राहुल गांधी : दुसरा राजीव गांधी !

तर्री's picture
तर्री in काथ्याकूट
5 Apr 2013 - 10:17 am
गाभा: 

काल राहुल गांधी यांनी सी.आय आय च्या सभेमध्ये भाषण केले. केवळ भाषण म्हणून मूल्यमापन करायचे तर ते एक प्रांजळ प्रकटन होते. त्यामध्ये नव्या कल्पना , नवी प्रतिभा यांचा सुरेख संगम होता. चप्पल नेमकी कुठे लागते आहे ? हे त्यांना आता समजते आहे. समस्या समाधानाची पहिली पायरी म्हणजे समस्या नेमकी समजणे , आणि ते त्यांना जमले आहे असे वाटते. समस्या समाधानाची दुसरी पायरी म्हणजे उपाय योजना करणे. येथे मात्र राहुल गांधीचा अननुभव स्पष्ट दिसून येतो आहे.
राहुल गांधींचा एकूण सूर हा "खूप झाले राजकारण - आता कामाला लागा " असा होता. हा राग सत्तेत नसलेल्यानी गायला तर समजू शकते पण गेली ९ वर्षे तुम्ही सत्ताधारीपक्षाचे सरचिटणीस आहात हे जनता तरी विसरलेली नाही. तुम्हांला हा सरकार विरोधी सूर लावण्याचा अधिकार पोहोचत नाही , सत्तेचे घराणे तुमचेच आहे ! चांगले विचार आणि उत्तम अभिव्यक्ती एवढेच पुरेसे नाही , निदान तुमच्याकडून तरी नाही . एका दिग्विजय सरचिटणीसपदावरून ला हालून द्या , कलमाडीला पक्षातून तडीपार करा , सुशील कुमारांना पद्भ्रष्ट करा एवढेही केलेत तरी तुम्ही काही कृती करता असे दिसेल.

भारतीय अर्थव्यवस्थेला , समाजव्यवस्थेला दिशा देण्याची प्रामाणिक भावना राजीव गांधीनी त्यांच्या सुरवातीच्या काळात अशीच दर्शवली होती. पंजाब , ईशान्य भारत , श्रीलंका हया तीन ठिकाणचा दहशतवादाचा प्रश्न राजीव गांधीनी सुरवातीच्या काळात चांगला हाताळला होता. नंतर राजीव गांधीचे शक्तिपात सुरु झाला. त्यांच्या सल्लागार मंडळीनी दिलेले सल्ले , निवडणुकांचे अगम्य राजकारण , सत्तेचा मोह , राजकीय मुत्सादिपाणचा अभाव हया सगळ्यामुळे राजीव गांधी स्वतः कोंग्रेससहित गाळात गेले होते.
१९८४-८५ सालचा तो काल जणू राहुल गांधी परावर्तीत करत आहेत . एका उमद्या नेतृत्वाला हया देशाच्या प्रगतीची स्वप्ने पडत आहेत हे खूप आशावादी चित्र आहे. राहुल गांधींचे "सहकारी" त्यांचे हे स्वप्न साकारण्यात किती सहकार करणार ह खरा प्रश्न आहे ? कोंग्रेस च्या वळचणीला उभे राहून "लांगुलचालन" एवढ्या एका गुणावर अनेक नेते राष्ट्राची संपत्ती लुटताना राहुल गांधीना दिसत नाहित का ? एके काळी अनेक डॉक्टर , वकील , प्राध्यापक हे कोंग्रेस चे नेते , उमेदवार असत. आज व्यावसायिक निवडणुक ठेकेदार दार हेच त्यांचे खरे बळ होवून बसले आहे. ही कोंग्रेसची परिस्थिती बदलण्याची इच्छा शक्ती आज तरी त्यांच्या विचार -अभिव्यक्ती - भाषण- कृती मधून दिसत नाही. देशाची जडण घडण करण्या आधी कोंग्रेसची जडण घडण हे तरुण नेतृत्व कसे करतो ? हया मध्ये त्यांचे यशापयश आहे आणि तेथेच घोडे पेण खाते आहे.
केलेल्या भाष्टचाराला जर कोंग्रेस पाठीशी घालणार नसेल तर नेते होतील का कोंग्रेसवासी ? आपापल्या राज्यात त्यांना प्रादेशिक पक्ष आहेतच की तुडुंब भ्रष्टाचार करायला.
तर राहुलजी देश सुधारण्याआधी कोंग्रेस सुधारा , मग आम्ही आहोतच तुमच्या मागे !

प्रतिक्रिया

ऋषिकेश's picture

5 Apr 2013 - 10:23 am | ऋषिकेश

वाटच पहात होतो :)
पॉपकॉर्नवगैरे जुने असले तरी आम्ही तेच मागवतो आहोत ;)

मैत्र's picture

5 Apr 2013 - 10:25 am | मैत्र

झाड वगैरे पुरणार नाही.. मल्टिप्लेक्स गोल्ड क्लास ची तयारी पाहिजे..

