७२ मिनिटांचा हिशोब - पुरुष जनहित मे जारी.

तुमचा अभिषेक's picture
तुमचा अभिषेक in जनातलं, मनातलं
18 Apr 2013 - 8:50 pm

रविवारची सकाळ. दिवाणखान्यात सोफ्यावर बसलेलो मी. टिव्ही वर चिकनी चमेली के शीला की जवानी. मात्र त्याकडे जराही लक्ष नाही. एका हातात चहाचा कप. दुसर्‍या हातात पोह्याने भरलेला चमचा, जो ‘आ वासलेल्या’ तोंडाच्या अगदी जवळ येऊन तसाच थांबलेला. विस्फारलेले डोळे समोरच्या पेपरावर खिळलेले. अजूनही विश्वास बसत नव्हता. पण वस्तुस्थितीचे भान आले तेव्हा जाणीव झाली की बातमी "दैनिक फेकानंद" मध्ये आली असल्याने तिला हसण्यावारी नेणे शक्य नव्हते. हि बातमी दिवाणखान्यामधून स्वयंपाकघरापर्यंत पसरण्याआधी तिचा छडा लावणे गरजेचे होते. मी त्या वर्तमानपत्रातील तेवढे कात्रण नेमके कापून उरलेल्याची व्यवस्थित सुरंगळी करून रद्दीच्या पिशवीत भिरकावून दिेली आणि विचारमग्न अवस्थेतच अंत:पुराकडे प्रस्थान केले. कुठेतरी खोलवर आतवर अंतकरणात दडलेला पुरुषी अहंकार दुखावला गेला होता.

तर मित्रांनो काय होती ती बातमी जी आपल्या पुरुषांच्या प्रधानगिरीला आव्हान देणार होती हे ऐकायची तुम्हाला उत्सुकता नक्कीच लागून राहिली असणार.

तर ऐका,

आपले वाचा,

" भारतीय महिला ७२ मिनिटे जास्त काम करतात. "

बसला ना झटका...!!
असेच आणखी दोनचार झेलायची तयारी करून खाली सविस्तर वाचा.

---------------------------------------------------------------------------------------------
आधुनिक भारताच्या अत्यानुधिक महिलांच्या कर्तृत्वावर शिक्कामोर्तब करणारे वृत्त -
वृत्तसंस्था, झुमरीतलैया

भारतीय महिला दिवसभरात भारतीय पुरुषांच्या तुलनेत सरासरी ७२ मिनिटे अधिक कार्यालयीन काम उपसत असल्याचे एका गुप्त सर्वेक्षणानुसार समोर आले आहे. भारतातील प्रमुख शहरांमध्ये केलेल्या या सर्वेक्षणात प्रत्येक शहरात हीच बाब कमी-अधिक फरकाने अधोरेखित झाली आहे. "नारी शक्ती तिथे युक्ती अन पुरुषांपासून मुक्ती" हे ब्रीदवाक्य असलेल्या "सखी तू होऊ नकोस दुखी" या संघटनेतर्फे करण्यात आलेल्या अभ्यासात भारतभर महिला मनुष्यबळाचे प्रमाण क्षणोक्षणी वाढत असल्याचे दिसून आले आहे.

(बातमी इथेच थांबली असती तर काही प्रश्न नव्हता, पण तिच्या उत्तरार्धात पत्रकारसखीने खास बायकांच्याच शैलीत मारलेला तिरकस टोमणा मात्र संभाव्य धोक्याची चाहूल देणारा होता... तर ऐका... आपले वाचा...)

कामाच्या बाबतीत भारतीय पुरुष भारतीय महिलांपेक्षा पिछाडीवर असले, तरी भारतीय पुरुषांनी वेतनाच्या बाबतीत ही कसर भरून काढली आहे. निर्धारित वेळ काम करूनही पुरुष कर्मचाऱ्यांना महिला कर्मचाऱ्यांच्या तुलनेत १७ टक्के अधिक वेतन मिळत असल्याचे देखील या सर्वेक्षणात सामोरे आले आहे.
---------------------------------------------------------------------------------------------

