प्रथम तुज पाहता.......!!!-२

स्पंदना's picture
स्पंदना in जनातलं, मनातलं
29 Jul 2013 - 6:16 am

प्रथम तुज पाहता........!!!

{"अग! मी तसं नव्हते म्हणतं. " खरतर कॅरोलिन हादरलीच होती. "हे बघ तुझ्याकडे पाहुन कोणीही पुरुष आकर्षीत होणे शक्य नाही, पण आपली, म्हणजे मला नकोच आहे ती, तुझ्यासाठीच आहे ती, इस्टेट जर बळकावायला जर कोणी तुला नादाला लावेल तर? मग तुझ्याकडे काय रहाणार? असा विचार करुन मी म्हणत होते."
"आता ती इस्टेट तुझ्याकडे आहे तेंव्हा माझा रस्ता सोड!" सुझीने कार सुरु केली.
" हे बघ! अजुन वेळ गेली नाही....." कॅरी तिच्या कारच्या पुढ्यात उभी राहिली, पण सुझीने रिव्हर्स मारत गाडी मागे घेउन झटक्यात ड्राइव्ह वे सोडुन लॉन मध्ये घातली अन, आरामात नेचरस स्ट्रीप वरुन रस्त्याला लावली सुद्धा.
}

पुढे------

" काय म्हणते तुझी बहिणाबाई?" अपार्टमेंटच दार उघडत असतानाच चार्ल्सने अधीर प्रश्न टाकला. आता तो सुझीची खबरबात जाणुन घ्यायला अधीर होता की एकदाचं तिच्याबद्दल विचारुन बाकिची संध्याकाळ त्याला निवांत हवी होती असा प्रश्न कॅरोलिनला पडला. त्या चेलो एव्हढ्या सुझीला सगळ आयुष्य त्या चेलो बरोबरच घालवावं लागणार, अस चार्ल्सच मत होत. पण कॅरोलिनला सुझीबद्दल अधिक उणं बोललेलं अजिबात आवडत नसल्याने तो कधीमधीच हे मत बोलुन दाखवायचा.
"मुर्ख आहे ती." कॅरी पुटपुटली. "कुठल्याश्या अॅलीस स्प्रिंगच्या मेयरने मुली कमी पडताहेत म्हणुन ऑस्ट्रेलीयाभरच्या पेपरात जाहिरात दिलीय, म्हणुन हे ध्यान तिकडे पळालयं!"
"काय? अग वाळवंट झाल तरी....एखादा शहाणा हिच्या पेक्षा कांगारु पसंत करेल" चार्ल्स मजेदार चेहरा करत म्हणाला.
गेले आठ वर्षे कॅरी चार्ल्स बरोबर रहात होती. तोसुद्धा तिच्या सारखाच बँकिंग क्षेत्रात होता. दोघांचीही भरपुर कमाई होती. जोवर आपण स्थीरस्थावर होत नाही तोवर काहीही निर्णय घ्यायचा नाही अशी त्या दोघांची ठाम भुमिका होती. सुरेख कॅरोलिनला अगदी साजेसा होता चार्ल्स! कष्टाळु, हुषार, टापटिपीची आवड असणारा! जे उत्तम त्याची आस असणारा! जिममध्ये जाउन आठवड्यातुन तिन दिवस अगदी घाम गळेपर्यंत व्यायाम करुन त्यान स्वतःला अगदी तगडं राखल होतं. आताही टाय सैल करण्याच्या त्याच्या हालचालींनी आपण काय बोलत होतो तेच विसरुन गेली कॅरोलिन! तिच्या नजरेत नजर मिसळत तो खट्याळ हसला. डोळ्याचा चष्मा काढुन बाजुच्या टेबलवर ठेवत त्याने कॅरोलिनकडे हात पसरले अन कॅरोलिन भान विसरली.
थोड्या वेळाने जेंव्हा दोघेही आरामशीर गालिच्यावर पसरले होते, तेंव्हा मात्र कॅरोलिनला रहावल नाही. आपल्या लहाण बहिणीबद्दलची सारी काळजी तिने चार्ल्सला बोलुन दाखवली. " सोड ग! " चार्ल्सने समजावले. "सारे पैसे उडाले की येइल पुन्हा ठिकाणावर. पण तेंव्हा तिला मदत करायला माझ्याकडे हात नको पसरु म्हणजे झालं."
