Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by अत्रन्गि पाउस on Tue, 02/10/2015 - 22:13
इंटर्विह्यू धाग्यावर फायर कारणे ह्या विषयी उल्लेख होता म्हणून हा धागा... एक अत्यंत अप्रिय असे हे कर्तव्य असते परंतु बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये अतिशय कॉमन गोष्ट ... माझ्या आयुष्यातील ह्या बाबतीतील काही ठळक आठवणी ... १. ऑन साईट कस्टमर कम्प्लेंट माझ्या टीम मधली एक मुलगी कस्टमर साईट वर काम शिकत होती (transition)..शिकतांना ती विचारत असलेल्या प्रश्नांनी कस्टमर अस्वस्थ झाला ..इतके बेसिक प्रश्न म्हणजे तिला फार टेक्निकल नॉलेज नाही असे लक्षात आले ..परंतु मी इथे इंडियात ती तिथे परदेशी ...तत्काळ परदेशी असलेल्या दुसर्या मानेजर(माझ्या मित्राला) ला एक क़्विक असीस्मेंत करायला सांगितले ..कस्टमर बरोबर होता आणि आमची चूक होती..तिला रातोरात टिकेट बुक करून काही अर्जंट काम आहे असे सांगून बोलावून घेतले .. बाकीचे ४०-४५ जण परदेशात होते त्यांना त्यांच्या लेव्हल नुसार माहिती दिली आणि त्यांचे मोरल एनशुअर केले .. आता मुख्य काम ती इथे आल्यावर सगळ्यात पहिले तिची रिप्लेसमेंट (कम्प्लेंट आल्या पासून ७२ तासात) कस्टमरला देऊन काम पुढे चालू केले त्यामुळे प्रोजेक्ट सुरळीत सुरु राहिले आणि कस्टमर कोन्फिडन्स राखला तिला पहिल्यांदा कस्टमर feedback स्पष्टपणे सांगितला ..तिचे पुन:मुल्यांकन होईल असे सांगितले २-३ दिवस वेग वेगळ्या टेक्निकल सिनियर्स कडून तिचे असेसमेंट केले आणि सर्व मुल्यांकन तिच्या समोर लिखित स्वरुपात ठेवले ..शेवटी तिच्या माहितीची पुन्हा छाननी करून घेतली ... आता असे लक्षात आले कि तिचा मूळ रेझ्युमेच फेक होता ...आता एच आर ला ह्यात ओढले ...सिस्टीमटिकली तिला १ महिना सुधारण्याची संधी दिली त्यात तिने कोणतेही एक काम नीटस पणे संपूर्ण जबाबदारी घेऊन करण्याची जबाबदारी टाकली ह्या सगळ्या महिन्यात संपूर्णपणे वेगळे लोक तिच्याशी डील करीत होते (पूर्वग्रह रहित कार्यवाही साठी)..अपेक्षेप्रमाणे ती काहीहि करू शकली नाही तेव्हा तिला एच आर ने समोर बोलावून राजीनामा किंवा बडतर्फी असे २ पर्याय ठेवले ..आणि साहजिक राजीनामा पर्याय निवडल्यावर अक्षरश: १ तासात तिला रिलीव्ह केले .. ह्या संपूर्ण प्रकरणात मी मनेजर असल्याने माझ्यावर व्यक्तिगत आरोप करण्याचा प्रयत्न झाला परंतु माझी वरिष्ठ एक स्त्री होती ती स्वत: आणि टीम मधल्या बाकीच्या स्त्री पुरुषांनी माझ्या मागे खंबीर उभे राहून जोरदार पाठींबा दिल्याने एच आर पुढे त्या मुलीचे काही चालले नाही... परंतु हे एक सव्वा महिना मी प्रचंड मानसिक अस्वस्थ्यातून घालवले पण शेवटी पार पडले सगळे सुखरूप...पण एक महत्वाची जबाबदारी यशस्वी पणे पार पडल्याबद्दल पाठ थोपटली गेली ... ...क्रमश: ???
  • Log in or register to post comments
  • 30952 views
  • फायर एक करणे २
  • फायर एक करणे ३ (अंतिम)

Book traversal links for फायर ..एक करणे

  • फायर एक करणे २ ›

प्रतिक्रिया

Submitted by नगरीनिरंजन on Fri, 02/13/2015 - 04:11

In reply to अं हं नगरी। चुकताय तुम्ही। by स्पंदना

Permalink

संतुलित आणि मी?

