काल राहुल गांधी यांनी सी.आय आय च्या सभेमध्ये भाषण केले. केवळ भाषण म्हणून मूल्यमापन करायचे तर ते एक प्रांजळ प्रकटन होते. त्यामध्ये नव्या कल्पना , नवी प्रतिभा यांचा सुरेख संगम होता. चप्पल नेमकी कुठे लागते आहे ? हे त्यांना आता समजते आहे. समस्या समाधानाची पहिली पायरी म्हणजे समस्या नेमकी समजणे , आणि ते त्यांना जमले आहे असे वाटते. समस्या समाधानाची दुसरी पायरी म्हणजे उपाय योजना करणे. येथे मात्र राहुल गांधीचा अननुभव स्पष्ट दिसून येतो आहे.
राहुल गांधींचा एकूण सूर हा "खूप झाले राजकारण - आता कामाला लागा " असा होता. हा राग सत्तेत नसलेल्यानी गायला तर समजू शकते पण गेली ९ वर्षे तुम्ही सत्ताधारीपक्षाचे सरचिटणीस आहात हे जनता तरी विसरलेली नाही. तुम्हांला हा सरकार विरोधी सूर लावण्याचा अधिकार पोहोचत नाही , सत्तेचे घराणे तुमचेच आहे ! चांगले विचार आणि उत्तम अभिव्यक्ती एवढेच पुरेसे नाही , निदान तुमच्याकडून तरी नाही . एका दिग्विजय सरचिटणीसपदावरून ला हालून द्या , कलमाडीला पक्षातून तडीपार करा , सुशील कुमारांना पद्भ्रष्ट करा एवढेही केलेत तरी तुम्ही काही कृती करता असे दिसेल.
भारतीय अर्थव्यवस्थेला , समाजव्यवस्थेला दिशा देण्याची प्रामाणिक भावना राजीव गांधीनी त्यांच्या सुरवातीच्या काळात अशीच दर्शवली होती. पंजाब , ईशान्य भारत , श्रीलंका हया तीन ठिकाणचा दहशतवादाचा प्रश्न राजीव गांधीनी सुरवातीच्या काळात चांगला हाताळला होता. नंतर राजीव गांधीचे शक्तिपात सुरु झाला. त्यांच्या सल्लागार मंडळीनी दिलेले सल्ले , निवडणुकांचे अगम्य राजकारण , सत्तेचा मोह , राजकीय मुत्सादिपाणचा अभाव हया सगळ्यामुळे राजीव गांधी स्वतः कोंग्रेससहित गाळात गेले होते.
१९८४-८५ सालचा तो काल जणू राहुल गांधी परावर्तीत करत आहेत . एका उमद्या नेतृत्वाला हया देशाच्या प्रगतीची स्वप्ने पडत आहेत हे खूप आशावादी चित्र आहे. राहुल गांधींचे "सहकारी" त्यांचे हे स्वप्न साकारण्यात किती सहकार करणार ह खरा प्रश्न आहे ? कोंग्रेस च्या वळचणीला उभे राहून "लांगुलचालन" एवढ्या एका गुणावर अनेक नेते राष्ट्राची संपत्ती लुटताना राहुल गांधीना दिसत नाहित का ? एके काळी अनेक डॉक्टर , वकील , प्राध्यापक हे कोंग्रेस चे नेते , उमेदवार असत. आज व्यावसायिक निवडणुक ठेकेदार दार हेच त्यांचे खरे बळ होवून बसले आहे. ही कोंग्रेसची परिस्थिती बदलण्याची इच्छा शक्ती आज तरी त्यांच्या विचार -अभिव्यक्ती - भाषण- कृती मधून दिसत नाही. देशाची जडण घडण करण्या आधी कोंग्रेसची जडण घडण हे तरुण नेतृत्व कसे करतो ? हया मध्ये त्यांचे यशापयश आहे आणि तेथेच घोडे पेण खाते आहे.
केलेल्या भाष्टचाराला जर कोंग्रेस पाठीशी घालणार नसेल तर नेते होतील का कोंग्रेसवासी ? आपापल्या राज्यात त्यांना प्रादेशिक पक्ष आहेतच की तुडुंब भ्रष्टाचार करायला.