वाक्यावाक्याला भारतीय पुरुष असा उल्लेख वाचून आजवर स्वत:ला जेवढा "भारतीय" असल्याचा अभिमान वाटत होता तेवढीच आता "भारतीय पुरुष" असल्याची लाज वाटू लागली होती. काही नाही, मी ठरवले, या बातमीला उत्तर द्यायचेच. खून का बदला खून, आंख का बदला आंख, तसेच सर्वेक्षण का बदला सर्वेक्षण.... मात्र मला एकट्याला सर्वेक्षण करणे शक्य नसल्याने मी केवळ निरीक्षण करून एक अहवाल बनवायचे ठरवले अन लागलीच कामाला लागलो. महिन्याभरात स्वताच्याच ऑफिसमधील महिला कर्मचार्‍यांच्या निरीक्षणावरून भारतीय बायकांचे ऑफिसकाम प्रत्यक्षात कसे चालते यावर मी एक दसकलमी अहवाल बनवला. बस तोच पुरुष जनहित मे जारी तुमच्या समोर सादर करत आहे.

७२ मिनिटांचा हिशोब - पुरुष जनहित मे जारी.

१) सकाळी कार्यालयात शिरल्या शिरल्या या कामाच्या जागेवर न जाता सरळ प्रसाधनगृहाकडे कूच करतात आणि मेकअप शेकअप करत बसतात. कारण घरून आंघोळ अन नीटनेटकी तयारी करून निघाल्या असल्या तरी प्रवासामुळे (भले तो दहा मिनिटांचा अन वातानुकुलीत बसने का असेना) विस्कटलेले केस, ड्रेस, मेकअप वगैरे ठिकठाक करूनच यांना ऑफिसमधील आपल्या इतर सहकार्‍यांना दर्शन द्यायचे असते.

२) जागेवर आल्यानंतरही कॉम्प्युटरची कळ न दाबता या आधी इतर महिला सहकार्‍यांवर एक नजर मारतात. आज कोणी काय नवीन विशेष घातले आहे का याचा आढावा घेतला जातो. असल्यास खोट्या खोट्या स्तुतीसुमनांचा मारा होतो. कारण पुढच्यावेळी आपण जेव्हा काहीतरी नवीन घालून येऊ तेव्हा आपलीही अशीच दखल सर्वांनी घ्यावी हा सुप्त हेतू.. गिव एंड टेक.. तू मला लाईक कर मी तुला लाईक करते..!

३) तासाभराने चहा येतो. तेव्हा बरेच पुरुष मुकाट्याने चहा पिऊन लगेच कामाला सुरुवात करतात तर काही जण सिगारेटचा झुरका मारायला बाहेर पॅंट्रीमध्ये जातात, मात्र सिगारेट-चहा संपताच परत येतात. बायकांच्या गटात मात्र चहा आल्या की खुर्च्याच एकमेकींच्या दिशेने वळतात, डब्यातून चिवडा-फरसाण अन क्रीमची बिस्किटे काढली जातात. एकमेकींशी देवाणघेवाण केली जाते. आणि सावकाश गप्पा मारत ज्याला गॉसिपिंग असेही बोलतात त्याच्या जोडीने हा टी-टाईम साजरा केला जातो.

४) त्यानंतर होते दुपारी जेवायची वेळ. ही वेळही काटेकोरपणे पाळली जाते. कारण कितीही अर्जंट काम असले तरी या फारवेळ उपाशी राहू शकत नाहीत. जेवणही यांचे सावकाश असते. डब्यात रोजच्याच भाज्या असतात तरीही त्याची पाककृती उगाचच्या उगाच जेवणाबरोबर चघळली जाते. तसेच जेवण झाल्यावर देखील या तश्याच गप्पा मारत बसून राहतात, लगेच उठत नाहीत. इतर सारे उठले की उलट यांच्या गप्पा जास्त रंगात येतात आणि चुगलीचा कार्यक्रम जोर शोर से चालतो. जाऊ, भावजय, नणंद हे दुर्मिळ शब्द फक्त इथेच ऐकू येतात.

५) पुरुष बापुडे जेवतात आणि डबा तसाच बॅगेत भरून घरी आणतात. या मात्र तिथेच ऑफिसच्या पाणवठ्यावर डबा घासून, पुसून, सुकवून, लखलखीत करूनच बॅगेत भरतात. डबेही यांचे काही कमी नसतात. खाणार जेमतेम दिड चपात्या मात्र लोणचे, पापड, सॅलाड, भाजी, चपाती असे सतरा डबे असतात. धुणीभांडी स्वताच करायची असल्याने वेळप्रसंगी ताट वाटी चमच्याचेही लाड चालतात.