संतुलित आणि मी? :-) माझंही तेच म्हणणे आहे. घरासाठी, स्वतःसाठी आणि मित्रसुहृदांसाठी भरपूर वेळ दिला पाहिजे. पण काहींना नोकरी करण्यातच स्वातंत्र्य आणि इतिकर्तव्यता वाटते; त्यांच्यासाठी आहे ती प्रतिज्ञा.
  • Log in or register to post comments

Submitted by गिरकी on Fri, 02/13/2015 - 13:20

In reply to पेटल्या धाग्यावर तूप (सर्व by नगरीनिरंजन

Permalink

हे सारखं सारखं मध्यम वर्गीय /

हे सारखं सारखं मध्यम वर्गीय / उच्च वर्गीय कुटुंबांच्या डबल इन्कम च्या नावानी का खडे फोडले जातात? कष्टकरी समाजात सुद्धा डबल इन्कमच असतो. त्यांना असते ती गरज आणि बाकीच्यांचा तो तोरा? पगाराच्या जोरावर कुटुंबावर नियंत्रण? शांतपणाने विचार केला तर या सरसकटीकरणातली चूक लक्षात येईल.
  • Log in or register to post comments

Submitted by चिकित्सक on Fri, 02/13/2015 - 10:06

Permalink

वर मांडलेल्या बर्‍याच

वर मांडलेल्या बर्‍याच मुद्द्यांशी अक्षर्ष: सहमत . हैदराबादी लोक बहुतांशी फेकर्स असतात असे अनुभवा वरुन सांगतो . हैदराबाद ला अश्या अनेक ट्रेनिंग इनस्टिट्यूट्स आहेत कि जे फेक एक्सपिरीयन्स सर्टिफिकेट पैशे घेऊन देतात . प्रत्येक कंपनी मध्ये ह्या हैदराबाड्यांचा गोड फादर असतो जो ह्यांना रेफर करून रेफरल बोनस मिळवतो. हे हायदराबादी कमी पैश्यांवर काम करायला तयार असतात व त्या मुळे एचआर सुद्धा ह्यांना प्रेफरेन्स देते . अश्या लोकांचे पितळ लवकरच उघडे पडते मात्र ह्यांचा गोड फादर जो डिळिवार्य मॅनेजर किंवा ऑनसाइट मॅनेजर असतो तो ह्यांना कवर उप करतो , मात्र जरी ह्यांना फायर केले तरी ह्यांना नवी नोकरी शोधण्यात अजिबात त्रास होत नाही कारण ह्यांचे नेटवर्क मजबूत असत . मराठी प्रोफेशनल्सनि ह्यातून शिकण्या सारख आहे . बहुतांश मराठी/भारतीय मॅनेजर्स अत्यंत खत्रूड आणि तुटक असतात , राग नसावा पण हे अनुभवातून ओबसेर्व केल आहे आपल्याच लोकांना घालून पाडून बोलतात, शिवाए एस्कलेशन मॅनेज करणे जमत नाही , अश्या कॉल्स वर एंप्लायी ला बोलावून स्वत: ची कातडी वाचवण्या करता त्यांच्या कडून पुन्हा पुन्हा सपष्टीकरण मागितले जात . ह्या प्रॉजेक्ट मॅनेजर्स ना प्लॅनिंग जमत नाही रात्री अपरात्री किवा वेकेशन्स वर असताना फोन करून पुन्हा पुन्हा तेच ते प्रश्न विचारणे असे प्रकार घडतात. विमॅन एंप्लायी ना सेनसिटिव्ली हॅंडल करण्याची गरज असते हे सुद्धा त्यांना जमत नाही जी शिवराल भाषा ते मेल एंप्लायीस शी बोलतांना वापरतात , तसेच रूड्ली ते विमान एंप्लायी शी वागतात. क्लाइंट च्या समोर लाळ घोटे पणा करतात बहुधा क्लाइंट सोबत असलेल्या एस- ओ- डबलू च्या बाहेर जाऊन कमीटमेण्ट करतात कानी एंप्लायीस च्या पाठी मागे घोडा लावतात. काही वेड वाकड घडल तर वर सांगितल्या प्रमाणे रेस्पॉन्सिबिलिटी ओन करत नाही आणि फेल्यूर दुसरच्या माथी मारुन स्वत: ह्यातून निर्लज्ज सारखे बाहेर पडतात. हे असे प्रॉजेक्ट मॅनेजर्स कधीही बिलेबल नसतात , तांत्रीक दृष्ट्या कमकुवत असतात म्हणून आयटी मध्ये काही वर्षे काढल्या नंतर प्रोसेस किंवा प्रॉजेक्ट मॅनेज्मेंट कडे वळतात . अशे मॅनेजर्स ऑर्गनाइज़ेशन वर भार असतात , गळे लत्थ पगार मिळवून ह्यांचे स्वत: चे काहीच आउटपुट नसत दुसर्यांचे केलेल्या कामाच क्रेडिट लाटतात ही लोक , म्हणून अश्या उंटवरून शेळ्या हाकनार्‍याणा सगळ्यात आधी फायर करायला हव .
  • Log in or register to post comments

