कही दिवसंपुर्वी TV वर एक चर्चा पाहिली... नाव होते "पुण्यात लव्हर्स पार्क! - असावी कि नसावी".
अनेक लोक प्रतिक्रिया देत होते परंतु ज्या चैनल वर हा कार्यक्रम होता तो चैनल एवढा प्रसिद्ध नाही, त्यामुळे चर्चा एकाच भागात संपली... !! माझ्या मते लव्हर्स पार्क करणे हे काही प्रमाणात योग्य आहे. ( सामाजिक द्रुष्ट्या.. ) आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने पाहिले तर थोड्या अधिक सुधारणा आवश्यक असतील.. ! आता खरचं विचार करण्याची वेळ आलेली आहे... कारण तर सुज्ञांना माहितच आहे !!
कृपया आपले मत नोंदवा... ह्या लेखांच्या प्रतिक्रियांवर मी रोज नजर ठेवून असेन.. !
प्रतिक्रिया
9 Jul 2008 - 2:10 pm | अमोल केळकर
माझ्या मते लव्हर्स पार्क करणे हे काही प्रमाणात योग्य आहे.
सारसबाग / संभाजी पार्क ही लव्हर्स पार्क म्हणुन नावाजली जात असताना आणखी लव्हर्स पार्क एवजी एकत्र सह कुटुंब फिरता येईल अशी एक बाग पुण्यात निघाली तर चांगले होईल.
अमोल
(अवांतर : सारसबाग / संभाजी पार्क सोडुन इतर काही नवीन चांगल्या बागा पुण्यात झाल्या असल्यास माहित नाही)
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
9 Jul 2008 - 2:14 pm | मनस्वी
हो चालेल की.. म्हणजे झेड्-ब्रीज वरची गर्दी कमी होईल!
पण या पार्क मध्ये फक्त जोडी-प्रवेश (कपल एंट्री) हवी. टवाळखोरांना आणि रिक्कामटेकड्यांना प्रवेश बंद म्हणजे बंद.
मनस्वी
"मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."
9 Jul 2008 - 2:43 pm | आनंदयात्री
>>पण या पार्क मध्ये फक्त जोडी-प्रवेश (कपल एंट्री) हवी. टवाळखोरांना आणि रिक्कामटेकड्यांना प्रवेश बंद म्हणजे बंद.
असेच म्हणतो.
चामारी त्या टवाळखोरांच्या .....
9 Jul 2008 - 4:00 pm | शिप्रा
लव्हर्स पार्क मध्य जाऊन काय करायच? अश्लईलपणा?
आणी तो नाहि तर नुस्त्या प्र॑माचा ग्प्पआंना पार्क कशाला?
9 Jul 2008 - 4:33 pm | सखाराम_गटणे™
पण या पार्क मध्ये फक्त जोडी-प्रवेश (कपल एंट्री) हवी
माझा पण पाठींबा !!!!!!
सखाराम गटणे
9 Jul 2008 - 5:23 pm | अर्चिस
मित्र मैत्रिण......मित्र मित्र ........मैत्रिण मैत्रिण
9 Jul 2008 - 11:12 pm | सर्किट (not verified)
वा ! आपल्या प्रश्नाने गहिवरलो.
- सर्किट
9 Jul 2008 - 6:39 pm | टारझन
या गोष्टींची गरज आहे.. कपल एंट्री हवी अर्चिस ने कपल ची व्याख्या विज्ञानाच्या पूस्तकात पहावी.
बाकी फक्त प्रेमाच्या गोष्टींसाठीच तर एकांत हवाहो... नाहीतर मग गरवारे चौकात बसले नसते का सगळे...
जागेच्या शोधात ) कु. ख.
http://picasaweb.google.com/prashants.space
9 Jul 2008 - 10:14 pm | llपुण्याचे पेशवेll
ह्या विषयावर पूर्वीही चर्चा मिसळपाव वर झाली आहे. जर अश्लिल चाळे करायचे असतील तर ते ज्याने त्याने आपापल्या घरी करावेत असे माझे वैयक्तिक मत आहे. जर झेड ब्रिज आणि सारसबागेत ज्या गोष्टी चालतात त्याच गोष्टीसाठी वेगळी जागा निर्माण करणे हा जागेचा अपव्यय आहे असे वाटते. आधीच पुण्यात जागांचे भाव आभाळाला भिडले आहेत. प्रेमाच्या गोष्टीच करायच्या असतील तर त्या हॉटेलात बसून, मोबाईल फोनवर पण करता येतील पण जर प्रितीक्रिया करायच्या असतील तर त्या चार भिंतीच्या आत करणेच योग्य असे वाटते.
पुण्याचे पेशवे
10 Jul 2008 - 10:33 am | सागररसिक
कहि गरज नहि अशा पार्क चि
10 Jul 2008 - 10:49 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
पण या पार्क मध्ये फक्त जोडी-प्रवेश (कपल एंट्री) हवी
सहमत! जर प्रेमी युगुलांना घरी एकांत मिळत नसेल आणि हॉटेलमधे जाण्याची "गरज" (किंवा ऐपतही) नसेल तर अशा जोडप्यांनी काय करायचं? लहान मुलांच्या समोर हातात हात घालून, खांद्यांवर हात ठेवून किंवा इतर श्लील प्रकारे आपलं प्रेम व्यक्त करण्याएवढा आपला समाज मोकळा नाही आहे. त्यामुळे अशा जोडप्यांची कुचंबणा होऊ देण्यापेक्षा एक फक्त जोडप्यांसाठी बाग बनवावीच! आणि असं केल्यावर मात्र इतर जागी प्रेम "दाखवण्यावर" बंदी आणता येईल.
या संदर्भात आणखी एक प्रश्नः आई मुलांवर प्रेम "दाखवते" ते श्लील मग प्रेयसी प्रियकरावर "दाखवते" ते अश्लील का?
10 Jul 2008 - 10:50 am | शिप्रा
मि पुण्याचे पेशवेंशि सहमत आहे. आपल्या देशाची ती संस्क्रुती नाही. पुर्वीच्या लोकांना त्याची गरज पड्ली नाही मग आता काय वेगळी गरज निर्माण झाली? फक्त प्रेमाच्या गोष्टींसाठीच गरवारे चौक पण चालेल. का नाही?
जर अश्लिल चाळे करायचे असतील तर ते ज्याने त्याने आपापल्या घरी करावेत आम्हाला त्याचा त्रास का?
हि अमेरिका नाहि.