सुंबरान - आठवणीतल्या प्रेमकथा - भाग ४

मराठी कथालेखक's picture
मराठी कथालेखक in जनातलं, मनातलं
14 Feb 2014 - 3:18 pm

(कृपया भाग १ मधील प्रस्तावना आधी वाचा)

भाग १ - http://misalpav.com/node/26930
भाग २ - http://misalpav.com/node/26938
भाग ३ - http://www.misalpav.com/node/26981

४)

आईचे छत्र हरवलेले, वडीलांचे घराकडे फारसे लक्षा नाही आणि अर्थिक परिस्थिती ओढाताणाची. अशा स्थितीत प्रकाश आपल्या दोन धाकट्या आणि अविवाहित बहिणींची काळजी घेत त्यांच्या व स्वतःच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी धडपडत होता. दोघींपैकी तनुजा या बहिणीचे लग्न लावून दिले, तिला उत्तम स्थळ मिळाल्याने तो समाधानाने जगत असतानाच दुसरी धाकटी आणि अत्यंत लाडकी बहिण भावना हिच्या आकस्मिक मृत्यूने प्रकाश, तनुजा, प्रकाशच्या इतर तीन विवाहित बहिणी अशा सगळ्यांनाच दु:खाच्या खाईत लोटले.
अनुजा ही भावनाची मैत्रीण , तसेच तिचा भाऊ हा प्रकाशचा मित्र होता. भावनाचा मृत्यू हा अनुजासाठी देखील मोठा धक्का होता. या दुखवट्याच्या काळात इतर नातलगांप्रमाणेच अनुजा प्रकाशच्या घरी थांबली. त्याला आधार आणि धीर देण्याचा प्रयत्न ती करीत होती. पण त्या दोघांची जवळीक प्रकाशच्या तनुजा सोडून इतर तीन बहिणींना खटकली. त्यांनी प्रकाशशी वाद केला. तनुजाने हे तिच्या नव-याला म्हणजे अजय ला सांगितले. अजयने तिला सुचवले की "जर खरच त्या दोघांत काही असेल तर त्यांनी ते पुढे न्यायला काय हरकत आहे ? अनुजा एक चांगली मुलगी आहे" पण प्रकाशच्या मनात काय आहे हे तनुजाला ही माहित नव्हते. आपण असे काही विचारले तर दादा दुखावला जाईल असं समजून ती गप्प राहिली.

काळ पुढे सरकत होता. प्रकाशच्या लग्नाकरिता स्थळ बघणे चालू झाले.मात्र प्रकाशने अनुजाचा लग्नासाठी विचार केला नाही. उलट त्याच्या लग्नात ती आनंदाने मिरवत होती. अर्थात तिचे इतके मिरवणेही अनेकांना खटकले. लग्ना नंतर थोड्या दिवसांनी प्रकाश आणि त्याच्या पत्नीमध्ये अनुजाच्या विषयावरुन काहीसा वाद झाला होता.

काही काळाने अनुजाचे लग्न झाले आणि या लग्नाला प्रकाश सपत्नीक उपस्थित होता. आणि सगळ्या प्रकरणावर पडदा पडला.

त्या दोघांत तसे काही होते की नाही हे कळण्यास मार्ग नव्हता. पण तनुजा ला "ताई" किंवा तिच्या नव-याला "दादा" म्हणणारी अनुजा (त्या दोघांपेक्षा वयाने बराच मोठा असूनही) प्रकाशला कधीच "दादा" म्हणत नसे. अर्थात इतक्या छोट्या गोष्टीने निष्कर्ष काढणे चुकीचे ठरेल..पण तरीही भावनाच्या मृत्यूनंतर प्रकाशच्या घरी काही दिवस थांबलेली असताना, तिचे तिथले वावरणे ज्या प्रकारचे होते त्यातून तिचे त्याच्याशी असलेले बंध फक्त "मैत्रीणीचा भाऊ" किंवा "मित्र" असे नक्कीच वाटत नव्हते.
बहूधा त्या दोघांत एक हळूवार नाते होते पण जातीतल्या फरकामुळे त्यांनी लग्नाच्या दिशेने पाऊल टाकले नसावे. कारण रुढार्थाने तिच्या जातीचा सामाजिक स्तर खालचा होता (फक्त प्रचलित समजाप्रमाणे असे मला म्हणायचे आहे, मी स्वतः असा भेद मानीत नाही).

आता त्यांच्यात किती संपर्क असतो वगैरे माहीत नाही.

कथासाहित्यिकअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

14 Feb 2014 - 3:46 pm | मुक्त विहारि

प्रेमाच्या नात्यातले कंगोरे योग्य भाषेत दाखवत आहात.

किती गोन्धळ उडाला... :(

आदूबाळ's picture

14 Feb 2014 - 6:12 pm | आदूबाळ

अगदी अगदी.

तनुजा, फातिमा, डेव्हिड अशी नावं असती तर नसता उडाला.

मुक्त विहारि's picture

14 Feb 2014 - 6:44 pm | मुक्त विहारि

ह्या लेखाने तुमचा गोंधळ उडाला....

ओके...

ठीक आहे....

भाऊंचे लेख जरा वाचा...

ते वाचले (ते पचत नाहीत) की मग सामाजीक म्हणू नका,भावनिक म्हणू नका की वैचारीक म्ह्णू नका...कसलाच गोंधळ उडणार नाही....

(भाऊंच्या लेखनाचा पंखा) मुवि

राईट मुवी , पण मोजी मोजी हायत . आणी मकले मकले हायती . तेंव्हा गोंधळ होणारच .

(मौजींच्या कथेचा दोन वर फिरणारा पंखा)

थोडे मन लावून वाचले कि कळतंय !
मस्त, आजूबाजूला घडतंय असंच वाटतं.
अजून फुलवू शकता

अनुप ढेरे's picture

15 Feb 2014 - 10:42 am | अनुप ढेरे

आत्ता वाचल्या चारही कथा. आवडल्या. छान लिहिता. एकदम सोप्या भाषेत...