क्रेडीट कार्डाबद्दलचे गैरसमज

Primary tabs

सुबोध खरे's picture
सुबोध खरे in जनातलं, मनातलं
8 Dec 2013 - 9:41 pm

क्रेडीट कार्डाबद्दलचे गैरसमज
हा विषय मुद्दाम घेण्याचे कारण आपल्यापैकी जवळ जवळ ९५ % (कदाचित १००%) लोक क्रेडीट कार्ड वापरत आहोत. पण या बद्दल आपल्या मनात बरेच गैरसमज आहेत त्यातील काही जर दूर करता आले तर मला आनंदच होईल.
सर्व प्रथम मी अर्थ क्षेत्रातील तज्ञ नाही किंवा माझ्याकडे त्यातील कोणतीही पदवी नाही. बरीच मासिके आणि पुस्तके वाचून आलेल्या सामान्य ज्ञानातून मी हा लेख लिहित आहे यात झालेल्या चुका किंवा घोडचुका तज्ञ लोकांनी दुरुस्त कराव्यात अशी माझी अपेक्षा आहे.
श्री ज्ञानव यांनी मांडलेल्या विषयावर चर्चा करण्यापेक्षा मी सरळ कृती करण्याचा मार्ग अवलंबित आहे. चूक झाली तर क्षमस्व.

गैरसमज १) माझा c v v (card varification value) कुणालाच माहित नाही/ मी तो पाठ करून खोडला आहे म्हणजे माझे कार्ड सुरक्षित आहे. हा cvv क्रमांक कार्डच्या मागे आपण जिथे सही करतो त्याच्या बाजूला असतो.
पेट्रोल पंपावर किंवा हॉटेलात आपण कार्ड देतो तेन्व्हा त्याच्यासाठी त्यांना हा क्रमांक लागत नाही म्हणजेच जालाबाहेरील विनिमयासाठी (offline transaction) हा क्रमांक लागत नाही. (जालावरील विनिमयासाठी तो क्रमांक लागतो)
उपाय-- जेथे कार्ड आपल्यासमोर वापरले जात नाही तेथे ते न वापरणे किंवा आपल्या खुर्चीतून उठून कार्ड आपल्यासमोर स्वाईप होते आहे हे पाहणे. ( लोकांना कसे दिसेल -विशेषतः हॉटेलात- हा विचार बाजूला ठेवा).

गैरसमज २) माझा पिन(personal identification number) आणि पासवर्ड कुणालाच माहित नाही म्हणजे माझे कार्ड सुरक्षित आहे. सुदैवाने भारतीय रिझर्व्ह बँकेने आता भारतीय वेबसाईट(आंतरजालीय स्थळांवर) पिन वापरणे १ डिसेंबर पासून आवश्यक केले आहे. त्यामुळे आता भारतीय स्थळावर जालीय विनिमय तेवढा सुरक्षित झाला आहे. परंतु बर्याच आंतरराष्ट्रीय स्थळांवर अजून ते अत्यावश्यक नाही त्यामुळे आपल्या कार्डाचा नाव क्रमांक आणि cvv ची कोणी नक्कल केली असेल तर आपले कार्ड दुसरीकडे वापरले जाऊ शकते.

गैरसमज ३ )-- माझ्या कार्डाची नक्कल(duplication) करता येणार नाही. आपल्या कार्डच्या मागच्या बाजूला चुंबकीय पट्टी असते त्यात आपली सर्व माहिती साठविली जाते जेंव्हा आपण आपले कार्ड स्वाईप करता तेंव्हा आपल्या कार्डाची माहिती त्या यंत्रातून काढली जाउ शकते आणि त्याचे दुय्यम कार्ड बनवून त्याचा दुरुपयोग केला जाउ शकतो.
उपाय -- EMV EUROPAY, MASTERCARD आणी VISA यांनी आता चीप असलेली कार्डे बाजारात आणली आहेत ज्याचे DUPLICATION फार कठीण आहे.असे कार्ड वापरायला सुरुवात करा. तोवर ज्याठिकाणी आपल्याला शंका वाटत असेल तेथे आपले कार्ड वापरू नका
गैरसमज ४) कार्डमागे असलेली माझी सही फारशी महत्वाची नाही.
आपण आपल्या कार्डावर सही करता आणी ते कार्ड एखाद्या दुकानात वापरता तेंव्हा तो दुकानदार आपली सही कार्डावर आणी पावतीवर जुळत आहे कि नाही हे पाहण्यासाठी बांधील आहे. जर आपली सही जुळत नसेल( चोराने आपले कार्ड वापरले आणी आपल्या सहीची नक्कल केली असेल) तर ते पैसे देणे आपण बांधील नाही. जर आपण सही केलीच नसेल तर चोर त्या ठिकाणी सही करून आपला CVV वापरून आपले कार्ड( आणी खिसा) रिकामा करू शकतो.
मी क्रेडीट कार्ड १९८८ पासून वापरात आलो. परंतु मी आजतागायत त्यावर एक पैसा देखील व्याज भरलेले नाही
मी अशा मताचा आहे कि आपल्या गरजेपेक्षा जास्त रक्कमेचे क्रेडीट लिमिट मुळीसुद्धा घेऊ नये. अफरातफर झाली तर तेवढे जास्त पैसे आपल्या खिशातून जातील.
ज्या वेबसाईट बद्दल मला जरासुद्धा शंका असेल (चित्रपटगृहे ई ई) तेथे मी क्रेडीट कार्ड वापरत नाही. पेट्रोल मी फक्त रोख रक्कम देऊन घेतो हॉटेलात कार्ड स्वैप माझ्या समोर करायला लावतो.
(तरीसुद्धा माझ्या क्रेडीट कार्डावर फसवाफसवी होणार नाही असे मी खात्रीलायक रित्या सांगू शकत नाही.

खालील दोन दुवे जरूर वाचावे. माझे वरील बरेचसे लिखाण हे त्यातील पहिल्या दुव्यातील लेखाचे भाषांतरच आहे
http://profit.ndtv.com/news/your-money/article-credit-card-myths-you-sho...
http://profit.ndtv.com/news/your-money/article-10-ways-to-protect-yourse...