६) जेऊन जागेवर आल्यावर यांचा फोनचा कार्यक्रम सुरू होतो. सर्वप्रथम नवर्‍याला फोन लागतो ते जेवण कसे झाले होते हे विचारायला. पण अर्थातच, तो एक पुरुष असल्याने आणि त्याच्या ऑफिसला असल्याने बरेवाईट काय ते खरेखोटे न सांगता एका शब्दात चांगलेच होते बोलून फोन ठेऊन देतो. त्यानंतर घरी फोन लावला जातो. कोणाचा सासरी लागतो तर कोणाचा माहेरी, मात्र लागतो जरूर. तिकडचे हालहवाल काय आहेत यावर तो फोन किती चालतो हे ठरते.

७) पुन्हा तास दीड तासाने चहाचा कार्यक्रम सकाळसारखाच पार पडतो. एवढ्या गप्पा या दिवसभरात कश्या मारू शकतात, एवढे विषय कुठून येतात या बद्दल कोणालाही शंका नसावी. विवाहीत बायकांकडे चार विषय जास्तच असतात आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ते विषय सर्वच बायकांच्या सामाईक आवडीचे असतात. तसेच प्रत्येकीकडे त्यावर काही ना काही तरी सांगण्यासारखे असतेच असते.

८) संध्याकाळी ऑफिस सुटायच्या तासभर आधी यांना निसर्गनियमानुसार पुन्हा भूक लागते. यावेळी कोणी चहा तर आणून देणार नसतो. मग एकेकीच्या डब्यातून संत्री केळी अन सफरचंद निघतात. अगदी घरच्यासारखे सुरीने कापून वगैरे ही फळे खाल्ली जातात. इथे ही गप्पा मारणे हे ओघाने आलेच. निव्वळ खाण्यासाठी म्हणून या तोंड कधीच उघडत नाहीत.

९) ऑफिस सुटायच्या दहा ते पंधरा मिनिटे आधीच यांचा कॉम्प्युटर बंद होतो. कारण पुन्हा दिवसभराचा शीण घालवायचा तर तेवढा तगडा मेक अप हा हवाच. याच दरम्यान ऑफिसमधील सार्‍या बायका रंगरंगोटी करायला रेस्टरूमवर गर्दी करत असल्याने आणि प्रत्येकीला किमान सात-आठ मिनिटे लागत असल्याने यात वेटींगचा एक्स्ट्रा टाईम देखील हिशोबात धरल्यास उत्तम.

१०) उशीरा ऑफिसमध्ये थांबणे हा प्रकार यांच्या बाबतीत अभावानेच आढळतो आणि आढळला तरी रोज रोज नसतो. यांना वरचेवर थांबवायची त्यांच्या बॉसलाही भिती वाटते, न जाणो दुसर्‍या दिवशी ऑफिसमध्येच भाज्या निवडायला घेऊन आल्या तर......

तर मित्रांनो........ हे असे असते. यावरून असे म्हणता येईल की मुळातच या भारतीय बायका भारतीय पुरुषांच्या मानाने संथ असून त्यांना दिवसभरात तेच काम करायला ७२ मिनिटे जास्त लागत असण्याची शक्यता असल्याने हा सर्व्हे सर्वस्वी चुकीचा आहे असे नाही म्हणता येणार.

या अहवालाशी सहमत असाल नसाल तरी इथे याच खाली मोठ्या संख्येने स्वाक्षरी करा. येत्या अमावस्येच्या आधी आपल्याला याची एक प्रत दैनिक फेकानंदच्या कार्यालयात सादर करायची आहे. पुढील कार्यक्रमाची रुपरेषा लवकरच, तुर्तास शुभरात्री शब्बाखैर खुदाहाफिज..!!

धन्यवाद,
अहवाल सादरकर्ता -
तुमचा पुरुषमित्र अभिषेक

तळटीप - सदर लेख कल्पनेवर आधारीत असून आपल्या जवळपास असेच काहीसे द्रुष्य दिसल्यास तो निव्वळ योगायोग समजावा........ आणि हो, हलकेच घ्या हं. ;)

समाजजीवनमानराहणीराहती जागानोकरीसमीक्षामाध्यमवेधमतवाद

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

18 Apr 2013 - 8:56 pm | मुक्त विहारि

मस्त..

