फोन वापरताना

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जनातलं, मनातलं
8 Mar 2013 - 8:11 pm

फोन वापरताना बरेच वेळा फोन ची कॉर्ड एकमेकात आडकते
फोन येतो व आपण गडबडीत रिसिव्हर उचलतो अन कॉर्ड एकमेकात गुंतल्याने फोन पण रिसिव्हर सगट उचलला जातो अन गोंधळ उडतो.
ते टाळण्या साठी एक साधी युक्ती.
१..बाथरुम मध्ये वापरतो त्या रबरी नळी चा साधारण ३ " लांबीचा तुकडा घेणे (चित्र क्र .एक)
.
२.कॉर्ड काढुन त्यात हा रबरी नळिचा तुकडा साधारण मधोमध ओवणे (चित्र क्र .दोन )
.
३कॉर्ड परत जागेवर लावणे व या समस्ये पासुन कायमाची मुक्ती मिळवणे (चित्र क्र तीन).
.
करून बघा ..

धोरणप्रकटन

प्रतिक्रिया

धन्या's picture

8 Mar 2013 - 9:24 pm | धन्या

उद्याच बाजारात जाऊन एक फोन घेऊन येतो आणि हे करुन पाहतो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Mar 2013 - 1:23 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

उद्या बाजारात जातो आणि एक रबरी नळी घेऊन येतो आणि हे करुन पाहतो.

-दिलीप बिरुटे

मी पण उद्याच सकाळी बाजारात जाऊन दुसरा फोन घेऊन येते आणि हे करुन बघते .

खादाड_बोका's picture

8 Mar 2013 - 9:50 pm | खादाड_बोका

बापरे अजुनही लोक असे फोन वापरतात.......तेही स्मार्ट फोन च्या जमान्यात.

पिवळा डांबिस's picture

8 Mar 2013 - 9:58 pm | पिवळा डांबिस

यापेक्षा कॉर्डलेस फोन वापरला तर?
न रहा कॉर्ड न बने वेटोळी!!!
:)

श्रीरंग_जोशी's picture

8 Mar 2013 - 10:02 pm | श्रीरंग_जोशी

मुद्द्याबरोबर सहमत.

पण लेखात दर्शवलेल्या दुरध्वनीसंचाला वीजपुरवठ्याची गरज नसते. त्यामूळे वारंवार वीज जाणार्‍या ठिकाणी याची उपयुक्तता सर्वोच्च आहे.

पिवळा डांबिस's picture

8 Mar 2013 - 10:15 pm | पिवळा डांबिस

>>त्यामूळे वारंवार वीज जाणार्‍या ठिकाणी याची उपयुक्तता सर्वोच्च आहे.
ते शिंचं ध्यानातच आलं नाही माझ्या!!!
सॉरी..

सोत्रि's picture

8 Mar 2013 - 10:18 pm | सोत्रि

फोटो काढण्याआधी जागा जरा स्वच्छ केली असती तर फोटो स्वच्छ आले असते, असे उगाच आपले एक मत बरं का!

- (स्मार्ट फोन वापरणारा स्मार्ट) सोकाजी

श्रीरंग_जोशी's picture

8 Mar 2013 - 10:23 pm | श्रीरंग_जोशी

आजकाल जाणून बुजून थोडी अस्वच्छता ठेवणे, अजागळपणा दाखवणे हेही एक स्टाईल स्टेटमेंट असते. इथेही तसे काही असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जेनी...'s picture

8 Mar 2013 - 10:29 pm | जेनी...

अय्या रंगा काका तुमीपण ??
(तुमच्या टेबलाचा फोटु पायची नीतांत विच्छा असणारी ) पूजा =))

श्रीरंग_जोशी's picture

8 Mar 2013 - 10:46 pm | श्रीरंग_जोशी

रंगाकाकांचा टेबल

सोत्रि's picture

8 Mar 2013 - 10:39 pm | सोत्रि

>>आजकाल जाणून बुजून थोडी अस्वच्छता ठेवणे, अजागळपणा दाखवणे हेही एक स्टाईल स्टेटमेंट असते. इथेही तसे काही असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ते शिंचं ध्यानातच आलं नाही माझ्या!!!
सॉरी..

- (पिवळा बाडिस * ) सोकाजी

[*]पिडांकाकांची माफी मागून

=))

नाना कुयामत ते कुयामत तक सहमत ... =))

फोन अडगळीच्या ठिकाणी असेल कदाचित.

टवाळ कार्टा's picture

8 Mar 2013 - 11:17 pm | टवाळ कार्टा

=))

अधिराज's picture

8 Mar 2013 - 11:40 pm | अधिराज

कृती आणि फोटो दोन्ही छान.

