Skip to main content

कृष्ण नाही गोकुळी

लेखक जुईचे फूल यांनी बुधवार, 28/08/2013 या दिवशी प्रकाशित केले.
रंग नाही गंध नाही रास नाही गोकुळी विरह वेड्या गौळणीचा श्वास नाही गोकुळी गोपिकांचे लक्ष भारी दूध लोणी लपविती दूध लोणी चोरण्याची आस नाही गोकुळी सांज वेळी कृष्ण जाई वाजवूनी बासुरी अधर वेड्या बासुरीचा वास नाही गोकुळी मोहनाने मोहलेल्या गौळणीला गाठली कृष्ण प्रेमी गुंगण्याचा भास नाही गोकुळी आठवांचे लोट येती नंदराणी सांगते गोकुळीला जगविणारा त्रास नाही गोकुळी
लेखनविषय:

वाचने 1349
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

सु रे ख!!

खुप सुरेख ……. सध्याच्या दहीहंडी मध्ये मला हे असेच भाव जाणवतात, कृष्णाची हंडी आता राजकारण्याची झाली. भक्तीचा तो भाव नाही, व्यवहार वसला गोकुळी.(थोडेसे अवांतर)