मुक्तकविचार

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

9 Dec 2013 - 12:25 am | मुक्त विहारि

आवडला

अर्धवटराव's picture

9 Dec 2013 - 12:29 am | अर्धवटराव

तुम्ही हे सर्व पॉईण्ट्स म्हणजे गैरसमज का म्हणताय? कार्ड सुरक्षीत नाहि का आपलं ??

ज्ञानव's picture

9 Dec 2013 - 8:24 am | ज्ञानव

श्री ज्ञानव....नको प्लीज..ज्ञानव,ज्ञाना काहीही चालेल डॉक्टरसाहेब
बाकी लेख उत्तमच आणि सुबोधक आहे हे खरे.

नितिन थत्ते's picture

9 Dec 2013 - 10:51 am | नितिन थत्ते

काही उपाय आहेत.
सहसा क्रेडिट कार्ड स्वाइप केले गेले की जी रक्कम काढली जाते (अगदी २०० रुपये का असेनात) त्या रकमेचा उल्लेख असलेला SMS मला येतो. तसा येत नसेल तर तो येईल याची व्यवस्था करून घ्यावी. म्हणजे पहिल्याच फ्रॉड ट्रान्झॅक्शनला कार्ड ब्लॉक करता येईल.

मला एकदा असा अनुभव आला आहे. मी काही खरेदी केली असता माझ्या समोरच दुकानदाराने कार्ड स्वाइप केले. तेव्हा काही कनेक्शन अडचण येऊन ते ट्रान्झॅक्शन प्रोसेस झाले नाही. म्हणून दुकानदाराने (माझ्या संमतीनेच) ते पुन्हा स्वाइप केले. त्यावेळी एका मिनिटाच्या आत मला बँकेतून फोन आला. "आपले कार्ड दोन वेळा या अमाउंटसाठी स्वाइप झाले आहे तुम्हीच केले आहे का?" मी परिस्थिती सांगून पहिले ट्रान्झॅक्शन कॅन्सल करण्यास सांगितले. त्या प्रमाणे बँकेने मला एकदाच डेबिट चार्ज लावला.

मास्टर कार्ड किंवा व्हिसा कार्ड ही (चारेक वर्षांपासूनच) नुसत्या सीवीवी नंबरवर ऑनलाइन ट्रान्झॅक्शन करू देत नाहीत. दोन्हीसाठी सिक्युअर आयडीचा पासवर्ड घालावा लागतो.

मी माझी विविध क्रेडिट कार्डे गेली सात आठ वर्षे वापरत आहे. आजवर कधी अडचण आली नाही. पुढे येणार नाही असे अर्थातच सांगता येणार नाही.

आतिवास's picture

9 Dec 2013 - 11:55 am | आतिवास

+ १ हेच लिहायला आले होते.

एसएमएसची सोय आणि सिक्युअर आयडी पासवर्ड (विसा वेरीफिकेशन?) या दोन सोयींमुळे काळजी कमी झाली आहे - पण ती घेत राहण्याला पर्याय नाही. पिन कधीही दुस-या व्यक्तीला न सांगण्याची (मॉल, हॉटेल अशा ठिकाणी) काळजी घेत राहायला हवी.

आणखी एक म्हणजे उगाच भारंभार क्रेडिट कार्ड्स वापरु नयेत आणि व्याजाची सूट मिळवण्यापेक्षा सुरक्षा सोयी काय आहेत याची खातरजमा करुन घ्यावी.

तरीही आपल्या कार्डावर फ्रॉड होणार नाही असं समजून चालता येणार नाही ते नाहीच!

सुबोध खरे's picture

10 Dec 2013 - 9:56 am | सुबोध खरे

साहेब
आपले कार्ड क्लोन केले असेल. ( आपल्या समोर स्वाईप केले नसेल तर) आणी त्या चोरांनी ते एखाद्या ड्युटी फ्री दुकानात रात्री दोन वाजता वापरले तर आपल्याला त्याचा संदेश येतो तो अपरात्री येतो या वेळेस आपण तो संदेश पाहिला नाही तर हिशाक्याता रात्री दोन वाजता खूप आहे. त्या संदेशात जर त्याने एक लाख रुपयापर्यंत(आपले क्रेडीट एक लाख आहे असे गृहीत धरून) वापरले तर सकाळी उठल्यावर आपल्याला असे लक्षात येईल कि आता कार्ड ब्लॉक केले तरी एक लाख रुपये आपल्याला भरावेच लागतील. नंतर तुम्ही पोलिसांकडे जा गुन्हा दाखल करा आणी नंतर जर ते सिद्ध करू शकलात तर आपल्याला एक लाख परत मिळण्याची शक्यता आहे. हे असे वारंवार घडलेले आहे. कारण चोरांना आपल्या वाटा चांगल्याच ठाऊक असतात
जालावरील विनिमय हा त्यामाने जास्त सुरक्षित आहे . पण लोक आपला पास वर्ड १२३४ किंवा ० ० ० ० सारखा लक्षात ठेवण्यासाठी सोपा ठेवतात तेंव्हा चोर् असा पास वर्ड वापरून पाहतात. मिळाले तर ठीक नाहीतर कार्ड ब्लॉक होते.
बायका पर्स मध्ये क्रेडीट कार्डबरोबर पासवर्ड असलेली चिट्ठी ठेवतात. म्हणजे चोराला फक्त आमंत्रण देणे बाकी असते.
एक गोष्ट महत्त्वाची आहे आपण कितीही उत्तम कुलूप लावले तरी आपले घर शंभर टक्के सुरक्षित आहे असे आपण म्हणू शकत नाही तसेच आपण शक्य तितकी काळजी घ्या तरीही आपल्या कार्डावर अफरातफर होणार नाहीच असे म्हणता येणार नाही.

सुबोध जी व अन्य मित्रांनो,
धाग्यातून व नितीनजींनी सांगून वरील उपायांनी आपल्याला मिळणाऱ्या सुविधेचा वापर व संरक्षण करायला मदत असेल तर अन्यही काही उपाय सुचवले गेले तर बरे होईल. माझ्या विविध बँकातील खात्यातून वेळोवेळी घडणाऱ्या व्यवहाराचा एसएम एस येतोय कि नाही यावर माझे लक्ष असले पाहिजे.