Submitted by चिकित्सक on Fri, 02/13/2015 - 10:55

Permalink

माझा अनुभव

आमचा एपलिकेशन सपोर्ट चा इनवेस्टमेंट बँकेचा प्रॉजेक्ट होता , सर्वात सीनियर टीम मेंबर आणि टेक्निकली स्ट्रॉंग असल्या मुळे माझे टीम मेट्स नेहमी मला अपरोच व्हयाचेत हे आमच्या नव्या टीम लीड ला आवड्याच नाही . स्टाफ औग प्रॉजेक्ट असल्या मुळे त्या टीम लीड ला सुद्धा बाकी मेंबर्ज़ प्रमाणे शिफ्ट मध्ये काम करायला सांगायचे . हे टीम लीड म्हणजे आपल्या कोकणातल 'रत्न' . टीम मध्ये नवीन असल्या मुळे क्लाइंट ने संगितलेल काम जमायच नाही महणून रात्री अपरात्री मला आणि विमन कलीग ना फोन कॉल्स , हीटेड डिस्कशन्स ! एक दोन डा ह्याला संगितल कि बाबा रे नालेज बेस मध्ये अश्या इवेंट्स , टिकेट्स चे एसोपी ऑलरेडी आहेत , आम्हाला रात्री- अपरात्री फोन करण्या अगोदर ते वाचत जा . पण त्या वर प्रतिक्रिया शून्य . मग त्या टीम लीड ची इमेज पार पडली , क्लाइंट कॉल च्या वेळेस त्याला टेक्निकल एक्सप्लनेशन देण त्याला जमत नसे त्याला वैतागून क्लाइंट मला कॉल जॉइन करायला लावायचा आणि मी सांभाळून घ्यायचो.क्लाइंट मला अप्रीशियेट करायचा. टीम लीड ला ह्या गोष्टी चा राग आला , त्याने नव्या डेलिवरी मॅनेजर ला माझ्या बद्दल नाही नाही ते उलट सुलट सांगितल . मला वॉर्निंग देण्यात आली . माझ्या प्रॉजेक्ट मॅनेजर ला खरी सिचुयेशन माहिती होती तरी सुद्धा ह्या दीड शहण्या टीम लेड आणि डेलिवरी मॅनेजर पुढे त्याचा नाइलाज होता . मी ह्याला कंटाळून रिलीज मागितला तर म्हणे तू काही महिने काढ तुला ऑनसाइट देतो पण काहीच हाल चाल न झाल्याने परत रिलीस मागितल्यावर म्हणे तू क्रिटिकल रीसोर्स आहेस रीप्लेस्मेंट मिळे पर्यंत तू कंटिन्यू कर , तीन चार महिने असेच गेले आणि माझ लग्न ठरले परत ह्यांना रिलीज मागितल त्यांनी तीच टेप वाजवली , शेवटी मी त्यांना लागणा साठी ३ विक्स ची सुट्टी मागितली ती सुद्धा पॉलिसी म्हणून नाकारली , कॉंप ऑफ आणि वीकेंड जोडुन ६ दिवसाची सुट्टी मंजूर केली . मी ठरवल होत आता ह्या कंपनी तून बाहेर पडायच आणि त्या दृष्टीने हाल चाल सुरू केल्या होत्या . लग्नाच्या एक दिवसा नंतर जाय्निंग च्या एक दिवस आधी मला कलीग चा फोन आला कि टीम लीड ची बहीण तुझी रीप्लेस्मेंट म्हणून जॉइन होते आहे आणि डेलिवरी मॅनेजर नि तुला फायर करायचे ठरवल आहे म्हणून , प्रॉजेक्ट मॅनेजर नी खूप सांगून बघितल तरी ते ऐकेनात. खूप टेन्शन आल , बायको आणि घरच्यांना सांगून आणखी टेन्षन देण्याचा प्रश्नच नव्हता. आमच्या क्लाइंट मॅनेजर ला ही गोष्ट कुठून तरी कळली त्याने लगेच मला क्लाइंट कंपनी ला जॉइन होण्याचा ऑफर रिलीस केला , चांगला पगार , वरची पोस्ट आणि मुख्य म्हणजे ह्या छ्प्री टीम लीड आणि डेलिवरी मॅनेजर ची जिर्वायला मिळणार म्हणून विशेष आनंद झाला. लगेच त्यांची ऑफर अक्सेप्ट केली आणि दुसर्या दिवशी ह्या कंपनीत रिज़ाइन करायला जॉईन झालो. टीम लीड आणि डेलिवरी मॅनेजर ना ह्यातले काहीच माहीत नव्हत. मला बघून टीम लीड कुत्सित पणे हसून म्हणाला कि "तुझे इथले दिवस संपले " मी काहीही न म्हणता शांतपणे रेसिग्नेशन ची मेल त्याला , प्रॉजेक्ट मॅनेजर आणि डिलीवरी मॅनेजर ला पाठवली. लगेच मला मीटिंग चे बोलावणे आले , डिलिवेरय मॅनेजर झाल्या प्रकारला स्तब्ध होता , टीम लीड चा अक्षर्ष : जळफळाट झाला होता , मला २ महिन्याची नोटीस सर्व करायला सांगितला , मी त्यांना म्हणालो बाय आउट करायला म्हणून त्याला त्यांनी अर्थातच नकार दिला , मग क्लाइंट नी त्यांच्यावर प्रेशर टाकले आणि मोजून १४ दिवसात तेथून बाहेर पडलो. क्लाइंट कंपनी ला जॉइन झाल्या झाल्या त्यांनी मला दुसर्या प्रॉजेक्ट वर सिंगापुर ला पाठवले . नंतर एक वर्षानी मला कळाल कि बरेचशे एस्कलेशन होऊन त्या टीम लीड ची आणि त्या डिलीवरी मॅनेजर ची कंपनीतून हाकालपट्टी झाली.
  • Log in or register to post comments