"तेच तर सांगतेय मी तुला, ती सारे पेपर्स अन घराची किल्ली मला पोस्टाने पाठवुन अगदी कफल्लक होउन गेली आहे तिच्या कृष्णाला शोधायला."
"अरे वा! कशाला ठेवते आहेस ते घर मग? किती जुनं आहे ते. टाक विकुन अन घे शेअर्स विकत त्या पैशाचे. टाक थोडे तिच्या नावानेपण, तिला थोडेच कळणार आहे?"
कॅरोलिनने एक नापसंतीचा कटाक्ष चार्ल्सकडे टाकला. तिच्या चेहर्यावरचा बदल त्याला अंधुकसा जाणवला. बाजुला होत उठुन त्याने टेबलवरचा चष्मा डोळ्यावर चढवुन त्याने तिच्याकडे थोडं निरखुन पाहिलं अन तो बाथरुमकडे वळला.
**************************************************************************************************
आता या गोष्टीला १५ दिवस होउन गेले होते. सुझीच्या जाण्यानंतर अजुनही तिचा काहीच ठावठिकाणा नव्हता. शोधायच म्हंटल तरी कुठे हा प्रश्न पडला होता कॅरीला. तश्यात सुझी खर्चिक होतो म्हणुन सेल फोनसुद्धा वापरत नव्हती. या आठवड्यात जर सुझनची काहीच खबर नाही मिळाली तर आपण सरळ अॅलीस स्प्रिंगच्या मेयरला काँटॅक्ट करायचा असं मनोमन ठरवुन कॅरोलिन त्या दिवशी अपार्ट्मेंटकडे वळली. तिच्या चाहुलीने बाजुच्या अपार्टमेंटमधुन तिची शेजारीण बाहेर आली अन थोडा नाराज चेहरा करत तिने एक एक्स्प्रेस डिलिव्हरी पॅकेज तिच्या हातात दिले. दुपारी कधीसे ते घेउन एक पोस्टल सर्वीसचा माणुस आला असल्याने ते तिला स्विकारावे लागले होते.
झाल्या प्रकाराबद्दल पुन्हा पुन्हा दिलगीरी व्यक्त करत, कॅरोलिनने आपल्याला यातले काहीही माहित नसल्याचे तिला सांगितले. पॅकेट घेउन घरात येउन तिने त्याच्या सेंडरचा पत्ता पाहिला अन तिचा चेहरा उजळला. अॅट लास्ट! सुझीचे नाव तिला कुठेतरी दिसले. पॅकेट अॅलीस स्प्रिंगहुन आले होते. त्यावर सुझीचे नाव आणि केअर ऑफ म्हणुन कोणा एका ग्रेग हेंडरसनचे नाव दिसत होते.
कॅरोलिनने पॅकेट फोडले अन ती स्तंभीतच झाली. एका सुरेख नाजुक डिझाईनच्या कागदावर दिमाखदार लेस लावलेले ते वेडिंग इन्व्हिटेशन होते. मध्ये वेलबुट्टीदार अक्षरात निमंत्रण मजकुर, अन त्या खाली सही होती सुझन क्लार्कची! सुझन! तिची लहाण वेडगळ बहिण? १५ दिवसापुर्वी ती सिडनी सोडुन जाते काय, अन त्या पाठोपाठ हे वेडिंग इन्व्हीटेशन येते काय? हा असला महागडा पेपर अन छपाई वापरुन कोण हा सुझनचा फायदा घेउ इच्छीतो आहे? अन लग्न? ते ही नुकत्या १५ दिवसांच्या ओळखीत? कसे शक्य आहे? या असल्या गोष्टी परिकल्पनेत घडतात , प्रॅक्टीकल आयुष्यात नाही. लग्न झालच तर ते व्हायच होतं कॅरोलिन अन चार्ल्सच ! हे कुठुन मध्येच सुझनच लग्न उपटलं?
