Skip to main content

मखाण्यांची खिर

लेखक Mrunalini यांनी गुरुवार, 18/04/2013 01:11 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः मखाणे - १ वाटी दुध - १ लिटर साखर - १/४ वाटी (आवडीप्रमाणे कमी-जास्त करु शकता) तुप – 1 चमचा काजु - ४-५ बदाम - २-३ पिस्ता - ४-५ केशर - ४-५ काड्या वेलची पावडर - १/४ चमचा कृती: १. दुध १/२ लिटर होई पर्यंत आटवुन घ्यावे. २. काजु, बदाम व पिस्ता बारिक चिरुन घ्यावे. ३. एका पॅन मधे १ चमचा तुप गरम करावे. त्यात मखाणे ३-४ मिनिटे परतुन घ्यावे. ४. मखाणे थोडे गार झाल्यावर, त्यांची मिक्सर मधे भरड करुन घ्यावी. ५. आटवलेल्या दुधामधे मखाण्यांची भरड, साखर, वेलची पावडर व केशर टाकुन ५-७ मिनिटे उकळुन घ्यावे. ६. ५-७ मिनिटांनी गॅस बंद करुन, वरुन सुक्या मेव्याने सजवावे. ७. ही खिर जास्त करुन गारच चांगली लागते. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही गरम खिरही serve करु शकता. k1 k2

वाचने 49700
प्रतिक्रिया 32

प्रतिक्रिया

खीर आवडली. फोटू तर क्यूटच! खूप दिवसांपूर्वी मिपाकर रामदासांशी या खिरिबद्दल बोलणे झाल्याचे आठवते. उत्तर भारतीये लोकांकडे व्रतवैकल्य करताना हा प्रकार केला जातो असे ऐकले आहे. ग्रोसरी दुकानातही मखाणे दिसतात.

ओ मखणा वे. नावाचं गाणं म्हैते. ;) हे काय असतं अ‍ॅक्चुअली? म्हणजे बी, लाह्या, फळ, सुकामेवा? बाकी सगळा शाही कारभार आहे पाकृचा. ब्येस्ट

शेवटचा फोटो खुप आवडला. अगदी कल्पक! म्हणजे आधी नुसते मखाणे दाखवण्या ऐवजी असे कल्पकतेने दाखवलेले आवडले. छान पाककृती. आवडली.

उत्तर भारतात हे मखणे वेगवेगळ्या पदार्थात मिसळुन डिश बनवल्या जातात. जसे दाल मखानी (दाल-मखनी वेगळी), मा-उडद-चने की दाल त्यात हे मखाणे असतात,स्पेशल मखाण्यांची भाजी नवरात्रींमधे, नुसत्या काळ्या उडदाची डाळ मखाणे घालुन इ.इ.इ.

In reply to by इरसाल

>>> उत्तर भारतात हे मखणे वेगवेगळ्या पदार्थात मिसळुन डिश बनवल्या जातात. जसे दाल मखानी (दाल-मखनी वेगळी), मा-उडद-चने की दाल त्यात हे मखाणे असतात,स्पेशल मखाण्यांची भाजी नवरात्रींमधे, नुसत्या काळ्या उडदाची डाळ म्हणजे मखाणे अन मखणे वेगवेगळे आहेत काय? अन जर दोन्ही एकच असले अन ते कमळाचे बी असते काय? कोकणातले कमळाचे बी म्हणजे मखणे/मखाणे आहेत काय?

मी कधी खाल्ले नाहीयेत मखाणे पण आता खाण्याची हिंम्मत करेल :)

हि साधारण दाट होत असेल नाहि? शेवटच्या फोटोतील कप लगेच उचलुन खीर प्यावीशी वाटतेय. एकदम तोंपासु

मस्त दिसतेय खीर. मी कधी मखाणे खाल्ले नाहीयेत पण खीर करुन बघणार.

उत्तर बिहार त्यातही मिथिलांचल (दरभंगा, समस्तीपुर, मधुबनी, सीतामढी) ची ओळख आहे मखाणा (इथे मखान असं म्हणतात) पान, माछ और मखान मिथिला की पहचान असंही म्हणल्याजाते. मखाण्याची नुसती खीरच उत्तम होते असे नाही, थोड्या तुपावर जीरे फोडणी करायची त्यात मखान कुरकुरीत होइस्तोवर परतायचे वरतुन काळे मीठ / चाट मसाला भुरभुरुन डव्यात बंद ठेवायचे. लो कॅलरी टी टाईम स्नॅक म्हणुन मस्त खपतात.मखान कोरडेच (बिना तेला तुपाचे गरम कढईत फिरवुन ) डबाबंद ठेवा, अन अर्धवट रश्याच्या ज्या भाज्या असतील ( थोडे पाणी शिल्लक ठेवलेली बटाटा भाजी वगैरे किंवा घट्ट रश्यात वांगी) एक-एक मुठ हे कुरकुरीत मखाण टाका, भाजी रस पिऊन मस्त होतात चवीला!! मधे मधे खायला भारी लागतात भाजीत

ओहह्... हे मखणा प्रकरण हे आहे काय ? च्यामारी आपल्याला बॉ काय बी समजेना... हे मखाणा लयं ऐकलय गाण्यांमंदी. मेरे प्यार का रस जरा चखना ओय मखणा... हे हेच हाय का ? असं इचार करतो.