Submitted by हाडक्या on Fri, 02/13/2015 - 16:20

In reply to माझा अनुभव by चिकित्सक

Permalink

सगळे ठिक..

सगळे ठिक.. आता आपण या प्रतिसादातले मराठी शब्द आणि जमल्यास देवनागरीतले आंग्ल शब्द मोजायचा खेळ खेळूयात का ? जिंकणार्‍यास एक शतकी धागा भेट.. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by बाप्पू on Fri, 02/13/2015 - 19:50

In reply to माझा अनुभव by चिकित्सक

Permalink

आमच्या इथे पण पण

* विषयाचा विचार केला तर थोडा अवांतर वाटेल. पण सांगावासा वाटला म्हणून हा किस्सा सांगतोय आमच्या इथे पण पण असाच एक टीम लीड होता. कामाच्या बाबतीत म्हणाल तर विशेष असे काहीच येत नव्हते. जेम तेम नौलेज होते. जर काही मोठा इश्यू असेल तर मी आणि माझे २ टीममेट्स काम करायचो आणि हा मात्र फक्त बघत राहायचा. ह्या पठ्ठ्याला दरवेळी प्रत्येक कामाला बैक-अप लागायचा. वीकांत ला देखील काही काम आले तर हा कधीच एकटा ते सांभाळू शकत नसे. तर असा हा आमचा टीम लीड फक्त १५ वर्षे अनुभव आहे म्हणून आमच्या डोक्यावर कंपनी ने आणून बसवला होता. बाकी त्याची काहीच लायकी नव्हती. HR कडे पण याची तक्रार केली तरी काहीच फरक नाही. आमचे रेपोर्टिङ्ग याच्याकडे असल्याने कधीच आमचे अप्प्रिसल चांगले झाले नाही. प्रत्येक वेळी तेच " अरे मी चांगले रेटिंग दिले होते पण नंतर प्रोजेक्ट मैनेजर ने कमी केले असतील. जाऊदे रे असच चालते इथे. मला पण खूप कमी इन्क्रिमेंट मिळाली आहे " एकदा मला त्याच्या a /c चा पासवर्ड मिळाला. म्हणल बघूया तरी या सायबाला पोसायला कंपनी किती पैसे खर्च करते ते. बघितल्यावर डोळे पांढरे व्हायची वेळ आली. आमच्या पगाराच्या चौपट पगार हा माणूस घेत होता. तोही कोणतेही काम न करता. आणि आम्ही केलेली कामे स्वतः केली आहेत असे सांगून कंपनी कडून २ दा भरघोस पगारवाढ देखील मिळवून घेतली होती. पण हे सगळ बघून त्याला मनातल्या मनात शिव्या घालण्या व्यतिरिक्त काही करू पण शकत नव्हतो. या नंतर आम्ही सगळ्यांनीच त्याला वाळीत टाकल्यासारखे वागणे सुरु केले. काही काम असेल तर स्पष्टपणे नकार देणे सुरु केले. आता आपली डाळ शिजत नाही म्हणल्यावर याने २-३ महिन्यानंतर