एक वादळ ..

आनंदा माने's picture
आनंदा माने in जे न देखे रवी...
12 Jul 2008 - 11:47 pm

एक वादळ..

एक वादळ..थोडंसं अंधारात पडलेलं
माहीत नाही कुणाला पण प्रत्येकात दडलेलं..

उठ शोध घे, तुझ्यामधल्या वादळाचा..
विसरून जा सारं मनाविरूद्ध घडलेलं..

अश्रूंपासून शक्ती घे, हुंदक्यांपासून ध्यास
कामाला येईल तुझ्या ते, कधीकाळी रडलेलं..

अंधार हो प्रकाश घे, सुर्य हो प्रकाश दे
नव्या पालवीत विसरून जा एकेक पान झडलेलं

निर्झर हो वाहून जा, झर-झर सारं पाहून जा
खुळ्या हळव्या डोळ्यातून, कुठे पाणी होतोस अडलेलं..

आनंदा

कवितासमाजजीवनमानप्रतिभा

प्रतिक्रिया

स्वाती फडणीस's picture

12 Jul 2008 - 11:50 pm | स्वाती फडणीस

अश्रूंपासून शक्ती घे, हुंदक्यांपासून ध्यास
कामाला येईल तुझ्या ते, कधीकाळी रडलेलं..
:)

बेसनलाडू's picture

13 Jul 2008 - 4:23 am | बेसनलाडू

आणि सकारात्मकता.
(सकारात्मक)बेसनलाडू

अभिज्ञ's picture

13 Jul 2008 - 12:38 am | अभिज्ञ

कविता जबरदस्त झालीय.
मुळात कवितेचा सकारात्मक आशय जास्त भावला.
अगदी एक एक ओळ अर्थपुर्ण झालीय.
अभिनंदन.
अजून येउ द्यात.

मि.पा. वर स्वागत.

अभिज्ञ.

चैताली's picture

13 Jul 2008 - 12:35 pm | चैताली

आनंद दा.....इथेपण

छान आहे...

मदनबाण's picture

13 Jul 2008 - 5:40 pm | मदनबाण

फारच सुरेख कविता..

मदनबाण.....

यशोधरा's picture

13 Jul 2008 - 5:56 pm | यशोधरा

अश्रूंपासून शक्ती घे, हुंदक्यांपासून ध्यास
कामाला येईल तुझ्या ते, कधीकाळी रडलेलं..

सही!! आवडली कविता एकदम!

llपुण्याचे पेशवेll's picture

13 Jul 2008 - 7:12 pm | llपुण्याचे पेशवेll

पूर्ण कविताच छान.
पुण्याचे पेशवे

प्राजु's picture

13 Jul 2008 - 7:27 pm | प्राजु

नवी उमेद निर्माण करणारी आहे कविता..

मला खास करून या ओळी आवडल्या,

अंधार हो प्रकाश घे, सुर्य हो प्रकाश दे
नव्या पालवीत विसरून जा एकेक पान झडलेलं

सुंदर..
अभिनंदन!

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/