(काल काही मिपाकरांशी गप्पा मारता मारता 'नासा म्हणे' ची आठवण आली नि अचानक हे असं झालं.)
डावीकडे भारत,
उजवीकडे लंका
सेतू मधोमध
नासा म्हणे
गणकी श्रेष्ठ भाषा,
गीर्वाण ही थोर
जळो भूतकाळ
नासा म्हणे
किरणोत्सारी भेव
नाही मुळी वाव
गोमयाच्या आड
नासा म्हणे
जगी या शिक्षण
श्रेष्ठ एका स्थानी
हिंदुस्थानी आज
नासा म्हणे
भारती थोरियम
पडले हो विपुल
आणा ढापून
नासा म्हणे
ऐशा नासा नरे
ररा झाला त्रस्त
पोचे वॉशिंग्टनी
करे रुजवात
कोण हा रमत्या?
नि कोणता भारत?
जाणतो संस्थान!
नासा म्हणे
हाकलला ररा
परतुनी ये घरा
नका काही सांगू
नासा म्हणे
परि ऐसे देखो
संतुष्ट 'हा' फार
भली मोडे खोड
नासा म्हणे
श्रेष्ठ आमच्या देशा
कोसे* हा फार
सूर्या शनिश्वर
नासा म्हणे
ररा म्हणे आता
गांजलो मी फार
नको व्यर्थ चर्चा
नासा म्हणे
ररा झाला निवांत
मिळे थोडी उसंत
इतक्यात कानी येई
'नासा म्हणे'
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3667
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
तळटीप राहिली
मस्त..
मस्त !
????
गल्लत होते आहे
In reply to ???? by चौकटराजा
कन्चा वो ?
In reply to गल्लत होते आहे by रमताराम
तसं अवघड नाही
In reply to कन्चा वो ? by चौकटराजा
साष्टांग नमस्कार ! मांडीवर
+१
In reply to साष्टांग नमस्कार ! मांडीवर by निवांत पोपट
झकास टोलेबाजी
मस्त !
भारीच!
डोंगर
In reply to भारीच! by धन्या