नाईट शिफ्ट टायमिंग चा त्रास होत आअहे म्हणून रेजाइन देऊन टाकले. ७-८ दिवसात ते अप्प्रुव झाले आणि आम्हाला सुटका मिळाली. आता नवीन मैनेजेर खूप चांगले आणि फ्रेंडली आहेत. अप्प्रिसल कशाला म्हणतात ते आत्ता आम्हाला कळले. आणि आमच्या पगारात आता समाधानकारक वाढ झाली. तर सांगायचा मुद्दा हा कि कंपनी देखील कधी कधी फक्त " अनुभव आहे " या सबबीखाली अश्या फुकट्या आणि नालायक लोक्कांना पोसत असते. यांना देखील फायर एक केले पाहिजे
  • Log in or register to post comments

Submitted by चिकित्सक on Sat, 02/14/2015 - 10:57

In reply to आमच्या इथे पण पण by बाप्पू

Permalink

फुकटे टीम लीड , मॅनेजर्स

ह्या अश्या फुकटे आणि नालायक टीम लीड , मॅनेजर्स पेक्षा क्लाइंट परवडले. कित्येकदा बघितल आहे आपल्या भारतीय टीम लीड , मॅनेजर्स एस्कलेशन झाल्या वर शेपटी ला आग लागल्या प्रमाणे पळत सुटतात आरडा ओरड करून कुणाला इंप्लिकेट करता येईल असे बघतात त्या विरुद्ध क्लाइंट चा कल इश्यू रिसॉल्व करण्यावर असतो , आणि टीम चे एफर्ट्स अप्रीशियेट करतात. कुठले टेक्निकल इश्यूस आल्यावर टीम लीड , मॅनेजर ची ततपप होते आणि क्लाइंट नेमक अशयाच लोकांना शिव्या घालतात मात्र ह्यांना फार सा फर्क पडत नसावा. हे टीमलीड,मॅनेजर कॉल वर मग आमच्या सारख्या सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट्स किवा टेक्निकल लीड ना शॉर्ट नोटीस वर पाचारण करतात आणि पुढचा मागचा काहीही बॅकग्राउंड न सांगता क्लाइंट च्या देखात आरडा ओरडा करतात. ह्यांची अपेक्षा असते कि एण्ड टू एण्ड अनॅलिसिस आम्ही करायचे आणि तेच अनॅलिसिस कॉपी पेस्ट करून क्लाइंट ला पाठवू बघतात. एकदा असाच प्रकार घडला होता , मी अनॅलिसिस क्लाइंट ला पाठवला आणि टीम लीड , मॅनेजर ला कॉपी केल , त्या बद्दल मला ह्या टीम लीड आणि मॅनेजर नी तंबी दिली कि आमच्याकडून रिव्यू न करव्ता कसा काय तू मेल पाठवला , गंमत म्हणजे त्याच मेल मध्ये क्लाइंट नि मला अप्रीशियेट केल तेव्हा ह्यांचे तोंड बघण्या सारखे झाले होते .
  • Log in or register to post comments

Submitted by गौरी लेले on Fri, 02/13/2015 - 14:58

Permalink

आई गं !

