनच ही एक स्त्री आहे म्हणजे ती काम करणार नाही, तिचे लक्षच नसेल असा पुर्वग्रह मनात ठेवुन त्यावरुन नाही म्हणणे हा मुद्दा आहे.

ण इश्श्यू सॉल्व्ह करणं महत्वाचं की तुमच्या भावना महत्वाच्या? मग अशा वेळी असा माणूस ज्याला कधीही उठवलं जावू शकतं त्यालाच निवडलं जाणार ना? की कस्टमर ला सांगायचं की आमचा एम्प्लॉयी झोपलाय म्हणून? कंपनीनं करायचं काय?

तुमच्या वरच्या आणि याही प्रतिसादातुन एक मुद्दा जाणवतो आहे. कंपनीचे इशुज सॉल्व्ह करणे ही आयुष्यातील सगळ्यात मोठी प्रायॉरिटी आहे असा मुद्दा असेल तर मग ठीके. एखादे वेळी असे होणे आणि नेहमीच असे असणे यात फरक आहे. मग लग्न झालेले असो अथवा नसो, कंपनीसाठी किती काम करायचं यावर मर्यादा स्त्री-पुरुष सगळ्यांनी घालाव्यात. फक्त नवरा आणि मुलंच नाही, माझ्या आईवडीलांनाही वेळ देणे हे माझे कर्तव्य आहे. लग्नापुर्वीही होते आणि आता माझ्या कुटूंबात जेजे आहेत त्या सगळ्यांसाठी आहे. केवळ स्त्री म्हणुन नाही, हेच नवर्‍याचेही आहे. वर्षानुवर्षे २४ तास कंपनीला बांधील मी नक्कीच होणार नाही. मग त्याऐवजी कमी पैसे मिळाले, कमी प्रतिष्ठा मिळाली तरी हरकत नाही. हे प्रत्येकाने त्याचे त्याचे ठरवायचे असते. कस्टमर म्हणतोय म्हणुन किती प्रेशर घ्यायचे, त्यासाठी स्वतःला किती प्रमाणात कॉम्प्रमाईज करायचे हा प्रश्न प्रत्येकासाठी वेगळा असु शकतो. एका ठराविक मर्यादेनंतर 'नाही' म्हणणे यात मला काही चुक वाटत नाही. इथे स्त्री-पुरुष हा फरक नाही. दिवसातील काही ठराविक वेळ काम करुन, माझ्या कुटूंबावर, माझ्या छंदांवर उर्वरीत वेळ देण्यात मला आनंद मिळतो. मग या अशा नोकर्‍या न करण्यात मी समाधान मानेल. माझ्या ओळखीत असे अनेक पुरुषही आहेत ज्यांना हा वर्क लाईफ बॅलन्स साधायचा आहे. आणि मग अशा नोकर्‍यांना नाही म्हणणे हा मार्ग त्यांनी स्वीकारला आहे. मुलासाठी, कुटुंबासाठी जर त्यांनी काही सवलती घेतल्या, बाकी बाजुला ठेवुन भावनांना महत्व दिले तर ते माझ्या मते द्यायलाच हवे. निदान मी देईन आणि त्यात मला अपराधी वाटणार नाही. मग ते कदाचित मला एखादे ठिकाणी अपात्र ठरवणारे ठरले तरिही हरकत नाही.

तुम्ही मला सांगताय ते बहुतांशी अपवाद आहेत.

किती उदाहरणे देऊ? माझी आई शिक्षिका आहे. जेव्हा महत्वाचे काम असायचे, तेव्हा मी अगदी लहान असतानाही तिला दिवस्भरासाठी बाहेरगावी जावे लागायचे. बोर्डाच्या परीक्षा असताना घरातल्याच लग्नांना तिला जाता आले नाही. अशाच शाळेतल्या इतर महिला पण होत्या ज्यांनी हे केले. डॉक्टर आहेत. वर दिलेली उदाहरणे आहेत. अजुनही आहेत जी फक्त अपवाद म्हणुन नाहीत.

एकुण या केसमध्ये कामाच्या अवास्तव अपेक्षा वाटल्या. आणि केवळ प्रेशर टाकुन त्या पुरुषांकडुन पुर्ण करुन घेता येत असतील, किम्वा काही जण आनंदानेही करत असतील तर यात महिलांचा दोष वाटला नाही.

तुम्ही वर म्हणलंय तशा विनाकारण सवलती घेणार्‍या महिला आहेत याची केवळ कल्पना नाही, अनुभव देखील आहे. पण म्हणुन सगळ्याच तशाच आहेत, काम करतच नाहीत आणि म्हणुन त्या योग्य नाहीत यावर माझा आक्षेप होता.

मधुरा देशपांडे's picture

12 Feb 2015 - 10:23 pm | मधुरा देशपांडे

अजुन एक, वरची काही उदाहरणे ही त्या मुलींनी स्वखुशीने देखील स्वीकारली होती. कुठलिही जबरदस्ती नाही की मुलगी म्हणुन वेगळी वागणुक नाही.
आणि या खालच्या केस बाबत -

हे साधारण सहा महिने. इथे जर एखादी भारतीय महिला असती तर तिनं हे केलं असतं? खरं उत्तर द्या.