पत्रिकेबरोबर सुझनचं पत्रं होतं. तिच्या वळणदार अक्षरात तिने आयुष्यातल्या या अतिशय सुरेख वळणावर ती कॅरोलिनला आपण किती आनंदात आहोत ते सांगत होती. ग्रेग ...खरतर नाव वाचुनच कॅरोलिनला शिसारी आली... किती चांगला माणुस आहे, अन तिने सिडनी सोडायचा घेतलेला निर्णय किती योग्य होता हे ही तिने लिहिले होते. आपण येत्या महिन्यात लग्न करणार असुन, त्यासाठी कॅरोलिन अन चार्ल्सचे असणे सुझनसाठी किती मह्त्वाचे आहे ते ही तिने आवर्जुन लिहिले होते. कॅरोलिनच्या बीझी शेड्युलमध्ये तिला रजा मिळावी म्हणुन सगळ्यात पहिली पत्रिका आपण तिला पाठवली असुन, ग्रेगने फक्त एक पत्रिका तातडीने छापुन बाकिच्या नंतर मिळाल्यातरी चालतील असे सांगुन, ही पत्रिका सुझीच्या बहिणीसाठी खास आणली होती.
खर सांगायच तर हे सारे तपशील वाचुन कॅरोलिनच डोकं फिरायची वेळ आली होती. "मुर्ख, मुर्ख आणि मुर्ख" याशिवाय तिला शब्द सुचत नव्हते . ती सारी संध्याकाळ तिने धुसफुसत घालवली. भरीत भर म्हणुन कोणताही दुरध्वनी क्रमांक सुझीने दिला नव्हता. उलट दिले होते ते कॅरोलिनने कोणते विमान पकडायचे अन कुठे थांबायचे याचे तपशिल. बरोबर, लग्नाच्या एक आठवडा आधिची विमानाची दोन तिकिटे , फुल्ली पेड!
हा असा अवास्तव खर्च करणारा; कोण हा पारधी जो सुझीची शिकार करतो आहे तेच कॅरोलिनला उमगेना. चार्ल्स तर ते पत्र अन पत्रिका पाहुन हसुन हसुन बेजार झाला होता. पण तरीही त्याने लग्नाला जायचा, अगदी कॅरोलिनच्या बरोबर जावं म्हणुन सुद्धा, नकार दर्शवला होता.अगदी त्याच तारखेला त्याचं काही तातडीच काम होतं महिन्याभराने! तो आधिच अॅपाँइंट्मेट घेउन बसल्याने अन ती डेट बुक असल्याने त्याने ताबडतोब विमानाच तिकिट रद्द करायला फोन लावला अन पैसे वाचवण्याचा दुरदर्शीपणा दाखवला. उरला प्रश्न कॅरोलिनचा! चार्ल्सच्या मते तिने अवश्य जावे, पण तेथे जाउन तिच्या बहिणीला समजावुन या रिलेशनशिप मधुन वाचवावे अन परत आणावे! अर्थात त्यासाठी तरी का असेना पण कॅरोलिनचे जाणे निश्चित झाले.
****************************************************************************************
अॅलीस स्प्रिंगच्या वाळवंटात विमानाची दारं उघडल्याबरोबर कॅरोलिनला जाणवला तो प्रचंड उष्णतेचा अन धुळीचा एक लोट ज्याने दोन मिनिट ती गुदमरुन गेली. विमानतळाच्या बिल्डींग्मधुन ती जेंव्हा बाहेर पडली तेंव्हा आपण नक्की ऑस्ट्रेलियातच आहोत की कोणत्या एखाद्या आफ्रिकन देशात? असा प्रश्न पडला तिला. विमानतळाच्या बाहेरच जरा दुरवर तिला सुझीने वाट बघत थांबायला सांगितलेल्या बारची पाटी दिसत होती. त्या धुळभरल्या रस्त्याने, आजुबाजुला पहुडलेली भटकी कुत्री चुकवत ती कशीबशी बार मध्ये शिरली.

