[अनुभव] बॅन्कांचा हलकटपणा

युयुत्सु's picture
युयुत्सु in जनातलं, मनातलं
19 Oct 2009 - 10:15 am

माझ्याकडे Standard Chartered बॅंकेचे क्रेडीट कार्ड आहे. नुकताच मला बॅंकेकडून फोन आला. पलीकडे फोनवरुन बोलणारा सेल्समन, त्याची सगळी कौशल्ये पणाला लावून मला म्हणाला की माझे आतापर्यंतचे रेकॉर्ड बघुन बॅन्केने माझे कार्ड upgrade करायचे ठरवले आहे. त्या कार्डाच्या सुविधा मला एक वर्ष फुकट वापरता येतील. त्याअगोदर माझे सध्याचे कार्ड एक महिन्या नंतर रद्द होईल, इत्यादि.

मी टेलिफोनवर खपविण्यात येणा-या कोणत्याही योजनेस कधिही भुलत नाही. वरील संभाषणात मी त्या सेल्समनला एक प्रश्न परत परत विचारला - या नव्या कार्डाची वार्षिक फी एका वर्षानंतर मला किती द्यावी लागेल. माझ्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे त्याने शिताफीने टाळले तेव्हा मी त्याला कडक शब्दात मला त्याच्या योजनेत रस नसल्याचे सांगितले आणी फोन बंद करायला सांगितले. त्याने माझे चालू कार्ड बंद होणार असल्याची मला परत परत धमकी दिली पण माझ्याकडे दूसरे कार्ड असल्याने मी त्याला बधलो नाही.

यातून काही मुद्दे उपस्थित होतात -
० बॅंन्क परस्पर कार्ड upgrade करु शकते का?
० तसेच जुने कार्ड परस्पर रद्द करू शकते का?

रिझर्व बॅन्केने वसुली एजटांचा छळवाद थांबवण्यासाठी काही पावले नुकतीच उचलली. पण क्रेडीट कार्डच्या योजना आणि त्याविषयीच्या तक्रारी निवारण करण्यासाठी ट्राय सारखी एखादी नियामक संस्था आहे का?

याच अनुषंगाने मला दूसरे एक निरीक्षण इथे नोंदवायचे आहे. बर्‍याच बॅन्कानी आता कोअर बॅन्कींग स्वीकारले आहे. कोअर बॅंकींग मुळे जुने खाते क्रमांक न वापरता नवे १२ आकडी खाते क्रमांक वापरायचा आग्रह बॅंका धरतात. आता जे लोक ECS वापरतात त्यांच्यावर बॅन्केने नवे खाते क्रमांक संबंधिताना कळविण्याची जबाबदारी टाकली आहे. मला हे खटकते कारण कोअर बॅंकीग हे बॅन्केने स्वीकारलेले तंत्रज्ञान आहे आणि त्याचे implementation ग्राहक निरपेक्ष आणि पारदर्शक व्हायला हवे. साठी-सत्तरी गाठलेल्या लोकांना नवा खाते क्रमांक बदलायला लावण्यासाठी धावाधाव करायला लावून बॅंकाना काय मिळते हे कळायला मार्ग नाही. एखादी नवी प्रणाली वापरात आणताना ज्येष्ठ नागरीकांचा विचार प्राधान्याने व्हायला हवा पण आपण भारतीय लोक हे कधी शिकणार देव जाणे...

जीवनमानमत

प्रतिक्रिया

अवलिया's picture

19 Oct 2009 - 10:27 am | अवलिया

तुमचं नशीबच खत्रुड ब्वा.
सगळे हलकट लोक तुम्हालाच भेटतात.
एकदा कुंडली दाखवुन घ्या जाणकाराला आणि काय शांती वगैरे असेल ती करुन घ्या.

:)

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

JAGOMOHANPYARE's picture

19 Oct 2009 - 11:30 am | JAGOMOHANPYARE

साठी-सत्तरी गाठलेल्या लोकांना नवा खाते क्रमांक बदलायला लावण्यासाठी धावाधाव करायला लावून बॅंकाना काय मिळते हे कळायला मार्ग नाही. >>>>>>>>>>>>

साठीखालील लोकाना एक वेगळा नंबर आणि नंतरच्याना एक वेगळा नंबर असे बँकानी करावे की काय? प्रणाली बदलली की सर्वाना बदलावेच लागते... क्रेडीट कार्ड अनुभव... मात्र अगदी सार्वजनिक आहे..... असे अनुभव यायला नकोत, याला अनुमोदन.