प्रभाकर पेठकर's picture

9 Dec 2013 - 1:39 pm | प्रभाकर पेठकर

डेबिट/क्रेडीट् कार्डांच्या द्वारे आर्थिक घोटाळे करणार्‍यांची एक टोळी कांही काळापूर्वी कार्यरत होती (कदाचित अजूनही असेल). ही टोळी उपहारगृहांच्या सेवकांना (वेटर्स/कॅशिअर्स) एक पेजरच्या आकाराचे, हाताच्या पंज्यात सहज लपू शकणारे, एक यंत्र देतात. तो सेवक, गिर्‍हाईकाचे कार्ड, ह्या यंत्रातून स्वाईप करतो. कार्डाचा तपशिल त्या यंत्रात हस्तांतरीत होतो. नंतर ते यंत्र त्या टोळीच्या हस्तकाकडे सुपूर्त केले की त्या सेवकाला 'मोबदला' मिळतो. तो हस्तक नंतर ते यंत्र संगणकाला जोडून आपल्या तपशिलाबरहुकूम कार्डाची एक नविन प्रत (ड्यूप्लिकेट कॉपी) बनवितो. आता तुमच्या नांवाची, तपशिलाची दोन कार्ड तयार झाली आहेत. तुमचे कार्ड तुमच्या जवळ सुरक्षित आहे पण त्या दूसर्‍या कार्डाच्या मार्फत बाहेर खरेदी केली जाते आणि पैसे तुमच्या खात्यातून वजा होतात.
उपायः तुमचे डेबिट्/क्रेडीट कार्ड कोणाच्या हाती देऊ नका. कॅशियर जवळ तुमच्या नजरेसमोर (त्याने पाठमोरे होऊन आपल्यापासून कांही लपवून करू न देता) कार्ड वापरा.

रमेश आठवले's picture

9 Dec 2013 - 4:37 pm | रमेश आठवले

"मी क्रेडीट कार्ड १९८८ पासून वापरात आलो. परंतु मी आजतागायत त्यावर एक पैसा देखील व्याज भरलेले नाही"------
असे जर असेल तर क्रेडीट कार्ड ची जरूरच काय? आपल्या वर दिलेल्या माहितीप्रमाणे आपल्याला क्रेडीट फार तर दोन तीन आठवड्याचे मिळते व कंपनीचे पुढचे बिल आले कि आपण दिलेल्या मुदतीत सर्व पैसे भरून टाकता.
हेच काम डेबिट कार्डने हि होऊ शकते व ते फुकट मिळते किंवा वार्र्षिक किरकोळ पैसे ब्यांक घेते. या उलट क्रेडीट कार्डला बरीच वार्षिक फी भरावी लागते. हे मी माझ्या जवळ असलेल्या sbi कार्डच्या अनुभवाने लिहिले आहे.

अनिरुद्ध प's picture

9 Dec 2013 - 6:53 pm | अनिरुद्ध प

+१११ सहमत

राजेंद्र मेहेंदळे's picture

9 Dec 2013 - 7:03 pm | राजेंद्र मेहेंदळे

रमेश
तुमच्या प्रश्नाला माझे उत्तर असे की काही वेबसाईटवर ऑनलाईन व्यवहार करताना फक्त क्रेडीट कार्डच चालते.
उदा. प्रोमेट्रिक, VUE या साईटवर परीक्षा बुक करताना.शिवाय महीनाअखेरीस जेव्हा सेव्हींग अकाउंटमध्ये पैसे नसतात :) तेव्हा क्रेडीट कार्ड उपयोगी पडते. त्यामुळे वेळेच्या आधी पैसे भरले तर त्यात वाईट काही नाही. उलट परदेशात असे केल्याने आपले क्रेडीट रेटींग वाढते आणि बँका स्वतःहुन तुमची लिमिट वाढवतात.

सुबोध खरे's picture

10 Dec 2013 - 9:42 am | सुबोध खरे

साहेब,
मी जे क्रेडीट कार्ड घेतो ते मला आजपर्यंत फुकट मिळत आले आहे. गेली १६ वर्षे मी एच डी एफ सी बँकेचे क्रेडीट कार्ड वापरीत आहे ते माझा पगाराचे खाते असल्याने मला फुकट वापरता येते.
क्रेडीट कार्डाची गरज काय?-
१) मी सैन्यात होतो त्यामुळे कुठेही भारतभर फिरताना रात्री बेरात्री रेल्वे ने प्रवास करताना खिशात पैसे बाळगण्यापेक्षा क्रेडीट कार्ड बाळगणे जास्त सोपे आणि सुरक्षित आहे.
२) एखाद्या वेळेस तातडीने पैसे पाहिजे असतील तर आपण कोणत्याही ए टी एम मधून पन्नास हजार रुपये रोख काढू शकता
३) भ्रमण करणाऱ्या माणसाला आयत्या वेळेस विमानाचे तिकीट काढता येते
४)मी क्रेडीट कार्डावर वीस हजार रुपये भरून माझा टीव्ही घेतला (१९९२ साली ) आणी ते पैसे पुढच्या महिन्यात भरून टाकले. यात मला माझी मुदत ठेव न मोडता दोन पगारान्च्या पैशात टीव्ही विकत घेता आला. मुदत ठेवीचे व्याज १२ टक्क्याने एक महिन्याचे रुपये दोनशे फक्त वाचले आणी मुदत ठेव चालू राहिली. जास्तीत जास्त पन्नास दिवस पर्यंत तुम्हाला क्रेडीट मिळते
५) माझ्या कडे त्याच बँकेचे डेबिट कार्ड पण आहे पण ते वापरले असता माझे ६ ६ रुपये ( व्याज दर ४ टक्क्याने) नुकसान झाले असते. १९९२ साली सहासष्ट रुपयात पुण्यात एक वेळचे हॉटेलिंग होत असे.
६) क्रेडीट कार्डाचे व्याज हे साधारण २.५ ते २.९५ टक्के फक्त पण महिन्याला असते म्हणजेच वर्षाला तीस ते पस्तीस टक्के. त्यामुळे पहिल्याच महिन्यात पैसे भरून टाकणे हे श्रेयस्कर.
७) नंतर बायकोला त्याच बँकेचे क्रेडीट कार्ड ऐड ऑन कार्ड म्हणून घेतले त्याची फी रुपये शंभर फक्त वर्षाला आहे.
८) दोन्ही कार्डावर विनिमय केला असता पुढच्या तीस सेकंदात मला भ्रमणध्वनीवर संदेश येतो.
९) दहा हजारापेक्षा जास्त पैशाचा विनिमय दुकानातून केला तर ताबडतोब त्याचा दूरध्वनी येतो. राजावत सराफ ठाणे यांचेकडे सौ ला कानातील दागिना घेतला तेंव्हा कार्ड यंत्रात घातल्याच्या पंधरा सेकंदात मला दूरध्वनी आला कि साहेब आपण दागिन्याच्या दुकानात विनिमय करीत आहात काय? माझ्या होकारानंतर तो विनिमय पूर्ण झाला.गर्दीच्या वेळेस रेल्वे किंवा बाजारातून जाताना पाच आकडी रक्कम खिशात टाकून जाण्यापेक्षा मला क्रेडीट कार्ड बाळगणे जस्त सोयीचे वाटते.
१० ) स्टेट बँक आणी सिटी बँकेचे क्रेडीट कार्डाचे अनुभव अतिशय वाईट आले. काहीही कारण नसताना( मी लिहिलेले नसताना) संदेशाचे (एस एम एस) रुपये दहा फक्त बिल लावले आणी ते बील न भरल्याबद्दल तीनशे रुपये दंड दरमहा लावला. असे बिल जेंव्हा तीन हजार झाले तेंव्हा दोन्ही बँकांना मी न विचारलेल्या सेवांसाठी पैसे लावल्याबद्दल तुमच्यावर अफरातफरीचे आरोप करून वृत्तपत्रात चव्हाट्यावर आणीन अशी धमकी द्यावी लागली. त्याबरोबर ४८ तासात सर्व चार्जेस माफ झाले. मी दोन्ही क्रेडीट कार्ड दोन तुकडे करून त्यांच्या ए टी एम माध्येताकून दिली. पुढे बरेच दिवस आमचे कार्ड घ्या फुकट देतो म्हणून ते मागे लागले होते.
असो अजून बरेच फायदे आहेत. पण एवढे पुरे.
माझे आजही मत असे आहे कि क्रेडीट कार्ड हि अतिशय उपयुक्त गोष्ट आहे. फक्त त्याच्या जालात अडकू नका.

