रिमझिम.. धुवांधार.. वगैरे..

या धाग्यामधे फक्त सुरु करुन देण्याचं निमित्त झालोय म्हणून मी धागाकर्ता. अन्यथा माझा सहभाग या धाग्यात वाचक म्हणूनच असेल असा बेत आहे.

पावसाची तर्‍हा जरा अत्रंग आहे. हा रोमँटिक गुदगुल्या करता करता मधेच लपविलेला बडगा दाण्णकन हाणायला कमी करत नाही. गालगुच्चा घेतल्यासारखं करुन पाठोपाठ कानशिलात लाफे लगावणारा पाऊस मुंबईत आणि कोंकणात दिसतो.

मुंबईकरांच्या मनात पावसाची गंमत जाऊन दहशतही बसली आहे एव्हाना. पाऊस आला की सक्काळी सक्काळी उठून आधी इमारतीखाली किती इंच पाणी झालंय हे पाऊल बुडवून बघायचं, मग त्या लेव्हलवरुन लोकल चालू असेल की लोचे झाले असतील हा अंदाज बांधायचा आणि परत जिना चढून आपापल्या घरात घुसून टीव्ही बघत बसायचं.. असेही दिवस येतात.

हा धागा "पावसातले आपण" या विषयावरच आहे. आणि सर्वांसाठी आहे. याचा उपयोग (?) आपापले पावसात अडकल्याचे, किंवा पावसामुळे हपीसातून सुटल्याचे, किंवा पावसात कटिंग चहात पाणी मिसळून तो गार झाल्याचे, किंवा छत्तीस तास अडकून पडल्याचे असे कोणतेही अनुभव इथे सर्वांना सांगण्यासाठी...!! सोबत चालू पावसाचे किंवा पूर्वी कधी काढलेले पण कायमची आठवण बनलेले पावसाचे फोटोही लिंकवावेत.

हे फक्त मुंबईसाठी अर्थातच नाही..

ज्या प्रदेशांत सध्या पावसाळा नाही, किंवा जिथे बारमाही पावसाळाच असतो, किंवा जिथे वर्षभरात मिळून पावसाचा थेंबही पडत नाही अश्या सर्व भागात आपले मिपाकर मेंबर राहत असू शकतील. आपापल्या जवळचा पाऊस सर्वांना भेटायला इथे आणा. फोटोसकट किंवा नुसत्या शब्दांनी.. अगदी बर्फवृष्टीसहित सुद्धा...

अगदी पावसाची वॉर्निंग देण्यासाठी, अपडेट करण्यासाठी, तुम्ही कुठे अडकून पडला असाल तर इतरांना सावध करण्यासाठी आणि त्याचवेळी प्लॅटफॉर्मवर वेळ घालवण्यासाठी हे पान आपल्या मोबाईलवर बुकमार्क करुन ठेवता येईल..

A

B

C

प्रतिक्रिया

मृत्युन्जय's picture

24 Jun 2013 - 6:12 pm | मृत्युन्जय

झक्कास. आता एक चहाचा, एक भजीचा, एक पावसाने तारांबळ उडालेल्या मुंबैकरांचा, गटाराच्या पाण्याने ओसंडुन वहाणार्‍या रेल्वेरुळांचा, पावसाने व्यवस्था कोलमडुन गेलेली असतानाही असामान्य धैर्याने परिस्थितीला सामोरे जाणार्‍या मुंबैकरांचा असे फटु येउ द्यात बरे पटपट.

मग मुंबैकर महिला भगिनी सालाबादप्रमाणे "शी बाई रस्त्यावर पाणी तुंबलेले असताना साडी सावरत सावरत चालताना झुरळे पायावरुन जातात तेव्हा इतकी घाण वाटते ना..." अश्या चिरपरिचीत प्रतिक्रिया देतील.

