✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मदत हवी आहे. ग्रंथालय अमेरिके मध्ये

स
सिद्धार्थ ४ यांनी
गुरुवार, 07/17/2014 - 00:39  ·  लेख
लेख
नमस्कार लोकहो. गेली २ वर्ष मी अमेरिके मध्ये राहतो आहे. वाचनाच्या माझा छःअन्द मला स्वस्थ बसू देत नाही आहे. कृपया कोणाला अमेरिके मध्ये कोणी मराठी पुस्तकांचे ग्रंथालय चालवत असेल तर इथे कळवावे. माझे हे मिपा वरील पहिले लिखाण आहे, आणि गेल्या ५ वर्षा पासून मी मिपा चा सभासात आहे. इथले कमेंट्स मला पूर्ण माहिती आहेत तरीही daring करत आहे. आपला लोभ असावा असे मी बिलकुल म्हणणार नाही कारण मला माहिती आहे के हे माझे लिखाण फाट्यावर मारले जाईल. तरीही प्लीज जमले तर मदत करा.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
साहित्यिक
लेखनप्रकार (Writing Type)
माहिती

प्रतिक्रिया द्या
6100 वाचन

💬 प्रतिसाद (27)

प्रतिक्रिया

अमेरिकावासीय मिपाकर मदत करु

यशोधरा
गुरुवार, 07/17/2014 - 00:44 नवीन
अमेरिकावासीय मिपाकर मदत करु शकतील. अमेरिकेत म्हणजे नक्की कोणत्या राज्यात? तिथे मराठी मंडळ वगैरे असल्यास तिथे विचारा.
  • Log in or register to post comments

नॉर्थ करोलिना. इथल्या मराठी

सिद्धार्थ ४
गुरुवार, 07/17/2014 - 00:50 नवीन
नॉर्थ करोलिना. इथल्या मराठी मंडळात चौकशी केली पण कोणालाही माहिती नाही. :(
  • Log in or register to post comments

पब्लिक लायब्ररीत कधी कधी

भृशुंडी
गुरुवार, 07/17/2014 - 00:58 नवीन
पब्लिक लायब्ररीत कधी कधी मराठी पुस्तकं असतात, तेव्हा तुमच्या इथल्या लायब्ररीच्या वेबसाईटवर पहा. काहीच नाही मिळालं तर बूकगंगा झिंदाबाद!
  • Log in or register to post comments

माझ्या माहितीत वेगळ्या

रेवती
गुरुवार, 07/17/2014 - 01:05 नवीन
माझ्या माहितीत वेगळ्या राज्यात एक मराठी फिरते पुस्तकालय होते पण आता ते चालवायला वेळ अपुरा पडू लागल्याने त्या लोकांनी बंद केले एका हामेरिकन लायब्ररीत हिंदी पुस्तके बरीच बघितली होती (म्हणजे पंचविसेक), मराठी नव्हती.
  • Log in or register to post comments

पब्लिक लायब्ररी मधून मागवता येतील

शोनू
गुरुवार, 07/17/2014 - 01:14 नवीन
बर्कली, शिकागो, यू पेन इथल्या ग्रंथालयात, तसेच लायब्ररी ऑफ कॉंनग्रेस मधे मराठी व इतर भारतीय भाषांमधली, शेकडो- हजारो पुस्तके आहेत. या सर्वांचे कॅटलॉग्स ऑनलाइन आहेत, सर्चेबल आहेत. त्या कॅटॅलॉगच्या पानाची प्रत छापून दिल्यास तुमच्या इथल्या फ्री लायब्ररी तर्फे इंटर लायब्ररी लोन स्वरुपात मागवता येतील.
  • Log in or register to post comments

अरे वा! चांगली माहिती.

रेवती
गुरुवार, 07/17/2014 - 01:25 नवीन
अरे वा! चांगली माहिती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शोनू

नाही कळले.

