घराच्या उंब-याला सांग फिरुनी
घराच्या उंब-याला सांग फिरुनी
घराच्या उंब-याशी थांब फिरुनी
पुन्हा ती ओळखीची रात येता
तिला सोडून येते लांब फिरुनी
किती चालून गेले वाट वेडी
खुणेचा येतसे का खांब फिरुनी
मनी गर्दी कशाला आठवांनो
इथे ना हासरी ती रांग फिरुनी
थवे गं दाटले या आसवांचे
जराशी काजळा तू पांग फिरुनी
(*पांगणे)
- संध्या
१९ मार्च २०१३
मस्तच संध्यातै. कविता आवडली
किती चालून गेले वाट वेडी
फार छान .
धन्यवाद
खूप छान
सुरेख
मिपाच्या सर्व वाचकांचे मला
सुरेख.