मग काही मुंबैकर पावसाचे थैमान चालु असताना दहिसर, भांडूप, विक्रोळी, विरार भागात जायचे म्हणजे अंगावर कसा काटा येतो ते सांगणार. मग मध्येच एखादे वर्तमानपत्रातीला कात्रण चिकटवता येइल की पावसाने रेल्वेसेवा ठप्प झाल्याने मुंबैकरांचे हाल (अधुन मधुन हार्बर लाइन, सेंट्रल, वेस्टर्न, साउथ मुंबै असले शब्द वापरुन नॉन मुंबैकरांना गोंधळात टाकण्याचा हुकुमी एक्का देखील वापरता येइल).

असो तर अश्याप्रकारे मुंबैकरांनी मुंबैकरांसाठी सुरु केलेल्या धाग्याला आमच्या शुभेच्छा. हे फक्त मुंबईसाठी अर्थातच नाही.. असे नुसते लिहुन काय उपयोग? मुंबैबाहेर भारतात कुठे पाऊस पडतो तरी का?

का बुवा धाग्यात पुढे काय काय येईल याचा इतका पुढचा तपशीलवार अंदाज आणि गृहीतकं?

खाली इस्पिकराजांनी सौदीतल्या क्वचित येणार्‍या राक्षसी पावसाविषयी लिहिलंय ना? मुंबईखेरीजचाच भाग आहे ना?

कोंकणपट्टी अगदी गोवा आणि दक्षिणेपर्यंत प्रचंड पाऊस पाडते. गोव्यात चापोरा किल्ल्यावर उभे राहून दुरुन येणारा पाऊस अगदी डोक्यावर येऊन भिजवेपर्यंत पाहात राहाण्याचा अनुभव मीही घेतला आहे. गोव्यात अनेक मिपाकर आहेत.

सांगली-कोल्हापूर रस्त्यावर सिमेंट गोटीएवढ्या आकाराच्या गारपिटीचा पाऊस पाहिला आहे. गाडीचीही काच फुटेल अशी भीती वाटवणारा तो जोरदार वादळी पाऊस होता. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या भागात अनेक मिपाकर राहतात.

गतवर्षी आलेल्या हरिकेनने अमेरिकेचा खूप मोठा भाग व्यापला आणि नुकसान केलं. त्यासाठी इथे धागाही आला होता. त्यावर आपापली सुखरुपता सांगितली अनेक अमेरिकास्थित मिपाकरांनी. अमेरिकेतही पाऊस पडतो, काही भागात टोर्नाडोही येतात, तिथे असंख्य मिपाकर आहेत.

युरोपातल्या अनेक भागांत वर्षभर कधीही अचानक पाऊस सुरु होतो. जवळजवळ रोजच.. छत्री, रेनकोट सोबत ठेवावाच लागतो असं म्हणतात. मी वाजत्या दातांनी युरोप दौर्‍यात हा पाऊस झेलला, अगदी बर्फाळ वादळी पाऊसही, तेव्हा इथे राहणार्‍या लोकांच्या दृष्टीने हा पाऊस काय असेल असा विचार आला होता.

युरोपातही अनेक मिपाकर आहेत, तिथेही पाऊस पडतो.

.....

आणि तरीही, त्याउपर, समजा मुंबईतल्या लोकांनी त्यांचे ते नेहमीचेच हाल लिहीले, तर ते अगदी नकोसे कंटाळवाणे आहेत का?

......

तेव्हा ते मुंबईकरांनी मुंबईकरांसाठी वगैरे उपरोक्त सर्व गंमतीने म्हटले आहे असं समजतो... :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Jun 2013 - 6:16 pm | डॉ सुहास म्हात्रे

कोण म्हणतय सौदि अरेबियामध्ये पाऊस पडत नाही ? आँ??? ही पहा जानेवारी २०११ मध्ये (सौदि अरेबियात पाउस पडलाच तर डिसेंबर-जानेवारीत पडतो) झालेली जेद्दा शहराची अवस्था...

.

.

.

.

.