नितिन थत्ते's picture

5 Apr 2013 - 10:52 am | नितिन थत्ते

राहुलजी किंवा कोणत्याही गांधी कुटुंबियाकडून काही अपेक्षा करण्याच्या अपेक्षेला सलाम !!!

इथे दुसरीकडे लिहिलेले निरूपण चिकटवीत आहे.

राहुल गांधींविषयी जे काही लिहिले आहे (राजकीय जाण नाही. बाकीही काही नाही) ते सत्यच आहे. आता प्रश्न हा आहे की तरीही त्या कुटुंबाची भारतीय राजकारणातली भूमिका कोणती?

या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी आपल्याला इंदिरा गांधींच्या पंतप्रधानपदावरील नियुक्तीपर्यंत मागे जावे लागेल.

नेहरूंनंतर कोण या प्रश्नाची सोडवणूक नेहरूंनी आपल्या कार्यकाळातच केली होती. कामराज यांनी वृद्धांच्या निवृत्तीची योजना आणून बर्‍याच वृद्ध नेत्यांना पक्षकार्यात गुंतवले. तरीही नेहरूंनी काँग्रेस पक्षाची खास परवानगी घेऊन शास्त्रींना 'मिनिस्टर विदाउट पोर्टफोलिओ' म्हणून मंत्रीमंडळात घेतले. नेहरूंच्या शेवटच्या काळात (आजारी असताना) शास्त्री डी-फॅक्टो पंतप्रधान होते. (संदर्भ- इंडिया आफ्टर गांधी: रामचंद्र गुहा) त्यामुळे नेहरूंनंतर लगेच नेतृत्वाचा प्रश्न उभा राहिला नाही.

शास्त्रींच्या अकाली निधनानंतर तो उभा राहिला. तेव्हा काँग्रेसमध्ये बरेच दिग्गज नेते होते. आणि त्यांच्यात संघर्ष अटळ झाला असता. त्याचवेळी काँग्रेसमधील नेत्यांनी एक अँकरपॉइंट म्हणून इंदिरा गांधींना पंतप्रधान बनवले. त्या विठोबाची स्थापना करून बडवे कारभार करणार अशी ती योजना होती. [इंदिरा गांधींनी विठोबाचा रोल झुगारून दिला ही नंतरची गोष्ट. पण कल्पना विठोबा बनवण्याचीच होती).

पुढे इंदिरा गांधींच्या निधनानंतर परत हा प्रश्न उभा राहिला. त्यावेळी प्रणव मुखर्जी आणि इतर मोठे नेते यांच्यात संघर्ष होण्याची शक्यता होती. प्रणव मुखर्जींनी दावासुद्धा सांगितला होता असे ऐकले आहे. पुन्हा राजीव गांधी यांना पंतप्रधान करून हा संघर्ष टाळला गेला. राजीव गांधींनी विठोबाची भूमिका बरीचशी निभावली. अर्थात आधुनिकीकरणाचे वारे आणण्याचे काम त्यांनी काही प्रमाणात केले. त्यांच्या (खूपच लवकर झालेल्या) मृत्यूनंतर त्यांची जागा घेण्यासाठी लगेच कोणी विठोबा उपलब्ध नव्हता. राहुल प्रियांका खूप लहान होते. आणि सोनिया गांधी राजकारणात यायला तयार नव्हत्या. त्यावेळी नरसिंहराव पंतप्रधान झाले. त्यांनी पाचवर्षे राज्य केले; मनमोहन सिंग यांच्याकरवी उदारीकरण आणले वगैरे सर्व घडले तरी काँग्रेस पक्षाची पीछेहाट मात्र चालूच राहिली. पक्षातले नेते पक्ष सोडून जाऊ लागले. काहींनी स्वतःचे पक्ष स्थापले, काहींनी तर भाजपमध्येही प्रवेश केला.

९९ मध्ये सोनिया गांधींनी राजकारणात प्रवेश केला. त्यानंतरच्या निवडणूकीत काँग्रेसला यश मिळाले नाही. पण पुढे एक घडले की काँग्रेस पक्षाची फाटाफूट थांबली. आणि २००४ च्या निवडणुकांपर्यंत काँग्रेस सोडून गेलेले बरेचसे नेते परत आले. २००४ मध्ये सोनिया गांधींमुळे काँग्रेसला विजय मिळाला याचा अर्थ मते मिळवणारे नेते काँग्रेसमध्ये परतले असा आहे (सोनिया गांधींनी काँग्रेसला मते मिळवून दिली असा अर्थ नाही).