रमेश आठवले's picture

10 Dec 2013 - 1:28 pm | रमेश आठवले

१.माझ्या sbi क्रेडिट कार्ड साठी मी वर्षाला ७५० रु. देतो आणि मिसेस च्या add on कार्ड साठी २५० रु. देतो. माझ्या आणि मिसेस च्या डेबिट कार्ड साठी प्रत्येकी वर्षी रु. १०२ sbi खात्यातून कापले जातात.
माझ्या जवळ icici चे क्रेडिट कार्ड आहे. चौकशी केली असता ते सुद्धा क्रेडिट लिमीट च्या आधारावर ५००, १०००, १५०० असा चार्ज लावतात . डेबिट कार्ड वर मात्र चार्ज लावत नाही.
२. मला icici मधून मिळालेल्या माहिती प्रमाणे बरीच on line खरेदी डेबीट कार्डने ही होऊ शकते. अर्थात वर राजेंद्र मेहेंदळे यांनी दिलेले अपवाद वगळून.
३. वेगवेगळ्या बँकांचे ( डेबीट कार्ड चे ) आणि क्रेडिट कंपन्यांचे दर वेगळे वेगळे असतात असे दिसते. तरी इतर मिपा सद्स्य्यांनी त्यांची माहिती येथे दिल्यास त्यांची तुलना करता येईल. खरे साहेबाना hdfc ने फुकट कार्ड दिले ते खास वर्गाचे म्हणून असे वाटते. hdfc सर्वांनाच क्रेडिट कार्ड विनामुल्य देते का ?
आंतरजालावर या विषयाबद्दल सर्व महत्वाच्या बँका बद्दल ची माहिती कोणाला मिळाली तर त्याने येथे उधृत केल्यास चांगले होईल.

सुबोध खरे's picture

10 Dec 2013 - 6:56 pm | सुबोध खरे

साहेब,
मी कोणत्याही खास वर्गाचा नाही. आणि तसेही लष्करी लोक हे पैश्याच्या बाबतील निम्न स्तरावरचे असतात. पण तो माझा सैलरि अकौंट पगाराचे खाते असल्याने क्रेडीट कार्ड फुकट मिळते. हे कोणीही नोकरदार आपले पगाराचे खाते उघडल्यास ते आपल्याला हा फायदा देतात. याचे कारण आपला पगार त्यांच्या खात्यात जमा होतो आणि आपण ते पैसे जोवर काढत नाही तोवर त्यांना ते पैसे वापरायला मिळतात म्हणून हि सुविधा सर्व बँकांनी दिलेली आहे.
डेबिट कार्डाने आपल्या खात्यातून पैसे ताबडतोब काढले जातात यात एक तोटा म्हणजे आपल्या खात्यात पैसे नसतील तर आपल्याला काहीच करत येत नाही. अगदी कितीही निकड असेल तरी. पण क्रेडीट कार्ड आपल्याला आपल्या क्रेडीट लिमिट पर्यंत पैसे वापरू देते. त्यामुळे एखाद्या अत्यावाश्यक प्रसंगी( आपल्या नातेवाईकाला रुग्णालयात भरती करायचे आहे तर) आपल्याला तातडीने पैसे मिळू शकतात. हे पैसे आपल्याला पुढच्या एक ते दीड महिन्यात भरता येतात.

रमेश आठवले's picture

10 Dec 2013 - 7:31 pm | रमेश आठवले

मला एकदा एका हृदय विकाराच्या पेशंट ला त्यासाठीच्या खास रुग्णालयात तातडीने दाखल करावे लागले. तेथील लोकांनी क्रेडीट कार्ड घेत नाही असे सांगितले. लगेच पैशाची दुसरी व्यवस्था करता आली आणि त्यामुळे वेळेवर उपचार होऊ शकला.
हा माझा अनुभव अपवाद असेलही.
दुसरा अनुभव म्हणजे भारतातील एका telivision विक्रेत्याने अमेरिकेत सर्रास वापरले जाणारे discovery क्रेडीट कार्ड चालणार नाही असे सांगितले. इतर दोन तीन अमेरिकन कार्डनाही त्याने नकार दिला. शेवटी भारतीय sbi कार्ड वर भागवले.
२. मला आपला 'खास वर्ग' म्हणजे त्या बँकेत पगार भरला जाणारा एवढेच म्हणावयाचे होते. hdfc इतरांकडून क्रेडीट कार्ड साठी काय फी आकारते हे जाणण्याची उत्सुकता आहे.

