एका गावात एक शेतकरी राहतं होता.
त्याने वारकरी पंथाची दीक्षा घेतली व माळकरी झाला.
व त्याने एक नेम घरला तो असा की सकाळी उठायचे अंघोळ करून बुक्क्याचा टिळा लावायचा देवपूजा करून हरीपाठाच्या निदान ४ ओळी वाचायच्या व मग न्याहरी इत्यादी.करून शेतात जायचे....
त्याच्या शेजारी जो रहात असतो तो चंगीभंगी व खाणारा पिणा~यातला असतो...
त्याला हि गोष्ट समजते तेंव्हा तो शेतकरी बुवाकडे जातो व नेम/नियम म्हणजे काय असे विचारतो.
त्यावर बुवा सांगतात की कोणतीही गोष्ट नियमाने करणे,,,
त्याने काय होते?
मन शांत राहते..मनात भक्तिभाव जागतो..मनासारखे होते..बुवा उत्तरले.
शेजारी घरी येतो व विचार करु लागतो,,पण त्याला देवपूजा आदी शक्य नसल्याने तो एक नेम करतो की रोज शेतकरी बुवांना बघितल्या शिवाय चहा नाश्ता आदी सकाळची कामे करायची नाहीत..
बुवा रोज ९-९.१५ ला शेतावर निघाले की शेजारी खिडकीतून त्यांना बघायचा व मग आपली कामे सुरू करायचा
असे बरेच दिवस नित्य नियमाने चालले असते.
एके दिवशी १० वाजतात तरी बुवा दिसत नाही व शेजारी काळजीत पडतो..ाज आपला नेम मोडणार तर नाही ना अशी काळजी त्याला लागते वकदाचित बरे नसावे अशी शंका येऊन तो घरी त्यांना बघण्या साठी जातो..पण पत्नी सांगते की आज शेतावर जास्त काम असल्याने ते सकाळी च ८ वाजता शेतावर गेले.
शेतकरी बुवांना बघण्याचा नियम असल्याने शेजारी तसाच शेताकडे निघतो..
इकडे तो शेतकरी शेतात कुदळाने खणत असताना त्याला एक धनाचा हंडा सापडतो..व तो आनंदतो..व कुणी पाहतं तर नाही ना म्हणून इकडे तिकडे बघत असताना त्याला शेजारी दिसतो..व तो चपापतो व खुणेने काय असे विचारतो..
त्यावर शेजारी त्याला सांगतो की" बघायला आलो होतो बघितले" असे म्हणून शेजारी निघून जातो..
मात्र शेतक~याला वाटते की याने आपल्याला तो हंडा खोदताना बघितले असावे ..पण शेजारी मात्र नित्य नियमाप्रमाणे त्याला फक्त बघायला आलेला असतो.
सायंकाळी शेतकरी तो हंडा लपवुन घरी आणतो..मात्र त्याला भिति असते ती शेजा~याची कि हा कुठे तरी तोंड उघडणार याची..
त्यावर उपाय म्हणुन तो धनाचा २५% भाग बाजुस काढतो ति पेटी घेवुन शेजा~या कडे जातो व त्याला देतो..व कुठे याची वाच्यता करु नकोस असे सांगतो..शेजा~यास काय प्रकार तो कळतच नाहि पण धन मिळाले आता गप्प रहायचे एव्हढेच त्याला कळ्ते
दोघेहे एक गोष्ट नित्य नियमाने करत असतात व त्याचा दोघांनाही फायदा होतो..
प्रतिक्रिया
29 Aug 2014 - 10:30 pm | धर्मराजमुटके
अहो ! चंपतंत्रातील किंवा चांदोबातील कथा लिहील्यावर त्याचे तात्पर्य ही लिहित चला साहेब ! :)
अवांतर : चंपतंत्र = पंचतंत्र !
29 Aug 2014 - 10:42 pm | विलासराव
मीही करतो आता नित्यनेमाला/नित्यनियमाला सुरवात.
29 Aug 2014 - 11:33 pm | आदूबाळ
सायंकाळी शेतकरी तो हंडा लपवुन घरी आणतो..मात्र त्याला भिति असते ती शेजा~याची कि हा कुठे तरी तोंड उघडणार याची..
त्यावर उपाय म्हणुन
तो शेजा-याचा मुडदा पाडतो. ते करताना तो पुरावे मागे सोडतो आणि पकडला जातो. पुढे त्याला खुनाबद्दल फाशी होते. खजिना सरकारजमा होतो.
29 Aug 2014 - 11:51 pm | मुक्त विहारि
तो शेजार्याला बाहेर बोलावतो आणि त्याचा मुडदा पाडतो.
आणि इंग्लंडला पैसे घेवून इंग्लंडला जाणार्या बोटीत बसतो.बोटीवर वेळ जायला आणि काहीतरी काम शिकून घ्यावे म्हणून तो बोटीवरच्या सर्जनच्या हाताखाली काम करतो.
शारीरीक भूक भागवण्यासाठी तो प्रयत्न करतो, पण बोटीवरच्या वेश्या त्याला दूर लोटतात.म्हणून मग तो त्या वेश्यांचा लंडन पर्यंत पाठलाग करतो आणि त्या सगळ्या वेश्यांचे खून करतो.
पण तो कधीच पकडल्या जात नाही....
हाच तो आपला "जॅक द रीपर...."
30 Aug 2014 - 2:18 pm | विश्वनाथ मेहेंदळे
त्या बोटीचे नाव क्वीन मेरी होते.
30 Aug 2014 - 2:41 pm | बॅटमॅन
क्वीन तेरी? ऊफ्फ्फ ये नै हो सक्ता!!!!!!!
क्वीन मेरीच्च्च्च्च है आउर र्हैगी!!!!!
30 Aug 2014 - 4:56 pm | पोटे
:)
30 Aug 2014 - 11:45 pm | काळा पहाड
राम्गोपाल्वर्मा आता नक्कीच या स्टोरीवर आता शिनुमा बनवणार..
31 Aug 2014 - 12:38 am | संजय क्षीरसागर
31 Aug 2014 - 1:54 am | प्रभाकर पेठकर
त्याने वारकरी पंथाची दीक्षा घेतली व माळकरी झाला.
वारकरी पंथाची दिक्षा काय असते?
'तो शेतकरी शेतात कुदळाने खणत असताना त्याला एक धनाचा हंडा सापडतो..व तो आनंदतो..व कुणी पाहतं तर नाही ना म्हणून इकडे तिकडे बघत असताना त्याला शेजारी दिसतो.......मात्र त्याला भिति असते ती शेजा~याची कि हा कुठे तरी तोंड उघडणार याची..त्यावर उपाय म्हणुन तो धनाचा २५% भाग बाजुस काढतो ति पेटी घेवुन शेजा~या कडे जातो........'
ज्या धनावर आपला अधिकार नाही त्याचा मोह बाळगणे, शेजार्याने कुठे 'तोंड उघडू नये' म्हणून त्याला लाच रुपी हिस्सा देणे हे वारकरी संप्रदायाच्या शिकवणीत बसते काय?
कांही समजत नाही......
31 Aug 2014 - 2:52 pm | कवितानागेश
७८१ वाचने????
इथले सदस्य नित्यनेमानी आलेला प्रत्येक धागा वाचतात. त्याचा फायदा सर्वांनाच मिळतो. वाचनसंख्या वाढली की लेखक खुश, करमणूक झाली की सदस्य खुश. ;)