२००४ निवडणुकांनंतर सोनिया गांधी पंतप्रधान झाल्या नाहीत याचे कारण आपली पक्षातली भूमिका विठोबाची आहे हे त्यांना समजले होते. आणि ते राहुललाही बहुधा ठाऊक आहे. पंतप्रधान होऊन देश चालवण्याची ताकद नाही हेही सोनिया गांधींना बहुधा कळत असावे.

आता एवढे सगळे लिहिल्यावर कोणाच्या मनात विचार येईल की असल्या विठोबाची गरज काय? त्याचे उत्तर "बडव्यांची भांडणे टाळण्यासाठी". विठोबा ठेवण्यात राजकीय शहाणपण आहे.

नेहरू कुटुंबातल्या व्यक्तींनी देश खरोखर चालवावा अशी काँग्रेसमधल्या नेत्यांची कधीही (अगदी इंदिरा गांधींकडूनही) अपेक्षा नव्हती.

देशात दोन (ठळक) राजकीय स्पेसेस आहेत. एक पुराणमतवादी* स्पेस भाजपने व्यापलेली आहे. दुसरी लिबरल* स्पेस सध्या बरीचशी काँग्रेसने व्यापली आहे. ती स्पेस टिकून रहायला हवी आणि ती व्यापायला दुसरा योग्य पक्ष दृष्टीपथावर नाही म्हणून ती स्पेस काँग्रेसने व्यापायला हवी. त्यासाठी काँग्रेस टिकायला हवी. आणि त्यासाठी विठोबा हवा.

*हे माझे मत आहे. त्यावर मला चर्चा करण्याची इच्छा नाही.

पंतप्रधान पद काँग्रेस मध्ये कसं आणि का दिलं गेलं यातला परस्परसंबंध हा नेहमीपेक्षा वेगळा आणि स्वतंत्र विचार वाटला..
"आता एवढे सगळे लिहिल्यावर कोणाच्या मनात विचार येईल की असल्या विठोबाची गरज काय? त्याचे उत्तर "बडव्यांची भांडणे टाळण्यासाठी". विठोबा ठेवण्यात राजकीय शहाणपण आहे. "
पक्ष इतक्या थराला बडव्यांनी भरलेला आहे की कसलाही पूर्वानुभव/शैक्षणिक अर्हता/कर्तृत्व नसताना विठोबा वर बसवावा लागतो नरसिंह राव / प्रणवदा / चिदंबरम / मनमोहनसिंग अशा दिग्गज नेत्यांवर अधिकार चालवण्यासाठी हे स्पष्ट मान्य करुन त्या पक्षाला "लिबरल" म्हणणं हे म्हणजे फिस्सकन हसू यावं इतकं हास्यास्पद आहे.
सोनिया गांधी यांनी पंतप्रधान पद नाकारल्यावर जे निष्ठेचं दयनीय प्रदर्शन झालं होतं.. त्याचा विचार करता या पक्षाला लिबरल म्हणणं यासारखा विनोद नाही.

इंदिरा / राजीव यावेळी अतिशय ज्येष्ठ आणि योग्य नेते असताना विठोबा गादीवर बसलेच होते ना. मग सोनिया पंतप्रधान झाल्या नाहीत कारण भूमिका विठोबाची होती हे त्यांना समजले होते. -- ही परस्परविरोधी विधाने आहेत.
रिमोट कंट्रोल हा गेल्या ९ वर्षातलाच आहे. पूर्वी पायलट मुलगा थेट पंतप्रधान होऊ शकत होता..
घराणेशाही हा मुद्दा नाही कारण घराणेशाही प्रत्येक पक्षात, सर्व राज्यात आणि सर्व स्तरांवर आहे. पण तेच करून, सत्तेसाठी सर्व काही अशा पद्धतीने राजकारण करुन, लिबरल असण्याचा बळंच आव आणणं हा दांभिक आणि संधिसाधूपणा आहे.
भाजपला पुराणमतवादी म्हणणं हे वैयक्तिक मत असेल तर ते कदाचित मंदिर, हिंदुत्व इ. ने असू शकतं .. पण

रणजित चितळे's picture

5 Apr 2013 - 12:25 pm | रणजित चितळे

शेवटचा परीच्छेद सोडून बाकीचे सगळे एकदम बरोबर वाटले. अगदी असेच आहे.

नाना चेंगट's picture

5 Apr 2013 - 12:36 pm | नाना चेंगट

देशात दोन (ठळक) राजकीय स्पेसेस आहेत. एक पुराणमतवादी* स्पेस भाजपने व्यापलेली आहे. दुसरी लिबरल* स्पेस सध्या बरीचशी काँग्रेसने व्यापली आहे. ती स्पेस टिकून रहायला हवी आणि ती व्यापायला दुसरा योग्य पक्ष दृष्टीपथावर नाही म्हणून ती स्पेस काँग्रेसने व्यापायला हवी. त्यासाठी काँग्रेस टिकायला हवी. आणि त्यासाठी विठोबा हवा.

