Skip to main content

जगातल्या सर्वात उंच इमारतीवर वीज पडते तेव्हा...

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी मंगळवार, 02/07/2013 या दिवशी प्रकाशित केले.
आतापर्यंत आपण सौदी अरेबियातील निसर्ग चमत्कार पाहिले... सौदी अरेबियातली बर्फवृष्टी... सौदी अरेबियातले वाळूचे वादळ… सौदी अरेबियातला पाऊस… सौदी अरेबियातली “गारा” वर्षा... आता थोडे दुबईकडे वळूया.. दुबईच्या सुरस कहाण्या तुम्ही ऐकल्या असतीलच. आता पहा हा दुबईतला खास एक निसर्गचमत्कार, जो जगात इतर कोठेही होऊ शकत नाही... निदान बुर्ज दुबई (आताचे नामकरण बुर्ज खलिफा) जगातील सर्वात ऊंच इमारत असेपर्यंत तरी नक्कीच नाही. हा विजेचा नाच नक्कीच चित्तथरारक असतो... त्याची काही चित्रे...  .  .  .  .  .  ही सर्व चित्रे जालावरून आणि मित्रमंडळींकडून संग्रहीत केलेली आहेत. जगातल्या इतर उंच इमारतींवर झालेले विद्युल्लतेचे हल्ले तुम्ही www.environmentalgraffiti.com/nature/news-7-most-iconic-skyscrapers-ear… येथे पाहू शकाल.
लेखनविषय:

वाचने 26976
प्रतिक्रिया 22

प्रतिक्रिया

असे वीज पडणे आम्ही वरळीच्या दूर्दर्शन मनोर्यावर पडताना बघीतले आहे त्यावेळी मनोर्याच्या टोकावर थोडा धूर दिसला होता,ईथे तसे कही झाले नसेल तर उत्तम.

In reply to by अनिरुद्ध प

उंच इमारतींकडे वीज आकर्षीत होणे सहाजीक आहे... त्यांमुळेच सर्व ऊंच इमारतीना वीजरोधक बसविलेले असतात. बुर्ज खलिफासारखे अफाट उंच मनोरे तर अगदी ढगांच्या खालच्या थराच्या उंचीपेक्षा जास्त वर असतात... त्यामुळे त्यांच्या बाजूचीच (वरची नव्हे ;) वीज त्यांच्याकडे आकर्षीत होणे हे नेहमीचेच आहे. त्यामुळे अशी चित्रे दुर्मिळ नाहीत पण आकर्षक नक्कीच आसतात. बुर्ज खलिफावर अत्यंत प्रबळ अगदी आता माहित असलेल्या वीजेच्या मार्‍यापेक्षा जास्त आघात सहन करू शकेल एवढी प्रबळ संरचना स्थापीत केली आहे असे ऐकून आहे... अर्थात अश्या जगावेगळ्या उंच इमारतीची तेवढी काळजी घेतलि नसती तरच नवल होते म्हणा !

फोटो सहीच. -दिलीप बिरुटे

इतक्या प्रचंड शक्तीला नियंत्रित केल्यावर त्या उर्जेचा पुढे उपयोग केला जातो का?

इतक्या प्रचंड शक्तीला नियंत्रित केल्यावर त्या उर्जेचा पुढे उपयोग केला जातो का? नियन्त्रीत केले जात नाही. ती वीज सरळ अर्थ मध्ये जाते. ( पृथ्वी फिरवायला उपयोग केला जातो म्हणाल तर थोडेसे योग्य ठरेल)

In reply to by संजय क्षीरसागर

त्याच्यापुढे काही प्रगती आहे का?
निकोला टेस्ला यावर काम करता करताच मेला…नायतर झाली असती, तो वायरलेस वीज पण देणार होतार म्हणे

In reply to by मालोजीराव

निकोला टेस्ला यावर काम करता करताच मेला…नायतर प्रगती झाली असती, तो वायरलेस वीज पण देणार होता म्हणे !

मानलं इस्पीक एक्का साहेब! तरीही सहज एक शंका, विज फक्त पडते की उत्सर्जीतही होते? कारण मला इथे विज बाहेर पडताना दिसते आहे म्हणुन विचारल.

In reply to by स्पंदना

वीज पडणे हा केवळ एक मराठी वाक्प्रचार आहे. हवेच्या चलनवलनाने, वातावरणातील उष्णतेच्या फरकाने आणि इतर काही कारणांनी वातावरणाच्या दोन भागांच्या विद्युतभारात फरक निर्माण होतो. याबरोबर जर तो विद्युतभार वाहून नेण्यास मदत करणारी सोय असली (जी बहुदा पावसाळी दमट ढग पुरवतात) की मग वीजेचा स्रोत धन-ते-ऋण असा वाहू लागतो (किंवा खरे म्हणजे इलेक्ट्रॉन्स उलट्या दिशेने वाहू लागतात !). हा प्रकार धन भारीत व ऋण भारीत ढगांमधे झाला की आपल्याला आकाशात चमकणारी वीज दिसते. पण हा प्रकार धन भारीत ढग आणि ऋण भारीत पृथ्वी अथवा पृथ्वीवरील इमारत / झाड यामधे झाला की आपण वीज पडली असे म्हणतो. या सर्व प्रकारात उंच इमारतींना त्या ढगांच्या जवळ असल्याने नेहमीच जास्त धोका असतो. विद्युतप्रवाहाच्या स्त्रोताचा इमारतीवर परिणाम होऊ नये यासाठी उंचइमारतींवर ती वीज आकर्षीत करून जमिनीत वाहून नेण्यासाठी (किंवा खरे तर जमिनीतील ऋणभार / इलेक्ट्रॉन्स वर ढगांत सहज वाहून जावे अशी) यंत्रणा उभारलेली असते. हे सगळे होताना इलेक्ट्रॉन्सच्या प्रवाहाने "आयोनाइज्ड एअर अथवा प्लाझ्मा" तयार होतो आणि त्यामुळे प्रकाश उत्सर्जीत होतो, जो आपल्याला दिसतो.... हुश्य... हे झाले आकाशातल्या क्षणभरच चमकणार्‍या विद्युल्लतेचे फार सोपे केलेले दीर्घ वर्णन. प्रत्यक्षात ही प्रक्रिया खूप गुंतागुंतीची आहे आणि अजूनही पूर्णपणे समजलेली नाही.

हम्म.. अशी एखादी इमारत आमच्या विदर्भात पण बान्धावी म्हणतो.. तेव्हडीच आपली वीज मिळेल... :)

In reply to by ब़जरबट्टू

विदर्भात असलेली औष्णिक विद्युत केन्द्रे नीट पुर्ण क्षमतेने चालत नाहित का?

जालावरून आणि मित्रमंडळींकडून संग्रहीत केलेली छायाचित्रे नयनरम्य आणि मनोहारी आहेत.

सर्व प्रतिसादकर्त्यांचे आणि वाचकांचे धन्यवाद !