जगातल्या सर्वात उंच इमारतीवर वीज पडते तेव्हा...

Primary tabs

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in कलादालन
2 Jul 2013 - 6:37 pm

आतापर्यंत आपण सौदी अरेबियातील निसर्ग चमत्कार पाहिले...

सौदी अरेबियातली बर्फवृष्टी...
सौदी अरेबियातले वाळूचे वादळ…
सौदी अरेबियातला पाऊस…
सौदी अरेबियातली “गारा” वर्षा...

आता थोडे दुबईकडे वळूया..

दुबईच्या सुरस कहाण्या तुम्ही ऐकल्या असतीलच. आता पहा हा दुबईतला खास एक निसर्गचमत्कार, जो जगात इतर कोठेही होऊ शकत नाही... निदान बुर्ज दुबई (आताचे नामकरण बुर्ज खलिफा) जगातील सर्वात ऊंच इमारत असेपर्यंत तरी नक्कीच नाही.

हा विजेचा नाच नक्कीच चित्तथरारक असतो... त्याची काही चित्रे...

.

.

.

.

.

ही सर्व चित्रे जालावरून आणि मित्रमंडळींकडून संग्रहीत केलेली आहेत.

जगातल्या इतर उंच इमारतींवर झालेले विद्युल्लतेचे हल्ले तुम्ही www.environmentalgraffiti.com/nature/news-7-most-iconic-skyscrapers-eart... येथे पाहू शकाल.

भूगोल

प्रतिक्रिया

अनिरुद्ध प's picture

2 Jul 2013 - 7:05 pm | अनिरुद्ध प

असे वीज पडणे आम्ही वरळीच्या दूर्दर्शन मनोर्यावर पडताना बघीतले आहे त्यावेळी मनोर्याच्या टोकावर थोडा धूर दिसला होता,ईथे तसे कही झाले नसेल तर उत्तम.

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Jul 2013 - 8:12 pm | डॉ सुहास म्हात्रे

उंच इमारतींकडे वीज आकर्षीत होणे सहाजीक आहे... त्यांमुळेच सर्व ऊंच इमारतीना वीजरोधक बसविलेले असतात. बुर्ज खलिफासारखे अफाट उंच मनोरे तर अगदी ढगांच्या खालच्या थराच्या उंचीपेक्षा जास्त वर असतात... त्यामुळे त्यांच्या बाजूचीच (वरची नव्हे ;) वीज त्यांच्याकडे आकर्षीत होणे हे नेहमीचेच आहे. त्यामुळे अशी चित्रे दुर्मिळ नाहीत पण आकर्षक नक्कीच आसतात.

बुर्ज खलिफावर अत्यंत प्रबळ अगदी आता माहित असलेल्या वीजेच्या मार्‍यापेक्षा जास्त आघात सहन करू शकेल एवढी प्रबळ संरचना स्थापीत केली आहे असे ऐकून आहे... अर्थात अश्या जगावेगळ्या उंच इमारतीची तेवढी काळजी घेतलि नसती तरच नवल होते म्हणा !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Jul 2013 - 8:00 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

फोटो सहीच.

-दिलीप बिरुटे

संजय क्षीरसागर's picture

2 Jul 2013 - 10:32 pm | संजय क्षीरसागर

इतक्या प्रचंड शक्तीला नियंत्रित केल्यावर त्या उर्जेचा पुढे उपयोग केला जातो का?

विजुभाऊ's picture

3 Jul 2013 - 2:52 am | विजुभाऊ

इतक्या प्रचंड शक्तीला नियंत्रित केल्यावर त्या उर्जेचा पुढे उपयोग केला जातो का?
नियन्त्रीत केले जात नाही. ती वीज सरळ अर्थ मध्ये जाते. ( पृथ्वी फिरवायला उपयोग केला जातो म्हणाल तर थोडेसे योग्य ठरेल)

संजय क्षीरसागर's picture

3 Jul 2013 - 7:52 am | संजय क्षीरसागर

ते लहानपणी शिकलोय हो. त्याच्यापुढे काही प्रगती आहे का?

मालोजीराव's picture

9 Jul 2013 - 11:40 am | मालोजीराव

त्याच्यापुढे काही प्रगती आहे का?

निकोला टेस्ला यावर काम करता करताच मेला…नायतर झाली असती, तो वायरलेस वीज पण देणार होतार म्हणे

मालोजीराव's picture

9 Jul 2013 - 11:41 am | मालोजीराव

निकोला टेस्ला यावर काम करता करताच मेला…नायतर प्रगती झाली असती, तो वायरलेस वीज पण देणार होता म्हणे !