आत शिरताच अंगावर आलेला गार हवेचा झोत तिला थोडा दिलासा देउन गेला. बार मधल्या सर्वांच्या उंचावलेल्या भुवया टाळत तिने बारटेंडरला ड्रिंक ऑर्डर केले. अन दाराकडे पाठ करुन ती बसुन राहिली. ड्रिंकचे चार घुटके ती घेते नी घेते तोवर झटक्यात बारच मुख्य दार उघडलेले तिला जाणवले अन वळुन न पहाताच ग्रेग नावाची व्यक्ती दारात उभी असणार हे तिला जाणवले. " कॅरोलिन!" अगदी गडगडाटी आवाजात तिच्या नावाचा उच्चार झाला अन तिला वळावे लागले. जवळ जवळ साडेसहा फुटी उंच, एक धिप्पाड तरुण तिच्या मागे उभा होता. त्याच्या नजरेत हसु मावत नव्हते. " ओह! अगदी सुझीच्या वर्णनाबरहुकुम आहेस तू कॅरोलिन डिअर!" सुरवातीलाच त्याने बॉम्ब टाकला. उन्हाने रापलेल्या त्याच्या देखण्या चेहर्यावर तिची नजर ठरत नव्हती. हस्तांदोलनासाठी पुढे केलेला त्याचा पंजा पाहुन तिचा श्वास अड्कला. तिच्या दुप्पट मोठा असलेला तो दणदणीत पंजा जेंव्हा तिच्या नाजुक हातावर आदळला तेंव्हा कुठेशी भुकंप होतो आहे की काय असा भास झाला तिला. " अग काही खाते पिते की नाही तू? मोठी बहिण ना तू सुझीची?" सुझीच्या नावावर किंचीत जोर देत त्याने संभाषणाला सुरवात केली.त्याच्या फुल शर्टच्या कॉलरमधुन तिला त्या गळ्यात असलेली जाडजुड सोन्याची चेन दिसत होती. अन त्या चेनच्या खाली उघड्या बटणातुन त्याचा मुळचा गौरवर्ण डोकावत होता. तिची त्याच्यावर फिरणारी ती नजर पाहुन तो आणखी हसु लागला.
"सुझी म्हणलीच होती की मला स्कॅनींग खालुन जावं लागणार म्हणुन. मी ही त्या तयारीनेच आलो आहे."
इतकं धडधडीत उघड बोलण? नवं माणुस! थोऽडा संकोच! काही नाही? शुद्ध गावंढळ! तिने मनातल्या मनात शेरा मारला. जरा सुद्धा सिव्हिलियन मॅनर्स नाहीत. कस होणार सुझीचं? तिच्या बाजुच्या बार स्टुलवर अगदी सहजी बैठक मारत त्याने बार टेंडरला एका कोल्डड्रींकची ऑर्डर दिली.
कॅरोलिनच्या भिवया किंचीत उंचावल्या. तिने स्वतः थंडगार बिअर मागवली होती. अन हा राकट, तगडा माणुस चक्क कोल्ड्रींक मागवतो आहे?
"मला वाटल अॅलिस स्प्रिंगची माणस, अंथरुणातुन उठायच्या आधी, बियरनेच चुळा भरत असावीत. अन तुम्ही चक्क....."
"हा!हा!हा! " गडगडाटी हसत तो उत्तरला," पंधरा दिवसापुर्वी तू म्हणते आहेस ते खरच होतं. अन अॅलिस स्प्रिंगची हवा पहाते आहेस ना? दोन तास या हवेत उभी राहिलीस तर शिजुन निघशील अशीच बिनतिखटामिठाची. पण सुझी....." बघता बघता त्याचा चेहरा बदलला, नजरेत एक कमालीची हळुवार भावना डोकावली," तिला नाही आवडायचे तिच्या बहिणीला आणायला गेलेला मी असा पिउन परत आलेला."
कॅरोलिनला शब्दच सुचेना. सुझी आणि कधीपासुन पुरुषांवर वर्चस्व गाजवायला लागली?
"तिने सांगीतल अस? मला बिअर प्यायलेली आवडणार नाही अस?"कॅरोलिनने विचारलं.
" नाही, नाही" तो गडबडीने म्हणाला, "पण तिला, तू येणार म्हणुन खुप आनंद झालाय. तिच्या बाजुने तू एकटीच नातेवाईक आहेस. अन तिच्या एकुणच वागण्याबोलण्यात तुझ्याबद्दल खुप आस्था जाणवली मला, म्हणुन."