आई गं ! ज्या मुलीला फायर केले तिचे तर करीयरच उध्वस्त झाले असणार ह्या विचाराने कसेसेच झाले :(
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Fri, 02/13/2015 - 16:03

In reply to आई गं ! by गौरी लेले

Permalink

म्हणजे फेक रेझ्युमे वगैरे

म्हणजे फेक रेझ्युमे वगैरे गेलं खड्ड्यात. आणि अशा खोटारड्या व्यक्तीबद्दलचा कळवळा मात्र येतोय. हेच जर तो मुलगा असता तर कशा प्रतिक्रिया आल्या असत्या हे पाहणे रोचक ठरावे.
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Fri, 02/13/2015 - 16:22

In reply to म्हणजे फेक रेझ्युमे वगैरे by बॅटमॅन

Permalink

१००???

१००??? ;)
  • Log in or register to post comments

Submitted by बाप्पू on Fri, 02/13/2015 - 19:51

In reply to म्हणजे फेक रेझ्युमे वगैरे by बॅटमॅन

Permalink

+१

बॅटमॅन +१
  • Log in or register to post comments

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on Sat, 02/14/2015 - 14:22

In reply to म्हणजे फेक रेझ्युमे वगैरे by बॅटमॅन

Permalink

सहमत. इथे चायला जेन्युइन

सहमत. इथे चायला जेन्युइन सर्टिफिकेशन वाले लायक लोक्स रहातात बेरोजगार..ह्या अश्या फेकाडचंदांची कशाला पर्वा करायची. तिला अक्कल हवी होती ना आधी असा कारभार करायच्या आधी.
  • Log in or register to post comments

Submitted by काळा पहाड on Fri, 02/13/2015 - 16:56

In reply to आई गं ! by गौरी लेले

Permalink

बघा ना हो काय तरी दिवस आले.

बघा ना हो काय तरी दिवस आले. अशा चोरांना आणि खोटी अ‍ॅलिगेशन्स करणार्‍यांना काढून टाकायचं म्हणजे फारच झालं. कलियुग आहे कलियुग.
  • Log in or register to post comments

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on Sat, 02/14/2015 - 14:22

In reply to बघा ना हो काय तरी दिवस आले. by काळा पहाड

Permalink

(No subject)

=))
  • Log in or register to post comments

Submitted by असंका on Sat, 02/14/2015 - 11:11

Permalink

वर दोघांनी सर्वच टीम लीड आणि

वर दोघांनी सर्वच टीम लीड आणि मॅनेजरना फुकटे म्हणून टीकेचं धनी केलेलं दिसतं आहे. दुसरं कुणी हे कंफर्म करू शकेल का, की ही परीस्थिती प्रातिनिधीक आहे किंवा कसे?
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रन्गि पाउस on Sat, 02/14/2015 - 14:33

In reply to वर दोघांनी सर्वच टीम लीड आणि by असंका

Permalink

ते कसं आहे कि

सासू सुने सारखे आहे ... म्हणजे सासू सून असतांनाचे दिवस विसरते आणि सून सासू झाली कि तेच वागते ... किंवा क्रिकेट सारखे म्हणूयात कि समालोचकाच्या खोलीत बसून मैदानावर खेळणाऱ्या फलंदाजाने अमुक चेंडू तमुक प्रकारे खेळायला हवा किंवा गोलंदाजाने आता फिल्डिंग अशी लावावी वगैरे बोलणे ठीक असते पण तिथे खेळणाऱ्या खेळाडूला जे 'फेस' करावे लागते ते तोच करू जाणे एका शब्दात सांगायचे तर मिड्ल मानेजमेंट म्हणजे 'मृदुंग' झालेला असतो .. *lol*
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com