मदत हवी आहे. ग्रंथालय अमेरिके मध्ये

सिद्धार्थ ४'s picture
सिद्धार्थ ४ in जनातलं, मनातलं
17 Jul 2014 - 12:39 am

नमस्कार लोकहो. गेली २ वर्ष मी अमेरिके मध्ये राहतो आहे. वाचनाच्या माझा छःअन्द मला स्वस्थ बसू देत नाही आहे. कृपया कोणाला अमेरिके मध्ये कोणी मराठी पुस्तकांचे ग्रंथालय चालवत असेल तर इथे कळवावे. माझे हे मिपा वरील पहिले लिखाण आहे, आणि गेल्या ५ वर्षा पासून मी मिपा चा सभासात आहे. इथले कमेंट्स मला पूर्ण माहिती आहेत तरीही daring करत आहे.

आपला लोभ असावा असे मी बिलकुल म्हणणार नाही कारण मला माहिती आहे के हे माझे लिखाण फाट्यावर मारले जाईल. तरीही प्लीज जमले तर मदत करा.

साहित्यिकमाहिती

प्रतिक्रिया

अमेरिकावासीय मिपाकर मदत करु शकतील. अमेरिकेत म्हणजे नक्की कोणत्या राज्यात?
तिथे मराठी मंडळ वगैरे असल्यास तिथे विचारा.

सिद्धार्थ ४'s picture

17 Jul 2014 - 12:50 am | सिद्धार्थ ४

नॉर्थ करोलिना. इथल्या मराठी मंडळात चौकशी केली पण कोणालाही माहिती नाही. :(

भृशुंडी's picture

17 Jul 2014 - 12:58 am | भृशुंडी

पब्लिक लायब्ररीत कधी कधी मराठी पुस्तकं असतात, तेव्हा तुमच्या इथल्या लायब्ररीच्या वेबसाईटवर पहा.
काहीच नाही मिळालं तर बूकगंगा झिंदाबाद!

रेवती's picture

17 Jul 2014 - 1:05 am | रेवती

माझ्या माहितीत वेगळ्या राज्यात एक मराठी फिरते पुस्तकालय होते पण आता ते चालवायला वेळ अपुरा पडू लागल्याने त्या लोकांनी बंद केले एका हामेरिकन लायब्ररीत हिंदी पुस्तके बरीच बघितली होती (म्हणजे पंचविसेक), मराठी नव्हती.

बर्कली, शिकागो, यू पेन इथल्या ग्रंथालयात, तसेच लायब्ररी ऑफ कॉंनग्रेस मधे मराठी व इतर भारतीय भाषांमधली, शेकडो- हजारो पुस्तके आहेत. या सर्वांचे कॅटलॉग्स ऑनलाइन आहेत, सर्चेबल आहेत. त्या कॅटॅलॉगच्या पानाची प्रत छापून दिल्यास तुमच्या इथल्या फ्री लायब्ररी तर्फे इंटर लायब्ररी लोन स्वरुपात मागवता येतील.

रेवती's picture

17 Jul 2014 - 1:25 am | रेवती

अरे वा! चांगली माहिती.

सिद्धार्थ ४'s picture

17 Jul 2014 - 2:40 am | सिद्धार्थ ४

प्लीज थोडे सविस्तर सांगा. इथे इंटर स्टेट पुस्तके मागवता येतात? माझ्या माहिती प्रमाणे इथील ग्रंथालय लोकल कंट्री चालवते आणि स्वयंभू असते.

ऑनलाइन कैट्लोग ची लिंक मिळेल का ?

शोनु - हे सगळीकडे शक्य आहे का याची खात्री नाही. तुम्ही लिंक दिली तर चेकवता येईल.
तसेच एका राज्यातील काही ग्रंथालयं एकमेकांना जोडलेली असतात, काही नसतात, त्यामुळे सगळीकडुनच लोन स्वरुपात मागवता येत नाही.
आमच्या इथल्या वेगवेगळ्या लोकल ग्रथांलयात काही मराठी पुस्तके आहेत. सगळीच चांगल्या प्रतीची म्हणता येत नाही काही भयानक प्रकारातही मोडतात. पंरतु काही वर्षांपूर्वी श्रावण मोडकांची तिढा मिळुन अतीव आनंद झाला होता, तिथल्या लायब्ररीअनशी बोलल्यावर त्यांनी ते बहुदा मुद्दाम ऑर्डर केले असावे असे तिचे म्हणणे होते (वेगळ्या विषयावरचे असल्याकारणाने).

स्वप्नांची राणी's picture

17 Jul 2014 - 2:28 am | स्वप्नांची राणी

बघा किती जणांचा लोभ आहे ना...स्वारी उगिच वाकड्यात शिरली. परत असं नाही हं बोलायचं गडे..!!!

सिद्धार्थ ४'s picture

17 Jul 2014 - 2:43 am | सिद्धार्थ ४

ताई परत नाही असे बोलणार. :( रागाऊ नका.

रेवती's picture

17 Jul 2014 - 8:04 pm | रेवती

हा हा. मेले!

मार्क ट्वेन's picture

17 Jul 2014 - 2:58 am | मार्क ट्वेन

www.dli.ernet.in
इथे हजारांनी ऑनलाईन मराठी पुस्तके आहेत.

खटपट्या's picture

17 Jul 2014 - 3:37 am | खटपट्या

जबरी लिन्क दिलीत राव !!!

लायब्ररी ऑफ काँग्रेस मधे भरपूर मराठी पुस्तके आहेत, हे ठाऊक आहे (पूर्वी दिल्लीत मी स्वतःही काही मराठी पुस्तकांची यादी देऊन ती आणवली होती) परंतु ती शोधून अमेरिकेतील आपल्या लोकल पब्लिक लायब्ररीत कशी मागवायची, याबद्दल माहिती कोणी काढल्यास ती इथे अवश्य द्यावी.

रमेश आठवले's picture

17 Jul 2014 - 4:21 am | रमेश आठवले

बृहन महाराष्ट्र मंडल ऑफ नॉर्थ अमेरिका यांची लिंक वर दिली आहे. त्यांना मेल पाठवून विचारा. त्यांचे पुढील वर्षाचे अधिवेशन लॉस एंजेलिस मध्ये जुलैत होणार आहे. त्या मध्ये चर्चेसाठी आपला विषय पाठवा. त्यावर चर्चा झाली तर अमेरिकेतील सर्व मराठी बांधवांचा फायदा होईल.

तन्वी अभ्यन्कर's picture

17 Jul 2014 - 11:43 am | तन्वी अभ्यन्कर

http://www.rasik.com/library/
ही अमेरिकेतील मराठी लायब्ररी आहे. घरपोच पुस्तके येतात व पोस्टाने परत पाठवायची असतात. माझ्या बहिणीला चांगला अनुभव आहे ह्यांचा.

सिद्धार्थ ४'s picture

17 Jul 2014 - 5:05 pm | सिद्धार्थ ४

खूप खूप आभारी आहे. साईट तर चांगली वाटत आहे. नक्की रजिस्टर करीन.

धमाल मुलगा's picture

17 Jul 2014 - 6:27 pm | धमाल मुलगा

हे ठाऊकच नव्हतं. चांगली माहिती!

काहीवेळा एखाद्या लोकल लायब्ररीत विचारण्यापेक्षा काउंटीची जी मुख्य लायब्ररी असेल तिथे विचारल्यास त्यांना जास्त माहिती असते.
माझ्या इथल्या लोकल लायब्ररीत मला नेहमीच मिळाली आहेत पुस्तके. मी लायब्ररी ऑफ कॉन्ग्रेसच्या कॅटलॉग मधले पान छापून लायब्रेरीयनला देते. २-३ आठवड्यात पुस्तक आले आहे, घेउन जा अशी इमेल येते.
युनिव्हरसिटी ऑफ पेन्सिल्व्हेनिया ऑनलाइन कॅटलॉग किंवा लायब्ररी ऑफ कॉन्ग्रेस ऑनलाइन कॅटलॉग असे शोधणे कठीण नाही अजिब्बात :-)

शोनू's picture

18 Jul 2014 - 1:46 am | शोनू

हे पान पहा . कॅटलॉग + शोध असे एकत्र आहे. गौरी देशपांडे यांच्या पुस्तकांची यादी आहे. अशी यादी छापून मला हवी असलेली पुस्तके मार्क करुन देते मी लायब्रेरियनला .

http://www.loc.gov/search/?q=deshpande+gauri&all=true&in=original-format...

सखी's picture

18 Jul 2014 - 4:43 pm | सखी

धन्यवाद शोनु, आमच्या स्थानिक ग्रंथालयात मी विचारले ह्या सर्विसबद्द्ल, तर त्यांनी ३-४ वर्षांपूर्वी बंद झाल्याचे सांगितले, खास करुन २००९च्या मंदीमुळे. तुम्ही भाग्यवान आहात पुस्तकांच्या बाबतीत, एन्जॉय :).

उपास's picture

18 Jul 2014 - 4:00 pm | उपास

रसिकची सोय उत्तम आहेच.
एन जे मध्ये महाराष्ट्र मंडळाची उत्तम मराठी लायब्ररी आहे, मी स्वतः सभासद होतो.

चामुंडराय's picture

13 Aug 2018 - 10:18 pm | चामुंडराय

या साईट वर बरीच पुस्तके आहेत.

स्मिता.'s picture

14 Aug 2018 - 1:44 am | स्मिता.

सिद्धार्थ, आपला धागा हायजॅक करतेय त्याबद्दल माफ करावे.

लंडनमधे कुठे मराठी लायब्ररी आहे का? सशुल्क असली तरी हरकत नाही.

सिद्धार्थ ४'s picture

14 Aug 2018 - 1:42 pm | सिद्धार्थ ४

तसेही अस्मादिक भारतात परत आले आहेत :)

चामुंडराय's picture

14 Aug 2018 - 4:03 am | चामुंडराय

बऱ्याच ठिकाणी कम्युनिटी मोठी असेल आणि वाचनालयाला विनंती केली तर मराठी पुस्तके उपलब्ध करून देतात.