"हं!" कॅरीने नुसताच हुंकार भरला.
"पण मी मात्र आणखी एक थंडगार बिअर प्यायल्या शिवाय येथुन हलायची नाही आहे हे ध्यानात घे तू" ओठांचा चंबु बनवत तिने जरा रुसका अभिनय केला. मग पुन्हा एकवार टेबलवरचा नॅपकिन उचलुन तो कपाळावरुन फिरवत ती म्हणाली," या बार मधुन पुन्हा त्या बाहेरच्या भट्टीत जायला मी निदान थोडीतरी नशेत असले पाहिजे"
"हा! हा! हा!" ग्रेग पुन्हा गडगडाटी हसला. "काळजी नको करु. माझी पिक-अप फुल्ल एसी आहे. घरातला एसी जाम खर्चिक होतो म्हणुन मी या आधी बर्‍याचदा या ट्रॅव्हलर मध्येच झोपायचो."
"अच्छा?" उगाच काही तरी बोलायचम्हणुन कॅरी बोलुन गेली. खरतर असा तगडा, बराचसा नव्हे खरच देखणा मेव्हणा आपल्या नशिबात असेल यावर अजुन तिचा विश्वास नव्हता बसत. ग्रेग बार टेंडरकडे वळला अन आणखी एक बिअर मागवत त्याने बिल मागवलं.
" आता उठ लवकर " तो जरा अजिजीने म्हणाला," बरच लांब जायच आहे आपल्याला. अन सुझन वाट पहात असेल."
त्याची प्रत्येक गोष्ट अशी सुझीवर येताना पाहुन कॅरी जरा वैतागलीच्,पण ती आणि काही बोलायच्या आधीच ग्रेग उठुन उभा राहिला.
"तुझी बिअर संपली की बाहेर मर्सीडीज बेन्झ उभी आहे. स्काय ब्लु. नंबर प्लेटवर ग्रेगरी२ लिहिलं आहे तेथे ये. मी जरा माझी कामे आटोपुन येतो लगेच."
बारस्टुल मागे सरकवत तो उभा राहीला. ती उंच अश्या बारस्टुलवर बसुन सुद्धा तो उभा राहिल्यावर जणु पूरा तिला झाकोळुन टाकत होता. मान वर करुन त्याच्याकडे पहात तिने उसनं हसु हसायचा प्रयत्न केला. क्षणभर तिच्याकडे पहात तो तसाच थांबला अन मग अगदी हळुवार आवाजात म्हणाला," सुझनसाठी तू इथवर आलीस! हे वातावरण, ही हवा, तुला सहन होत नाही आहे हे समजतय मला." अन या वाक्यासरशी तटकन वळुन तो निघुन गेला. जाता जाता एक फ्रेंडली हात बारमनच्या दिशेने हलवायला तो तेव्हढ्यातही विसरला नाही.
ग्रेग गेला तरी त्याचा गंध तसाच त्या बारच्या हवेत दरवळत राहिला. तिने एक दिर्घ श्वास घेउन नक्की कोणता डिओ असावा याचा अंदाज बांधायचा प्रयत्न केला. चार्ल्सला आवडणार्‍या अन त्याच्या वापरातल्या कोणत्याही डिओशी त्या गंधाच साम्य नव्हतं. असेल कोणता तरी फालतु,स्वस्तातला, तिने मनाला फटकारलं. खरतर कुठेतरी खोलवर तिला जाणवल की तो कोणताच कृत्रीम गंध नव्हता. एक ताजा, अंघोळ करुन नुकताच टॉवेल लावुन बाहेर आलेला पुरुष जवळपास असावा असा काहीसा ...
तिच्या समोर आता प्रश्न होता तो, हे खूळ त्या येड्या सुझीच्या डोक्यातुन बाहेर कसे काढायचे हा! अर्थात सुझी भेटली की दोनचार प्रश्नात हा प्रश्न आपण निकालात काढु शकु असा आत्मविश्वास तिला नक्कीच होता. पण सुझीपेक्षाही या दिसायला धडधाकट ग्रेगने सुझीत काय पाहिले हा होता. इतका टेकीला येइल असा तर तो नक्कीच दिसत नव्हता. मग का?

