Skip to main content

फोन वापरताना

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शुक्रवार, 08/03/2013 या दिवशी प्रकाशित केले.
फोन वापरताना बरेच वेळा फोन ची कॉर्ड एकमेकात आडकते फोन येतो व आपण गडबडीत रिसिव्हर उचलतो अन कॉर्ड एकमेकात गुंतल्याने फोन पण रिसिव्हर सगट उचलला जातो अन गोंधळ उडतो. ते टाळण्या साठी एक साधी युक्ती. १..बाथरुम मध्ये वापरतो त्या रबरी नळी चा साधारण ३ " लांबीचा तुकडा घेणे (चित्र क्र .एक) . २.कॉर्ड काढुन त्यात हा रबरी नळिचा तुकडा साधारण मधोमध ओवणे (चित्र क्र .दोन ) . ३कॉर्ड परत जागेवर लावणे व या समस्ये पासुन कायमाची मुक्ती मिळवणे (चित्र क्र तीन). . करून बघा ..
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 7480
प्रतिक्रिया 43

प्रतिक्रिया

उद्याच बाजारात जाऊन एक फोन घेऊन येतो आणि हे करुन पाहतो.

In reply to by धन्या

उद्या बाजारात जातो आणि एक रबरी नळी घेऊन येतो आणि हे करुन पाहतो. -दिलीप बिरुटे

यापेक्षा कॉर्डलेस फोन वापरला तर? न रहा कॉर्ड न बने वेटोळी!!! :)

In reply to by पिवळा डांबिस

मुद्द्याबरोबर सहमत. पण लेखात दर्शवलेल्या दुरध्वनीसंचाला वीजपुरवठ्याची गरज नसते. त्यामूळे वारंवार वीज जाणार्‍या ठिकाणी याची उपयुक्तता सर्वोच्च आहे.

In reply to by श्रीरंग_जोशी

>>त्यामूळे वारंवार वीज जाणार्‍या ठिकाणी याची उपयुक्तता सर्वोच्च आहे. ते शिंचं ध्यानातच आलं नाही माझ्या!!! सॉरी..

फोटो काढण्याआधी जागा जरा स्वच्छ केली असती तर फोटो स्वच्छ आले असते, असे उगाच आपले एक मत बरं का! - (स्मार्ट फोन वापरणारा स्मार्ट) सोकाजी

In reply to by सोत्रि

आजकाल जाणून बुजून थोडी अस्वच्छता ठेवणे, अजागळपणा दाखवणे हेही एक स्टाईल स्टेटमेंट असते. इथेही तसे काही असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

In reply to by श्रीरंग_जोशी

>>आजकाल जाणून बुजून थोडी अस्वच्छता ठेवणे, अजागळपणा दाखवणे हेही एक स्टाईल स्टेटमेंट असते. इथेही तसे काही असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ते शिंचं ध्यानातच आलं नाही माझ्या!!! सॉरी.. - (पिवळा बाडिस * ) सोकाजी [*]पिडांकाकांची माफी मागून

तुमच्याकडे BSNL चे नेट कनेक्शन आहे का हो..? ६ / ७ वर्षांपूर्वीचा धागा आत्ता अपडेट झाला आहे.

In reply to by मोदक

BSNL चे वायर्ड नेट कनेक्शन सर्वात जलद आहे असे मित्रांकडून ऐकावयास मिळते. टाटा फोटॉनवाल्यांनी BSNL ला मंद म्हणून नावे ठेवणे म्हणजे कासवाने सशाला तू खुपच हळू चालतोस म्हणण्यासारखे आहे.

In reply to by धन्या

कुणीही BSNL ला नावे ठवलेले पटत नाही कारण टेडा है पर मेरा है ;) - (BSNL सेवा वापरणारा संतुष्ट ग्राहक) सोकाजी

In reply to by धन्या

टाटा फोटॉनवाल्यांनी BSNL ला मंद म्हणून नावे ठेवणे म्हणजे कासवाने सशाला तू खुपच हळू चालतोस म्हणण्यासारखे आहे.
किंवा आयटीतील इंजीनेराने आयटीतील BCom ला "तुला काहीच येत नाही" असे म्हणण्यासारखे ;-)

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

चान्स पे डान्स करणे म्हणतात ते हेच का? :) बाय द वे, आयटीतील BCom वर्ड, एक्सेल वगैरे मध्ये एक्स्पर्ट असतात. ;)

नवीन संशोधन तुम्हाला तर पद्मश्री मिळायला हव

c1 भावना समजु शकतो.चांगल्या माहितीपुर्ण,रोमहर्षक आणि रोचक धागा काढल्या बद्दल धन्यवाद. (नाहीतर हल्लीचे धागे कुणीतरी नविन केमेरा घेतो अन टेकडीवरील ट्रेकचे फोटो टाकतो. पाक क्रुती भागात तर नुसते जळावु धागे आग आग होते पोटात.) तुमच्या मुळे माझ्यासारख्या वाचनमात्र सभासदाची मिपा वर लॉगईन होण्याची ईच्छा झाली. पिडा काका. त्या कॉर्डचा गळा आवळण्यास खुप चांगला उपयोग होतो. cord पुजा बाई तुम्ही हे का नाही घेत? ;-) c2