श्रीरंग_जोशी's picture

18 Apr 2013 - 9:06 pm | श्रीरंग_जोशी

कल्पक लेखन आवडले.

अभिषेक - तुम्ही हे सर्वेक्षण करण्यात घालवलेला कामाचा महत्वपूर्ण वेळ तुमच्या सुटीच्या कोट्यातून वजा का केला जाऊ नये अशी कारणे दाखवा नोटीस देण्यात येत आहे.

या नोटिशीचे उत्तर देण्यास कामाचा वेळ पुन्हा दवडल्यास तोही सुटीच्या कोट्यातून वगळला जाईल हे ध्यानात ठेवा...

तुमचा अभिषेक's picture

18 Apr 2013 - 9:27 pm | तुमचा अभिषेक

एक्स्ट्राचा वेळ नाही घेतला हो... बायका नाही का मालिका बघत बघत तांदूळ निवडताना आपल्या पपूबाळाचा अभ्यास घेत असतात.. बस्स तसेच मी देखील काम करता करताच थोडेफार निरीक्षण केले.. :)

श्रीरंग_जोशी's picture

18 Apr 2013 - 9:35 pm | श्रीरंग_जोशी

पहिली वेळ असल्याने केवळ नोटिस देऊन सोडण्यात येत आहे....:-).

बाकी आता तुम्ही कार्यालयातील एक समस्या शोधून काढलीच आहे तर त्यावर उपायही सुचवा :-).

तुमचा अभिषेक's picture

18 Apr 2013 - 9:41 pm | तुमचा अभिषेक

उपाय शोधायच्या फंदात पडू नका.. समस्या कार्यालयातच राहू द्या.. उपाय शोधायच्या नादात समस्या घरात आणून ठेवाल.. ;)

श्रीरंग_जोशी's picture

18 Apr 2013 - 10:50 pm | श्रीरंग_जोशी

अभिषेक - तुम्ही केवळ कल्पकच नाही तर समजुतदारपण आहात.

मुळातच या भारतीय बायका भारतीय पुरुषांच्या मानाने संथ असून

बॉर्र्र

ससा-कासवाची गोष्ट माहीत आहे ना? नाही असच विचारलं ;)

तुमचा अभिषेक's picture

18 Apr 2013 - 9:29 pm | तुमचा अभिषेक

हा हा.. मग आपणच सांगा आता ससा कोण अस कासव कोण.. ;)

कथेत जिंकतं कोण हे आपणच सांगा ;) गर्विष्ठ ससा की संथ पण सातत्य राखणारं कासव? :)

तुमचा अभिषेक's picture

18 Apr 2013 - 9:34 pm | तुमचा अभिषेक

त्या ससा कासव कथेच्या बरेच आवृत्त्या निघाल्या आहेत हं.. आपणच सांगा कोणती आपल्याला अपेक्षित आहे ते.. ;)

आमच्या संस्कारक्षम वयात, लहानपणी एकच आवृत्ती शिकवली जिच्याशी आम्ही ईमान राखलं. कासव जिंकतो ती. मग नंतर चलाख सशांनी आवृती चे भ्रष्टांतर केले असल्यास माहीत नाही ब्वॉ!! :)

तुमचा अभिषेक's picture

18 Apr 2013 - 11:02 pm | तुमचा अभिषेक

चला ठिक आहे, आम्ही चलाख ससे आहोत आणि आपण संथ कासव आहात या पॉंईंटवरच आपण हा वाद तुर्तास थांबवूया, आणि बघूया आपल्या किती कासव मैत्रीणी यावर सहमत होताहेत..
शुभरात्री शब्बाखैर खुदाहाफिज.. :)

मी तुझ्याशी सहमत हा शुचि :D

धमाल मुलगा's picture

18 Apr 2013 - 9:29 pm | धमाल मुलगा

एकतर आधीच इथं ते राखीव विभागावरुन अग्निकुंड पेटलंय, अन त्यात आणि राकेल ओतायचं काम चाललंय होय? :)

अभ्या लेका...स्वतःच्या हातानं चिता रचून घेतलीस की रे! आता बस बोंबलत. :D

अवांतरः लेख बाकी एकदम फर्डा जमलाय हो. निरिक्षणं फिरिक्षणं एकदम खणखणीत.
फक्त ते 'मेकअप शेकअप' अंमळ खटकलं...शेकअप म्हणल्यावर सगळ्या बायाबापड्या हापिसात पोचल्यावर त्या रेष्टरुममध्ये जाऊन काय मिल्कशेक वगैरे करुन पितात की काय असा प्रश्न पडला क्षणभर. :)

तुमचा अभिषेक's picture

18 Apr 2013 - 9:39 pm | तुमचा अभिषेक

हा हा.. ते शेक अप चा असाही अर्थ होतो का.. बरे झाले आणखी अर्थ नाही सुचले..

कॉलेजमध्ये ग्रूपमध्ये काही काळासाठी एक पंजाबी मुलगा होता त्याच्या या असल्या वाणीने मी बराच प्रभावित झालो होतो.. चल लेक्चर बंक शंक करते है, कुछ सिगार शिगार पिते हे असेच काही बाही बोलायचा तो..

अग्निकोल्हा's picture

18 Apr 2013 - 11:08 pm | अग्निकोल्हा

फुटलो. :)

कोणासाठी बायका एवढे प्रसाधन करत असाव्या आणि कोणासाठी पुरुष राब राब राबत असावे - असे २ मुलभूत प्रश्न पडले आहेत.

उपास's picture

18 Apr 2013 - 11:26 pm | उपास

प्रश्न पडणे हे जाणीवा जिवंत असण्याचे लक्षण आहे.. :)
लेख मस्तच..

अन्या दातार's picture

18 Apr 2013 - 11:39 pm | अन्या दातार

सांख्यिकी विदा नसल्याने सदर निरीक्षणे बाद का ठरवली जाऊ नयेत?? ;)

प्यारे१'s picture

19 Apr 2013 - 12:48 am | प्यारे१

फार मार लागलाय का रे लातूर उदगिरच्या भूकंपाचा? ;)

तुमचा अभिषेक's picture

19 Apr 2013 - 9:12 am | तुमचा अभिषेक

काय ओ, लेखात लिहिले आहे ना, हे सर्वेक्षण नसून निरीक्षण आहे, ते ही ऑफिसातील शेजारच्या तब्बल दोन मुलींचे.
दरवेळी मी काहीही लिहिले की पहिल्यांदा बायकोला वाचायला देतो, हाच एक लेख असा जो त्यांना आधी वाचायला दिला, त्यांची मान्यता मिळवून मगच प्रकाशित केला...
अन्यथा मूळ अहवालात १२ मुद्दे होते, दोघांवर त्यांनी आक्षेप घेतला म्हणून १० झाले.. :)

अभ्या..'s picture

21 Apr 2013 - 2:18 pm | अभ्या..

अंड्याच्या आणि माझ्या लिखाणातील मुख्य फरक सांगायचा झाला तर अंड्या त्याच्या निरीक्षणानुसार लिहितो आणि माझे बहुतांश लिखाण अनुभवावर आधारीत असते

म्हणून जरासे कन्फ्युजन झाले ओ. बाकी काही नाही. ;)

राव माझ्या लिखाणावरच्या गप्पा माझ्या धाग्यात तेवढ्या मारल्या असता तर मला तरी त्याचा फायदा झाला असता.. ही चिटींग झाली ना भाऊ.. :(

लाल टोपी's picture

18 Apr 2013 - 11:46 pm | लाल टोपी

लेख आवडला..

चेतन माने's picture

20 Apr 2013 - 4:54 pm | चेतन माने

:D :D :D

कोमल's picture

20 Apr 2013 - 5:57 pm | कोमल

:) :) :)
अजुन एका आंतरजाला वरील धाग्यात अशी महिती मिळाली की "भारतिय पूरुषा" पेक्शा "भारतीय महीलांच्या" कामाचा दर्जा चांगला असतो.. ;)

आता बोला अभिषेकराव..

तुमचा अभिषेक's picture

21 Apr 2013 - 10:41 am | तुमचा अभिषेक

तुमची लिंक गंडलीय.. माझ्याकडे तरी नाही दिसतेय..

बाकी काय बोलू.. बायका जे घरकाम करतात त्याला तोड नाहीच.............. फक्त त्या ऑफिसलाही घर समजूनच वागतात.. ;)

कोमल's picture

21 Apr 2013 - 12:11 pm | कोमल

लिंक तर गंडलीय खरीच.. पण गूगलवलात की लै लिंका मिळतात...

फक्त त्या ऑफिसलाही घर समजूनच वागतात..

आणि संत ग्यानोबांनी म्हटले आहे ना, "हे विश्वची माझे घर.."
:)

अतिशयोक्ती हा ही विनोदाचाच एक प्रकार आहे. तो लेखापुरता ठीक. पुढे समर्थन-त्याविषयीचा काथ्या कुटायला गेलात की विनोद संपतो. जर ते द्यायचंच असेल, तर तुमचा सँपल सेट चुकलाय.. सगळ्यात आधी ऑफिस बदला.

थोडंसं अवांतरः आमच्या कॉलेजमध्ये एक साधारण पंचेचाळीस-पन्नास वयाचे गृहस्थ कंपनीतला जॉब सोडून लेक्चररशीप करायला आले. अशी उलटी गंगा कशी काय म्हणून विचारल्यावर ,"खूप उशीर झालाय, हे आधीच करायला हवं होतं" म्हणाले. नंतर आम्हाला आपापल्या विभागातून काही काम एकत्र करायचे होते, परंतु कार्यक्रमाला उशीर होता त्यामुळे उगीच इकडे-तिकडे न करता आम्ही तिथे बसून वाट पाहायचे ठरवले. त्या अर्ध्या तासात आपल्या कॉलेजात किती कामं करावी लागतात आणि कंपनीत कसं मस्त मजेत होतं असं सांगून डोकं खायला लागले. शेवटी इतकं होतं तर आलात कशाला या क्षेत्रात असं विचारल्यावर त्यांचं उत्तर होतं, "मला वाटलं होतं इकडं आराम असेल". म्हटलं, "देअर यू आर". आता ते राजीनामा द्यायच्या तयारीत आहेत असं कळतं.

तुमचा अभिषेक's picture

21 Apr 2013 - 2:54 pm | तुमचा अभिषेक

समर्थन कसले हो, तेवढेच दोन प्रतिसाद वाढतात अन लेख वर येतो म्हणून बळंच लिहिले.. ;)

शुचि's picture

22 Apr 2013 - 4:55 pm | शुचि

मी तुझी पंखा झाले या प्रतिसादावर :)

श्री गावसेना प्रमुख's picture

21 Apr 2013 - 10:49 am | श्री गावसेना प्रमुख

७२ मिनिटांचा हिशोब - पुरुष जनहित मे जारी.
टायटल असे हवे होते.पुरुष हित मे जारी

चार बायका एकत्र आल्या की वेळ कसा भुरकन निघुन जातो ,त्यात हे ७२ मिनट कुठे लागतात

तुमचा अभिषेक's picture

21 Apr 2013 - 2:52 pm | तुमचा अभिषेक

पुरुषजन हित मे जारी असे करूया मग.. हा.का.ना.का. :)

पिलीयन रायडर's picture

22 Apr 2013 - 1:54 pm | पिलीयन रायडर

विवाहीत बायकांकडे चार विषय जास्तच असतात आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ते विषय सर्वच बायकांच्या सामाईक आवडीचे असतात. तसेच प्रत्येकीकडे त्यावर काही ना काही तरी सांगण्यासारखे असतेच असते.

उत्तम निरीक्षण!!!

लेख आवडला...!!!

पैसा's picture

23 Apr 2013 - 7:17 pm | पैसा

अतिशयोक्ती म्हणून ठीक आहे. आतापर्यंत मी ज्या ज्या शाखेत्/ऑफिसात काम केले आहे, तिथून माझी बदली झाल्यानंतर माझ्या जागी दर वेळी २/३ पुरुष सद्स्यांची नेमणूक झाल्याचा गेल्या २५ वर्षातला रेकॉर्ड आहे. आता नोकरी सोडल्यानंतर शेवटच्या शाखेतही तेच रेकॉर्ड कायम आहे.

तुमचा अभिषेक's picture

23 Apr 2013 - 10:06 pm | तुमचा अभिषेक

क्या बात है.. तसा माझा अनुभव तोकडाच.. आतापर्यंत तीन च नोकर्‍या बदलून झाल्यात.. पैकी पहिल्या दोन कंपन्या मी जॉब सोडताच सहामहिने वर्षभरात बंद पडल्या.. अन तिसरी कंपनी रिलायन्स असल्याने अगदी बंद वगैरे नाही पडली पण मी राजीनाम्याचा पेपर सरकावला त्या दिवशीच रिलायन्सचे शेअर तेवढे गडगडले होते.. खालच्या दिशेने हं.. :)

पैसा's picture

23 Apr 2013 - 10:10 pm | पैसा

एक विनोद म्हणून लेख आवडला, पण मी लिहिलेली अतिशयोक्ती नाही. माझ्या ऑफिसात तुम्ही जाऊन चौकशी करू शकता. मी पत्ता फोन नंबर देये पाहिजे तर. कुठेही महिला जास्त सिन्सिअर वर्कर्स असतात हे सत्य आहे.

कुठेही महिला जास्त सिन्सिअर वर्कर्स असतात हे सत्य आहे.

असहमत. महिला पुरुषांच्या तुलनेने जास्त वेळ वाया घालवतात हे जसं चुकीचं वाक्य आहे तसंच हेही वाक्य चुकीचं आहे.

पैसा's picture

23 Apr 2013 - 10:34 pm | पैसा

तुमचीच वाट बघत होते!

बॅटमॅन's picture

23 Apr 2013 - 10:36 pm | बॅटमॅन

सार्थक झालं म्हणायचं वाट बघितल्याचं =))

पैसा's picture

23 Apr 2013 - 10:44 pm | पैसा

बाजूने नाहीतर विरोधात काही विदा असला तर दे. नाहीतर मी पण इथून पळ काढते आहे.

दावा तुमचा, सबब विदा तुम्ही द्या.

पैसा's picture

23 Apr 2013 - 10:56 pm | पैसा

विधाने करणे हा आमचा हक्क आहे. ती खोटी ठरवायची असतील तर काम तुम्हाला करावे लागेल.

विधानाला आधार देणे हे तुमचे कर्तव्य आहे. हक्काबरोबर याचा विसर पडू देता कामा नये. कुठलाही दावा करणार्‍याला त्याच्या पुष्ट्यर्थ पुरावे देणे भागच असते. "अ‍ॅबसेन्स ऑफ प्रूफ इज नॉट द प्रूफ ऑफ अ‍ॅबसेन्स", सबब तुमच्या दाव्याच्या पुष्ट्यर्थ विदा तुम्हाला देणे भागच आहे. नसेल तर मग बिनबुडाचे विधान म्हणून संभावना केल्या जाईल.

पैसा's picture

23 Apr 2013 - 11:04 pm | पैसा

मी चाल्ले.

बॅटमॅन's picture

23 Apr 2013 - 11:04 pm | बॅटमॅन

ह्याप्पी जर्नी.

तुमचा अभिषेक's picture

24 Apr 2013 - 9:22 am | तुमचा अभिषेक

नाही हो पैसाजी.. अविश्वास का दाखवेन.. पण मला एका गोष्टीचे नवल वाटते.. तुम्ही नोकरी सोडल्यावर मॅनेजमेंटने २-३ पुरुषांच्या जागी परत १ महिलाच का नाही घेतली?

पैसा's picture

24 Apr 2013 - 9:28 am | पैसा

महिलांना इकडे बदल्या करून टाकणे शक्य नाही. सरकारी बँकामधे बदल्यांच्या बाबतीत युनियन्सचा मोठा प्रभाव असतो. कोणालाही उचलून कुठेही टाकता येत नाही. नवी लागलेली पोरे आणि ऑफिसर्स यांना मात्र कुठेही उचलून टाकता येते. तसाच एक ऑफिसर आणि २ नव्या पोरांना आणून टाकलाय. मॅनेजरने त्यांना कंटाळून ट्रान्सफर मागितलीय असे कालच कळले.

