रुसवा

अज्ञातकुल's picture
अज्ञातकुल in जे न देखे रवी...
14 May 2013 - 10:53 am

कबूल नाही नसलेपण तव
निगूत जपले आहे वैभव
सरले ऋतू कितीक युगाब्धे
हिरमुसले ना जीवन लाघव

अदृष्यातिल दृष्य आभासे
चंचल डोळ्यांमधील बारव
स्मितरेषा गालांवर अंकित
खोल खळ्या ओठांचे पल्लव

भल्या किनारी रुसवा फसवा
अबोल्यात वठले गुंजारव
आभास; विझल्या खुणा सणाच्या
भिजले काळिज हसले शैशव

............................अज्ञात

शांतरसकविता

प्रतिक्रिया

Bhagwanta Wayal's picture

14 May 2013 - 11:08 am | Bhagwanta Wayal

अदृष्यातिल दृष्य आभासे
चंचल डोळ्यांमधील बारव
स्मितरेषा गालांवर अंकित
खोल खळ्या ओठांचे पल्लव
वा..! छन..!

स्पंदना's picture

14 May 2013 - 1:34 pm | स्पंदना

अबोल्यात वठले गुंजारव

अंहं!
निगूत म्हणजे काय?

अज्ञातकुल's picture

14 May 2013 - 3:56 pm | अज्ञातकुल

"निगूत" नीट नेटकेपणाने, व्यवस्थित, मनापासून, काळजीपूर्वक. एखदं काम "निगुतीने" करतो आपण म्हणजे "सावकाश काळजीपूर्वक" करतो.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

14 May 2013 - 3:59 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

भल्या किनारी रुसवा फसवा
अबोल्यात वठले गुंजारव
आभास; विझल्या खुणा सणाच्या
भिजले काळिज हसले शैशव

भिजलयं भिजलयं!!