या संपुर्ण केसमध्येच, अशा अर्जंट कामासाठी दोन लोकांनी शिफ्टमध्ये काम करणे, अजुन एक रिप्लेसमेंट तयार करणे असेही पर्याय असु शकतात. हे मी उदाहरण म्हणुन दिले, अजुन काही वेगळे पर्याय देखील. लगेच असे होत नाही असे म्हणु नका. अशा केसेस पाहिल्या आहेत. प्रोजेक्टची जेव्हा वाट लागलेली असते तेव्हा नवीन रिसोर्सेस आणणे, ते मॅनेज करणे हेही प्रोजेक्ट मॅनेजर आणि टीम कडुन अपेक्षित असते. त्या पुरुषाला रात्री उठुन हे सगळे करावे लागने यात कुठल्या स्त्रीचा नाही तर मॅनेजमेंट आणि प्लॅनिंगचा इशु आहे.
असो. बरंच लिहिलं गेलंय. लिहेल तेवढे कमी आहे. पिरा सगळे प्रतिसाद आवडले.

जिन्गल बेल's picture

13 Feb 2015 - 4:00 pm | जिन्गल बेल

मधुरा सहमत.... +१००

"क्रमश:" कराच हो.

पिलीयन रायडर's picture

12 Feb 2015 - 10:00 pm | पिलीयन रायडर

काळा पहाड ह्यांना एकच काय तो हा प्रतिसाद..

मुळात मी तुम्हाला हे सगळं लिहीतेय ते "बायकंना हजार लिमिटेशन्स असतात त्यामुळे नकोच त्या बायका.." हा तुमचा नुसता सुरच नाही तर सरळ सरळ तुम्ही लिहीलं आहेत.. त्यामुळे माझा काही गैरसमज नाही तुमच्या बाबतीत हे नक्की..

तुमच्या प्रतिसादातुन जाणवलेली सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ऑफिसचे काम हीच तुमची सर्वोच्च प्रायोरिटी आहे.. जरुर असावी.. पण त्यालाही मर्यादा आहेत.. तुम्ही जो काही साम्यवाद.. भांडवलशाही.. आणि कंपनीचे हीत वगैरे मुद्दे मांडले आहेत, त्याही पेक्षा निश्चित मह्त्वाचं आहे एक मुल सुखरुप ह्या जगात जन्माला येणं.. म्हणजे हा फारच बेसिक मुद्दा झाला की जे जग आता कुणी कडे चाल्लय ह्यावर तुम्ही बोलत आहात ते जग मुळात असण्यासाठी बाईला ९ महिने बाळ पोटात वाढवुन ते जन्माला घालावं लागेल.. ह्याच महत्व तुम्हाला कळत नसेल आणि "एक्सपेक्टींग बाईला काम सांगता येत नाही" हेच तुमचं ह्यावर म्ह्णणं असेल तर ते दुर्दैवी आहे..

जर तुम्हाला रात्री उशीरा घरी जायला कॅब द्यावी लागते ह्या नियमा मागे "का द्यावी लागते?" हे दिसत नसेल तर ते दुर्दैवी आहे..

स्त्रियांना अनेक सवलती द्याव्या लागतात.. मान्य आहे.. पण त्या उगाच दिल्या जात नाहीत.. त्यामागे निश्चित कारणं आहेत.. मुल जन्माला घालणं हे आता आमच्या भाळी लिहीलं आहे ह्याला आम्ही काहीही करु शकत नाही.. पण जर तुम्हाला प्रॉजेक्ट कस्टमरला वेळेवर देणं हे जास्त महत्वाचं वाटत असेल तर तुमच्या विचारसरणीत घोळ आहे (अगदी सरळ लिहीलय.. पण ह्याहुन जास्त शुग्गरकोट करायची इच्छाच नाही..)

साहेब.. असे अनेक मॅनेजर्स आहेत जे टिममध्ये ५०- १००% मुली घेऊन अत्यंत यशस्वीरित्या काम करत आहेत. अशा अनेक कंपन्या आहेत ज्या जास्तीत जास्त मुली घेतल्या जाव्यात ह्यासाठी खास प्रकल्प राबवत आहेत. अशा कंपन्यांच्या मॅनेजमेंट्ला क्लायेंटची चिंता नक्कीच तुमच्यापेक्षा जास्त आहे. पण तरीही असा निर्णय का घेतला जात असावा? तुम्हाला मुलींचे फक्त प्रॉब्लेम्सच दिसत आहेत.. पण तरीही मुली घेतल्या जातात.. त्या मोठ्या संख्येने याव्यात ह्यासाठि प्रयत्न होतात.. तुम्हाला ह्यावर विचार नाही का करावा वाटत?

पण तुमचा एकंदरित मुद्दा हा तिकडे कुणी जगो..मरो.. इकडे माझा क्लायेंट खुश असावा.. बास... साहेब नोकरी म्हणजे सर्व आयुष्य नसते.. मला जर मुल होणार असेल तर दुनिया गेली तेल लावत मी माझ्या बाळाकडेच बघणार ना? आता तुम्ही म्हणताय की हेच तुमच्या कंपनीच्या हिताच्या आड येतं.. पण मग जन्माला घातलेली मुलं नक्की सांभाळायची कुणी? हे काही फक्त आयांचे इश्यु नाहीत..बापांनाही असतात हो लेकरांसंबंधित अडचणी.. (आणि जर नसतील तर त्या बापाच्या लेकरामागे एक बाई बॉस समोर सदैव तोंड वेंगाडुन उभी असलेली दिसेल... पण हा सामाजिक प्रॉब्लेम आहे.. तुम्ही, तुमची कंपनी आणि मुख्य तुमचा क्लायेंट ह्यांना त्याच्याशी काय घेणं देणं...)

तुम्हाला मुळात सर्व सामाजिक मुद्दे तुमच्या बिझिनेस मधुन बाहेर काढायचेत.. लग्न झालं की नोकरी सोडणे (स्त्रीयांनी सासरी जायची पद्धत), मुलासाठी तडजोडी (संसार आणि मुल ही मुख्यतः बाईची जवाबदारी), रात्री उशीरा न थांबता येणे / कॅब द्यावी लागणे (बलात्काराचे वाढते प्रमाण)... तुम्हाला फक्त एवढंच दिसतय की बायकांना प्रॉब्लेम्स असतात.. "का?" असतात हे कुणी बघायचे हो?

