नित्य नियम
एका गावात एक शेतकरी राहतं होता.
त्याने वारकरी पंथाची दीक्षा घेतली व माळकरी झाला.
व त्याने एक नेम घरला तो असा की सकाळी उठायचे अंघोळ करून बुक्क्याचा टिळा लावायचा देवपूजा करून हरीपाठाच्या निदान ४ ओळी वाचायच्या व मग न्याहरी इत्यादी.करून शेतात जायचे....
त्याच्या शेजारी जो रहात असतो तो चंगीभंगी व खाणारा पिणा~यातला असतो...
त्याला हि गोष्ट समजते तेंव्हा तो शेतकरी बुवाकडे जातो व नेम/नियम म्हणजे काय असे विचारतो.
त्यावर बुवा सांगतात की कोणतीही गोष्ट नियमाने करणे,,,
त्याने काय होते?
मन शांत राहते..मनात भक्तिभाव जागतो..मनासारखे होते..बुवा उत्तरले.
शेजारी घरी येतो व विचार करु लागतो,,पण त्याला देवपूजा आदी शक्य नसल्याने तो एक नेम करतो की रोज शेतकरी बुवांना बघितल्या शिवाय चहा नाश्ता आदी सकाळची कामे करायची नाहीत..
बुवा रोज ९-९.१५ ला शेतावर निघाले की शेजारी खिडकीतून त्यांना बघायचा व मग आपली कामे सुरू करायचा
असे बरेच दिवस नित्य नियमाने चालले असते.
एके दिवशी १० वाजतात तरी बुवा दिसत नाही व शेजारी काळजीत पडतो..ाज आपला नेम मोडणार तर नाही ना अशी काळजी त्याला लागते वकदाचित बरे नसावे अशी शंका येऊन तो घरी त्यांना बघण्या साठी जातो..पण पत्नी सांगते की आज शेतावर जास्त काम असल्याने ते सकाळी च ८ वाजता शेतावर गेले.
शेतकरी बुवांना बघण्याचा नियम असल्याने शेजारी तसाच शेताकडे निघतो..
इकडे तो शेतकरी शेतात कुदळाने खणत असताना त्याला एक धनाचा हंडा सापडतो..व तो आनंदतो..व कुणी पाहतं तर नाही ना म्हणून इकडे तिकडे बघत असताना त्याला शेजारी दिसतो..व तो चपापतो व खुणेने काय असे विचारतो..
त्यावर शेजारी त्याला सांगतो की" बघायला आलो होतो बघितले" असे म्हणून शेजारी निघून जातो..
मात्र शेतक~याला वाटते की याने आपल्याला तो हंडा खोदताना बघितले असावे ..पण शेजारी मात्र नित्य नियमाप्रमाणे त्याला फक्त बघायला आलेला असतो.
सायंकाळी शेतकरी तो हंडा लपवुन घरी आणतो..मात्र त्याला भिति असते ती शेजा~याची कि हा कुठे तरी तोंड उघडणार याची..
त्यावर उपाय म्हणुन तो धनाचा २५% भाग बाजुस काढतो ति पेटी घेवुन शेजा~या कडे जातो व त्याला देतो..व कुठे याची वाच्यता करु नकोस असे सांगतो..शेजा~यास काय प्रकार तो कळतच नाहि पण धन मिळाले आता गप्प रहायचे एव्हढेच त्याला कळ्ते
दोघेहे एक गोष्ट नित्य नियमाने करत असतात व त्याचा दोघांनाही फायदा होतो..
वाचने
3945
वाचनखूण
प्रतिक्रिया
11
अहो !
मीही करतो आता नित्यनेमाला
सायंकाळी शेतकरी तो हंडा लपवुन
In reply to सायंकाळी शेतकरी तो हंडा लपवुन by आदूबाळ
आमचा पण थोडा शब्दभार...
In reply to आमचा पण थोडा शब्दभार... by मुक्त विहारि
त्या बोटीचे नाव क्वीन मेरी
In reply to त्या बोटीचे नाव क्वीन मेरी by विश्वनाथ मेहेंदळे
क्वीन तेरी? ऊफ्फ्फ ये नै हो
.
राम्गोपाल्वर्मा आता नक्कीच या
अवि, तुम्ही त्रिकालाबाधित सत्यच सांगितलंय !
वारकरी संप्रदायाची दिक्षा...?
७८१ वाचने????