मंतरलेले दिवस ते, पुन्हा परत येतील का....

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in जे न देखे रवी...
30 Oct 2013 - 9:10 pm

येतील का
मिपा चाळत असताना एका धाग्याचं नाव वाचलं आणि त्या मक्त्याला धरून विचारांना बरोबर घेत मग काव्य सुचत गेलं...

aaa
नाणेघाटच्या अविस्मरणीय ट्रेक मधील एक निवांत क्षण

मंतरलेले दिवस ते, आता परत येतील का
वेळीअवेळी मित्र माझे हाका मारत येतील का

मान्य आहे सगळे येथे गरजेपुरते सखे
गरजेला मी साद घालता तरीही धावत येतील का

भेटलास आनंद झाला, नको म्हणाया कुणी
नाही भेटलो म्हणून साले शिव्या घालत येतील का

निर्जळ झाल्या आपुलकीच्या नद्या इथे डोळ्यात
प्रेमाचे ते झरे नभातून वाजत गाजत येतील का

मिटेल का कधी इथली ही विषयांची वानवा
उगीच कुणी मग शाळेच्या त्या गोष्टी सांगत येतील का

मी दिसता जे हात दाविती, हसती बघून मजला
मी नसता ते सगळे चेहरे मला विचारत येतील का

गर्वाच्या ईर्षेच्या भिंती तुटतील कधी अपूर्व
स्वत:स विसरून स्वत:च सारे स्वत:स शोधत येतील का

- अपूर्व.
सर्व हक्क राखीव.

मराठी गझलशांतरसकविता

प्रतिक्रिया

वेल्लाभट's picture

31 Oct 2013 - 10:17 am | वेल्लाभट

अरेच्चा!
माझा धागा इन्विजिबल राहिला की काय :P प्रतिसादच नाहीत :P

खूप छान गझल ! प्रा. अरुण म्हात्रे यांच्या शब्दात सांगायचे तर " ते दिवस आता कुठे जेंव्हा फुले बोलायची, दूर ती गेली तरीही तिची सावली भेटायची" हरवले ते दिवस … !

पैसा's picture

31 Oct 2013 - 10:58 am | पैसा

कल्पना, फोटो आणि त्यानुरूप कविता. फार छान!

पियुशा's picture

31 Oct 2013 - 11:39 am | पियुशा

मस्त !

डॉ सुहास म्हात्रे's picture

31 Oct 2013 - 11:49 am | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर !