( चला नांगरूया शेत सारे )

Primary tabs

मोदक's picture
मोदक in जे न देखे रवी...
15 Oct 2013 - 3:49 pm

आमचे लाडके लोककवी हभप श्री धनाजीराव यांच्या काव्यजीवनातील चरणकमलांचे तंतोतंत अनुकरण करण्याच्या आमच्या छोट्या प्रयत्नांचे हे पुढचे पाऊल.

चल परत नव्याने सुरू करू सारे या काव्यातून पेरणीचा मनोदय व्यक्त करणार्‍या धनाजीरावांनी नांगरणीवर काहीच भाष्य केले नसल्याने धनाजीरावांच्या गोधडीला ठिगळ लावण्याचा हा प्रयत्न गोड मानून घ्यावा..

***************************************************

बाई पाटाला आलंय पाणी वाफ्यात कुदळ मारुन घे
वरच्या अंगाची दोन मोठी ढेकळं माझ्या मोंगरानं* फोडून घे

कामाला लाग बिगी बिगी वरची ढेकळं अजून जरा फुटू दे
खालच्या पाटाचं स्वच्छ पाणी तुझ्या शेतात खळाळत सुटू दे
माझ्या मोठया फाळानं शेत तुझं बाई खोलवर नांगरुन घे
बाई पाटाला आलंय पाणी वाफ्यात कुदळ मारुन घे

खुरपी, विळा, टिकाव, खोरं झेपंल ते हत्यार हातात घे
मोठ्या फाळानं नांगरणी केली तरी अजून कामाला दम र्‍हावू दे
येवढं कष्ट केल्यापरी घामाचं पीक उभे र्‍हाऊ दे
बाई पाटाला आलंय पाणी वाफ्यात कुदळ मारुन घे

बाई पाटाला आलंय पाणी वाफ्यात कुदळ मारुन घे
वरच्या अंगाची दोन मोठी ढेकळं माझ्या मोंगरानं फोडून घे.

***************************************************

*मोंगर - लोखंडी घणाच्या आकाराचे लाकडी औजार जे शेतकरी ढेकळं फोडण्यासाठी वापरतात.

***************************************************

अभय-काव्यकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडबालसाहित्यभूछत्रीवाङ्मयशेतीभयानकबालगीतविडंबनव्युत्पत्तीसमाजजीवनमानतंत्रक्रीडाशिक्षणमौजमजा

प्रतिक्रिया

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

15 Oct 2013 - 3:51 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

खुरपी, विळा, टिकाव, खोरं झेपंल ते हत्यार हातात घे
मोठ्या फाळानं नांगरणी केली तरी अजून कामाला दम र्‍हावू दे
येवढं कष्ट केल्यापरी घामाचं पीक उभे र्‍हाऊ दे
बाई पाटाला आलंय पाणी वाफ्यात कुदळ मारुन घे

लयीच भारीये...

येवढं कष्ट केल्यापरी घामाचं पीक उभे र्‍हाऊ दे
बाई पाटाला आलंय पाणी वाफ्यात कुदळ मारुन घे

बाई पाटाला आलंय पाणी वाफ्यात कुदळ मारुन घे
वरच्या अंगाची दोन मोठी ढेकळं माझ्या मोंगरानं फोडून घे.

कष्ट, घाम, अन ढेकूळविच्छेदन करण्यासाठीचे लाङ्गल याञ्चे वर्णन अतिशयच आवडले. क्षेत्र-शस्त्रादि वर्णनाने अनादि ऐक्य सांगण्याच्या लेखकाच्या खुबीला सलाम.

शिवाय कोडाईकनालला जाऊन भूछत्रांची शेती केल्या गेली पाहिजे असा उद्योजकतेला पूरक सल्ला दिल्याबद्दलही आभार. या सल्ल्यामागे दूर((हनी)चन्द्र)दृष्टी दिसून येते. गरम पाण्याचे कुण्ड बहुतेक कोडाईकनालच्या थंड हवेत काकडून झाल्यावर स्नान करण्यासाठी असावे.

प्रचेतस's picture

15 Oct 2013 - 5:16 pm | प्रचेतस

ढेकूळविच्छेदन हा शब्द काळजाला भिडला =))

धन्या's picture

15 Oct 2013 - 4:03 pm | धन्या

मस्त जमलंय. :)

मोदक's picture

15 Oct 2013 - 4:09 pm | मोदक

तुमचे आशीर्वाद हायेत गुरूम्हाराज!!! :-)

पैसा's picture

15 Oct 2013 - 4:07 pm | पैसा

काव्यरस:
gulub
kavita shradhdhanjali
अभय-काव्य
कोडाईकनाल
गरम पाण्याचे कुंड
बालसाहित्य
भूछत्री
वाङ्मयशेती
भयानक
लेखनविषय::
बालगीतविडंबनव्युत्पत्तीसमाजजीवनमानतंत्रक्रीडाशिक्षणमौजमजा

ब्वॉर्र ब्वॉर्र.