बरं मग ह्यावर उपाय काय? नोकरीच करु नये का आम्ही? की तुमच्या सारखी मानसिकता नसणारे मॅनेजर्स शोधुन मग त्यांच्या हाताखाली जॉब मिळवावे..? की मुलच पैदा करु नयेत?

आणि एवढ्ं सगळं होऊन पुन्हा "मला स्त्री सबलीकरण व्हायला हवेच आहे.. बाय्कांनी काम करु नये असं माझं म्हणणं नाहीचे.. फक्त दुसर्‍याच्या टिम मध्ये" असं म्हणणं म्हणजे तर "शिवाजी जन्मावा..पण दुसर्‍याच्या घरात..." असं म्हणल्यासारखं आहे..

आम्ही सुद्धा अनेक वर्ष जॉब करत आहोत.. आम्हालाही वर्क प्रेशर समजतं.. क्लायेंट असतो.. डेड्लाईन्स असतात.. पण इतका टोकाचा विचार करणारे तुम्हीच मला पहिले भेटलात.. अर्थात फार नवल वाटलं नाही..

...कुठेतरी मनाला ह्याची सवय आहे..

कानडाऊ योगेशु's picture

13 Feb 2015 - 12:12 am | कानडाऊ योगेशु

करियरमधला एक ठराविक टप्पा ओलांडला कि आवश्यक त्या सवलती घेण्याची मुभा आपोआप मिळते. त्यात स्त्रीपुरुष असा भेदभाव साधारणपणे पाहीला जात नाहीत. अश्या कॅटेगरीतल्या स्त्रिया कामे संपवुन लवकर घरी जातील तर पुरुष मंडळी कामाच्या वेळात घरची इतर कामे करतील व घरी जाऊन वर्क फ्रॉम होम करतील. अश्या केसेस सर्रास पाहील्या आहेत आणि कंपनी व एम्प्लॉयी ह्या दोघांसाठीही विन-विन सिच्युएशन असल्याने तसा फारसा प्रॉब्लेम झालेलाही पाहीलेला नाही. पण उमेदवारी करत असलेल्या एम्प्लॉईज मध्ये मात्र तसे करुन चाल्त नाही. ह्या अवस्थेत असलेल्या जवळजवळ प्रत्येकालाच स्वतःची गुणवत्ता सिध्द करायची असते. अश्या वेळेस एखादी कलिग केवळ स्त्री आहे म्हणुन तिच्या वाट्याला येणारे काम जर कुणा पुरुष सहकार्याच्या बोकांडी मारले गेले तर अश्या पुरुष सहकार्याचा होणारा जळफळाट समजण्यासारखा आहे.
बर्याच मोठ्या कंपन्या ह्या वुमन फ्रेंडली आहेत पण प्रॉब्लेम मात्र स्टार्टअप्स किंवा स्मॉल स्केल कंपन्यात येतो. तिथे पगार भले तगडा असेल पण कामाचे तास मात्र विचित्र असतात व डिलिव्हरेबल्स ही नेहेमी बदलणारे असे असतात तेव्हा तिथे जर असा तगडा पगार घेणारी एखादी स्त्री जर स्वत:च्या स्त्रीत्वामुळे येणार्या मर्यादांचे ( constraints ह्या अर्थाने) भांडवल करु लागली तर तेव्हा काळा पहाड ह्यांनी घेतलेली भुमिका नाईलाजाने घ्यावी लागते. मी स्वत: दोन्ही प्रकारच्या क्षेत्रात काम केले आहे. जेव्हा उमेदवारी करत होतो तेव्हा मुंबईत एका अगदी छोट्या कंपनीत काम करत होतो. कंपनीचे मालक लोकही तिशीत होते व कंपनीची कामाची वेळ दुपारी १-३० ते रात्री ११-०० अशी अडनीड असायची.काम करणारे सगळे बॅचलर्स असल्याने निघायला १२ तरी वाजायचेच. कंपनीत जेव्हा काही नवी पोझिशन निघायची तेव्हा येणार्या बायोडाटामधुन मुंलीचे बायोडाटा सर्वात आधी बाजुला केले जात. कारण केवळ स्त्रियांसाठी म्हणुन मस्ट ह्या कॅटेगरीत दिल्या जाव्या अश्या सोयी देण्याची कंपनीचीही आर्थिक स्थिती नव्हती.मालक लोकांनीही हे अनऑफिशियली सांगितलेले होते व तिथे काम करणार्या सर्वच जणांना हे मान्य होते.परंतु ह्या प्रकारात जेंडर बायस ह्या प्रकारापेक्षा नाईलाज हाच फॅक्टर जास्त होता.(कंपनीत एक अकाऊंटंट मात्र एक स्त्री होती व ती १० ते ६ असे काम करुन निघुन जात असे.)

पिलीयन रायडर's picture

13 Feb 2015 - 11:40 am | पिलीयन रायडर

कंपनीचा नाईलाज असणे, कॅब, वर्क फ्रॉम होम साठी आवश्यक पैसा नसणे हे मुद्दे रास्त आहेत.. आणि तरीही अशी अवेळी कामं करणार्‍या मुली अत्यल्प का होईना पण असतीलच..

मात्र उमेदीच्या काळात जास्त सवलती मिळणे आणि मागणे.. दोन्ही होऊ नयेच.. पण तसंही लग्न / बाळांतपण / मुल हे मुद्दे तसे बरेच नंतर येतात. तोवर सुरक्षा हा एक मुद्दा सोडला तर मुलींना तसा काही प्रॉब्लेम नसतो.
पण वरच्या प्रतिसादात "मुलींना(च) प्रॉब्लेम(च) असतात(च)" हे जे गृहितक आहे ते वादास्पद आहे. काम करणार्‍या मुली / काम न करणारे पुरुष अस्तित्वात नाहिचेत का? मग अशावेळेस सरसकट "टिम मध्ये मुली नकोच" हे कसं काय बुवा? लक्षात घ्या, असा अ‍ॅटिटुय्ड असणारे अनेक आहेत आणि त्याचा मुलींना काम करताना त्रास होतो. ह्यालाच पुर्वग्रह म्हणतात जो चांगल्या काम करणार्‍या मुलीलाही नैराश्य आणतो, अशा केसेस जवळुन पाहिल्या आहेत.
काम अजिबात न करणारे, घड्याळाच्या ठोक्यावर घरी जाणारे पुरुष असतात ना.. मग असे लोक जर तुमच्या हाताखाली आले तर डेडलाईन्सचे वांदे होणार नाहीत का?
थोडक्यात, इफिशिएन्सी हा व्यक्तिसापेक्ष मुद्दा आहे लिंगसापेक्ष नाही...

काळा पहाड's picture

13 Feb 2015 - 11:59 am | काळा पहाड

असा अ‍ॅटिटुय्ड असणारे अनेक आहेत आणि त्याचा मुलींना काम करताना त्रास होतो. ह्यालाच पुर्वग्रह म्हणतात जो चांगल्या काम करणार्‍या मुलीलाही नैराश्य आणतो, अशा केसेस जवळुन पाहिल्या आहेत.

पुन्हा तुम्ही फक्त मुलींच्या बाजूने पहाताय. मुलांच्या बाजूने पाहिलं तर मुलींना ज्यादा कन्सेशन्स दिले जातायत असं दिसत नाही का? बाकी एखाद्याला टाळणं हा अ‍ॅटिट्यूड असणं (जो मुख्यतः स्वतःचा त्रास टाळण्याकरिता असतो) आणि मुलींना त्रास देणं या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. मी ज्या टीम मध्ये काम केलंय त्यातल्या कुणालाही माझ्या पाठीमागे विचारलं तर हेच सांगतील की टीम मध्ये मदत (टेक्निकल, फंक्शनल बाबतीत) करण्याबाबतीत मी भेदभाव केलेला नाही. वर्क मॅनेजमेंट, वर्क-लाईफ बॅलन्स या गोष्टी तशाही मी मॅनेजर नसल्याने माझ्या कक्षात येत नाहीत. तुम्ही जे नैराश्य म्हणताय ते एखाद्याला एखाद्या गोष्टीसाठी सिलेक्ट न केल्यानं येत नाहीत कारण त्यांच्यासाठी हा काही एकच प्रोजेक्ट नसतो. दुसरं असं की टीम मोठी असेल (१००-२०० वगैरे) तर एखादीच नव्हे तर अशा चार पाच केसेस ही खपून जातात. जर टीम पाच सहा माणसांची असेल तर एखाद्या माणसाच्या कन्सेशन्स चा बाकीच्यांना त्रास होतोच.

हे अर्थातच प्रोजेक्ट वर अवलंबून असतं. आमच्या १० जणांच्या एका प्रोजेक्ट मध्ये १ च मुलगी अशी निवडली गेली जी लग्न न झालेली होती (आणि अन-ट्रेन्ड होती). दुसर्‍या अनुभवी मुलीचा ऑप्शन तिनं वर्क फ्रॉम होम (फक्त) केलेल्या मागणीनं (तिला दोन छोटी इन्फन्ट्स असल्यानं) सोडावा लागला. लक्षात घ्या, माझ्या फिल्ड मध्ये अनुभवी माणसाचा ऑप्शन नाकारणं म्हणजे मोठी गोष्ट आहे. अनुभवी माणसं मिळत नाहीत आम्हाला. टीम छोटी असल्यानं अशा व्यक्तीला घेण्याचं प्रोजेक्ट मॅनेजरनं साफ नाकारलं.

पिलीयन रायडर's picture

13 Feb 2015 - 12:37 pm | पिलीयन रायडर

तुम्हाला कन्सेशन मुळात "जादा" का वाटतात? अनाठायी का वाटतात? त्याची गरज नाही का आम्हाला? ज्या बाईला दोन तान्ही मुलं सांभाळायची आहेत तिला गरज नाही का ह्या सपोर्टची?

