नेहमीप्रमाणे फेसबूकचे पान उघडले.
सवईप्रमाणे आज कुठल्या कुठल्या मित्रांचे आणि मैत्रीणींचे वाढदिवस आहेत ते बघीतले.
पहिलेच नांव वाचले आणि न विसरता."Happy Birth Day." लिहून मो़कळा झालो.
काही माणसांचे काही-काही विचारच असे असतात की, जे चिरकाल टिकतात.हा यकू पण तसाच विचार करायचा.
तसा मी मिपावर नविनच होतो.(अद्यापही नविनच आहे.)एखादा लेख लिहीला की दर तासा-दोन तासाने येवुन
(खरे तर मिनीटा-मिनीटाला) लेख परत परत बघत पण होतो.जसे मिळतील मिळतील तसे इतर मिपाकरांचे लेख वाचत पण होतो.
एकदा असेच मला मिळालेले प्रतिसाद बघत असतांना एक सुंदर प्रतिसाद मिळाला.नांव बघीतले आणि व्यनि केला आणि सुरु झाला एका नव्या दोस्तीचा प्रवास.त्याने लिहिलेल्या आणि मला आवडलेल्या लेखाला प्रतिसाद तर देत होतोच पण न आवडलेल्या लेखाला व्यनि पाठवत होतो.
व्यनि आणि खरडवहीतून हा माणुस थोडा समजत गेला आणि एक दिवस इंदौरला भेटायचे पण ठरले.काही कारणांमुळे मला मुंबई बाहेर पडता येत न्हवते.तरी पण मिपावरचा माझा वावर होताच.त्यावेळी जरा लौकरच ऑफर लेटर मिळाले आणि मी व्हिसाची वाट बघत बसलो.
व्य.नि तुन माहिती मिळाली की,सध्या यकू संभाजी नगरला आहे.इंदूरपेक्षा संभाजीनगर जास्त जवळ होते आणि सहज जाता देखील आले असते.पण २ वेळा मला प्रवास अर्धवट सोडायला लागला होता.त्यामुळे पुढच्या वर्षी भेटू असे ठरले.पण असे नक्की ठरवून देखील यकूला भेटता आले नाही ते नाहीच आणि पुढेही ह्या प्रुथ्वीवर त्याला भेटता येणार नाही ह्याची हूरहूर मात्र अखेर पर्यंत राहील.
न जाने क्युं होता है ये हमारे साथ
अचानक ये मन किसीके जाने के बाद
करे ये उसकी याद बार बार..
वाचने
3552
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा!!
ह्म्म्म....
इतके दिवस झाले हा यकु
In reply to ह्म्म्म.... by विटेकर
त्याच्याच प्रोफाईल वर खाली....
In reply to इतके दिवस झाले हा यकु by अत्रुप्त आत्मा
माझीही भेट अशीच राहिली. आज
.
यकूचा ब्लॉग आणि मिपा आणि फेस्बूक प्रोफाईल
..
यशवंत!