सिद्धार्थ ४
गुरुवार, 07/17/2014 - 02:40 नवीन
प्लीज थोडे सविस्तर सांगा. इथे इंटर स्टेट पुस्तके मागवता येतात? माझ्या माहिती प्रमाणे इथील ग्रंथालय लोकल कंट्री चालवते आणि स्वयंभू असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शोनू

ऑनलाइन कैट्लोग ची लिंक मिळेल

खटपट्या
गुरुवार, 07/17/2014 - 02:49 नवीन
ऑनलाइन कैट्लोग ची लिंक मिळेल का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शोनू

शोनु - हे सगळीकडे शक्य आहे का

सखी
गुरुवार, 07/17/2014 - 03:06 नवीन
शोनु - हे सगळीकडे शक्य आहे का याची खात्री नाही. तुम्ही लिंक दिली तर चेकवता येईल. तसेच एका राज्यातील काही ग्रंथालयं एकमेकांना जोडलेली असतात, काही नसतात, त्यामुळे सगळीकडुनच लोन स्वरुपात मागवता येत नाही. आमच्या इथल्या वेगवेगळ्या लोकल ग्रथांलयात काही मराठी पुस्तके आहेत. सगळीच चांगल्या प्रतीची म्हणता येत नाही काही भयानक प्रकारातही मोडतात. पंरतु काही वर्षांपूर्वी श्रावण मोडकांची तिढा मिळुन अतीव आनंद झाला होता, तिथल्या लायब्ररीअनशी बोलल्यावर त्यांनी ते बहुदा मुद्दाम ऑर्डर केले असावे असे तिचे म्हणणे होते (वेगळ्या विषयावरचे असल्याकारणाने).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शोनू

बघा किती जणांचा लोभ आहे ना..

स्वप्नांची राणी
गुरुवार, 07/17/2014 - 02:28 नवीन
बघा किती जणांचा लोभ आहे ना...स्वारी उगिच वाकड्यात शिरली. परत असं नाही हं बोलायचं गडे..!!!
  • Log in or register to post comments

आय माय सोर्रि

सिद्धार्थ ४
गुरुवार, 07/17/2014 - 02:43 नवीन
ताई परत नाही असे बोलणार. :( रागाऊ नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वप्नांची राणी

हा हा. मेले!

रेवती
गुरुवार, 07/17/2014 - 20:04 नवीन
हा हा. मेले!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वप्नांची राणी

www.dli.ernet.in

मार्क ट्वेन
गुरुवार, 07/17/2014 - 02:58 नवीन
www.dli.ernet.in इथे हजारांनी ऑनलाईन मराठी पुस्तके आहेत.
  • Log in or register to post comments

जबरी लिन्क दिलीत राव !!!

खटपट्या
गुरुवार, 07/17/2014 - 03:37 नवीन
जबरी लिन्क दिलीत राव !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्क ट्वेन

लायब्ररी ऑफ काँग्रेस मधील मराठी पुस्तके

चित्रगुप्त
गुरुवार, 07/17/2014 - 03:20 नवीन
लायब्ररी ऑफ काँग्रेस मधे भरपूर मराठी पुस्तके आहेत, हे ठाऊक आहे (पूर्वी दिल्लीत मी स्वतःही काही मराठी पुस्तकांची यादी देऊन ती आणवली होती) परंतु ती शोधून अमेरिकेतील आपल्या लोकल पब्लिक लायब्ररीत कशी मागवायची, याबद्दल माहिती कोणी काढल्यास ती इथे अवश्य द्यावी.
  • Log in or register to post comments

http://www.bmmonline.org/

रमेश आठवले
गुरुवार, 07/17/2014 - 04:21 नवीन
बृहन महाराष्ट्र मंडल ऑफ नॉर्थ अमेरिका यांची लिंक वर दिली आहे. त्यांना मेल पाठवून विचारा. त्यांचे पुढील वर्षाचे अधिवेशन लॉस एंजेलिस मध्ये जुलैत होणार आहे. त्या मध्ये चर्चेसाठी आपला विषय पाठवा. त्यावर चर्चा झाली तर अमेरिकेतील सर्व मराठी बांधवांचा फायदा होईल.
  • Log in or register to post comments

रसिक

तन्वी अभ्यन्कर
गुरुवार, 07/17/2014 - 11:43 नवीन
http://www.rasik.com/library/ ही अमेरिकेतील मराठी लायब्ररी आहे. घरपोच पुस्तके येतात व पोस्टाने परत पाठवायची असतात. माझ्या बहिणीला चांगला अनुभव आहे ह्यांचा.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

सिद्धार्थ ४
गुरुवार, 07/17/2014 - 17:05 नवीन
खूप खूप आभारी आहे. साईट तर चांगली वाटत आहे. नक्की रजिस्टर करीन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तन्वी अभ्यन्कर

व्वा!

