मखाण्यांची खिर

Primary tabs

Mrunalini's picture
Mrunalini in अन्न हे पूर्णब्रह्म
18 Apr 2013 - 1:11 am

साहित्यः

मखाणे - १ वाटी
दुध - १ लिटर
साखर - १/४ वाटी (आवडीप्रमाणे कमी-जास्त करु शकता)
तुप – 1 चमचा
काजु - ४-५
बदाम - २-३
पिस्ता - ४-५
केशर - ४-५ काड्या
वेलची पावडर - १/४ चमचा

कृती:

१. दुध १/२ लिटर होई पर्यंत आटवुन घ्यावे.
२. काजु, बदाम व पिस्ता बारिक चिरुन घ्यावे.
३. एका पॅन मधे १ चमचा तुप गरम करावे. त्यात मखाणे ३-४ मिनिटे परतुन घ्यावे.
४. मखाणे थोडे गार झाल्यावर, त्यांची मिक्सर मधे भरड करुन घ्यावी.
५. आटवलेल्या दुधामधे मखाण्यांची भरड, साखर, वेलची पावडर व केशर टाकुन ५-७ मिनिटे उकळुन घ्यावे.
६. ५-७ मिनिटांनी गॅस बंद करुन, वरुन सुक्या मेव्याने सजवावे.
७. ही खिर जास्त करुन गारच चांगली लागते. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही गरम खिरही serve करु शकता.

k1

k2

प्रतिक्रिया

खीर आवडली. फोटू तर क्यूटच!
खूप दिवसांपूर्वी मिपाकर रामदासांशी या खिरिबद्दल बोलणे झाल्याचे आठवते. उत्तर भारतीये लोकांकडे व्रतवैकल्य करताना हा प्रकार केला जातो असे ऐकले आहे. ग्रोसरी दुकानातही मखाणे दिसतात.

होय मला माहीत नव्हते यांना मखाणे म्हणतात ते. मस्त वाटते खीर.

हो.. अगदी बरोबर.. हे मखाणे काश्मिर मधे जास्त खाल्ले जातात. :)

मखाणे म्हनजे नक्की काय असत...

Mrunalini's picture

18 Apr 2013 - 2:47 am | Mrunalini

मखाण्यां बद्द्ल अधिक माहिति येथे वाचावयास मिळेल.

रुस्तम's picture

18 Apr 2013 - 3:06 am | रुस्तम

धन्यवाद....

michmadhura's picture

18 Apr 2013 - 1:36 pm | michmadhura

मखाणा हा कॅल्शियमचा अत्त्युच्च स्त्रोत आहे.

रेवती's picture

19 Apr 2013 - 8:16 pm | रेवती

ही माहिती उपयोगी आहे.

शुचि's picture

19 Apr 2013 - 8:34 pm | शुचि

+१

अभ्या..'s picture

18 Apr 2013 - 2:21 am | अभ्या..

ओ मखणा वे. नावाचं गाणं म्हैते. ;)
हे काय असतं अ‍ॅक्चुअली? म्हणजे बी, लाह्या, फळ, सुकामेवा?
बाकी सगळा शाही कारभार आहे पाकृचा. ब्येस्ट

सानिकास्वप्निल's picture

18 Apr 2013 - 3:48 am | सानिकास्वप्निल

रंग ही सुंदर आलाय गं ...मस्तचं :)

मखाणे म्हणजे कमळाचे बी.

स्पंदना's picture

18 Apr 2013 - 4:12 am | स्पंदना

शेवटचा फोटो खुप आवडला. अगदी कल्पक!
म्हणजे आधी नुसते मखाणे दाखवण्या ऐवजी असे कल्पकतेने दाखवलेले आवडले.
छान पाककृती. आवडली.

शेवटचा फटू कातील, म्याग्झीन कवर म्हणून सहज खपून जाईल

पाक्रु पण जबराट

प्यारे१'s picture

18 Apr 2013 - 2:19 pm | प्यारे१

+११११११

बघायला हवेत मखाणे कुठे मिळतात. मस्त दिसते आहे खीर!

अक्षया's picture

18 Apr 2013 - 9:32 am | अक्षया

फोटॉ आणि पाकॄ. दोन्ही छान. :)

पैसा's picture

18 Apr 2013 - 10:25 am | पैसा

पाकृ आणि फोटो अगदी मस्त!

इरसाल's picture

18 Apr 2013 - 11:37 am | इरसाल

उत्तर भारतात हे मखणे वेगवेगळ्या पदार्थात मिसळुन डिश बनवल्या जातात.
जसे दाल मखानी (दाल-मखनी वेगळी), मा-उडद-चने की दाल त्यात हे मखाणे असतात,स्पेशल मखाण्यांची भाजी नवरात्रींमधे, नुसत्या काळ्या उडदाची डाळ मखाणे घालुन इ.इ.इ.

पाषाणभेद's picture

2 Jan 2014 - 8:29 am | पाषाणभेद

>>> उत्तर भारतात हे मखणे वेगवेगळ्या पदार्थात मिसळुन डिश बनवल्या जातात.
जसे दाल मखानी (दाल-मखनी वेगळी), मा-उडद-चने की दाल त्यात हे मखाणे असतात,स्पेशल मखाण्यांची भाजी नवरात्रींमधे, नुसत्या काळ्या उडदाची डाळ

म्हणजे मखाणे अन मखणे वेगवेगळे आहेत काय? अन जर दोन्ही एकच असले अन ते कमळाचे बी असते काय? कोकणातले कमळाचे बी म्हणजे मखणे/मखाणे आहेत काय?

सोन्याबाळ's picture

18 Apr 2013 - 1:30 pm | सोन्याबाळ

क्या चल रहा है,भाई लोग्ज?

सोन्याबाळ's picture

18 Apr 2013 - 1:30 pm | सोन्याबाळ

क्या चल रहा है,भाई लोग्ज?

पाकृ आवडल्या बद्दल सगळ्यांचे धन्यवाद!! :)

सूड's picture

18 Apr 2013 - 4:29 pm | सूड

मस्त आहे, करुन पाहायला हवी !!

कच्ची कैरी's picture

18 Apr 2013 - 5:26 pm | कच्ची कैरी

मी कधी खाल्ले नाहीयेत मखाणे पण आता खाण्याची हिंम्मत करेल :)

दिपक.कुवेत's picture

18 Apr 2013 - 5:38 pm | दिपक.कुवेत

हि साधारण दाट होत असेल नाहि? शेवटच्या फोटोतील कप लगेच उचलुन खीर प्यावीशी वाटतेय. एकदम तोंपासु

हावरटचे तुमीतर दीपूकाका :-/

=))

खीरीचे सग्गे सग्गे प्रकार आवडणारी खीरुबै :)

हो.. हि खिर थोडी दाटच होते. पण चव चांगली लागते. ह्या मखाण्यांचा थोडासा nutty flavour लागतो.

सुहास झेले's picture

19 Apr 2013 - 3:57 pm | सुहास झेले

वाह भन्नाट आहे पाककृती. मखाणे म्हणजे काय हे माहीतच नव्हते... शेवटचा फोटो तर जबरीच :) :)

धनुअमिता's picture

19 Apr 2013 - 4:25 pm | धनुअमिता

मस्त दिसतेय खीर. मी कधी मखाणे खाल्ले नाहीयेत पण खीर करुन बघणार.

कैलासवासी सोन्याबापु's picture

2 Jan 2014 - 7:58 am | कैलासवासी सोन्याबापु

उत्तर बिहार त्यातही मिथिलांचल (दरभंगा, समस्तीपुर, मधुबनी, सीतामढी) ची ओळख आहे मखाणा (इथे मखान असं म्हणतात) पान, माछ और मखान मिथिला की पहचान असंही म्हणल्याजाते. मखाण्याची नुसती खीरच उत्तम होते असे नाही, थोड्या तुपावर जीरे फोडणी करायची त्यात मखान कुरकुरीत होइस्तोवर परतायचे वरतुन काळे मीठ / चाट मसाला भुरभुरुन डव्यात बंद ठेवायचे. लो कॅलरी टी टाईम स्नॅक म्हणुन मस्त खपतात.मखान कोरडेच (बिना तेला तुपाचे गरम कढईत फिरवुन ) डबाबंद ठेवा, अन अर्धवट रश्याच्या ज्या भाज्या असतील ( थोडे पाणी शिल्लक ठेवलेली बटाटा भाजी वगैरे किंवा घट्ट रश्यात वांगी) एक-एक मुठ हे कुरकुरीत मखाण टाका, भाजी रस पिऊन मस्त होतात चवीला!! मधे मधे खायला भारी लागतात भाजीत

नानीचा नाना's picture

2 Jan 2014 - 8:11 am | नानीचा नाना

झक्कास..!!!!

ओहह्... हे मखणा प्रकरण हे आहे काय ? च्यामारी आपल्याला बॉ काय बी समजेना... हे मखाणा लयं ऐकलय गाण्यांमंदी.
मेरे प्यार का रस जरा चखना ओय मखणा... हे हेच हाय का ? असं इचार करतो.