तद्दन बिनडोक आणि बिनबुडाचा निष्कर्ष !
आणि म्हणूनच

>>>*हे माझे मत आहे. त्यावर मला चर्चा करण्याची इच्छा नाही.

असे म्हणून चर्चा टाळून केलेले पलायन.

अर्थात गेल्या कित्येक दिवसांपासून थत्यांचे विचार हास्यास्पद बनत चाललेले दिसत आहेत आता तर कशाचा कशाला थांगपत्ताच नाही. हेच का ते थत्ते असा प्रश्न पडत आहे. बुढा सटिया गया !

तेव्हा चाचानी देखिल पुणे शहराध्यक्ष पद मिळण्यास हरकत नाही.

नितिन थत्ते's picture

5 Apr 2013 - 5:23 pm | नितिन थत्ते

पुणे?

वेताळ's picture

5 Apr 2013 - 5:27 pm | वेताळ

मग ठरवु.

आजानुकर्ण's picture

5 Apr 2013 - 6:25 pm | आजानुकर्ण

थत्तेचाचांचा नेहमीप्रमाणेच उत्तम प्रतिसाद. काँग्रेसचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांची हायकमांड पक्षांतर्गतच असते. भारतातील एका मोठ्या पक्षाची हायकमांड पक्षाबाहेरील एका संघात आहे असे कळते, त्यामानाने हे बरे.

श्रीरंग_जोशी's picture

5 Apr 2013 - 6:59 pm | श्रीरंग_जोशी

नितिनराव - ज्या प्रमाणे कॉंग्रेस व भाजपने अनुक्रमे उदारमतवादी व पुराणमतवादी जागा व्यापल्या आहेत असे आपले मत आहे.

हे दोन्ही पक्ष सत्तेत असताना (सत्तेत नसताना कशाला विरोध करतील कसलाच ताळमेळ नाही )जर आर्थिक धोरणांच्या अंमलबजावणीचा विषय बघितल्यास चित्र नेमके याउलट दिसते.

१९९१ मध्ये उदारीकरणाच्या धोरणाचे शिल्पकार होते तत्कालिन पंतप्रधान स्व. नरसिंहराव. खर्‍या अर्थाने त्यांच्या नंतर त्यांची धोरणे पुढे चालली ती १९९८ ते २००४ वाजपेयी पंतप्रधान असताना. त्या काळात जो धडकपणा दिसला (उदा. निर्गुंतवणूक धोरण वगैरे) संपुआची सत्ता आल्यापासून तो पुन्हा कधी दिसलाच नाही. आर्थिक बाबतीत धोरणात्मक निर्णय घेतांना जो धरसोडपणा दाखवला गेलाय त्यास तोडच नाही.

आघाडी चे सरकार होते ही सबब दाखवून ९ वर्षे चालढकल अक्षम्य केली , आणि देश १० वर्षे मागे पडला.
पायाभूत सुविधा , आरोग्य , शिक्षण हया क्षेत्रांचे अपरिमित नुकसान झाले वर भ्रष्टाचार व दहशतवाद फ्री मध्ये देशवासियांना मिळाला

क्लिंटन's picture

6 Apr 2013 - 6:57 pm | क्लिंटन

९९ मध्ये सोनिया गांधींनी राजकारणात प्रवेश केला. त्यानंतरच्या निवडणूकीत काँग्रेसला यश मिळाले नाही. पण पुढे एक घडले की काँग्रेस पक्षाची फाटाफूट थांबली. आणि २००४ च्या निवडणुकांपर्यंत काँग्रेस सोडून गेलेले बरेचसे नेते परत आले. २००४ मध्ये सोनिया गांधींमुळे काँग्रेसला विजय मिळाला याचा अर्थ मते मिळवणारे नेते काँग्रेसमध्ये परतले असा आहे

जरा इतिहासात डोकावू.१९९० च्या दशकात कॉंग्रेसमधून नेते बाहेर पडायला लागले १९९५ मध्ये.मे १९९५ मध्ये अर्जुन सिंह आणि नारायण दत्त तिवारींनी कॉंग्रेस (तिवारी)ची स्थापना केली.कॉंग्रेसचे तामिळनाडूमधील नेते पी.रंगराजन कुमारमंगलम, राजस्थानातील नेते शीशराम ओला आणि उत्तराखंडमधील सत्पाल महाराज हे नेते तिवारी कॉंग्रेसमध्ये सामील झाले.१९९६ मध्ये जैन हवालाप्रकरणी पक्षाने लोकसभा निवडणुकीचे तिकिट नाकारल्यामुळे माधवराव शिंदे पक्षातून बाहेर पडले. १९९७ मध्ये नरसिंह राव कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणून आणि संसदीय पक्षाचे नेते म्हणून दूर झाल्यानंतर गुजराल सरकारमध्ये मंत्री असलेले शीशराम ओला आणि सत्पाल महाराज वगळता तिवारी कॉंग्रेस पक्ष परत मुळच्या कॉंग्रेस पक्षात आला. माधवराव शिंदेही स्वगृही परतले. या सगळ्या घटना सोनिया राजकारणात यायच्या पूर्वीच्या.१९९७ मध्ये सीताराम केसरींनी इंद्रकुमार गुजराल सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर पण सोनिया राजकारणात यायच्या आधी काही नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.हे नेते होते--पी.रंगराजन कुमारमंगलम,अब्रार अहमद आणि अस्लम शेरखान.तर ममता बॅनर्जींनी स्वत:च्या तृणमूल कॉंग्रेस या वेगळ्या पक्षाची घोषणा केली. पुढे सोनियांनी डिसेंबर १९९७ मध्ये पहिल्यांदा पक्षासाठी प्रचार करायची घोषणा केली आणि मार्च १९९८ मध्ये निवडणुकांचे निकाल हातात आल्यानंतर चाचा केसरींना पक्षाध्यक्ष पदावरून हटवून सोनियांना अध्यक्ष बनविले गेले.

