रंग नाही गंध नाही रास नाही गोकुळी
विरह वेड्या गौळणीचा श्वास नाही गोकुळी
गोपिकांचे लक्ष भारी दूध लोणी लपविती
दूध लोणी चोरण्याची आस नाही गोकुळी
सांज वेळी कृष्ण जाई वाजवूनी बासुरी
अधर वेड्या बासुरीचा वास नाही गोकुळी
मोहनाने मोहलेल्या गौळणीला गाठली
कृष्ण प्रेमी गुंगण्याचा भास नाही गोकुळी
आठवांचे लोट येती नंदराणी सांगते
गोकुळीला जगविणारा त्रास नाही गोकुळी
प्रतिक्रिया
28 Aug 2013 - 5:44 am | स्पंदना
सुरेख!
28 Aug 2013 - 12:40 pm | नित्य नुतन
खुपच सुंदर ...
31 Aug 2013 - 6:45 am | फिझा
खूपच मस्त !!!
आवडली रचना !!!
31 Aug 2013 - 10:03 am | सुधीर
सुंदर कविता.
31 Aug 2013 - 10:31 am | मिसळलेला काव्यप्रेमी
सु रे ख!!
1 Sep 2013 - 2:02 am | कवितानागेश
अतिशय सुंदर रचना.
.... गाता येइल. :)
4 Sep 2013 - 3:40 pm | भावना कल्लोळ
खुप सुरेख ……. सध्याच्या दहीहंडी मध्ये मला हे असेच भाव जाणवतात, कृष्णाची हंडी आता राजकारण्याची झाली. भक्तीचा तो भाव नाही, व्यवहार वसला गोकुळी.(थोडेसे अवांतर)