***************************
प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l
प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll

प्रकाश घाटपांडे's picture

20 Oct 2009 - 9:21 am | प्रकाश घाटपांडे

यात ग्राहकाभिमुख होण्यासाठी जशी आंतरजालावर डोमेन नेम सर्विस चालू झाली तशी ग्राहकसुलभ खाते क्रमांक हा कोअर बँकिंग मधील लांबलचक नंबरात रुपांतरीत करणारी यंत्रणा निर्माण करणे गरजेचे होईल.
बाकी हल्ली ग्राहक सेवेत-करारात अनेक छुपे मुद्दे असतात. सर्व वाचुन सही करायची हे व्यावहारिक दृष्ट्या शक्य होत नाही.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

पाषाणभेद's picture

20 Oct 2009 - 9:30 am | पाषाणभेद

तुमाला त्याच बँकेत जायच आसल तर शेवटले लंबर ३/४ ध्यानात राहू द्या. त्योच खात लंबर र्‍हातूया. पयले सगले लंबर सगळ्यांस्नी सारखे र्‍हात्यात.
--------------------
पासानभेद
(महारास्ट्र मैं जाने के लिये हमे कन्टॅक करें|)

पाषाणभेद's picture

20 Oct 2009 - 9:30 am | पाषाणभेद

तुमाला त्याच बँकेत जायच आसल तर शेवटले लंबर ३/४ ध्यानात राहू द्या. त्योच खात लंबर र्‍हातूया. पयले सगले लंबर सगळ्यांस्नी सारखे र्‍हात्यात.
--------------------
पासानभेद
(महारास्ट्र मैं जाने के लिये हमे कन्टॅक करें|)

देवदत्त's picture

19 Oct 2009 - 11:59 am | देवदत्त

तुम्ही बँकेच्या ग्राहक केंद्रावर फोन करून खात्री करून घ्या. बहुतेक वेळा हे कॉल एजंटकडून असतात. बँक आणि हे एजंट ह्यांना परस्परासंबंधी माहिती विचारल्यास त्यांना ती नसते (ते देत नाहीत असे मला वाटत नाही)

माझ्या माहितीप्रमाणे,
बँक परस्पर काही गोष्टी करू शकते, पण त्याबाबतचा उल्लेख भरलेल्या अर्जात आहे का हे तपासून पहावे. जर ग्राहकाला अतिरिक्त आर्थिक भार पडत असेल तर त्याची सूचना ग्राहकाला आधी देणे बंधनकारक आहे.

शोधल्यानंतर थोडीफार माहिती येथे मिळाली.

The card issuing bank/NBFC should not unilaterally upgrade credit cards and enhance credit limits. Prior consent of the borrower should invariably be taken whenever there are any change/s in terms and conditions.

बाकी, बँकेच्या प्रश्नाबद्दल मला उत्तर रिझर्व बँकेच्या संकेतस्थळावर अजून मिळाली नाही. ग्राहकाच्या बदललेल्या खात्याची माहिती ते देणार नाहीत, अन्यथा ग्राहकाची माहिती दुसर्‍याला दिल्याचा आरोप त्यांच्यावर येऊ शकतो. त्यामुळे असे वाटते की बँका स्वत: सुरक्षित राहण्याचा प्रयत्न करतील.

युयुत्सु's picture

20 Oct 2009 - 4:35 pm | युयुत्सु

महत्त्वाच्या संदर्भाबद्दल आभारी आहे...

युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||

- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

तिमा's picture

19 Oct 2009 - 1:52 pm | तिमा

लहानपणापासून मला एका प्रश्नाचे उत्तर मिळालेले नाही. कोणी जाणकार सांगू शकेल ?
बेंक मधील मो.कि. अर्धा
असे 'नवा वेपार' या खेळात लिहिलेले असायचे. त्याचा अर्थ काय ?

हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

कानडाऊ योगेशु's picture

20 Oct 2009 - 4:43 pm | कानडाऊ योगेशु

मला असाच अनुभव H.S.B.C बँकेकडुन आला.कंपनीत बँकेचा कुणी एजंट आला होता आणि क्रेडिट कार्ड घेतले तर एक टेबल-क्लॉक मिळणार होते.माझ्यासकट झाडुन सगळ्या कलिग्जनी त्या फुकटात मिळणार्या क्लॉकसाठी क्रेडिट कार्ड साठी अप्लाय केले.वर्षभरानंतरच सगळ्यांना बँकेचे जे स्टेटमेंट आले त्यात बँकेने क्रेडिट-कार्डची वार्षिक फी लावली होती. बँकेच्या कस्टमर केअर वर फोन केल्यानंतर आणि कार्ड कॅन्सल करण्याची धमकी दिल्यानंतर बँकेने ती ड्यु अमाऊंट रिवर्ट केली.पण अजुनही असे पुन्हा होणार नाही ह्याची काडीमात्र खात्री नाही.