या काळात कॉंग्रेसचे जनाधार असलेले नेते--शरद पवार,राजेश पायलट, माधवराव शिंदे इत्यादी पक्षातच होते.त्यातल्या त्यात अर्जुन सिंह आणि नारायण दत्त तिवारी मध्यंतरी पक्ष सोडून गेले होते.हे दोन्ही नेते फार जनाधार असलेले अजिबात नव्हते.अर्जुन सिंहांचा १९९६ मध्ये सतना लोकसभा मतदारसंघातून बसपच्या फुलसिंह बरय्या या नवख्या उमेदवाराने पराभव केला होता तर १९९८ मध्ये होशंगाबादमधून भाजपच्या सरताज सिंहांनी पराभव केला होता.तिवारी १९९१ मध्ये नैनीताल मधून निवडणुक हरले होते (नाहीतर १९९१ मध्ये नरसिंह रावांऐवजी तिवारी पंतप्रधान व्हायची शक्यता बरीच जास्त होती). १९९६ मध्ये ते जिंकले पण १९९८ मध्ये परत हरले.पी.रंगराजन कुमारमंगलम १९९१ मध्ये सेलममधून लोकसभेवर कॉंग्रेसचे उमेदवार म्हणून निवडून गेले असले तरी १९९६ मध्ये तिवारी कॉंग्रेसचे उमेदवार म्हणून चांगलेच आपटले.तीच गोष्ट अस्लम शेरखानांची.तेव्हा या नेत्यांच्या सोडून जाण्याने पक्षाची फार मोठी हानी झाली असे अजिबात नाही.

त्यातून ममता बॅनर्जी सोडून गेल्यामुळे बरीच जास्त हानी झाली पण त्या अजूनही कॉंग्रेस पक्षात परतलेल्या नाहीत.शरद पवार (पी.ए.संगमा आणि तारिक अन्वर) १९९९ मध्ये बाहेर पडले आणि कॉंग्रेस पक्षाचे बरेच नुकसान झाले आणि अजूनही ते पक्षाबाहेरच आहेत. तेव्हा थत्तेचाचांच्या म्हणण्याप्रमाणे---मते मिळवून देणारे नेते कॉंग्रेसमध्ये परतले म्हणजे नक्की कोणते नेते त्यांना अपेक्षित आहेत याची कल्पना नाही.

थत्तेचाचांना या मुद्द्यावरही चर्चा करण्यात इंटरेस्ट आहे की नाही हे माहित नाही पण रेकॉर्ड "स्ट्रेट" असावा म्हणून हा मुद्दा मांडला.

बाकी चालू द्या.

तर्री's picture

5 Apr 2013 - 11:01 am | तर्री

जर विठोबा आणि बडवे अशी उपमा ही उपमा एखादी लिमिटेड / खाजगी कंपनी पुरती मर्यादित असती ठीक आहे. हया देशासाठी ही संकल्पना घातक आहे.
कोंग्रेस हे लीबरल आहे हे ही तितकेसे ठीक नाही , ती एक सत्ता टिकवण्याचे साधन आहे. उद्या हया देशातला बहुसंख्य मतदार पुराणमतवादी झाला तर कोंग्रेस लगेच पुराणमतवादी होईल.

