नेहमीप्रमाणे फेसबूकचे पान उघडले.
सवईप्रमाणे आज कुठल्या कुठल्या मित्रांचे आणि मैत्रीणींचे वाढदिवस आहेत ते बघीतले.
पहिलेच नांव वाचले आणि न विसरता."Happy Birth Day." लिहून मो़कळा झालो.
काही माणसांचे काही-काही विचारच असे असतात की, जे चिरकाल टिकतात.हा यकू पण तसाच विचार करायचा.
तसा मी मिपावर नविनच होतो.(अद्यापही नविनच आहे.)एखादा लेख लिहीला की दर तासा-दोन तासाने येवुन
(खरे तर मिनीटा-मिनीटाला) लेख परत परत बघत पण होतो.जसे मिळतील मिळतील तसे इतर मिपाकरांचे लेख वाचत पण होतो.
एकदा असेच मला मिळालेले प्रतिसाद बघत असतांना एक सुंदर प्रतिसाद मिळाला.नांव बघीतले आणि व्यनि केला आणि सुरु झाला एका नव्या दोस्तीचा प्रवास.त्याने लिहिलेल्या आणि मला आवडलेल्या लेखाला प्रतिसाद तर देत होतोच पण न आवडलेल्या लेखाला व्यनि पाठवत होतो.
व्यनि आणि खरडवहीतून हा माणुस थोडा समजत गेला आणि एक दिवस इंदौरला भेटायचे पण ठरले.काही कारणांमुळे मला मुंबई बाहेर पडता येत न्हवते.तरी पण मिपावरचा माझा वावर होताच.त्यावेळी जरा लौकरच ऑफर लेटर मिळाले आणि मी व्हिसाची वाट बघत बसलो.
व्य.नि तुन माहिती मिळाली की,सध्या यकू संभाजी नगरला आहे.इंदूरपेक्षा संभाजीनगर जास्त जवळ होते आणि सहज जाता देखील आले असते.पण २ वेळा मला प्रवास अर्धवट सोडायला लागला होता.त्यामुळे पुढच्या वर्षी भेटू असे ठरले.पण असे नक्की ठरवून देखील यकूला भेटता आले नाही ते नाहीच आणि पुढेही ह्या प्रुथ्वीवर त्याला भेटता येणार नाही ह्याची हूरहूर मात्र अखेर पर्यंत राहील.
न जाने क्युं होता है ये हमारे साथ
अचानक ये मन किसीके जाने के बाद
करे ये उसकी याद बार बार..
प्रतिक्रिया
14 Oct 2013 - 10:43 am | नानबा
फार सुंदर लिहिलंयत हो...
14 Oct 2013 - 10:52 am | विटेकर
.........कळ एक जीवघेणी आमच्या उरात आली!
इतके दिवस झाले हा यकु डोक्यातून जाता जात नाही !
15 Oct 2013 - 9:55 am | अत्रुप्त आत्मा
इतके दिवस झाले हा यकु डोक्यातून जाता जात नाही !>>> +++++१११११
मलापण फे.बु.वर तेच दिसले, पण नंतर म्हटलं...अनेकांना खरी बातमी लागलेली नसेल! :-(
15 Oct 2013 - 10:04 am | मुक्त विहारि
बातमी लावली आहे....
(आणि तसेही जो माणुस उत्तम विचार ठेवून जातो, तो स्वर्गात गेला तरी विचार रुपाने जिवंत राहतोच ना?)
14 Oct 2013 - 10:59 am | मनिष
माझीही भेट अशीच राहिली. आज त्याच्या वॉलवर कित्येकांचे 'Many, manhy jhappy returns of the day' किंवा 'जिवेत शरद: शतम्' वाचून उगाचंच कळ आली! :(
14 Oct 2013 - 11:03 am | मिसळलेला काव्यप्रेमी
:(
14 Oct 2013 - 11:06 am | मुक्त विहारि
यकूचा ब्लॉग : http://www.yekulkarni.blogspot.in/
मिसळपाव प्रोफाईल : http://www.misalpav.com/user/9247
फेस्बूक प्रोफाईल : https://www.facebook.com/yekulkarni?fref=ts
14 Oct 2013 - 1:48 pm | सुहास झेले
:( :(
14 Oct 2013 - 5:20 pm | स्पंदना
यशवंत!