प्रकाश घाटपांडे's picture

9 Dec 2013 - 8:43 pm | प्रकाश घाटपांडे

क्रेडीटा कार्ड माझ्याकडे नाही. डेबीट कार्ड कधी खरेदीसाठी वापरली नाही त्यामुळे अनुभव नाही. एक प्रश्न आहे कि डेबीट कार्ड वरुन खरेदी करताना दुकानदार बिलात सर्विस चार्ज अ‍ॅड करतो. तो नेमका कुणाचा सर्विस चार्ज असतो. सरकारला जर चलनी नोटा कमी वापरात ठेवायच्या असतील तर प्लास्ट्क मनीला प्रोत्साहन द्यायला पाहिजे. अशा वेळी जर सर्विस चार्ज घेतला तर लोक एटीएम मधुन कॅश काढून ते देतील.

राजेंद्र मेहेंदळे's picture

9 Dec 2013 - 9:52 pm | राजेंद्र मेहेंदळे

ज्या कंपन्या (मास्टर/व्हिसा/पे पाल ई.) हे पेमेंटचे गेटवे मॅनेज करतात त्या दुकानदारांना ही फी लावतात.शिवाय प्रत्येक वेळी कार्ड वापरताना सर्वरला काँटॅक्ट करायला त्यांचा एक फोन कॉल वापरला जातो .
खरे तर त्यांनी ही फी ग्राहकाकडुन घेणे बेकायदा आहे.आणि मला वाटते कॅश मिळावी म्हणुन ते हा आडमार्ग वापरतात.

अनेक ज्वेलर्सकडे सोन्याचे भाव रोख रक्कम देणार असाल तर कमी आणि कार्डद्वारे पेमेंट करणार तर जास्त असतात. जेणेकरुन लोकांनी रोख रक्कम देऊन त्यांच्या काळ्या पैशात भर घालावी.

जर होणारा पुर्ण व्यवहार पाहिला तर जे पैसे दुकानदार सर्वीस tax कार्डद्वारे पेमेंट साठी भरणार, ती रक्कम गिराईका ला सुट दिली गेली असे मानता येइल. अशी सुट सोने, वाहन खरेदी या गोष्टी साठी (दुकानदाराला) परवडण्या सारख्या नाहीत.
आपण ज्वेलर्सकडे चेक देण्या बद्दल चौकशी केली आहे का? चेक ने व्यवहार करण्यास तो दुकानदार नकार देउ शकत नाही. (हे फक्त वरील उदाहरणान्साठी आहे.)

गोस्टी

सुबोध खरे's picture

10 Dec 2013 - 3:40 pm | सुबोध खरे

मी आत्ता पर्यंत सराफाकडे क्रेडीट कार्ड किंवा चेक नेच पैसे दिलेले आहेत त्यासाठी मी एक पैसा जास्तीचा भरलेला नाही .पांढर्याचे काळे करण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत. वामन हरी पेठे यांनी माझा चेक वटण्याच्या अगोदरच मला हार देऊन टाकला. यावर मी त्यांना म्हटले कि अहो तुमचे पूर्ण पैसे मिळाल्यावर (चेक वटल्यावर) मी तो हार घेऊन जाईन. त्यावर त्यांनी आम्हाला माणसांची पारख आहे असे सांगून उगाच परत चक्कर का मारता म्हणून विचारले.

राजेंद्र मेहेंदळे's picture

10 Dec 2013 - 7:05 pm | राजेंद्र मेहेंदळे

सुबोध
अहो त्यात पेठ्यांच मोठेपणा काही नाही. त्यांना भा. द. वि. कलम १३८ (चेक बाउंसिंग) ची चांगली ओळख आहे एव्हढेच :)

सुबोध खरे's picture

10 Dec 2013 - 7:28 pm | सुबोध खरे

दुसरा कोणता दुकानदार आपल्याला चेक न वटता माल देतो ते आपण सांगा?
साधा ३ ० ० ० रुपयाचा भ्रमणध्वनी चेक देऊन घेऊन दाखवा. सहा आकडी रक्कम सोडून द्या.
चेक परत आला तर त्याची कट कट करायची का आपला व्यवसाय करायचा?

वाचा
http://timesofindia.indiatimes.com/city/ahmedabad/Cheque-bounce-case-Fat...
In 2008 October, the city had 84,000 cases were pending under the Negotiable Instruments Act, where cheque bouncing cases are dealt with. To address this problem, 10 courts were started. The situation is no better still. There are 1.1 lakh cases pending nowadays, as against a pendency of 79,000 cases in 25 courts of Gujarat high court.
Commission of India-- more than 38 lakh cheque bouncing cases were pending before various courts in the country.

राजेंद्र मेहेंदळे's picture

10 Dec 2013 - 7:37 pm | राजेंद्र मेहेंदळे

रु.३००० च्या चेकसाठी कोर्टात जाणे परवडणार नाही दुकानदाराला..पण मला २० ते ८० हजार च्या खरेदीत दुकानदारानी चेक वटायची वाट न बघता डिलीव्हरी केल्या आहेत.उदा. TV,फ्रीझ

निदान मला तरी असा अनुभव नाही आला,मी महिन्याची वाणसामानाची खरेदी डी-मार्ट मधुन नियमीत डेबिट कार्ड्ने करतो,पण मला अजुन पर्यन्त तरी कसले सर्विस चार्जेस भरावे लागले नाहीत्,उलट क्रेडीट कार्डाचा वाईट अनुभव आला,माझ्याजवळ sbi चे कार्ड होते वार्षिक चार्जेस तसेच बिले वेळेवर न मिळणे,त्यामुळे पुढील महिन्यात सव्याज पैसे उकळणे,बोनस पॉईंटचा उपयोग शुन्य तसेच ते बाद होणे,त्यापेक्षा डेबिट कार्ड हे जास्त सोयीचे वाटले.

चुकीचे आहे. तो व्यापार्‍याने स्वतःच्या खिशातून भरायला हवा.