स्पंदना's picture

3 Jul 2013 - 4:47 am | स्पंदना

मानलं इस्पीक एक्का साहेब!
तरीही सहज एक शंका, विज फक्त पडते की उत्सर्जीतही होते? कारण मला इथे विज बाहेर पडताना दिसते आहे म्हणुन विचारल.

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Jul 2013 - 4:26 am | डॉ सुहास म्हात्रे

वीज पडणे हा केवळ एक मराठी वाक्प्रचार आहे. हवेच्या चलनवलनाने, वातावरणातील उष्णतेच्या फरकाने आणि इतर काही कारणांनी वातावरणाच्या दोन भागांच्या विद्युतभारात फरक निर्माण होतो. याबरोबर जर तो विद्युतभार वाहून नेण्यास मदत करणारी सोय असली (जी बहुदा पावसाळी दमट ढग पुरवतात) की मग वीजेचा स्रोत धन-ते-ऋण असा वाहू लागतो (किंवा खरे म्हणजे इलेक्ट्रॉन्स उलट्या दिशेने वाहू लागतात !). हा प्रकार धन भारीत व ऋण भारीत ढगांमधे झाला की आपल्याला आकाशात चमकणारी वीज दिसते. पण हा प्रकार धन भारीत ढग आणि ऋण भारीत पृथ्वी अथवा पृथ्वीवरील इमारत / झाड यामधे झाला की आपण वीज पडली असे म्हणतो.

या सर्व प्रकारात उंच इमारतींना त्या ढगांच्या जवळ असल्याने नेहमीच जास्त धोका असतो. विद्युतप्रवाहाच्या स्त्रोताचा इमारतीवर परिणाम होऊ नये यासाठी उंचइमारतींवर ती वीज आकर्षीत करून जमिनीत वाहून नेण्यासाठी (किंवा खरे तर जमिनीतील ऋणभार / इलेक्ट्रॉन्स वर ढगांत सहज वाहून जावे अशी) यंत्रणा उभारलेली असते. हे सगळे होताना इलेक्ट्रॉन्सच्या प्रवाहाने "आयोनाइज्ड एअर अथवा प्लाझ्मा" तयार होतो आणि त्यामुळे प्रकाश उत्सर्जीत होतो, जो आपल्याला दिसतो.... हुश्य... हे झाले आकाशातल्या क्षणभरच चमकणार्‍या विद्युल्लतेचे फार सोपे केलेले दीर्घ वर्णन. प्रत्यक्षात ही प्रक्रिया खूप गुंतागुंतीची आहे आणि अजूनही पूर्णपणे समजलेली नाही.

हुश्श!!
:)
माहिती बद्दल धन्यवाद.

ब़जरबट्टू's picture

3 Jul 2013 - 9:34 am | ब़जरबट्टू

हम्म.. अशी एखादी इमारत आमच्या विदर्भात पण बान्धावी म्हणतो.. तेव्हडीच आपली वीज मिळेल... :)

अनिरुद्ध प's picture

8 Aug 2013 - 7:35 pm | अनिरुद्ध प

विदर्भात असलेली औष्णिक विद्युत केन्द्रे नीट पुर्ण क्षमतेने चालत नाहित का?

कवितानागेश's picture

6 Jul 2013 - 7:54 am | कवितानागेश

भारी आलेत सगळे फोटो.

प्रभाकर पेठकर's picture

6 Jul 2013 - 10:55 am | प्रभाकर पेठकर

जालावरून आणि मित्रमंडळींकडून संग्रहीत केलेली छायाचित्रे नयनरम्य आणि मनोहारी आहेत.

टक्कू's picture

6 Jul 2013 - 10:57 am | टक्कू

खत्तरनाक !!!!!!

बॅटमॅन's picture

6 Jul 2013 - 3:13 pm | बॅटमॅन

जबरी!!!!!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Jul 2013 - 4:47 pm | डॉ सुहास म्हात्रे

सर्व प्रतिसादकर्त्यांचे आणि वाचकांचे धन्यवाद !

पैसा's picture

7 Jul 2013 - 5:03 pm | पैसा

आणि माहितीसाठी धन्यवाद!

अत्रुप्त आत्मा's picture

7 Jul 2013 - 11:13 pm | अत्रुप्त आत्मा

फोटू आणी माहितीसाठी>>> http://www.sherv.net/cm/emoticons/war/smiley-face-soldier.gif

त्रिवेणी's picture

7 Aug 2013 - 12:44 pm | त्रिवेणी

कसले भारी फोटो आहेत, आता एक एक करून तुमचे सर्व प्रवास वर्णन वाचणार आहे.

Bhagwanta Wayal's picture

7 Aug 2013 - 4:34 pm | Bhagwanta Wayal

अप्रतिम...