नासाचे अभंग

रमताराम's picture
रमताराम in जे न देखे रवी...
3 Oct 2013 - 8:17 am

(काल काही मिपाकरांशी गप्पा मारता मारता 'नासा म्हणे' ची आठवण आली नि अचानक हे असं झालं.)

डावीकडे भारत,
उजवीकडे लंका
सेतू मधोमध
नासा म्हणे

गणकी श्रेष्ठ भाषा,
गीर्वाण ही थोर
जळो भूतकाळ
नासा म्हणे

किरणोत्सारी भेव
नाही मुळी वाव
गोमयाच्या आड
नासा म्हणे

जगी या शिक्षण
श्रेष्ठ एका स्थानी
हिंदुस्थानी आज
नासा म्हणे

भारती थोरियम
पडले हो विपुल
आणा ढापून
नासा म्हणे

ऐशा नासा नरे
ररा झाला त्रस्त
पोचे वॉशिंग्टनी
करे रुजवात

कोण हा रमत्या?
नि कोणता भारत?
जाणतो संस्थान!
नासा म्हणे

हाकलला ररा
परतुनी ये घरा
नका काही सांगू
नासा म्हणे

परि ऐसे देखो
संतुष्ट 'हा' फार
भली मोडे खोड
नासा म्हणे

श्रेष्ठ आमच्या देशा
कोसे* हा फार
सूर्या शनिश्वर
नासा म्हणे

ररा म्हणे आता
गांजलो मी फार
नको व्यर्थ चर्चा
नासा म्हणे

ररा झाला निवांत
मिळे थोडी उसंत
इतक्यात कानी येई
'नासा म्हणे'

अभंगविडंबन

प्रतिक्रिया

रमताराम's picture

3 Oct 2013 - 8:18 am | रमताराम

* हा मटामराठीचा चलाखीने केलेला वापर आहे हे सुज्ञांच्या ध्यानी आले असेलच.

मुक्त विहारि's picture

3 Oct 2013 - 8:19 am | मुक्त विहारि

झक्कास..

मदनबाण's picture

3 Oct 2013 - 9:02 am | मदनबाण

मस्त !

चौकटराजा's picture

3 Oct 2013 - 9:13 am | चौकटराजा

जगी या शिक्षण
श्रेष्ठ एका स्थानी
हिंदुस्थानी आज
नासा म्हणे

" सीए " च्या प्रवेश परीक्षेला त्रिकोणमिती आहे म्हणे या देशात !
स्वस्त हे हमाल
मिळती जेथून
भारत नेशन
नासा म्हणे .........

रमताराम's picture

3 Oct 2013 - 9:46 am | रमताराम

तुमचा 'नासा म्हणे' वायला नि आमचा वायला. ;)

चौकटराजा's picture

3 Oct 2013 - 9:57 am | चौकटराजा

तुमचा वायला म्हंजी कन्चा वो ? आम्च्या सारख्या 'देहाती" ला जरा सांगा ना राव ! त्ये यिथुल्ल्या येकांद्या आयडी ला नासा
म्हंत्यात काय मालक ?

रमताराम's picture

4 Oct 2013 - 11:16 am | रमताराम

जरा 'नासा म्हणे' चे वर लिष्टलेले दावे पाहिलेत (खासकरून पहिला) तर आमचा 'नासा म्हणे' कोण याचा तर्क करणे फार जड जाऊ नये. :)

निवांत पोपट's picture

3 Oct 2013 - 9:18 am | निवांत पोपट

साष्टांग नमस्कार ! मांडीवर 'सिंथसायझर'रुपी वीणा, आणि हातात 'डिजिटल' चिपळ्या घेतलेले रमताराम साक्षात सामोरे आले..धन्य हो! :)

बिपिन कार्यकर्ते's picture

3 Oct 2013 - 10:07 am | बिपिन कार्यकर्ते

+१

=))

पैसा's picture

3 Oct 2013 - 9:53 am | पैसा

हे म्हणजे "नाठाळाच्या माथा हाणू काठी" क्याटेगरीतले ठणठणपाळी टोले आहेत. मस्त!

किरणोत्सारी भेव
नाही मुळी वाव
गोमयाच्या आड
नासा म्हणे

हा शोध लै भारी आहे. भारतातली रस्त्यावरची गुरेढोरे रशिया आणि जपानला पाठवून देऊया. पण नासाने रमतारामाला हाकलून लावला हे काय आवडलं नाय बघा. नासाची ही हिंमत?

मदनबाण's picture

3 Oct 2013 - 10:00 am | मदनबाण

मस्त !

धन्या's picture

3 Oct 2013 - 10:08 am | धन्या

भारीच!

तुम्हाला असाच निवांत वेळ मिळो आणि तुमचे अभंग वाचायला मिळोत.

रच्याकने तुम्हाला अभंग कुठल्या डोंगरावर स्फुरतात? ;)

रमताराम's picture

4 Oct 2013 - 11:19 am | रमताराम

रच्याकने तुम्हाला अभंग कुठल्या डोंगरावर स्फुरतात? >> वेताळ टेकडीवर.
रच्याकने आमचे बाकीचे अभंग लवकरच प्रकाशित होणार्‍या 'एका दुभंगाचे अभंग' या शीर्षकाच्या गाथेत समाविष्ट केले आहेत त्यात वाचायला मिळतील.