बरं तुमच्या प्रॉजेक्ट मॅनेजरने का नाकारलं ते मला माहित नाही कारण जपानच्या कंपनीसाठी भारतात शिफ्ट झाल्याने गेले २ वर्ष भारतातुन जपानसाठी काम करणारी स्त्री माहित आहे. तिलाही लहान मुल आहे. शेवती सगळ्या गोष्टी डेडिकेशन आणि कुवत ह्यावरच येतात. तुम्ही उदाहरण दिलेल्या छोट्या टीममधले सर्व जण लायक असतीलच कशावरुन? आणि जिला तुम्ही नाकारलत तिच्यामुळे तुम्हाला त्रास झालाच असता हे तरी कशावरुन? संधीच न देता कसं काय ठरवता? कदाचित त्या बाईला तुम्हाला सांभाळुन घ्यावं लागलं असतं, पण तरीही नवशिक्या व्यक्तिला घेण्याची रिस्क तुम्हाला सोपी वाटते..पण कुणाला थोडंफार सांभाळुन घ्यायची तयारी नसते.
आणि बरं त्या दोन तान्ह्या मुलांना वडीलही असतीलच.. आई कम करतेय म्हण्जे वडीलही ऑफिसला जात असतीलच.. पण बहुतांशी आईच "WFH" करताना दिसते. ह्याला कारणं काय हे तुम्हालाही माहित आहेच. जे तुमचे मॅनेजर्स / टिममेट्स / किंवा अगदी तुम्ही सुद्धा, रात्री - अपरात्री काम करता, उशिरा पर्यंत थांबता किंवा एकंदरीतच कामाला सर्वोच्च प्राधान्य देऊ शकता कारण तुमच्या मागे तुमचं घर कुणीतरी सांभाळतय.. खरं सांगा... त्याशिवाय एका माणसाला घर आणि ऑफिस दोन्ही तुम्ही म्हणताय त्या लेव्हलला काम करुन सांभाळणं ह्युमनली पॉसिबल नाही..
आता जे "कुणीतरी" तुमच्या मागे "तुमची" घरातली जबाबदारी सांभाळत आहे, ते स्वतः एखाद्या ऑफिसमध्ये काम करत असेल तर? तुमच्या समोर येणार्‍या स्त्रिया ह्या त्या "कुणितरी" आहेत.. त्यांचे नवरे असे "डेडिकेशन" नी काम करत आहेत कुठे तरी म्हणुन त्यांना कॉम्प्रमाईज करावं लागतय.. हीच परिस्थ्ती आहे, बहुतांश जागी.. म्हणुन तर कंपन्या ह्या सवलती देत आहेत ना..
तुम्ही सामाजिक मुद्दे आणि कंपनी वेगळी करु शकत नाही.. समाजमनाचे परिणाम कंपनीच्या धोरणांवर होणारच..

नगरीनिरंजन's picture

13 Feb 2015 - 12:25 am | नगरीनिरंजन

पेटल्या धाग्यावर तूप (सर्व मानवी व पाशवी शक्तींनी हलके घ्यावे किंवा कसेही):
आधुनिक स्त्रीची प्रतिज्ञा
भारत माझा देश आहे. पण माझा नवरा व मुले हेच माझे विश्व आहे. माझ्या कुटुंबाच्या कल्पनेवर माझे प्रेम आहे. माझ्या कुटुंबातल्या गरज असलेल्या वा नसलेल्या डबल इनकमचा मला अभिमान आहे. त्यावर बेतलेल्या स्त्रीस्वातंत्र्याच्या संकल्पनांची पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन. मी माझ्या शेजारणींचा, मैत्रिणींचा आणि कार्यालयातील सहकारिणींचा मत्सर करीन आणि प्रत्येकीशी स्पर्धा करेन. माझा पगार आणि माझे कुटुंबावरील नियंत्रण यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे. इतर नातेसंबंधांकडे दुर्लक्ष व स्वकमाईचा तोरा राखण्यासाठी इतरांची नोकरी करण्यातच माझे स्वातंत्र्य सामावले आहे.

स्पंदना's picture

13 Feb 2015 - 3:18 am | स्पंदना

अं हं नगरी। चुकताय तुम्ही। जेंव्हा आम्ही भारतात होतो आणि तेथून एखाद्या यूरोपियन वा अमेरिकन वा ऑस्सी ला फोन करायचा नवरा आफ्टर वर्क अवर्स तो कुणी जॉर्ज टॉम असयाचा तो कुरकुरायचा। माय फॅमिली टाइम म्हणायचा। अर्थात त्यांची ती फॅमिली आणि भारतियांचे ते नखरे असा सर्वमान्य समज असल्याने बोलण्यात अर्थच नाही। तरीही तुमच्या सारख्या संतुलित व्यक्तिकडून ही अपेक्षा नव्हती।

नगरीनिरंजन's picture

13 Feb 2015 - 4:11 am | नगरीनिरंजन

संतुलित आणि मी? :-)
माझंही तेच म्हणणे आहे. घरासाठी, स्वतःसाठी आणि मित्रसुहृदांसाठी भरपूर वेळ दिला पाहिजे. पण काहींना नोकरी करण्यातच स्वातंत्र्य आणि इतिकर्तव्यता वाटते; त्यांच्यासाठी आहे ती प्रतिज्ञा.

हे सारखं सारखं मध्यम वर्गीय / उच्च वर्गीय कुटुंबांच्या डबल इन्कम च्या नावानी का खडे फोडले जातात? कष्टकरी समाजात सुद्धा डबल इन्कमच असतो. त्यांना असते ती गरज आणि बाकीच्यांचा तो तोरा? पगाराच्या जोरावर कुटुंबावर नियंत्रण? शांतपणाने विचार केला तर या सरसकटीकरणातली चूक लक्षात येईल.

चिकित्सक's picture

13 Feb 2015 - 10:06 am | चिकित्सक

वर मांडलेल्या बर्‍याच मुद्द्यांशी अक्षर्ष: सहमत . हैदराबादी लोक बहुतांशी फेकर्स असतात असे अनुभवा वरुन सांगतो . हैदराबाद ला अश्या अनेक ट्रेनिंग इनस्टिट्यूट्स आहेत कि जे फेक एक्सपिरीयन्स सर्टिफिकेट पैशे घेऊन देतात . प्रत्येक कंपनी मध्ये ह्या हैदराबाड्यांचा गोड फादर असतो जो ह्यांना रेफर करून रेफरल बोनस मिळवतो. हे हायदराबादी कमी पैश्यांवर काम करायला तयार असतात व त्या मुळे एचआर सुद्धा ह्यांना प्रेफरेन्स देते . अश्या लोकांचे पितळ लवकरच उघडे पडते मात्र ह्यांचा गोड फादर जो डिळिवार्य मॅनेजर किंवा ऑनसाइट मॅनेजर असतो तो ह्यांना कवर उप करतो , मात्र जरी ह्यांना फायर केले तरी ह्यांना नवी नोकरी शोधण्यात अजिबात त्रास होत नाही कारण ह्यांचे नेटवर्क मजबूत असत . मराठी प्रोफेशनल्सनि ह्यातून शिकण्या सारख आहे .