मोदक's picture

9 Mar 2013 - 1:01 am | मोदक

तुमच्याकडे BSNL चे नेट कनेक्शन आहे का हो..?

६ / ७ वर्षांपूर्वीचा धागा आत्ता अपडेट झाला आहे.

धन्या's picture

9 Mar 2013 - 1:09 am | धन्या

BSNL चे वायर्ड नेट कनेक्शन सर्वात जलद आहे असे मित्रांकडून ऐकावयास मिळते.

टाटा फोटॉनवाल्यांनी BSNL ला मंद म्हणून नावे ठेवणे म्हणजे कासवाने सशाला तू खुपच हळू चालतोस म्हणण्यासारखे आहे.

सोत्रि's picture

9 Mar 2013 - 1:26 am | सोत्रि

कुणीही BSNL ला नावे ठवलेले पटत नाही कारण टेडा है पर मेरा है ;)

- (BSNL सेवा वापरणारा संतुष्ट ग्राहक) सोकाजी

विश्वनाथ मेहेंदळे's picture

9 Mar 2013 - 2:07 am | विश्वनाथ मेहेंदळे

टाटा फोटॉनवाल्यांनी BSNL ला मंद म्हणून नावे ठेवणे म्हणजे कासवाने सशाला तू खुपच हळू चालतोस म्हणण्यासारखे आहे.

किंवा आयटीतील इंजीनेराने आयटीतील BCom ला "तुला काहीच येत नाही" असे म्हणण्यासारखे ;-)

चान्स पे डान्स करणे म्हणतात ते हेच का? :)

बाय द वे, आयटीतील BCom वर्ड, एक्सेल वगैरे मध्ये एक्स्पर्ट असतात. ;)

श्री गावसेना प्रमुख's picture

9 Mar 2013 - 8:50 am | श्री गावसेना प्रमुख

नवीन संशोधन
तुम्हाला तर पद्मश्री मिळायला हव

jaypal's picture

9 Mar 2013 - 10:14 am | jaypal

c1
भावना समजु शकतो.चांगल्या माहितीपुर्ण,रोमहर्षक आणि रोचक धागा काढल्या बद्दल धन्यवाद. (नाहीतर हल्लीचे धागे कुणीतरी नविन केमेरा घेतो अन टेकडीवरील ट्रेकचे फोटो टाकतो. पाक क्रुती भागात तर नुसते जळावु धागे आग आग होते पोटात.) तुमच्या मुळे माझ्यासारख्या वाचनमात्र सभासदाची मिपा वर लॉगईन होण्याची ईच्छा झाली.

पिडा काका. त्या कॉर्डचा गळा आवळण्यास खुप चांगला उपयोग होतो.
cord

पुजा बाई तुम्ही हे का नाही घेत? ;-)
c2

मैत्र's picture

9 Mar 2013 - 10:29 am | मैत्र

फुटलो..
लै भारि आयड्या..

जेनी...'s picture

10 Mar 2013 - 7:19 pm | जेनी...

:-/ :-/

आशु जोग's picture

9 Mar 2013 - 4:37 pm | आशु जोग

अविनाशकुलकर्णी

उपयुक्त माहिती दिलीत

धन्या यांनी प्रतिसादांमधे पहिली जागा पटकावून अशी घाण करायला नको होती
पुढचे लोकही डोळे मिटून तिच पिवळी रेघ पुढे ओढत राहतात.

नीलकांत यांनी इतक्यातच केलेली चर्चा अशी वाया जाऊ देऊ नये
हे पहावे

धन्या's picture

9 Mar 2013 - 4:57 pm | धन्या

धन्या यांनी प्रतिसादांमधे पहिली जागा पटकावून अशी घाण करायला नको होती

सॉरी बरं का. तुमच्या भावना दुखावल्याबद्दल मी दिलगीर आहे.
इथून पुढे मी तुमच्या आणि अकुंच्या कुठल्याच धाग्यावर प्रतिसादांमध्ये पहिली जागा पटकावून (फक्त पहिलीच बरं का.) अशी घाण करणार नाही.

जेनी...'s picture

10 Mar 2013 - 7:18 pm | जेनी...

अय्या ! कमालेय !

आशु काका माझ्या कुठल्या प्रतिसादात पिवळी रेघ दीसलिवो ??
सगळ्या रेघा काळ्याचेत :-/

कायपण बोल्तात बाबा :-/

आशु जोग's picture

9 Mar 2013 - 6:13 pm | आशु जोग

प्रत्येक वेळी सिरीयसनेस घालवला पाहीजे असे नाही

तुमचं म्हणणं मला एकदम मान्य आहे. ईतक्या आशयगर्भ, अभिजात लेखनाच्या पहिल्याच प्रतिसादात मी घाण करायला नको होती. माझी चूक माझ्या लक्षात आली आहे आणि त्यासाठी मी आपली माफीही मागितली आहे.