ऋषिकेश's picture

5 Apr 2013 - 12:10 pm | ऋषिकेश

(झाडावरून खाली)
मला काँग्रेस लिबरल आहे असे थत्तेचाचांनी कुठे लिहिलेलं दिसलं नाही.
फक्त जनमानसातील लिबरल स्पेस काँग्रेसने व्यापली आहे (अर्थात ती मंडळी प्रामुख्याने काँग्रेसला मते देताना दिसतात) असे काहिसे त्यांना म्हणायचे असावे असा माझा समज झाला आहे.
बाकी चाचा जाणोत!
(Back to झाडावर )

घाशीराम कोतवाल १.२'s picture

5 Apr 2013 - 12:21 pm | घाशीराम कोतवाल १.२

देशात दोन (ठळक) राजकीय स्पेसेस आहेत. एक पुराणमतवादी* स्पेस भाजपने व्यापलेली आहे. दुसरी लिबरल* स्पेस सध्या बरीचशी काँग्रेसने व्यापली आहे. ती स्पेस टिकून रहायला हवी आणि ती व्यापायला दुसरा योग्य पक्ष दृष्टीपथावर नाही म्हणून ती स्पेस काँग्रेसने व्यापायला हवी. त्यासाठी काँग्रेस टिकायला हवी. आणि त्यासाठी विठोबा हवा.
हा अख्खा प्रतिसाद वाचा आणि ठरवा काय ते ?

आनंदी गोपाळ's picture

13 Apr 2013 - 9:38 pm | आनंदी गोपाळ

तर,
blockquote>ती स्पेस टिकून रहायला हवी आणि ती व्यापायला दुसरा योग्य पक्ष दृष्टीपथावर नाही म्हणून ती स्पेस काँग्रेसने व्यापायला हवी.

हे दिसते.
काँग्रेसला दुसरा पर्याय नाही. हे १००% सत्य आहे.

चिरोटा's picture

5 Apr 2013 - 1:44 pm | चिरोटा

स्वतःच्याच सरकारविरुद्ध कोकलण्याची सध्या फॅशन आहे.'आपल्याला कोणीतरी समजून घेतेय' असे थोडावेळ लोकांना वाटू शकते.

एका उमद्या नेतृत्वाला हया देशाच्या प्रगतीची स्वप्ने पडत आहेत हे खूप आशावादी चित्र आहे.
अहो तर्री साहेब कोणत्या अ‍ॅन्गलने राहुल तुम्हाला उमदा वाटतो?

अहो तर्री साहेब कोणत्या अ‍ॅन्गलने राहुल तुम्हाला उमदा वाटतो?
दिग्विजय कोनातून :)

वेताळ's picture

5 Apr 2013 - 5:00 pm | वेताळ

कल्जी नाय

चौकटराजा's picture

5 Apr 2013 - 6:29 pm | चौकटराजा

राजकारण बास झाले आता कामाला लागू या... ऑं हे कुणासाठी मनमोहन , राहुल, आडवानी, येचुरी, ममता, जया यांच्या साठी ..? आयाया... कसला भाबडेपणा हा ! अहो, हा त्यांचा धंदाच आहे. मटणवाल्यानी आता हातात सुरी नको रक्तपात नको असे म्हणण्यासारखे आहे.ते जाउ द्या.. आपल्या सोसायटीचे उदाहरण घ्या.. तिथे तर असे धंदेवाईक राजकारणी येऊन बसत नाहीत ना ? मग साधा सोसायटी इमारतीला रंग लावायला सात सात वर्षे का लागतात. मी आठवीत असताना शाळेतील निवडणुकीत " तू बामण आहेस आम्ही तुला पाडणार ! " असे आधीच सांगून पाडण्यात आले. साल १९६६ . आता बोला राजकारण दिल्लीत आहे की गल्लीत ? ही घाण मतदारांमधे कधीपासूनची आहे मग ते बाल मतदार असोत की सिनियर सिटीझन. .

श्री गावसेना प्रमुख's picture

5 Apr 2013 - 6:35 pm | श्री गावसेना प्रमुख

उपहासात्मक धागा11111

पिशी अबोली's picture

5 Apr 2013 - 6:48 pm | पिशी अबोली

हा हा हा हा.. =)) =)) =)) =))

लोकसत्ता अग्रलेख

ह.भ.प. राहुलबाबा

नाना चेंगट's picture

5 Apr 2013 - 11:14 pm | नाना चेंगट

हभप म्हणजे

हळुच भलतीकडे पहाणारे
हळूच भजी पळवणारे
हरभरे भरडण्यात पटाईत

नक्की काय धरावे?

विकास's picture

5 Apr 2013 - 11:20 pm | विकास

"वरील सर्व" अर्थात "all of the above"

काही नाही हो .... फक्त गफ्फा आहेत गफ्फा या राहुलच्या....

हुप्प्या's picture

6 Apr 2013 - 11:52 pm | हुप्प्या

राहुलजी हे मुस्लिमांकरता माहदी आहेत, ख्रिस्ती लोकांकरता प्रभू येशूचे पुनरागमन आहे आणि हिंदूंकरता विष्णूचा अकरावा अवतार आहेत.
जेव्हा जेव्हा पृथ्वीवर अनाचार माजतो तेव्हा अशा विभूती जन्मतात.
ही विभूती गुजराथच्या भुताचे निर्दालन करणार ह्यात शंकाच नाही!