अविनाशकुलकर्णी उपयुक्त माहिती दिलीत धन्या यांनी प्रतिसादांमधे पहिली जागा पटकावून अशी घाण करायला नको होती पुढचे लोकही डोळे मिटून तिच पिवळी रेघ पुढे ओढत राहतात. नीलकांत यांनी इतक्यातच केलेली चर्चा अशी वाया जाऊ देऊ नये हे पहावे

In reply to by आशु जोग

धन्या यांनी प्रतिसादांमधे पहिली जागा पटकावून अशी घाण करायला नको होती
सॉरी बरं का. तुमच्या भावना दुखावल्याबद्दल मी दिलगीर आहे. इथून पुढे मी तुमच्या आणि अकुंच्या कुठल्याच धाग्यावर प्रतिसादांमध्ये पहिली जागा पटकावून (फक्त पहिलीच बरं का.) अशी घाण करणार नाही.

In reply to by आशु जोग

अय्या ! कमालेय ! आशु काका माझ्या कुठल्या प्रतिसादात पिवळी रेघ दीसलिवो ?? सगळ्या रेघा काळ्याचेत :-/ कायपण बोल्तात बाबा :-/

In reply to by आशु जोग

तुमचं म्हणणं मला एकदम मान्य आहे. ईतक्या आशयगर्भ, अभिजात लेखनाच्या पहिल्याच प्रतिसादात मी घाण करायला नको होती. माझी चूक माझ्या लक्षात आली आहे आणि त्यासाठी मी आपली माफीही मागितली आहे. पुन्हा एकदा विनंती करतो, उदार मनाने मला माफ करा.

In reply to by धन्या

तुम्हाला इतके वाईट वाटले असेल तर तुम्ही तो साष्टांग नमस्काराचा फोटो का टाकत नाही इथे..? कोण जाणे, कदाचित तुमच्या ही&हि प्रतिसादाचे पापक्षालनही होईल!

In reply to by मोदक

आम्ही पाप पुण्य वगैरे काही मानत नाही. त्यामुळे आमच्या ही&हि प्रतिसादाचे पापक्षालन होण्याचा प्रश्नच येत नाही. परंतू आम्ही मानवतेचे पुजारी आहोत. कोणा मानवाला दुखावणे (मग त्यामागे ठोस कारण का असेना) आमच्या बुद्धीला पटत नाही. म्हणून आम्ही बंधू आशु जोग यांची क्षमायाचना करत होतो.

In reply to by धन्या

तुम्ही जर मानवतेचे पुजारी असाल तर मानवाने मानवांसाठी काढलेल्या दोन मानवनिर्मीत वस्तूंच्या संयोगातून घडणार्‍या सुयोग्य वापराबाबतच्या माहितीपूर्ण धाग्यावरती पिवळ्या रेघा का ओढत आहात..? यामुळे काही मानवांनाच त्रास होतो.

In reply to by मोदक

दोन मानवनिर्मीत वस्तूंचा संयोग होतो हे नव्यानेच कळतंय. आम्हाला सर्वज्ञानाची काविळ झालेली असल्यामुळे आम्ही माहितीपुर्ण धाग्यांवर पिवळ्या रेघा ओढल्या. बंधू आशु जोग यांनी आमची चुक आमच्या लक्षात आणून दिली आहे. असो. आपण या धाग्याचा खरडफळा केला आहे हे कुणा संपादकाच्या लक्षात येण्याआधीच हे संभाषण आपण खरडवहीत नेऊ या.

In reply to by धन्या

धनाजीराव तुम्ही काहीही करणे अपेक्षित नाहीयेय, तेच विचारत आहेत की साफ अरू का म्हणून ;) - (साफ झालेला) सोकाजी

आता बाथरुम बांधणे आले... आणि त्यात वापरायला नळी घेणे आले.

In reply to by परिकथेतील राजकुमार

ईथे बाथरुम पेक्षा "नळी" महत्वाची आहे रे बाबा. "गुंतागुंती" टाळायची असल्यास "नळी" मधे गुंतवणुक करा.

In reply to by jaypal

@"गुंतागुंती" टाळायची असल्यास "नळी" मधे गुंतवणुक करा.>>> =)) अकुंचा धागा,आणी त्यावर अनेकांची जागा =))

आता आधी घर बांधणे आले, मग त्यात बाथरूम बांधणे आले, आणि मग त्यात वापरायला नळी घेणे आले... पण बाथरूम मधे नळीने करायचे काय, हे कळलेच नाही... आणि मग फोन घेणे आले, आणि कॉर्डचा गुंता होत नसेल, तर मुद्दाम करणे आले... अबब.... मिपावरचे लेख वाचून एवढे सगळे करावे लागणार, त्यापेक्षा मिपा वाचणेच बंद करावे की काय?