पुन्हा एकदा विनंती करतो, उदार मनाने मला माफ करा.

मोदक's picture

10 Mar 2013 - 11:46 am | मोदक

तुम्हाला इतके वाईट वाटले असेल तर तुम्ही तो साष्टांग नमस्काराचा फोटो का टाकत नाही इथे..?

कोण जाणे, कदाचित तुमच्या ही&हि प्रतिसादाचे पापक्षालनही होईल!

आम्ही पाप पुण्य वगैरे काही मानत नाही. त्यामुळे आमच्या ही&हि प्रतिसादाचे पापक्षालन होण्याचा प्रश्नच येत नाही.

परंतू आम्ही मानवतेचे पुजारी आहोत. कोणा मानवाला दुखावणे (मग त्यामागे ठोस कारण का असेना) आमच्या बुद्धीला पटत नाही. म्हणून आम्ही बंधू आशु जोग यांची क्षमायाचना करत होतो.

तुम्ही जर मानवतेचे पुजारी असाल तर मानवाने मानवांसाठी काढलेल्या दोन मानवनिर्मीत वस्तूंच्या संयोगातून घडणार्‍या सुयोग्य वापराबाबतच्या माहितीपूर्ण धाग्यावरती पिवळ्या रेघा का ओढत आहात..?

यामुळे काही मानवांनाच त्रास होतो.

दोन मानवनिर्मीत वस्तूंचा संयोग होतो हे नव्यानेच कळतंय. आम्हाला सर्वज्ञानाची काविळ झालेली असल्यामुळे आम्ही माहितीपुर्ण धाग्यांवर पिवळ्या रेघा ओढल्या.

बंधू आशु जोग यांनी आमची चुक आमच्या लक्षात आणून दिली आहे.

असो. आपण या धाग्याचा खरडफळा केला आहे हे कुणा संपादकाच्या लक्षात येण्याआधीच हे संभाषण आपण खरडवहीत नेऊ या.

मोदक's picture

10 Mar 2013 - 1:02 pm | मोदक

जशी तुमची इच्छा!

आशु जोग's picture

10 Mar 2013 - 1:26 pm | आशु जोग

> पुन्हा एकदा विनंती करतो, उदार मनाने मला माफ करा.
साफ करा हे अधिक योग्य नाही का

साफ करा हे अधिक योग्य नाही का.

म्हणजे नेमकं काय करु?

धनाजीराव तुम्ही काहीही करणे अपेक्षित नाहीयेय, तेच विचारत आहेत की साफ अरू का म्हणून ;)

- (साफ झालेला) सोकाजी

तुमचा अभिषेक's picture

10 Mar 2013 - 1:32 pm | तुमचा अभिषेक

हा हा हा... लेख आणि प्रतिसाद सारेच.. ;)
अविनाशकाका इथे ही फॉर्मला असतात तर.. ;)

परिकथेतील राजकुमार's picture

10 Mar 2013 - 3:48 pm | परिकथेतील राजकुमार

आता बाथरुम बांधणे आले... आणि त्यात वापरायला नळी घेणे आले.

jaypal's picture

10 Mar 2013 - 5:41 pm | jaypal

ईथे बाथरुम पेक्षा "नळी" महत्वाची आहे रे बाबा. "गुंतागुंती" टाळायची असल्यास "नळी" मधे गुंतवणुक करा.

अत्रुप्त आत्मा's picture

10 Mar 2013 - 10:21 pm | अत्रुप्त आत्मा

@"गुंतागुंती" टाळायची असल्यास "नळी" मधे गुंतवणुक करा.>>> =)) अकुंचा धागा,आणी त्यावर अनेकांची जागा =))

चित्रगुप्त's picture

10 Mar 2013 - 11:05 pm | चित्रगुप्त

आता आधी घर बांधणे आले, मग त्यात बाथरूम बांधणे आले, आणि मग त्यात वापरायला नळी घेणे आले...
पण बाथरूम मधे नळीने करायचे काय, हे कळलेच नाही...
आणि मग फोन घेणे आले, आणि कॉर्डचा गुंता होत नसेल, तर मुद्दाम करणे आले... अबब.... मिपावरचे लेख वाचून एवढे सगळे करावे लागणार, त्यापेक्षा मिपा वाचणेच बंद करावे की काय?