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

7 Apr 2013 - 2:33 am | निनाद मुक्काम प...

ROFLMAO
लेख वाचून निर्भेळ करमणूक झाली.
राजीव गांधी ह्यांची चुकीची राजकीय धोरणांमुळे अनेक राज्यातून त्यांचा पक्ष हद्दपार झाला तर देशाचे राजकारण प्रादेशिक पक्षांच्या हातात गेले.
उद्या कोणी देशात राष्ट्रीय पक्षाचा क्षय व प्रादेशिक पक्षांचा दिल्लीत वाढता प्रभाव नेमका कधीपासून सुरु झाला ह्यावर संशोधन केले तर त्याचे उत्तर राजीव कालखंडात दिले जाईल , त्यांच्या कालखंडात तामिळ वाघांची निर्मिती व मग शांती सेना ह्यामुळे झालेला गोंधळ आजतागायत तामिळनाडू सारख्या प्रगत राज्यात अवघड जागचे दुखणे झाला आहे.
इंदिरा गांधी ह्यांच्या मृत्यूनंतर ज्याला पंजाबातले काही लोक वध सुद्धा म्हणतात, त्यानंतर ज्या दंगली उसळल्या. त्या सर्व परिस्थिती मुळे आज पंजाबात कोंग्रेज गवत सुद्धा उगवत नसेल.
राजीव गांधी ह्यांनी संगणक युग आणले असा प्रचार केला जातो.
हे जर बरोबर असेल तर ह्याच यशाला एका मोठ्या अपयशाची सुद्धा झालर आहे.
जे काम नरसिंह राव ह्यांनी आल्या आल्या केले ते आपल्या राजकीय हयातीत राजीव ह्यांना जमले नाहीं.
देशाचे आर्थिक उदारीकरण
नरसिंह राव ह्यांनी मनमोहन व मनमोहन ह्यांनी अहलुवालिया ह्यांच्या प्रमुख मदतीने
हे कार्य करून दाखवले.
हेच मनमोहन व अहलुवालिया राजीव ह्यांच्या कारकिर्दीत आपली अर्थशास्त्रीय सरकारी सेवा करत होते. त्यांच्या डोक्यात ह्या सर्व कल्पना आंतरराष्ट्रीय स्तरावर शिक्षण व आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक बाबीचे नॉलेज होते , पण राजीव ह्यांच्या कारकिर्दीत
ते सरकरी गोदामात पडून असलेल्या धान्यासारखे होते.
सर्वात महत्त्वाची गोष्ट
भारताच्या परराष्ट्र धोरणांची पुनर्रचना करणारे नरसिंह राव ज्यांच्या लुक वेस्ट किंवा
ज्यू राष्ट्रांशी सबंध प्रस्थापित करण्याच्या धोरणांची मधुर फळे वाजपेयी व मनमोहन सरकार ने पुढे राबविल्याने आज तमाम भारत चाखत आहे ते राजीव ह्यांच्या काळात परराष्ट्र मंत्री होते , पण राजीव ह्यांच्या हयातीत हे धोरण राबविणे निव्वळ अशक्य होते
ह्या तुलनेत राहुल आपल्या वडिलांच्या पेक्षा बराच शहाणा आहे.
राजीव ह्यांनी आपल्या आईच्या पद्धतीने राजकारण करण्याचा प्रयत्न केला.
मात्र त्यांच्या आईने स्वतःच्या वडलांच्या विपरीत अशी स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण केली होती, तशी राहुल ह्यांना करायची आहे,
मात्र देशात आर्थिक उदारीकरण झाले नि घोटाळा झाला.
इंदिरा गांधीच्या काळात उद्योगपती हे नाईलाजाने का होईना त्यांचे शब्द झेलत.
कारण त्यांना समर्थ पर्याय नव्हता. मात्र आता उद्योगपतींच्या तालावर राजकारणी नाचतात. कारण अनेक पक्षांचा ह्या उद्योजकांच्या पुढे पर्याय असतो.
भाजपने सुद्धा पंचतारांकित राजकारण सुरु करून उद्योजकांना एक पर्याय दिला आहे.
सध्या देशाची जनता ४५ टक्के शहरात तर ५५ टक्के गावात राहते.
व वाढते उद्योगीकरण त्याचसोबत कृषी क्षेत्रातून होणारी निराशा पाहता शहरात लोकसंख्या तुफान वाढणार आहे. व शहरातील लोक प्रसार माध्यमे म्हणा किंवा आजूबाजूच्या चंगळवाद म्हणा बरीच शहाणी झाली आहे, त्यांना भावनिक राजकारणापेक्षा ठोस काहीतरी करणारा नेता हवा आहे.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कोंग्रेज मध्ये स्थानिक पातळीवर अनेक खादीधारी संस्थानिक देशभर झाले आहेत त्यांना दिल्लीहून आदेश व पुढारी आलेले आवडत नाहीं.
त्यामुळे राहुल ह्यांना देशभरातून त्यांच्या लोकांकडून मनापासून पाठिंबा अजिबात मिळणार नाहीं , एकंदरीत कठीण आहे
एक दिवस कलावतीच्या घरी राहून व मुंबईच्या लोकल मधून तिकीट काढून प्रवास केल्याने त्यांना ह्या समस्यांची जाणीव किती झाली शेतकऱ्यांच्या महाराष्ट्रातील समस्या व मुंबई लोकल प्रवाशांच्या समस्येवर त्यांनी काय केले किंवा काय करण्याचा प्रयत्न केला हे त्यांचे समर्थक सुद्धा गुगलून सांगू शकत नाहीं.
तेव्हा त्यांची राजीव गांधी ह्यांची तुलना होऊ शकत नाहीं , कारण आंतरराष्ट्रीय धोरणाच्या बाबतीत त्यांची मते कदाचित त्यांच्या मातोश्री वगळता अजून कोणालाही माहिती नसावीत. आकाश टेब्लेत कधी येणार ह्या धर्तीचा प्रश्न त्यांना एका विद्यार्थ्याने विचारला ह्याचे उत्तर ज्यांनी हा टेब्लेत आणला त्यांनाच विचारा , मी काय उत्तर देऊ असे सांगून सगळ्यांना चकीत केले ,
त्यांचे जनरल नॉलेज जबरा आहे