(क्रमशः)
__/\__
अपर्णा

राहणीप्रकटन

प्रतिक्रिया

कवितानागेश's picture

29 Jul 2013 - 7:13 am | कवितानागेश

आवडला हा भाग. छान सुरु आहे कथा.. :)

छान आहे. मूळ कथा सुद्धा वाचली आणि आवडली.पुढच्या भागाची उत्सुकता आहे.

यशोधरा's picture

29 Jul 2013 - 7:52 am | यशोधरा

वाचते आहे..

प्रभाकर पेठकर's picture

29 Jul 2013 - 9:37 am | प्रभाकर पेठकर

उत्सुकतावर्धक दुसरा भाग. वाचतो आहे. छान जमलाय हा भाग.

शिल्पा ब's picture

29 Jul 2013 - 10:11 am | शिल्पा ब

अनुवाद चांगला जमलाय. पुढचे भाग पण पटपट येउ द्या.

प्रचेतस's picture

29 Jul 2013 - 10:19 am | प्रचेतस

खूप छान लिहिताय.
वाचत आहे.

आतिवास's picture

29 Jul 2013 - 10:24 am | आतिवास

वाचतेय.

मस्त झालाय हा पण भाग. पुभाप्र

पैसा's picture

2 Aug 2013 - 8:32 pm | पैसा

मस्त अनुवाद! पुढचे भाग पटापट येऊ देत!

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

2 Aug 2013 - 8:38 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

वाचतोय...

ज्ञानोबाचे पैजार's picture

3 Aug 2013 - 9:39 am | ज्ञानोबाचे पैजार

हा अनुवाद पुर्ण झाला की मगच मुळ गोष्ट वाचणार आहे. त्या मुळे जास्त उत्सुकता न ताणता पुढचे भाग पटापट टाका.

स्वाती दिनेश's picture

3 Aug 2013 - 2:01 pm | स्वाती दिनेश

हा भागही छान, पु भा प्र
(अवांतर-एकदाचे प्रतिसाद टंकता यायला लागले .. हुश्श...)
स्वाती

श्रुती's picture

3 Aug 2013 - 7:50 pm | श्रुती

मस्तच. .. प्रथम तुज पाहता.......!!!-3 च्या प्रतिक्षेत आहे...

प्रतिसाद दिला नाही तरी वाचत आहे.

धमाल मुलगा's picture

4 Aug 2013 - 4:01 am | धमाल मुलगा

पण, हे मिल्स & बून्सच्या पठडीतलं गुलुगुलु है काय? थोडंसं तसं असावं असा मला भास होतोय. पण वांधो नथी! तुम लिख्खो, हम पढिंगा :)

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

4 Aug 2013 - 5:34 am | निनाद मुक्काम प...

वाचत आहोत

पुढचा भाग लवकर टाकण्यात यावा ही विनंती!!!

त्रिवेणी's picture

5 Aug 2013 - 8:19 pm | त्रिवेणी

मी पण वाचते आहे.

कवितानागेश's picture

5 Aug 2013 - 10:36 pm | कवितानागेश

पुढे काय झालं?

पिशी अबोली's picture

5 Aug 2013 - 11:28 pm | पिशी अबोली

पहिल्या भागात सुझी बिचारी, कॅरॉलिनवर जळणारी वाटली होती.. या भागात नेमकं उलटं वाटतंय.. पुढचा येऊदे भाग लवकरात लवकर... :)

स्पंदना's picture

6 Aug 2013 - 8:36 am | स्पंदना

सर्व वाचकांना धन्यवाद.