तर राहुलजी देश सुधारण्याआधी कोंग्रेस सुधारा , मग आम्ही आहोतच तुमच्या मागे !
वाचने
8773
प्रतिक्रिया
43
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाटच पहात होतो
ऐसपैस तयारी करून बसतो..
राहुलजी किंवा कोणत्याही गांधी
चांगला आढावा आणि हास्यास्पद निष्कर्ष !
In reply to राहुलजी किंवा कोणत्याही गांधी by नितिन थत्ते
थत्ते साहेब
In reply to राहुलजी किंवा कोणत्याही गांधी by नितिन थत्ते
देशात दोन (ठळक) राजकीय
In reply to राहुलजी किंवा कोणत्याही गांधी by नितिन थत्ते
चांदुरकराना मुंबई कॉग्रेस शहर अध्यक्षपद मिळाले
In reply to राहुलजी किंवा कोणत्याही गांधी by नितिन थत्ते
पुणे?
In reply to चांदुरकराना मुंबई कॉग्रेस शहर अध्यक्षपद मिळाले by वेताळ
तुम्हीच सुचवा
In reply to पुणे? by नितिन थत्ते
उत्तम प्रतिसाद
In reply to राहुलजी किंवा कोणत्याही गांधी by नितिन थत्ते
काँग्रेस व भाजप - आर्थिक धोरणे
In reply to राहुलजी किंवा कोणत्याही गांधी by नितिन थत्ते
आघाडी चे सरकार होते ही सबब !
In reply to काँग्रेस व भाजप - आर्थिक धोरणे by श्रीरंग_जोशी
इतिहासात डोकावून बघू
In reply to राहुलजी किंवा कोणत्याही गांधी by नितिन थत्ते
विठोबा आणि बडवे !
(झाडावरून खाली)
देशात दोन (ठळक) राजकीय
In reply to (झाडावरून खाली) by ऋषिकेश
नीट वाचले,
In reply to देशात दोन (ठळक) राजकीय by घाशीराम कोतवाल १.२
स्वतःच्या
राहुल गांधीचे कालचे भाषण तद्दन भिकारचोट होते
अहो तर्री साहेब कोणत्या अ
अहो तर्री साहेब कोणत्या अॅन्गलने राहुल तुम्हाला उमदा वाटतो?दिग्विजय कोनातून :)मग ठिक आहे
राजकारण बास झाले आता ..
उपहासात्मक धागा
हा हा हा हा..
लोकसत्ता अग्रलेख - ह.भ.प. राहुलबाबा
हे
In reply to लोकसत्ता अग्रलेख - ह.भ.प. राहुलबाबा by विकास
चौथा पर्याय
In reply to हे by नाना चेंगट
काही नाही हो .... फक्त गफ्फा आहेत गफ्फा या राहुलच्या....
थोर राहुलजी
लेख वाचून निर्भेळ करमणूक झाली
काल राहुल गांधी यांनी सी.आय
"राजीव गांधी यांच्या भाषणात
In reply to काल राहुल गांधी यांनी सी.आय by मदनबाण
राजीव गांधी विमान कंपनीचे
ही घ्या विकिलिक्सची ती केबल :
In reply to राजीव गांधी विमान कंपनीचे by श्री गावसेना प्रमुख
विकी
In reply to ही घ्या विकिलिक्सची ती केबल : by मदनबाण
आम्ही राजीवजींवर धागा काढला.
तर्री.
In reply to आम्ही राजीवजींवर धागा काढला. by तर्री
ह्म्म !
In reply to तर्री. by नाना चेंगट
तो असांगेही
In reply to आम्ही राजीवजींवर धागा काढला. by तर्री
राहुल गांधी आँधी है, दुसरा
http://www.loksatta.com/desh
सत्ता
In reply to http://www.loksatta.com/desh by श्री गावसेना प्रमुख
शेतीकर
In reply to http://www.loksatta.com/desh by श्री गावसेना प्रमुख