धन्याच्या कवितेवरचा प्रतिसाद दिला आहे असे समजून घ्यावे.

चौकटराजा's picture

15 Oct 2013 - 4:10 pm | चौकटराजा

भूमीहीन शेतकर्‍यासाठी एक भूमिहीन- चाळीशीतला युवक जमीन सुरक्षा बील ( प्रत्येकासाठी जमीन ) आणणार आहे. मग नांगरटीच्या, शेतीच्या, मशागतीच्या, वावराच्या, ढे़कळांच्या कविता पोत्यानी करा लेको !

सौंदाळा's picture

15 Oct 2013 - 4:13 pm | सौंदाळा

वाह
मोदकशेठ पण चांगलेच तयारीचे दिसतायत्...(विडंबनात)

पिलीयन रायडर's picture

15 Oct 2013 - 4:15 pm | पिलीयन रायडर

मोदक तु??????

प्यारे१'s picture

15 Oct 2013 - 4:22 pm | प्यारे१

हत्ती आहे तो....!
(खुलासा : येथे फक्त दाखवण्याचे नि खाण्याचे वेगळे दात म्हणायचं आहे. हा वेगळेपणा फक्त मा. श्री. मोदकराव ह्यांच्या बहुआयामी प्रतिभेचे दर्शन घडावे ह्याच निर्मळ हेतूनं दाखवण्याचा प्रयत्न आहे. गैरसमज नसावा. धन्यवाद.)

तद्वत बिचकू नये. :)

बॅटमॅन's picture

15 Oct 2013 - 4:29 pm | बॅटमॅन

तद्वत

तस्मात म्हणायचे होते काय?

मोदक's picture

15 Oct 2013 - 4:29 pm | मोदक

काय फरक आहे..?

बॅटमॅन's picture

15 Oct 2013 - 4:31 pm | बॅटमॅन

तद्वत= त्याप्रमाणे.

तस्मात= त्यामुळे.

बॅट्या, बॅट्या लेका बालिस्टर का नाही झालास?
बाकी, लग्न कर लेका! थोड्या दिवसांनी कुणी पूर्वेला पश्चिम म्हणायलं तरी आक्षेप घ्यायल यायचा नाहीस.!

(धागाच धुमाकूळ वाला आहे ना. करा राडा) ;)

बॅट्या, बॅट्या लेका बालिस्टर का नाही झालास?

इंजिनिअर झालो म्हणून.

बाकी, लग्न कर लेका! थोड्या दिवसांनी कुणी पूर्वेला पश्चिम म्हणायलं तरी आक्षेप घ्यायल यायचा नाहीस.!

आमच्या लग्नाची काळजी केल्याबद्दल धन्यवाद. बाकी तुम्ही आक्षेप घेणारे नसला म्हणून जनरलायझेशन करू नका बरे ;)

हत्ती ही उपमा (आगोबा या उपमेप्रमाणेच) राखीव आहे असे नम्रपणे सुचवू इच्छितो. ;-)

पिलीयन रायडर's picture

15 Oct 2013 - 5:12 pm | पिलीयन रायडर

कित्तीही सोज्वळ सोज्वळ म्हणलं तरी मोदकाचे असली रंग दिसलेच हो...

मोदकाच्या आवरणात केशरी, हिरवा, पिवळा असे खाण्याचे रंग घालून वेगवेगळे रंग दिसू शकायला हरकत नाही!
उकड काढतानाच असं करावं लागत असेल ना पण पिलियन रायडर?
- निरागस प्यारे

पिलीयन रायडर's picture

15 Oct 2013 - 5:29 pm | पिलीयन रायडर

हो..तसं करायला विशेष कष्ट पण पडणार नाहीत..
पण मोदकाच्या बाह्य आवरणाचा रंग धुतल्या तांदुळासारखा पांढरा शुभ्र.. आणि आतल्या बाजुने मात्र असा "नवरंगी" असेल तर?? कष्टाच काम हो..

रच्याकने.. मोदकाला जोडीला करंजी आणायची वेळ झाली आहे का? म्हणजे मोदक आपोआप आतुन बाहेरुन शुभ्र होईल?? रादर त्याची हिंमतच होणार नाही असे रंग उधळायची..

आपली दृष्टी अत्यंत पवित्र आहे एवढंच नमूद करु इच्छितो....! :)

बाकी गोड (वाटणार्‍या) मोदकाबरोबर 'तिखट रस्साभाजी' चांगली रुजू व्हावी. ;)
हलकं घे हो मोदक. नाहीतर कधी कुठे झणका देशील सांगता यायचं नाही.