धमाल मुलगा
गुरुवार, 07/17/2014 - 18:27 नवीन
हे ठाऊकच नव्हतं. चांगली माहिती!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तन्वी अभ्यन्कर

लोकल फ्री लायब्ररीत विचारुन तर पहा

शोनू
Fri, 07/18/2014 - 01:33 नवीन
काहीवेळा एखाद्या लोकल लायब्ररीत विचारण्यापेक्षा काउंटीची जी मुख्य लायब्ररी असेल तिथे विचारल्यास त्यांना जास्त माहिती असते. माझ्या इथल्या लोकल लायब्ररीत मला नेहमीच मिळाली आहेत पुस्तके. मी लायब्ररी ऑफ कॉन्ग्रेसच्या कॅटलॉग मधले पान छापून लायब्रेरीयनला देते. २-३ आठवड्यात पुस्तक आले आहे, घेउन जा अशी इमेल येते. युनिव्हरसिटी ऑफ पेन्सिल्व्हेनिया ऑनलाइन कॅटलॉग किंवा लायब्ररी ऑफ कॉन्ग्रेस ऑनलाइन कॅटलॉग असे शोधणे कठीण नाही अजिब्बात :-)
  • Log in or register to post comments

उदाहरण

शोनू
Fri, 07/18/2014 - 01:46 नवीन
हे पान पहा . कॅटलॉग + शोध असे एकत्र आहे. गौरी देशपांडे यांच्या पुस्तकांची यादी आहे. अशी यादी छापून मला हवी असलेली पुस्तके मार्क करुन देते मी लायब्रेरियनला . http://www.loc.gov/search/?q=deshpande+gauri&all=true&in=original-format%3Abook&st=list
  • Log in or register to post comments

धन्यवाद

सखी
Fri, 07/18/2014 - 16:43 नवीन
धन्यवाद शोनु, आमच्या स्थानिक ग्रंथालयात मी विचारले ह्या सर्विसबद्द्ल, तर त्यांनी ३-४ वर्षांपूर्वी बंद झाल्याचे सांगितले, खास करुन २००९च्या मंदीमुळे. तुम्ही भाग्यवान आहात पुस्तकांच्या बाबतीत, एन्जॉय :).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शोनू

रसिक..

उपास
Fri, 07/18/2014 - 16:00 नवीन
रसिकची सोय उत्तम आहेच. एन जे मध्ये महाराष्ट्र मंडळाची उत्तम मराठी लायब्ररी आहे, मी स्वतः सभासद होतो.
  • Log in or register to post comments

http://www.esahity.com/

चामुंडराय
Mon, 08/13/2018 - 22:18 नवीन
या साईट वर बरीच पुस्तके आहेत.
  • Log in or register to post comments

हायजॅक

स्मिता.
Tue, 08/14/2018 - 01:44 नवीन
सिद्धार्थ, आपला धागा हायजॅक करतेय त्याबद्दल माफ करावे. लंडनमधे कुठे मराठी लायब्ररी आहे का? सशुल्क असली तरी हरकत नाही.
  • Log in or register to post comments

काही प्रॉब्लेम नाही.

सिद्धार्थ ४
Tue, 08/14/2018 - 13:42 नवीन
तसेही अस्मादिक भारतात परत आले आहेत :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्मिता.

बऱ्याच ठिकाणी कम्युनिटी मोठी

चामुंडराय
Tue, 08/14/2018 - 04:03 नवीन
बऱ्याच ठिकाणी कम्युनिटी मोठी असेल आणि वाचनालयाला विनंती केली तर मराठी पुस्तके उपलब्ध करून देतात.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा