भिऊ नकोस मी आहे तुझ्यापाठी

आयुर्हित's picture
आयुर्हित in जे न देखे रवी...
20 Mar 2014 - 12:06 am

आलो रे धावून खास तुझ्यासाठी
भिऊ नकोस मी आहे तुझ्यापाठी
करेल इच्छा पुरी चंद्रभागा काठी
कर कटेवर ठेवुनी उभा हा जगजेठी ॥१॥

देईल सारे तुला जे सर्वांनाच हवे
रोज रोज खाशील नवनविन मेवे
सर्वांच्या आनंदाला उधाण यावे
दही दुध तूप लोणी सर्वांनी खावे ॥ २॥

घेत असतो मी अधेमध्ये परीक्षा
नापास झाल्यास देतो मोठी शिक्षा
वेळ आली तर मागावी लागते भिक्षा
अडल्याला करावी मदत ही खरी दीक्षा ॥ ३॥

ज्ञानाची धरा कास, अज्ञानालाच खोडा
व्यर्थ दु:खी न होता, वृथा अभिमान सोडा
भगीरथ प्रयत्न करुनी पै अन पै जोडा
दूरदृष्टी ठेवुनी सोन्याचा पिंजरा तोडा ॥ ४॥

चाणाक्ष होऊनी सारे बुद्धीचे बळ वाढवा
तेल काढण्या प्रयत्ने वाळूलाही रडवा
एकजूट दाखवुनी द्यावा प्रेमाचा गोडवा
विन्ध्य फोडुनी गंगा कावेरीला भिडवा ॥ ५॥

काही झाले तरी विवेकबुद्धी सोडू नका
देश, देव, धर्मासाठी नीतीमुल्ये तोडू नका
दुरितांचे तिमिर घालवा पण देश हा फोडू नका
आयुर्हित दावील दिशा, पिच्छा मात्र सोडू नका ॥ ६॥

धोरणकविताजीवनमानअर्थकारणसांत्वनामार्गदर्शन

प्रतिक्रिया

आत्मशून्य's picture

20 Mar 2014 - 3:11 am | आत्मशून्य

जरा विस्क्टुन सांगा की..

.

आयुर्हित's picture

20 Mar 2014 - 11:58 am | आयुर्हित

महागाई असो कि इतर काहीही/कितीही अडचणी असतील, जर त्यातून बाहेर पडायची मनापासून इच्छा असेल तर आपल्याया नक्कीच दिशा मिळेल.अर्थात हि दिशा विवेकबुद्धी व नीतीमुल्ये यांना धरूनच असेल.

प्रसाद गोडबोले's picture

20 Mar 2014 - 2:45 pm | प्रसाद गोडबोले

लोलकविता =))))

वेल्लाभट's picture

20 Mar 2014 - 6:24 pm | वेल्लाभट

जड जड आहे पण :) तरी... मस्तच..!

विवेकपटाईत's picture

20 Mar 2014 - 7:58 pm | विवेकपटाईत

काही झाले तरी विवेकबुद्धी सोडू नका
देश, देव, धर्मासाठी नीतीमुल्ये तोडू नका
दुरितांचे तिमिर घालवा पण देश हा फोडू नका
आयुर्हित दावील दिशा, पिच्छा मात्र सोडू नका

मस्त, आवडली.