काकाकाकू's picture

24 Jun 2013 - 9:30 pm | काकाकाकू

सौदि अरेबियात खूप पाउस पडत असेल. पण पाणी एव्हढं साचू शकेल अशी कल्पनाच करू शकलो नव्हतो!! जेद्दा समुद्र किनार्‍यावर आहे त्यामुळे हे काय भरतीच्या वेळेमुळे वगैरे का नेहेमीचंच आहे?

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Jun 2013 - 12:48 am | डॉ सुहास म्हात्रे

हे नेहमीचे नाही, फार क्वचीत होते. २०११ मध्ये अचानक प्रचंड मुसळधार वर्षा झाली. अनेक लोक प्राणासही मुकले. त्यानंतर असा पाऊस परत पडला तर ते पाणी वाहून जाण्याची व्यवस्था केल्याचे ऐकतो आहे.

सौदि अरेबियाची जमीन वाळवंटी असल्याने तिच्यात पाणी पटकन मुरत नाही; पाणी जमिनीवर साचून त्याची पातळी एकदम वर जाते आणि खूप नुकसान होते.

काकाकाकू's picture

25 Jun 2013 - 2:52 am | काकाकाकू

"जमीन वाळवंटी असल्याने तिच्यात पाणी पटकन मुरत नाही; ". चिकणमाती सारखी असते किंवा अति उष्णतेमुळे कडकडीत होते जमीन म्हणून? माझ्या डोक्यात आपलं वाळूत ओतलेलं पाणी झटकन जिरतं हेच आहे!

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Jun 2013 - 11:31 am | डॉ सुहास म्हात्रे

वाळवंटातली वाळू समुद्राकाठच्या वाळूसारखी नसते... "खालच्या स्तरात हजारो वर्षे दबून राहीलेली जिच्यात पाणीही शिरकाव करू शकत नाही इतकी घट्ट" आणि त्यावर "अगदी मातीसारख्या भुरभुरणारी वाळू (लाटालाटप्रमाणे दिसणारी वाळू हीच आणि वाळूची वादळेही हिच्यामुळेच होतात)" असते. त्यामुळे पाणी जिरण्याऐवजी जमिनीवरच साठते आणि त्याला वाहून जायला जेथे जागा मिळते तेथे अगदी कमी वेळात खूप वेगाचा आणि ताकदीचा ओध तयार होतो... गाड्या (अगदी ट्रकही) या प्रवाहात वाहून जाण्याएवढा. इतका पाऊस क्वचितच पडतो. पण पडतो तेव्हा पाणी ओसरल्यावर खेळण्यातल्या गाड्यांप्रमाणे एकावर एक रचलेल्या चारचाकी दिसणे ही नेहमीची गोष्ट आहे.

ह्या भुरभुरणार्‍या वाळूच्या वादळाची एक झलक... पाऊस परवडला अशी वाळूची बरसात आकाशातून होते...

हा धागा भरकटू नये म्हणून वाळूच्या वादळाची (? पावसाची ;) ) चित्रे येथे टाकली आहेत.

विजुभाऊ's picture

25 Jun 2013 - 1:55 am | विजुभाऊ

साठलेल्या पान्यात होड्या सोडाव्यात तशा गाड्या सोडल्या आहेत

पैसा's picture

24 Jun 2013 - 10:26 pm | पैसा

गविंचे आणि एक्का रावांचे फोटो जबरदस्तच आहेत! सौदीतला पाऊस पण कोकणी पावसासारखा पडतो हे बघून बरं वाटलं!

पावसामुळे शाळा आणि कॉलेज गेल्या गेल्याच सोडून द्यायचे तेव्हा जेवढी मज्जा वाटायची तशी नंतर वाटेनाशी झाली. पण कॉलेज सुटताच रत्नागिरीच्या गोगटे कॉलेजशेजारी पोस्टाच्या कँटीनमधे रेखाचा वडा आणि चहा हे मस्ट होतं. तसा वडाही नंतर कधी कुठे मिळाला नाही!

या धाग्याचे जन्मदाते का दिसत नाहीत..?