सुंबरान - आठवणीतल्या प्रेमकथा - भाग २

मराठी कथालेखक's picture
मराठी कथालेखक in जनातलं, मनातलं
6 Feb 2014 - 12:28 pm

भाग १ - http://misalpav.com/node/26930

२)

रघूवीर आणि मी सहकारी आणि मित्र होतो. त्याची कुणाशीही सहज ओळख, मैत्री होत असे. अनेक वरिष्ठ अधिका-यांशी त्याचे आपुलकीचे बंध निर्माण होत. त्यावेळी कार्यालयात स्त्री कर्मचारी फारशा नव्हत्त्या. पण बाहेर रघुवीर च्या अनेक मित्र-मैत्रिणी होत्या. त्याच्या कंपुतल्या (मी या कंपूत नव्हतो) एका मित्राने कॉम्प्युटर चा कसलासा क्लास लावला होता. रघूवीर कधी त्याला क्लासजवळ भेटायला जाई. त्यातून क्लास मध्ये शिकवणा-या प्रणिता मॅडमशी त्याचा परिचय झाला. प्रणिता हळूहळू त्याच्या कंपूत सामील झाली. ती त्याच्यापेक्षा ३-४ वर्षांनी मोठी होती. आणि मित्राची मॅडम असल्याने रघूवीर तिला "मॅडम"च म्हणायचा. हळूहळू दोघांची मैत्री वाढली. त्यावेळी मोबाईल चा वापर फारसा वाढला नव्हता. प्रणिता रघूवीर ला कॉईन बॉक्सवरुन आमच्या कार्यालयातील फोनवर कॉल करायची. कार्यालयातील फोन देखील अनेक कर्मचा-यांत सामाईक होता. ती खूप वेळ बोलायची आणि ईतर लोक फोन वापरण्यासाठी ताटकळायचे.
मी आणि इतर मित्रांनी रघूवीर ला प्रणितावरुन चिडवायला सुरु केले. तेव्हा तो त्यांच्यात फक्त मैत्री आहे असं म्हणायचा. पण लवकरच प्रकरण गंभीर होवू लागले. दोघांच्या भेटीगाठी वाढल्यात. अखेर रघूवीर ने प्रणिताशी लग्न करण्याचा विचार आपल्या घरी मांडला. पण त्याच्या आई-वडीलांनी खूप विरोध केला. "आम्ही जीव देवू" वगैरे धमक्या दिल्यात. त्याला भाऊ नव्हता आणी लग्न झालेल्या दोघी बहिणींनी सुध्दा त्याला पाठिंबा दिला नाही.
तो खचू लागला. पण दोघांच्या भेटीगाठी चालूच होत्या. त्याने नुकताच एक छोटा फ्लॅट घेतला होता. ते दोघे त्या फ्लॅटमध्ये एकांतात भेटत. प्रणिता खूप हळवी झाली होती. रघूवीरशी लग्न करण्यास अतिशय आतूर होती. पण तो आई-वडीलांच्या विरोधात जाण्याची हिंमत दाखवत नव्हता. यावरुन दोघांत भांडणे होत. दरम्यान इनकमिंग मोफत झाल्यावर मी मोबाईल घेतला, मग माझ्या मोबाईल वर रघूवीर साठी प्रणिताचे फोन येत. त्यांच्या प्रेमप्रकरणात माझ्या मोबाईलचा सहभाग होता याची मला फार गंमत वाटे. दोघांसाठी मी एक विश्वासू मित्र आहे या भावनेने बरे वाटायचे.
थोडे दिवसानी त्यानेही मोबाईल घेतला. पण तरीही कधी त्यांचे भांडण झाले असले आणि त्याने फोन नाही उचलला की प्रणिता मला कॉल करुन विचारायची कि "रघूवीर फोन का नाही उचलत".. मग "तो आता कामात/ मिटींगमध्ये बिझी आहे" असं उत्तर मी द्यायचो.
तो काही वेळा हळवा होवून माझ्याशी बोलत्त असे. मी त्याला सुचवले की "तू लग्न कर तिच्याशी आई-वडील नंतर राजी होतीलच." पण तो हिंमत नाही दाखवू शकला. प्रणिताच्या घरुनही तिने आता लवकर लग्न करावे म्हणून दबाव होता. अखेर तिने कंटाळून घरच्यांनी दाखविलेल्या एका स्थळाला होकार दिला. लग्न ठरले , वर ही त्याच शहरातला होता. पण तरीही दोघांच्या भेटीगाठी होतच होत्या (अगदी फ्लॅटवरदेखील). मी याबद्दल रघूवीरला काही विचारायचा प्रयत्न केला तर तो उत्तर टाळायचा. पुढे तिचे लग्न झाले.
काही दिवसांनी कळाले की हे दोघे अजूनही भेटत आहेत...मी त्याला याबद्दल विचारले तर तो म्हणाला "आता आम्ही फक्त मित्र आहोत. आणि मित्र म्हणुनच भेटतो." तिच्या नव-याच्या चांगल्या स्वभावाचे गोडवेही त्याने माझ्याकडे गायलेत.
नंतर मी ती नोकरी बदलली. माझा रघूवीरशी संपर्क कमी झाला. काही वर्षांनी त्यानेही लग्न केले. पण मित्र म्हणुन तो अजूनही प्रणिताला भेटतो.
पण आता आमचा संपर्क झाला तरी मी त्याला या विषयात फारसं काही विचारत नाही.

कथाअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

6 Feb 2014 - 4:57 pm | मुक्त विहारि

आवडली...

मराठी कथालेखक's picture

6 Feb 2014 - 5:30 pm | मराठी कथालेखक

एक सांगायचे राहिले...

आम्ही दुस-या पाळीत काम करायचो तेव्हा कार्यालयातील संगणकावर गाणी वाजवत असू.. त्या हळव्या मनस्थितीत असताना "तुम बिन" सिनेमातले"तुम बिन जिया जाये कैसे" हे गाणे रघुवीर खूप तल्लीन होवून ऐकत असे.
आजही ते गाणे कधी ऐकले तर मला त्याची प्रेमकथा आठवते.

त्या हळव्या मनस्थितीत असताना "तुम बिन" सिनेमातले"तुम बिन जिया जाये कैसे" हे गाणे रघुवीर खूप तल्लीन होवून ऐकत असे.
आजही ते गाणे कधी ऐकले तर मला त्याची प्रेमकथा आठवते.

छान.

बाकी ह्या कथा वाचताना कसा एकदम... बैठकित असल्याचा फिल येतो!

कवितानागेश's picture

6 Feb 2014 - 5:38 pm | कवितानागेश

छान लिहिलिये कथा.
पुढच्या भागाची वाट बघतेय. :)

पहिली आणि दुसरी कथा सेम च आहे की. (एकच टेम्प्लेट आहे का?)

मराठी कथालेखक's picture

7 Feb 2014 - 10:54 am | मराठी कथालेखक

नाही. या कथांचा एकमेकांशी संबंध नाही.

llपुण्याचे पेशवेll's picture

7 Feb 2014 - 11:21 am | llपुण्याचे पेशवेll

कदाचित पहील्या आणि दुसर्‍या कथेतल्या मुलाचं छोटं आणि मुलीचं मोठं वय या साम्यस्थळामुळे 'मराठी कथालेखकास' या प्रकारच्या प्रेम प्रकरणात बराच रस आहे असं वाटतं.
बाकी लेखनकळा चांगली वाटली.

खटपट्या's picture

7 Feb 2014 - 2:01 am | खटपट्या

अजुन येवूद्या

मदनबाण's picture

7 Feb 2014 - 4:07 am | मदनबाण

वाचतोय !
बाकी,तुम बिन जिया जाये कैसे" हे गाणे रघुवीर खूप तल्लीन होवून ऐकत असे.या वरुन मला बाली सागु चे तुम बीन जिया उदास {रिमिक्स} हे गाणं आठवल !

अमृत's picture

7 Feb 2014 - 10:44 am | अमृत

हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले
मोहब्बत में नहीं हैं फ़र्क़ जीने और मरने का
उसी को देख कर जीते हैं जिस काफ़िर पे दम निकले...

वाचतोय, अजुन येऊ द्या! अश्या बर्‍याच अपूर्ण व पूर्ण कथा आजूबाजूला बघितलेला.... :-)

पैसा's picture

8 Feb 2014 - 7:24 pm | पैसा

सत्यकथा आहे का? आम्ही फक्त मित्र म्हणून भेटतो हे काहीसे कठीण वाटते. ते दोघे मिळून नायिकेच्या नवर्‍याला फसवत असावेत असे काहीसे...

प्यारे१'s picture

8 Feb 2014 - 7:57 pm | प्यारे१

>>>सत्यकथा आहे का?
साम्य आढळल्यास योगायोग समजावा असा डिस्क्लेमर टाकायला सांगा की! ;)

>>>अजून येऊ द्या!
आता अजून काय येऊ द्या? =))

पैसा's picture

8 Feb 2014 - 8:10 pm | पैसा

आणि काय? आपल्याला ब्वॉ गोष्टी वाचायला आवडतात!

मराठी कथालेखक's picture

10 Feb 2014 - 11:15 am | मराठी कथालेखक

तुम्ही भाग १ ची प्रस्तवना वाचली नाहीत असं वाटतंय,
अस्प. ही १०० % सत्यकथा आहे, फक्त नावे बदलून.
रघूवीर आणि प्रणिता भेटतात (किती नियमित ते मला माहीत नाही), इतकेच काय प्रणिता, तिचा नवरा, रघूवीर, आणि त्यांचे आणखी काही मित्र-मैत्रीण (रघूवीर ची पत्नी मात्र नव्हती) यांचे सहलीचे एकत्र फोटोज मी फेसबूक वर पाहिलेत.
आता यात फसवणूक आहे की आणखी काही (open relationship ई) की खरच फक्त मैत्री ते मला माहीत नाही. आणि प्रस्तावनेत (भाग १ च्या) म्हंटल्याप्रमाणे मी मला माहीत नसलेल्या गोष्टी जुळविण्यासाठी कल्पनाशक्ती वापरणार नाही.