स्पा's picture

9 Dec 2013 - 9:04 pm | स्पा

त्रोटक वाटला खुप

श्रीरंग_जोशी's picture

10 Dec 2013 - 10:03 am | श्रीरंग_जोशी

लेखात दिलेले मुद्दे महत्त्वाचे आहेत. मी देखील गेल्या अनेक वर्षांपासून अनेक क्रेडिट कार्डांचा सढळ हस्ते वापर करत आहे. आजवर कुठलीही समस्या आलेली नाही व व्याजही भरावे लागले नाही. कॅशबॅक व रिवार्ड प्रोग्रम्सद्वारे थोडाबहुत आर्थिक व व्यावहारिक लाभच झाला आहे.

क्रेडिट कार्डसच्या वापरातून अधिकाधिक लाभ मिळवण्याबाबत मी लिहिलेला एक लेख वर rediff.com ६ वर्षांपूर्वी प्रकाशित झाला होता.

माझ्या मते निम्न मध्यम वर्गीयांसाठी क्रेडिट कार्ड वरदान ठरू शकते. माझे स्वतःचे उदाहरण सांगतो. विद्यार्थीदशेपासून स्वतःचा डिजीटल कॅमेरा असावा असे मला खूप वाटायचे. नोकरी लागल्यावर ही वस्तू अग्रक्रमाने खरेदी करायची असे मी मनोमन ठरवले होते. पण प्रत्यक्ष नोकरी लागल्यावर नव्या शहरात स्थिरावण्यासाठी लागणारे विविध खर्च भागवता भागवता दीड वर्षे निघून गेली तरी कॅमेरा खरेदी परवडण्याची शक्यता दिसत नव्हती.

त्यातच एके दिवशी रस्त्याने जाताना माझ्याकडे ज्या बँकेचे क्रेडिट कार्ड होते त्यांची जाहिरात दिसली. त्यात सोनी सायबरशॉट कॅमेरा शून्य टक्के व्याजदरावर २४ सुलभ हप्त्यांमध्ये उपलब्ध होता. मी ती सुवर्णसंधी न दडवता पहिल्यांदा डिजीटल कॅमेरा खरेदी केला. ही संधी मिळाली नसती तर पहिला कॅमेरा खरेदी करण्यासाठी मला अजून किती वाट बघावी लागली असती देव जाणे.

गमतीचा भाग असा की क्रेडिट कार्ड वापरणे म्हणजे घरातली भांडीकुंडी विकून नशापाणी करणे या दृष्टीने पाहिले जाते. वर्षानुवर्षे बँकिंग क्षेत्रामध्ये काम करणारेही क्रेडिट कार्ड वापराबाबत असाच विचार करतात. लोकांना असे का वाटते की क्रेडिट कार्डचा वापर ऐपत नसताना उधळपट्टी करण्यासाठीच करायचा असतो? वीज बिल, फोन बिल, इंधन, कपडे, वाणसामान खरेदी यासाठी त्याचा उपयोग करून रिवार्ड प्रोग्रामद्वारे आर्थिक लाभही मिळू शकतो हे लक्षात घेतले पाहिजे.

गेल्या वर्षीच माझा पहिला मिररलेस कॅमेराही क्रेडिट कार्डद्वारेच शून्य टक्के व्याजावर घेतला :-).

प्रकाश घाटपांडे's picture

10 Dec 2013 - 10:20 am | प्रकाश घाटपांडे

लोकांना असे का वाटते की क्रेडिट कार्डचा वापर ऐपत नसताना उधळपट्टी करण्यासाठीच करायचा असतो?

अगदी तसे नसले तरी लोकांना अनावश्यक खरेदीची नशा लावण्यात क्रेडिट कार्डाचा मोठा वाटा आहे. लोकांच्या या मानसिकतेचा विचार करुनच ही क्रेडिट कार्डची निर्मिती झाली आहे. त्याचा विवेकी वापर करणार्‍या लोकांची संख्या अत्यल्प आहे. कॅश सांभाळण्यात धोका म्हणजे तेवढे पैसे फार तर पाकीटमार मारु शकतो पण इथे तर आख्खा ब्यांक बॅलन्सवर तो डल्ला मारु शकतो.

गवि's picture

10 Dec 2013 - 11:38 am | गवि

अगदी अगदी.

जसे किराणामाल दुकान हाच एक ऑप्शन उपलब्ध असलेल्या काळात इमानदारीत घरातून यादी बनवून दुकानदाराला द्यावी अन त्याने सामान घरी आणून टाकावे अथवा काउंटरचा पलीकडून गोळा करुन थैलीत भरुन द्यावे अशी पद्धत होती. त्यात जे हवं तेवढंच घेतलं जायचं.

पण सुपरशॉप, सुपरमार्केट अशा कन्सेप्टमुळे काउंटरवर वस्तू स्वहस्ते घेण्याची सोय(!) झाल्यावर यादीतील वस्तू एकवेळ येतील न येतील पण पाहून मोहात पडून घेतलेल्या जास्तीच्या दीडपट संख्येने वस्तू तरी येतात हा स्वतःचा अनुभव आणि शिवाय हा अनुभव इतरांचाही असणार हे मॉलच्या बिल-रांगेतल्या मागील पुढील शॉपिंगकार्टांमधील तुडुंब वाहणार्‍या वस्तूंच्या निरीक्षणातूनही स्पष्ट होतं.

फार थोडे लोक मॉलात शिरुन मनात जितकं ठरवलं होतं तितकं घेऊन बाहेर पडतात. मॉल / मार्ट मधून ढीगभर सामान घेऊन कारमधे रिचवले पण जे आणायला बाहेर पडलो होतो तेच घेतलं नाही असं माझं अनेकदा झालं आहे, आणि इतरांचंही असेलच. शॉपिंग हा एन्टरटेनमेंट बिझनेस बनतो आहे..

क्रेडिट कार्ड हा प्रकार अशा आगीत पेट्रोल ओतणारा घटक आहे. प्रचंड आकर्षित करणारा टॅब्लेट.. किंवा हँडसेट.. झीरो इंटरेस्ट ई एम आय.. आत्ता समोर दिसतोय आणि बस्स एक स्वाईप, की हातातही येईल.. पुढच्या तीन महिन्यात विभागून पैसे कापले जातील.. पगार येतोच आहे दरमहा.. अशी आकर्षणं प्रचंड निग्रह नसलेल्या साधारण मनोवृत्तीच्या मनुष्याला भयंकर अडकवतातच..