बहुतांश मराठी/भारतीय मॅनेजर्स अत्यंत खत्रूड आणि तुटक असतात , राग नसावा पण हे अनुभवातून ओबसेर्व केल आहे आपल्याच लोकांना घालून पाडून बोलतात, शिवाए एस्कलेशन मॅनेज करणे जमत नाही , अश्या कॉल्स वर एंप्लायी ला बोलावून स्वत: ची कातडी वाचवण्या करता त्यांच्या कडून पुन्हा पुन्हा सपष्टीकरण मागितले जात .
ह्या प्रॉजेक्ट मॅनेजर्स ना प्लॅनिंग जमत नाही रात्री अपरात्री किवा वेकेशन्स वर असताना फोन करून पुन्हा पुन्हा तेच ते प्रश्न विचारणे असे प्रकार घडतात. विमॅन एंप्लायी ना सेनसिटिव्ली हॅंडल करण्याची गरज असते हे सुद्धा त्यांना जमत नाही जी शिवराल भाषा ते मेल एंप्लायीस शी बोलतांना वापरतात , तसेच रूड्ली ते विमान एंप्लायी शी वागतात.
क्लाइंट च्या समोर लाळ घोटे पणा करतात बहुधा क्लाइंट सोबत असलेल्या एस- ओ- डबलू च्या बाहेर जाऊन कमीटमेण्ट करतात कानी एंप्लायीस च्या पाठी मागे घोडा लावतात. काही वेड वाकड घडल तर वर सांगितल्या प्रमाणे रेस्पॉन्सिबिलिटी ओन करत नाही आणि फेल्यूर दुसरच्या माथी मारुन स्वत: ह्यातून निर्लज्ज सारखे बाहेर पडतात.

हे असे प्रॉजेक्ट मॅनेजर्स कधीही बिलेबल नसतात , तांत्रीक दृष्ट्या कमकुवत असतात म्हणून आयटी मध्ये काही वर्षे काढल्या नंतर प्रोसेस किंवा प्रॉजेक्ट मॅनेज्मेंट कडे वळतात . अशे मॅनेजर्स ऑर्गनाइज़ेशन वर भार असतात , गळे लत्थ पगार मिळवून ह्यांचे स्वत: चे काहीच आउटपुट नसत दुसर्यांचे केलेल्या कामाच क्रेडिट लाटतात ही लोक , म्हणून अश्या उंटवरून शेळ्या हाकनार्‍याणा सगळ्यात आधी फायर करायला हव .

चिकित्सक's picture

13 Feb 2015 - 10:55 am | चिकित्सक

आमचा एपलिकेशन सपोर्ट चा इनवेस्टमेंट बँकेचा प्रॉजेक्ट होता , सर्वात सीनियर टीम मेंबर आणि टेक्निकली स्ट्रॉंग असल्या मुळे माझे टीम मेट्स नेहमी मला अपरोच व्हयाचेत हे आमच्या नव्या टीम लीड ला आवड्याच नाही . स्टाफ औग प्रॉजेक्ट असल्या मुळे त्या टीम लीड ला सुद्धा बाकी मेंबर्ज़ प्रमाणे शिफ्ट मध्ये काम करायला सांगायचे . हे टीम लीड म्हणजे आपल्या कोकणातल 'रत्न' . टीम मध्ये नवीन असल्या मुळे क्लाइंट ने संगितलेल काम जमायच नाही महणून रात्री अपरात्री मला आणि विमन कलीग ना फोन कॉल्स , हीटेड डिस्कशन्स ! एक दोन डा ह्याला संगितल कि बाबा रे नालेज बेस मध्ये अश्या इवेंट्स , टिकेट्स चे एसोपी ऑलरेडी आहेत , आम्हाला रात्री- अपरात्री फोन करण्या अगोदर ते वाचत जा .

पण त्या वर प्रतिक्रिया शून्य . मग त्या टीम लीड ची इमेज पार पडली , क्लाइंट कॉल च्या वेळेस त्याला टेक्निकल एक्सप्लनेशन देण त्याला जमत नसे त्याला वैतागून क्लाइंट मला कॉल जॉइन करायला लावायचा आणि मी सांभाळून घ्यायचो.क्लाइंट मला अप्रीशियेट करायचा.
टीम लीड ला ह्या गोष्टी चा राग आला , त्याने नव्या डेलिवरी मॅनेजर ला माझ्या बद्दल नाही नाही ते उलट सुलट सांगितल .
मला वॉर्निंग देण्यात आली . माझ्या प्रॉजेक्ट मॅनेजर ला खरी सिचुयेशन माहिती होती तरी सुद्धा ह्या दीड शहण्या टीम लेड आणि डेलिवरी मॅनेजर पुढे त्याचा नाइलाज होता . मी ह्याला कंटाळून रिलीज मागितला तर म्हणे तू काही महिने काढ तुला ऑनसाइट देतो पण काहीच हाल चाल न झाल्याने परत रिलीस मागितल्यावर म्हणे तू क्रिटिकल रीसोर्स आहेस रीप्लेस्मेंट मिळे पर्यंत तू कंटिन्यू कर , तीन चार महिने असेच गेले आणि माझ लग्न ठरले परत ह्यांना रिलीज मागितल त्यांनी तीच टेप वाजवली , शेवटी मी त्यांना लागणा साठी ३ विक्स ची सुट्टी मागितली ती सुद्धा पॉलिसी म्हणून नाकारली , कॉंप ऑफ आणि वीकेंड जोडुन ६ दिवसाची सुट्टी मंजूर केली . मी ठरवल होत आता ह्या कंपनी तून बाहेर पडायच आणि त्या दृष्टीने हाल चाल सुरू केल्या होत्या . लग्नाच्या एक दिवसा नंतर जाय्निंग च्या एक दिवस आधी मला कलीग चा फोन आला कि टीम लीड ची बहीण तुझी रीप्लेस्मेंट म्हणून जॉइन होते आहे आणि डेलिवरी मॅनेजर नि तुला फायर करायचे ठरवल आहे म्हणून , प्रॉजेक्ट मॅनेजर नी खूप सांगून बघितल तरी ते ऐकेनात. खूप टेन्शन आल , बायको आणि घरच्यांना सांगून आणखी टेन्षन देण्याचा प्रश्नच नव्हता. आमच्या क्लाइंट मॅनेजर ला ही गोष्ट कुठून तरी कळली त्याने लगेच मला क्लाइंट कंपनी ला जॉइन होण्याचा ऑफर रिलीस केला , चांगला पगार , वरची पोस्ट आणि मुख्य म्हणजे ह्या छ्प्री टीम लीड आणि डेलिवरी मॅनेजर ची जिर्वायला मिळणार म्हणून विशेष आनंद झाला. लगेच त्यांची ऑफर अक्सेप्ट केली आणि दुसर्या दिवशी ह्या कंपनीत रिज़ाइन करायला जॉईन झालो.
टीम लीड आणि डेलिवरी मॅनेजर ना ह्यातले काहीच माहीत नव्हत. मला बघून टीम लीड कुत्सित पणे हसून म्हणाला कि "तुझे इथले दिवस संपले " मी काहीही न म्हणता शांतपणे रेसिग्नेशन ची मेल त्याला , प्रॉजेक्ट मॅनेजर आणि डिलीवरी मॅनेजर ला पाठवली. लगेच मला मीटिंग चे बोलावणे आले , डिलिवेरय मॅनेजर झाल्या प्रकारला स्तब्ध होता , टीम लीड चा अक्षर्ष : जळफळाट झाला होता , मला २ महिन्याची नोटीस सर्व करायला सांगितला , मी त्यांना म्हणालो बाय आउट करायला म्हणून त्याला त्यांनी अर्थातच नकार दिला , मग क्लाइंट नी त्यांच्यावर प्रेशर टाकले आणि मोजून १४ दिवसात तेथून बाहेर पडलो.
क्लाइंट कंपनी ला जॉइन झाल्या झाल्या त्यांनी मला दुसर्या प्रॉजेक्ट वर सिंगापुर ला पाठवले . नंतर एक वर्षानी मला कळाल कि बरेचशे एस्कलेशन होऊन त्या टीम लीड ची आणि त्या डिलीवरी मॅनेजर ची कंपनीतून हाकालपट्टी झाली.

हाडक्या's picture

13 Feb 2015 - 4:20 pm | हाडक्या

सगळे ठिक..
आता आपण या प्रतिसादातले मराठी शब्द आणि जमल्यास देवनागरीतले आंग्ल शब्द मोजायचा खेळ खेळूयात का ?
जिंकणार्‍यास एक शतकी धागा भेट.. ;)

बाप्पू's picture

13 Feb 2015 - 7:50 pm | बाप्पू

* विषयाचा विचार केला तर थोडा अवांतर वाटेल. पण सांगावासा वाटला म्हणून हा किस्सा सांगतोय
आमच्या इथे पण पण असाच एक टीम लीड होता. कामाच्या बाबतीत म्हणाल तर विशेष असे काहीच येत नव्हते. जेम तेम नौलेज होते. जर काही मोठा इश्यू असेल तर मी आणि माझे २ टीममेट्स काम करायचो आणि हा मात्र फक्त बघत राहायचा. ह्या पठ्ठ्याला दरवेळी प्रत्येक कामाला बैक-अप लागायचा. वीकांत ला देखील काही काम आले तर हा कधीच एकटा ते सांभाळू शकत नसे. तर असा हा आमचा टीम लीड फक्त १५ वर्षे अनुभव आहे म्हणून आमच्या डोक्यावर कंपनी ने आणून बसवला होता. बाकी त्याची काहीच लायकी नव्हती. HR कडे पण याची तक्रार केली तरी काहीच फरक नाही. आमचे रेपोर्टिङ्ग याच्याकडे असल्याने कधीच आमचे अप्प्रिसल चांगले झाले नाही. प्रत्येक वेळी तेच " अरे मी चांगले रेटिंग दिले होते पण नंतर प्रोजेक्ट मैनेजर ने कमी केले असतील. जाऊदे रे असच चालते इथे. मला पण खूप कमी इन्क्रिमेंट मिळाली आहे "
एकदा मला त्याच्या a /c चा पासवर्ड मिळाला. म्हणल बघूया तरी या सायबाला पोसायला कंपनी किती पैसे खर्च करते ते. बघितल्यावर डोळे पांढरे व्हायची वेळ आली. आमच्या पगाराच्या चौपट पगार हा माणूस घेत होता. तोही कोणतेही काम न करता. आणि आम्ही केलेली कामे स्वतः केली आहेत असे सांगून कंपनी कडून २ दा भरघोस पगारवाढ देखील मिळवून घेतली होती.
पण हे सगळ बघून त्याला मनातल्या मनात शिव्या घालण्या व्यतिरिक्त काही करू पण शकत नव्हतो.
या नंतर आम्ही सगळ्यांनीच त्याला वाळीत टाकल्यासारखे वागणे सुरु केले. काही काम असेल तर स्पष्टपणे नकार देणे सुरु केले.
आता आपली डाळ शिजत नाही म्हणल्यावर याने २-३ महिन्यानंतर नाईट शिफ्ट टायमिंग चा त्रास होत आअहे म्हणून रेजाइन देऊन टाकले. ७-८ दिवसात ते अप्प्रुव झाले आणि आम्हाला सुटका मिळाली.
आता नवीन मैनेजेर खूप चांगले आणि फ्रेंडली आहेत. अप्प्रिसल कशाला म्हणतात ते आत्ता आम्हाला कळले. आणि आमच्या पगारात आता समाधानकारक वाढ झाली.