काल राहुल गांधी यांनी सी.आय आय च्या सभेमध्ये भाषण केले.
राजीव गांधी यांच्या भाषणात हमे ये करना है,हमे वो करना है अशी वाक्य असायची ते आठवायला लागले.

श्रीगुरुजी's picture

8 Apr 2013 - 8:48 pm | श्रीगुरुजी

"राजीव गांधी यांच्या भाषणात हमे ये करना है,हमे वो करना है अशी वाक्य असायची ते आठवायला लागले."

कै. राजीव गांधींच्या भाषणात "हमे देखना है", "हम देख रहे है", "हमने देखा है" अश्या वाक्यांची रेलचेल असायची.

श्री गावसेना प्रमुख's picture

8 Apr 2013 - 5:54 pm | श्री गावसेना प्रमुख

राजीव गांधी विमान कंपनीचे एजंट
http://online2.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5383277317620479602&Se...'%E0%A4%8F%E0%A4%9C%E0%A4%82%E0%A4%9F'?

ही घ्या विकिलिक्सची ती केबल :-
https://www.wikileaks.org/plusd/cables/1976NEWDE01909_b.html

चिरोटा's picture

10 Apr 2013 - 6:19 pm | चिरोटा

आपल्या भारतिय पक्ष नेत्यांना विकीलिक्सवाल्यांना खाऊ की गिळू असे झाले असणार. जॉर्ज फर्नांडिस ह्यांचीही भानगड बाहेर पडली आहे. सी.आय्.ए.कडे फर्नांडिसांनी पैशाची मागणी केली होती देशभर गोंधळ घालायला.

आम्ही राजीवजींवर धागा काढला त्याची दखल विकीलिक ने घेतली आहे. असांगे चा मिपा आय.डी. काय बरे असेल ? असा विचार सुरु आहे.

नाना चेंगट's picture

8 Apr 2013 - 11:10 pm | नाना चेंगट

तर्री.

तर्री's picture

9 Apr 2013 - 9:57 am | तर्री

नानबा , आपल्या कल्पकतेला ---/\----.

प्रदीप's picture

9 Apr 2013 - 11:36 am | प्रदीप

लिबरलच! आता फक्त थेट इयूक्वेडोरसारख्या जुलूमी राजवटीचा पाहूणचार घेतो आहे, तो भाग वेगळा.

--- प्रदीप (इंटरनेट गांडू)

श्रीगुरुजी's picture

8 Apr 2013 - 8:50 pm | श्रीगुरुजी

राहुल गांधी आँधी है, दुसरा राजीव गांधी है!

श्री गावसेना प्रमुख's picture

10 Apr 2013 - 2:23 pm | श्री गावसेना प्रमुख

http://www.loksatta.com/desh-videsh-news/wikileaks-cables-indira-gandhi-...
आणीबाणीच्या दुर्गेने अणुतंत्रज्ञान पाकला देण्याची तयारी होती म्हणे

चिरोटा's picture

10 Apr 2013 - 6:16 pm | चिरोटा

सत्ताधीश कसाही असला तरी हे तंत्रज्ञान फुकटात कोणीही देणार नाही.त्याआधी झुल्फिकार भुत्तो ह्यांना काय प्रस्ताव मांडला होता ते पहावे लागेल.

विकास's picture

10 Apr 2013 - 7:56 pm | विकास

शेतीवर कर लावण्याचा पण त्यांचा १९७५ साली विचार होता.