लोकांच्या खिशातला पैसा बाहेर काढण्यासाठी हा अर्थव्यवस्थेत डेव्हलप झालेला अनिवार्य भाग आहे.

शनाया ट्वेनचं का चिंग हे गाणं याविषयी एकदम ऐकण्यासारखं आहे.

शब्द :

We live in a greedy little world--
that teaches every little boy and girl
To earn as much as they can possibly--
then turn around and
Spend it foolishly
We've created us a credit card mess
We spend the money that we don't possess
Our religion is to go and blow it all
So it's shoppin' every Sunday at the mall

All we ever want is more
A lot more than we had before
So take me to the nearest store

[Chorus:]
Can you hear it ring
It makes you wanna sing
It's such a beautiful thing--Ka-ching!
Lots of diamond rings
The happiness it brings
You'll live like a king
With lots of money and things

When you're broke go and get a loan
Take out another mortgage on your home
Consolidate so you can afford
To go and spend some more when
you get bored

All we ever want is more
A lot more than we had before
So take me to the nearest store

[Repeat Chorus]

Let's swing
Dig deeper in your pocket
Oh, yeah, ha
Come on I know you've got it
Dig deeper in your wallet
Oh

All we ever want is more
A lot more than we had before
So take me to the nearest store

[Repeat Chorus]

Can you hear it ring
It makes you wanna sing
You'll live like a king
With lots of money and things
Ka-ching!

अनुप ढेरे's picture

10 Dec 2013 - 5:11 pm | अनुप ढेरे

मोहात पडून घेतलेल्या जास्तीच्या दीडपट संख्येने वस्तू तरी येतात

एकदम सहमत !
गाणं मस्तच आहे !

हीच गोष्ट मोटार दुचाकी बद्दल फार काय दारू बद्दल हि म्हणता येईल

मंदार कात्रे's picture

10 Dec 2013 - 10:20 am | मंदार कात्रे

क्रेडिट कार्ड वापरणे म्हणजे घरातली भांडीकुंडी विकून नशापाणी करणे या दृष्टीने पाहिले जाते. वर्षानुवर्षे बँकिंग क्षेत्रामध्ये काम करणारेही क्रेडिट कार्ड वापराबाबत असाच विचार करतात. लोकांना असे का वाटते की क्रेडिट कार्डचा वापर ऐपत नसताना उधळपट्टी करण्यासाठीच करायचा असतो

सामान्यतःअस्साच समज आहे !

उद्दाम's picture

10 Dec 2013 - 12:16 pm | उद्दाम

मलाही क्रेडिट कार्ड चंगले उपयोगी वाटले.

माझ्याकडे एच डी एफ सी चे होते. छान सर्विस मिळाली. मी मॉलमधील खरेदी, एका कोर्सची फी भरणे, कधीतरी विमान प्रवास केले तेंव्हा कार्ड वापरले. त्याचे पॉइंटही मिळाले

माझे सिल्वर कार्ड होते. ते गोल्ड करा, अशी जाहिरात आली. मी त्याला भुलुन फॉर्म भरला. जुने कार्ड मग बाद झाले आणि नवीन आलेच नाही. अ‍ॅड्रेस वेरिफिकेशनला सात वेळा फोन आले. पण कार्ड मिळालेच नाही. शेवटी मी कंटाळून तुम्चे कार्ड नको असा मेसेज पाठवला.

त्यानंतर आजतागायत कुठलेही च्रेडिट कार्ड घेतलेले नाही.

सुनील's picture

10 Dec 2013 - 2:58 pm | सुनील

क्रेडिट कार्ड हे दुधारी शत्रासारखे आहे. त्याचा व्यवस्थित वापर केलात तर खूप उपयोगी, नाहीतर खिशाला भगदाड!

SMS अ‍ॅलर्टबद्दल वर आलेच आहे. तसेच जसे दिवसातून एकदा मिपावर चक्कर टाकता तसेच कार्डाच्या सायटीवरदेखिल चक्कर टाका.

सर्वाधिक फायद्यासाठी दोन कार्डे ठेवावीत. दोहोंच्या बिलिंग सायकलमध्ये साधारणतः १५ दिवसांचे अंतर ठेवावे (बिलिंग सायकल आपल्याला बदलून घेता येते). म्हणजे सर्वाधिक दिवसांचे क्रेडिट घेता येईल. खेरीज, अडीअडचणीला बॅलन्स ट्रान्स्फरच्या सुविधेचाही वापर करता येईल.

वेळच्यावेळी पेमेंट करणे मात्र जरूरीचे!

प्रकाश घाटपांडे's picture

10 Dec 2013 - 3:41 pm | प्रकाश घाटपांडे

युयुत्सुंचा या बाबतचा अनुभव मिपावर पुर्वी वाचला होता. http://www.misalpav.com/node/9792

मी क्रेका वापरते. त्यावरील पैसेही वेळेवर भरले जातात. खरेतर क्रेका वापरणे आवडत नाही. आधी डेका वापरत होते. रोखीने बिले भागवणे ही माझी आवडती, सोयिस्कर, मानवलेली गोष्ट आहे. ब्यांकेने आमचे जुने कार्ड बदलून त्याजागी नवे चिप असलेले कार्ड करून दिले आहे. एकंदरीतच क्रेका, डेका वापरणे सुरक्षित वाटत नाही. चोर लेकाचे आपल्यापेक्षाही डोकेबाज असतात. त्यांच्या युक्त्या बदलत्या असतात. आपल्याला नाही जमले सारखे सतर्क रहायला तर? असे वाटत राहते. असो.

राजेश घासकडवी's picture

10 Dec 2013 - 11:19 pm | राजेश घासकडवी

In the decade to 2008, general credit card losses have been 7 basis points or lower (i.e. losses of $0.07 or less per $100 of transactions).

संदर्भ

बहुतांश क्रेडिट कार्ड धारक यापेक्षा कितीतरी जास्त पैसे योग्य वेळी पैसे परत न केल्याबद्दल व्याज वा दंड या स्वरूपात भरतात. तसंही क्रेडिट कार्ड कंपनीला गैरव्यवहार कळवल्यावर त्यांनी ते पैसे परत दिल्याचे अनेक लोकांचे अनुभव माहित आहेत. तेव्हा सुरक्षेसाठी कॉमन सेन्स उपाय जरूर वापरावेत, पण प्रत्येक वेळी धोका होईलच अशी भीती बाळगून प्रत्येक ट्रॅंझॅक्शनवर बारीक नजर ठेवणे वगैरे उपाय मला तरी मानसिक दृष्ट्या 'खर्चिक' वाटतात.

