विचारणा व तोड सुचवा

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
24 Feb 2013 - 1:16 am

मित्र हो व विशेषतः स्मार्ट मोबाईल व टॅब वापरणाऱ्यांनो,

मी एल जी इ 400 स्मार्टफोन वापरतो. त्यात ‘मल्टीलिंग की बोर्ड’ हे ऎंड्रॉईड बेस्ड ऎप वापरून मराठीत ‘इन्सक्रिप्ट’ पद्धतीने लेखन करतो. पण जाड बोटांनी बारीक चौकोनी कीज दाबताना 10 पैकी 4 वेळा नको ती अक्षरे दाबली जातात. मोठ्या आकारात इतर कंपन्यांचे टॅब घेऊन त्यावर टाईप करायला सोईस्कर होते. पण त्यात गैरसोय अशी की ज्ञ, श्री, क्ष अशी युक्ताक्षरे व प्र त्र अशी जोडाक्षरे तुटक्या प्रकाराने दिसतात व विरस होतो. शिवाय ह्रस्व वेलांटी पुढील अक्षरावर पडते. जसे शशकिांत. मित्रांनो, आपण यावर काही तोड सुचवावीत. शिवाय आपण 7 ते 10 इंचापर्यंत टॅबचे व अन्य पर्याय कि ज्यात एल जी कंपनीच्या मोबाईल प्रमाणे सर्व अक्षरे मराठीतील वापरा प्रमाणे उमटतील - सुचवावेत. मी साधारण 10 हजारापर्यंत खर्च करू शकेन.

(माझी ही विचारणा आपणा सर्वांना आहे की आपण मल्टी लिंग की बोर्ड वापरून पाहिलात काय? त्यातील "शब्द सहाय्य" इतर कुठल्याही पद्धतीत पाहण्यात नाही. संपुर्ण शब्द टाईप करायला लागत नाही. कारण तो शब्द आपल्या समोर येऊन उभा असतो! तो दाबला की पुढील अक्षरे आपोआप टाईप होऊन बसतात. त्यामुळे वेळ व शुद्ध लेखनाचे कटकटीचे काम वाचते.)

वावरबातमीअनुभवमतशिफारससल्ला

प्रतिक्रिया

पैसा's picture

26 Feb 2013 - 6:21 pm | पैसा

हा प्रॉब्लेम फॉण्ट रेन्डरिंगचा आहे. मला वाटते सॅमसुंगच्या मोबाईल आणि टॅबमधे देवनागरी फॉण्ट्स व्यवस्थित दिसतात. तसा माझ्याकडे एक स्वस्तातला टॅब आहे Byond Mi-book Mi1 त्यावर देवनागरी अक्षरे व्यवस्थित येतात. पण मी त्यावर एनीसॉफ्ट कीबोर्ड वापरते. तो इन्स्क्रिप्ट नाही, तर फोनेटिक आहे.

नाना चेंगट's picture

26 Feb 2013 - 6:25 pm | नाना चेंगट

>>>पण जाड बोटांनी बारीक चौकोनी कीज दाबताना 10 पैकी 4 वेळा नको ती अक्षरे दाबली जातात.

बोटं बारिक करण्याचा प्रयत्न करा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Feb 2013 - 10:50 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

किबोर्डची बटनं लहान वाटतात हे खरं आहे, पण मल्टीलिंग की बोर्ड मला जरा वापरायला कठीन वाटला. प्रत्येक वेळेस भाषा निवडतांना सेटींग मधे जावून भाषा बदलावी लागते का ? आणि मराठी टंकन करतांना मला शब्दांचे पर्याय काही आले, नाही ! कीबोर्डची सेटींग कुठे चुकते आहे काय ?

-दिलीप बिरुटे

शशिकांत ओक's picture

27 Feb 2013 - 8:31 pm | शशिकांत ओक

डॉ. दिलीप जी, प्रत्येकवेळी भाषा निवडाची गरज नाही एकदा मराठी निवडले की झाले. शिवाय आपण प्लग इन मराठी जोडले असेल तर शब्द पर्याय येतील असे वाटते. माझ्याप्रमाणे हिंन्दी मधेही एकांनी मात्रेची तक्रार केलेली होती.

समस्या : अभी भी एक समस्या है, वो है, हिन्दी में मात्रा का सही नहीं दिखाना, कुछ शब्दो में हिन्दी की मात्रा सही से नहीं दिखती, जहां भी आधे शब्द है, अथवा ई की मात्रा है, वहाँ पर दिक्कत है, ये दिक्कत गूगल की तरफ से है, उसमे गूगल बाबा ही कुछ कर सकते है, लेकिन फिर भी ना होने से कुछ होना तो भला है, है कि नहीं?

मात्र ही मात्रेची किंवा जोडाक्षराची समस्या मला एलजीच्या मोबाईलवर मुळीच वर येत नाही. पण अन्य बियॉंड, बाबा, सॅमसंग आदि टॅब हाताळताना येते असे जाणवले. आपणास हवे तर ९८८१९०१०४८ वर बोलू या.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Feb 2013 - 10:24 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ओक साहेब, एकदा मराठी निवडली की पुन्हा इंग्रजी भाषा निवडायची कशी असं मला विचारायचं आहे. प्लग इन टाकलं आहे. मराठी शब्द लिहितांना पर्याय येत आहेत. मला वेलांट्याच्या ठिकाणी असं कसं दिसतंय ? बघा बरं जरा.

-दिलीप बिरुटे

शशिकांत ओक's picture

2 Mar 2013 - 11:31 pm | शशिकांत ओक

सर, वेलकमच्या स्क्रीनच्या ४ नंबरवर इनेबल लॅंगवेजेस मधे त्यावर एन्टर केले की लँग्वेजेस असा तिसरा ऑप्शन दिसतो. युज अल्फा फॉंट्स च्या नंतर. त्यात स्क्रोल डाऊन करून इंग्लिश (य़ुके) असा ऑप्शन (मी वापरतो) वापरा. शिवाय अतिशय हलक्याहाताने ढकला. मग स्पेस बार वर जरा जास्त वेळ दावबले की इंग्रजी व मराठी असे दोन पर्याय दिसू लागतात. त्याला निवडून दोन्ही भाषातून लिखाण करायला येते. शिवाय इंग्रजीसाठीचे प्लग इन्स आपण लावालच. स्वरांच्याजागी अन्य कुठल्यातरी अन्य अनेक भाषेचे चौकोनी कीज त्यावर दिसत आहेत त्यातील आणखी कुठली तरी भाषा नकळत निवडली गेला आहे का पहा.
मला इतपत खुलासा करता येतो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Mar 2013 - 11:52 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मदतीबद्दल आभार. मल्टी लिंग की बोर्ड मला फारसा आवडला नाही. लिपिकारचा ट्रायल व्हर्जन हिंदी,मराठीचे उत्तमच. पण, गुगल हिंदी इनपूट वापरुन बघा. मला वाटतं मल्टीलिंग पेक्षा वापरायला सोपे जाईल. आणि बोटाचा वापर करतांना एकावेळेस एकच अक्षर उमटेल. अर्थात मल्टीलिंग की बोर्डला आपण तोड सुचवायची सांगितली ती मला काही जमले नाही. धन्स.

-दिलीप बिरुटे

शशिकांत ओक's picture

27 Feb 2013 - 8:35 pm | शशिकांत ओक

विक्षिप्त बाईंनी यामधे लक्ष घालून काही उपाय सुचवले तर आवडेल.
माजा मो.नं ४८ नसून ४९ ने संपतो...