घराच्या उंब-याला सांग फिरुनी
घराच्या उंब-याशी थांब फिरुनी
पुन्हा ती ओळखीची रात येता
तिला सोडून येते लांब फिरुनी
किती चालून गेले वाट वेडी
खुणेचा येतसे का खांब फिरुनी
मनी गर्दी कशाला आठवांनो
इथे ना हासरी ती रांग फिरुनी
थवे गं दाटले या आसवांचे
जराशी काजळा तू पांग फिरुनी
(*पांगणे)
- संध्या
१९ मार्च २०१३
प्रतिक्रिया
19 Mar 2013 - 9:21 am | प्रीत-मोहर
मस्तच संध्यातै. कविता आवडली :)
19 Mar 2013 - 9:30 am | अत्रुप्त आत्मा
किती चालून गेले वाट वेडी
खुणेचा येतसे का खांब फिरुनी>>> ये अच्छा है,खूब भाया :-)
19 Mar 2013 - 11:16 am | साऊ
फार छान .
19 Mar 2013 - 6:04 pm | सांजसंध्या
:)
धन्यवाद
19 Mar 2013 - 6:12 pm | अभ्या..
सुरेख. कविता एकदम आवडली आहे.
आणखी येऊ द्या.
19 Mar 2013 - 6:45 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
सुरेख रचना.
23 Mar 2013 - 10:22 pm | सांजसंध्या
मिपाच्या सर्व वाचकांचे मला दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल मनापासून आभार.
31 Mar 2013 - 4:05 pm | गंगाधर मुटे
सुरेख.