त्यापेक्षा गविंनी मांडलेला मुद्दा - केवळ कार्ड आहे म्हणून सामान भरून घेण्याचा खर्च हा कितीतरी पटींनी अधिक असतो. तो आवरावा. पेनी वाइज आणि पाउंड फूलिश होऊ नये.

सुबोध खरे's picture

10 Dec 2013 - 11:26 pm | सुबोध खरे

मला माहिती असल्या पेक्षा कितीतरी जास्त गैरसमज आहेत असे दिसते.

श्रीरंग_जोशी's picture

11 Dec 2013 - 12:10 am | श्रीरंग_जोशी

पण दशकभरापूर्वीपेक्षा आजचे चित्र बरेच सकारात्मक आहे. भविष्यात परिस्थिती नक्कीच सुधारेल असा विश्वास वाटतो.

अवांतर - रोख चलनाचा वापर कमीत कमी का करावा

रमेश आठवले's picture

14 Dec 2013 - 3:25 pm | रमेश आठवले

खरे यांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर मी sbi क्रेडीट कार्ड ला माझ्या एका मित्राला hdfc कार्ड त्याचा पगार त्याच ब्यांकेत जमा होत असल्यामुळे फुकट मिळाले आहे असे कळवले आणि
माझी परस्थिती तशीच असल्याने मलाही तशीच सवलत मिळावयास हवी असे लिहिले. त्यावर त्यांनी मलाही तीच सवलत देऊ केली आणि नोवेंबर महिन्यात फी पोटी घेतलेले १००० रु. पुढच्या महिन्याच्या बिला मध्ये परत करण्याचे आश्वासन दिले आहे.

प्रकाश घाटपांडे's picture

14 Dec 2013 - 3:27 pm | प्रकाश घाटपांडे

बघा असा फायदा होतो.

मला आलेला डेबिट कार्डचा वाईट अनुभव….

माझे HDFC बँकेचे debit कार्ड मी emergency मध्ये june महिन्यात CANARA बँकेच्या ATM मध्ये वापरले.. काही तांत्रिक बिघाडामुळे मी काढलेल्या २० ० ० /- रुपयांपैकी १ ५ ० ० /- रुपये बाहेर आले आणि ५ ० ० /- रुपये कमी आले. मी HDFC शी email करून पिच्छा पुरवला पण त्यांनी CANARA बँकेचा report मागवून २ ० ० ० /- रुपये बाहेर आले होत्ते म्हणून मलाच खोट्यात पाडले… अशा प्रकारांची दाद कोठे मागावी ? कसा पाठपुरावा करावा ? अश्शी बॅंकेकडून होणारी फसवणूक कशी थांबवावी.?
म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काल सोकावतो… मार्गदर्शन अपेक्षित आहे.

गवि's picture

17 Dec 2013 - 8:36 am | गवि

आरबीआयच्या बँकिंग ओम्बड्समनकडे तक्रार करणे हा या केसमधला एकमेव उपाय आहे.

ही लिंक वापरा; काही वॉर्निंग आली तरी कंटिन्यू करा, आरबीआयचीच वेबसाईट आहे.

https://secweb.rbi.org.in/BO/precompltindex.htm

ओम्बड्समनचे पत्ते:

http://www.rbi.org.in/Scripts/bs_viewcontent.aspx?Id=164

ओंबड्समनकडे केस गेली की बँकेला तातडीने कारवाई करावीच लागते.

ह्या साठी सर्वोत्तम उपाय सकाळ मध्ये आला होता. प्रथम बँकेच्या कॉलसेंटरला फोने करून तक्रार करावी व तक्रार नोंद क्रमांक घ्यावा. नंतर पोलिस स्टेशनमध्ये जावुन रीतसर फसवणुकीची तक्रार करावी. अर्थात दोन्ही बँकेविरुद्ध व सर्व पुरावे उदा. ईमेल, तक्रार नोंद क्रमांक ई. द्यावेत. नंतर पोलिसांकडून सदर प्राथमिक तक्रार नोंद क्रमांक (FIR) घेउन जमल्यास आपल्या बँकेला कळवावे अथवा पोलिस ते नंतर करतातच पण वेळ जावु नये असे वाटत असल्यास आपल्या बँकेला कळवावे. सर्व पोलिस तक्रार नोदवून घ्यायला मा. कोर्टच्या आदेशानुसार बंधनीय आहेत. प्रकाश घाट्पांडे साहेब या साठी उर्वरित मार्गदर्शन करतीलच.

अव्यक्त's picture

16 Dec 2013 - 1:18 am | अव्यक्त

ह्या साठी सर्वोत्तम उपाय सकाळ मध्ये आला होता अहो हर्षद दादा, मला "सकाळ"च्या लेखाचे कात्रण मिळेल का? कोणत्या तारखेचा होता ? सविस्तर माहिती द्याल का? आणि माझे transaction १७ जून २ ० १ ३ रोजी झाले होते ह्या गोष्टीला तब्बल ६ महिने झालेत… मला आता हालचाल करून दाद मिळेल का? मार्गदर्शन करा… आणि पोलिस स्टेशन मध्ये आता माझी तक्रार नोंदवून घेतील काय?

प्रकाश घाट्पांडे साहेब या साठी उर्वरित मार्गदर्शन करतीलच.
साहेब मार्गदर्शन करा.आणि माझे transaction १७ जून २ ० १ ३ रोजी झाले होते ह्या गोष्टीला तब्बल ६ महिने झालेत… मला आता हालचाल करून दाद मिळेल का?

ऋषिकेश's picture

16 Dec 2013 - 11:15 am | ऋषिकेश

मी रोजच्या वापरात डेबिट कार्डेच वापरतो, क्रेडित कार्डे नाहित. जालावरील ट्रान्झेक्शन ऑनलाईन बँकिंगने करतो कोणत्याही कार्डाने नाही.

जितके पैसे आपल्याकडे आहेत तितकाच व्यवहार करणे मला सुरक्षित वाटते.