तर सांगायचा मुद्दा हा कि कंपनी देखील कधी कधी फक्त " अनुभव आहे " या सबबीखाली अश्या फुकट्या आणि नालायक लोक्कांना पोसत असते. यांना देखील फायर एक केले पाहिजे

चिकित्सक's picture

14 Feb 2015 - 10:57 am | चिकित्सक

ह्या अश्या फुकटे आणि नालायक टीम लीड , मॅनेजर्स पेक्षा क्लाइंट परवडले. कित्येकदा बघितल आहे आपल्या भारतीय टीम लीड , मॅनेजर्स एस्कलेशन झाल्या वर शेपटी ला आग लागल्या प्रमाणे पळत सुटतात आरडा ओरड करून कुणाला इंप्लिकेट करता येईल असे बघतात त्या विरुद्ध क्लाइंट चा कल इश्यू रिसॉल्व करण्यावर असतो , आणि टीम चे एफर्ट्स अप्रीशियेट करतात.
कुठले टेक्निकल इश्यूस आल्यावर टीम लीड , मॅनेजर ची ततपप होते आणि क्लाइंट नेमक अशयाच लोकांना शिव्या घालतात मात्र ह्यांना फार सा फर्क पडत नसावा.

हे टीमलीड,मॅनेजर कॉल वर मग आमच्या सारख्या सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट्स किवा टेक्निकल लीड ना शॉर्ट नोटीस वर पाचारण करतात आणि पुढचा मागचा काहीही बॅकग्राउंड न सांगता क्लाइंट च्या देखात आरडा ओरडा करतात.

ह्यांची अपेक्षा असते कि एण्ड टू एण्ड अनॅलिसिस आम्ही करायचे आणि तेच अनॅलिसिस कॉपी पेस्ट करून क्लाइंट ला पाठवू बघतात. एकदा असाच प्रकार घडला होता , मी अनॅलिसिस क्लाइंट ला पाठवला आणि टीम लीड , मॅनेजर ला कॉपी केल , त्या बद्दल मला ह्या टीम लीड आणि मॅनेजर नी तंबी दिली कि आमच्याकडून रिव्यू न करव्ता कसा काय तू मेल पाठवला , गंमत म्हणजे त्याच मेल मध्ये क्लाइंट नि मला अप्रीशियेट केल तेव्हा ह्यांचे तोंड बघण्या सारखे झाले होते .

गौरी लेले's picture

13 Feb 2015 - 2:58 pm | गौरी लेले

आई गं !

ज्या मुलीला फायर केले तिचे तर करीयरच उध्वस्त झाले असणार ह्या विचाराने कसेसेच झाले :(

म्हणजे फेक रेझ्युमे वगैरे गेलं खड्ड्यात. आणि अशा खोटारड्या व्यक्तीबद्दलचा कळवळा मात्र येतोय. हेच जर तो मुलगा असता तर कशा प्रतिक्रिया आल्या असत्या हे पाहणे रोचक ठरावे.

टवाळ कार्टा's picture

13 Feb 2015 - 4:22 pm | टवाळ कार्टा

१००??? ;)

बाप्पू's picture

13 Feb 2015 - 7:51 pm | बाप्पू

बॅटमॅन +१

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

14 Feb 2015 - 2:22 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

सहमत. इथे चायला जेन्युइन सर्टिफिकेशन वाले लायक लोक्स रहातात बेरोजगार..ह्या अश्या फेकाडचंदांची कशाला पर्वा करायची. तिला अक्कल हवी होती ना आधी असा कारभार करायच्या आधी.

काळा पहाड's picture

13 Feb 2015 - 4:56 pm | काळा पहाड

बघा ना हो काय तरी दिवस आले. अशा चोरांना आणि खोटी अ‍ॅलिगेशन्स करणार्‍यांना काढून टाकायचं म्हणजे फारच झालं. कलियुग आहे कलियुग.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

14 Feb 2015 - 2:22 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

=))

वर दोघांनी सर्वच टीम लीड आणि मॅनेजरना फुकटे म्हणून टीकेचं धनी केलेलं दिसतं आहे. दुसरं कुणी हे कंफर्म करू शकेल का, की ही परीस्थिती प्रातिनिधीक आहे किंवा कसे?

अत्रन्गि पाउस's picture

14 Feb 2015 - 2:33 pm | अत्रन्गि पाउस

सासू सुने सारखे आहे ...
म्हणजे सासू सून असतांनाचे दिवस विसरते आणि सून सासू झाली कि तेच वागते ...

किंवा क्रिकेट सारखे म्हणूयात कि समालोचकाच्या खोलीत बसून मैदानावर खेळणाऱ्या फलंदाजाने अमुक चेंडू तमुक प्रकारे खेळायला हवा किंवा गोलंदाजाने आता फिल्डिंग अशी लावावी वगैरे बोलणे ठीक असते पण तिथे खेळणाऱ्या खेळाडूला जे 'फेस' करावे लागते ते तोच करू जाणे

एका शब्दात सांगायचे तर मिड्ल मानेजमेंट म्हणजे 'मृदुंग' झालेला असतो ..

*lol*