होय म्हाराज्या!

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
12 Jul 2008 - 10:58 pm

कोकणात देवाला गार्‍हाणं घालण्याची रीत अजूनही प्रचलीत आहे.चांगल्या प्रसंगी देवाची आठवण काढून बरेच वेळा देवळात जाऊन पुजार्‍याकडून (भटजीकडून) गार्‍हाणं
घालून देवाशी संपर्क ठेवण्याची प्रथा आहे.देवाच्या कानावर घालून झाल्यावर एक प्रकारचं मानसीक समाधान प्राप्त झाल्याची समाधानी अगदी विरळीच असते.पुजार्‍याच्या प्रत्येक भाष्या पुढे "होय म्हाराज्या" असं इतरानी म्हणून स्वतःची समत्ती असल्याची जाहिर कबूली दिल्या सारखी असते.

ह्या वर्षी आमच्या घरी गणपतिच्या दिवसात विसर्जनादिवशी बाप्पामोर्याला आम्ही खास गार्‍हाणं घातलं,आणि ते मालवणीतून.
आमची दोन नातवंडं या वर्षी कॉलेजात जाणार होती.त्यांना
यश,समाधान,आणि चांगली बुद्धि दे हि बाप्पामोर्याला विशेष विनंती होती.

बाप्पा मोर्याला गार्‍हाणं ......
हे श्रीगणेशा,हे गणराया,हे शंकर-पार्वती पुत्रा,हे कार्तीकाच्या भावा,हे वक्रतुंडा,हे बाप्पा मोर्या तुका, आम्ही, आज, तुझ्या जन्मदिवशी, गार्‍हाणा घालतो,तां एकून घे म्हाराज्या.

"होय म्हाराज्या"

हे देवा,तूं आमच्या ह्या, सगळ्या गोतावळ्याक, सुखी ठेव. तेंची, सर्वांची प्रकृती, चांगली ठेव.
तेंची सदैव, भरभराट होऊ दे, असा आमचा तुका, हात जोडून सांगणा.

"होय म्हाराज्या"

हे देवा,आज, आमच्या जांवंयबापूचो, जन्मदिवस आसां.तेंका उदंड आयुष्य दी.

"होय म्हाराज्या"

हे गणनायका,लवकरच, आमची दोन नातवंडा, आमका सोडून, बाहेर गावाक, पुढचां, शिकुक जातहत,तेंच्यावर, तुझी चांगली नजर, असूं दे, तेंचो, अभ्यासात, नीट लक्ष लागू दे,तेंची, दिवसे दिवस, प्रगती होवूं दे.

"होय म्हाराज्या"

हे गौरीपति, पुढची सगळी, चार वर्षां, त्या दोघांक, सुखाची जावूं दे,असा तुका आमचा सांगणा.

"होय म्हाराज्या"

शेवटी देवा,आमच्याकडून, काय चूक झाली असल्यास, किंवा, काय तुझो उपम्रर्द, झालो असल्यास , किंवा, तुझो आमकां, विसर पडलो असल्य़ास, किंवा, वाडवडीलांचो, पुर्वजांचो ,किंवा, लहान मोठ्यांचो, आमच्या कोणाकडून, अपमान झालो असल्यास, चूक झाली असल्यास, आमका सगळ्याक, क्षमा कर.

"होय म्हाराज्या"

पुढ्ल्या वर्षी सुद्धा, तुझ्या पायाकडे येंवक, अशीच ताकद, आणि बुद्धी दी,ह्या, पार्वतीपुत्रा तुका अखेरचा सांगणा.

"होय म्हाराज्या"

गणपती बाप्पा मोर्या.पुढ्च्या वर्षी लवकर या.

श्रीकृष्ण सामंत

संस्कृतीसद्भावना

प्रतिक्रिया

धनंजय's picture

12 Jul 2008 - 11:08 pm | धनंजय

गार्‍हाणं (आणि कथाकथन) आवडले.

श्रीकृष्ण सामंत's picture

13 Jul 2008 - 12:27 am | श्रीकृष्ण सामंत

धनंजयजी,
आपल्याला लेखन आवडलं हे वाचून बरं वाटलं
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

पिवळा डांबिस's picture

13 Jul 2008 - 8:48 am | पिवळा डांबिस

सामंतांनु, बरां गार्‍हाणा घातल्यांत की!
माझी आपली एक शंका...
गणपतीक कोकणी गार्‍हाणा समाजतां?
नाय म्हणजे आम्ही आजवर फक्त मंगेशाक, वेतोबाक, शांतादुर्गा-शर्वाणीक घातलेली गार्‍हाणी पायलीसत
आमची भास बोलणारे देव ते!
गणपतीक घातलेला कोकणी गार्‍हाणा बघूची ही पहिलीच खेप म्हणान विचारतंय हो.....
:)
आपलो,
पिवळो डांबिस

श्रीकृष्ण सामंत's picture

13 Jul 2008 - 10:40 am | श्रीकृष्ण सामंत

पिवळो डांबिसजी,

हंय खंय इलो मंगेश,वेतोबा, शांतादुर्गा-शर्वाणीक.
हय आम्ही गणपति पुजतो मां,आणि दुसरां म्हणजे सगळे देव सामके. आम्ही आमच्या पोराबाळां सांगित इलो ना, गणपतिक विसर्जीत करण्यापुर्वी असा गार्‍हाणा आम्ही घालतो म्हणान.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

मिसळपाव's picture

13 Jul 2008 - 2:54 pm | मिसळपाव

गुरुजी संस्कृतमधे काहितरी अगम्य बोलताहेत, नी यजमान/जमलेली मंडळी गुरुजीनी सांगितलं की नमस्कार करताहेत ("हां, इथे आंगठा उठवा" यापेक्षा वेगळं काय असतं?!!) या पेक्षा गार्‍हाणं केव्हाहि उत्तम. सगळ्यानी मिळून आपल्याला समजणार्या शब्दात देवाची मनापासून प्रार्थना केली तर भाषा कुठली का असेना, देवाला नक्कीच कळेल!

सामंतानु ह्यां मिपाक शनि,राहु-केतुंनी भंडावून सोडलंनी. तवा तुमी हंयसर मिपासाटी पन एक गारानं घालाच!

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

मदनबाण's picture

13 Jul 2008 - 9:36 am | मदनबाण

देवा रवळनाथा मिपा वर वातावरण कसं हलक फुलक राहुदे.
"होय म्हाराज्या"

सामंत साहेब मस्तच...

मदनबाण.....