-गोडाला भिऊन असलेला प्यारे ;)

वाचतोय.. एकेकटे भेटा, मग बघतो तुमच्याकडे! ;-)

बॅटमॅन's picture

15 Oct 2013 - 6:19 pm | बॅटमॅन

या प्यारेकडे एकदा बघच अशी विनंती. लै लग्न लग्न करू राहिलाय अलीकडे ;)

पिलीयन रायडर's picture

15 Oct 2013 - 6:39 pm | पिलीयन रायडर

आम्ही कुठं काय केलं?
तुच नांगरणी आणि पेरणी आणि काय वाट्टेल ते करतोयस..
हे बघ आम्हाला काही बोलायचं नाई.. मी (गंगासे भी) पवित्र आणि प्यारे (नुसताच) निरागस आहे..

बघा की राव! उगा गरीबाला 'तरास' ;)
- सर्टीफाईड ;) निरागस प्यारे

>> सर्टीफाईड निरागस प्यारे
सर्टीफिकेट कुठून मिळालंय (किंवा मिळवलंय) यावरही बरंच काही असतं बरं. ;)

अरे, तू तो सीरियस हो गया मेरे दोस्त !
जुन्या नव्यांसकट आक्खं मिसळपाव ओळखतं की... आमचा निरागसपणा. :)

बॅटमॅन's picture

15 Oct 2013 - 7:39 pm | बॅटमॅन

प्यारे निरागस? =)) =)) =))

चौकटराजा's picture

15 Oct 2013 - 5:09 pm | चौकटराजा

या वाक्याचा अर्थच मुळी काय ..... ? बूटस दाउ टू ? सारखा ?
प्रामाणिक पणे आपल्या प्रतिभेचे ( अलौकिक) सादरीकरण केलेले दिसतेय मला तरी बुवा !

अग्निकोल्हा's picture

15 Oct 2013 - 4:59 pm | अग्निकोल्हा

इस्त्रिला गुलाम म्हणून राबवण्याच्या मानसिकतेचे उत्तम उदाहरण म्हणजे ह्या काव्यातिल ओळी (हुकुम्स) होय! ह्या पुर्शी आळ्शी पनाचा जाहिर निषेध!

मदनबाण's picture

15 Oct 2013 - 5:15 pm | मदनबाण

जमिनीचा कस कसा आहे यावर नांगरणे अवलंबुन असावे ! ;)

मी-सौरभ's picture

15 Oct 2013 - 6:19 pm | मी-सौरभ

आमच्यासारख्या शेतीचा गंध नसलेल्या सात बारा धारकांसाठी माहितीपुर्ण काव्य आहे हे...

भिकापाटील's picture

15 Oct 2013 - 6:26 pm | भिकापाटील

जमिनीचा कस कसा आहे यावर नांगरणे अवलंबुन असावे

बाणा तूला "पोत"असे म्हणायचे आहे का?

कस शब्दसुद्धा योग्य आहे. कस आणि पोत हे शब्द काहीसे समानार्थी आहेत.

(कस - काळी कसदार जमीन)

अत्रुप्त आत्मा's picture

15 Oct 2013 - 7:04 pm | अत्रुप्त आत्मा

वाह व्वा मादकराव....आपल ते हे...मोदकराव! ;-)

या काव्या वर बेहद्द खुष होउन १ कवीयत्रि भूछत्री बाजुला करून म्हणते,
या मोदकाच्या आत किती सारण दडलय?,
उघडुन मी पाहू का?
सहज "खुलत" नसेल मोदक तर,
त्याला तुपाचं बोट लाऊ का? ;-)

बॅटमॅन's picture

15 Oct 2013 - 7:16 pm | बॅटमॅन

=)) =))

सूड's picture

15 Oct 2013 - 7:22 pm | सूड

काव्यविभागात आलेलं शेतीप्रेमाचं भरतं पाहून कौतुक वाटलं.

अत्रुप्त आत्मा's picture

15 Oct 2013 - 7:32 pm | अत्रुप्त आत्मा

@शेतीप्रेमाचं भरतं पाहून कौतुक वाटलं.>>> आईंईंईंग????? :O
का हो? आपल्याला शेतं आणी शेती अवडत नाही काय? :P

सूड's picture

15 Oct 2013 - 8:26 pm | सूड

पण त्याचं असं उगाच प्रदर्शन करीत नाही. ;)

अत्रुप्त आत्मा's picture

16 Oct 2013 - 7:13 am | अत्रुप्त आत्मा

तुमच्यात "सहज"ला "उगाच" कंसं काय म्हणतात? :P