तुमचा अभिषेक's picture

24 Apr 2013 - 10:26 am | तुमचा अभिषेक

म्हणजे इथे एका महिलेच्या जागी दोन पुरुषांना घेतले असा प्रकार नसून एका सिनिअरच्या जागी ज्युनिअर भरले असे झाले ना. :)

पैसा's picture

24 Apr 2013 - 2:09 pm | पैसा

एक सीनीयर, आणि २ ज्युनियर पुरुष. बरं, मी इथे खरडायला रिकामटेकडी आहे. तुम्ही तुमच्या हापिसची १३ मिनिटे काम करा आता.

तुमचा अभिषेक's picture

24 Apr 2013 - 2:55 pm | तुमचा अभिषेक

ऑफिसटाईममध्ये नसतोच जास्त.. आज सुट्टी म्हणून मिपावाचन चालूय..

बाकी स्मार्ट वर्क करणार्‍यांना कधीही मरमर किंवा जास्तीचा वेळ काम करावे लागत नाही.. (हे जनरल स्टेटमेंट आहे, स्त्री-पुरुष सर्वांनाच लागू)

श्रीरंग_जोशी's picture

23 Apr 2013 - 10:10 pm | श्रीरंग_जोशी

पैसातै - यशस्वी कारकिर्दीबाबत अभिनंदन!!

तुम्ही संपादकपदावरून जेव्हाही निवॄत्त व्हाल (कधीच होऊ नये असे वाटते खरं तर) तेव्हा किती नवे संपादक लागतील याचा अंदाज बांधतोय...

पैसा's picture

23 Apr 2013 - 10:11 pm | पैसा

हाहा! धन्यवाद!

का हो श्रीजो, तुमचा डोळा की काय त्या पदावरती? हलकेच घ्या :)

श्रीरंग_जोशी's picture

23 Apr 2013 - 10:29 pm | श्रीरंग_जोशी

सदस्य म्हणून वावरतानाच धाप लागते हो... :-).

मी नोकरी सोडल्यावर गेल्या जागी लगेच २ मुलींना घेतलं :) अगदी ताबडतोब!!

प्यारे१'s picture

23 Apr 2013 - 11:08 pm | प्यारे१

बघा! ही एकटीच दोघींचं गॉसिप करायची. ;)

हाहाहा खरय गेल्या ऑफीसमध्ये एके मेष-सूर्य/मिथुन-चंद्र मैत्रिण होती. कसल्या गॉसपायचो आम्ही ;)

तुमचा अभिषेक's picture

24 Apr 2013 - 9:25 am | तुमचा अभिषेक

माझी बायको एवढे घरकाम करते की जर कधी ती मला सोडून गेली तर मला तिची कसर भरायला किमान दोन लग्ने करावी लागतील... वरची चर्चा बघून अस्से काहीसे मनात आले ;)

पैसा's picture

24 Apr 2013 - 2:10 pm | पैसा

हापिसात बायका ७२ मिनिटे जास्त काम करतात म्हटलं तर एवढं संशोधन केलंत आता घरात बायका किती जास्त काम करतात यावर संशोधन करा.

तुमचा अभिषेक's picture

24 Apr 2013 - 2:57 pm | तुमचा अभिषेक

हे म्हणजे मार खायची लाईन झाली हो.. असे कसे दुसर्‍यांच्या घरात जाऊन सर्वेक्षण करणार.. ;)

हापिसचा की? ७२ मिनिटे त्यात खपली तुमची! (स्मायलि).आता प्रश्न आमच्या वेळेचा आहे म्हणून, स्वतःच्या हापिसचा वेळ वाचवण्यासाठी पूर्ण विराम!

तुमचा अभिषेक's picture

24 Apr 2013 - 11:30 am | तुमचा अभिषेक

चला ७२ नाही १२ मिनिटे तर घालवलीत.. हा प्रतिसाद द्यायला अन माझ्या प्रतिसादांची मोजदाद करायला...
बाकी मला आज सुट्टी आहे महावीर जयंतीनिमित्त.. तर ऑफिसच वेळ काही वाया वगैरे जात नाहिये.. :)

अविनाशकुलकर्णी's picture

24 Apr 2013 - 5:37 pm | अविनाशकुलकर्णी

अभिच्या कथा इतर समुहावर वाचल्या आहेत..मजा आली वाचुन कथा..हलकि फुलकी..कहाणी

तुमचा अभिषेक's picture

25 Apr 2013 - 4:30 pm | तुमचा अभिषेक

धन्स काका.. फक्त ही कथा नसून व्यथा आहे.. ;)