संगणकावर इंटरनेटचा वेग ५०० टक्क्यांनी कसा वाढवाल ?

यशोधन वाळिंबे's picture
यशोधन वाळिंबे in काथ्याकूट
23 Feb 2013 - 7:26 pm
गाभा: 

संगणकावर इंटरनेट वापरताना बर्याच वेळा आपल्याला अपेक्षित वेग मिळत नाही आणी त्यामुळे आपली निराशा होते. इंटरनेट वर आधीच उपलब्ध असलेल्या युक्त्या वापरून आपल्याला इंटरनेटचा वेग वाढवला तरी देखील तो २० ते ३० टक्क्यांनीच वाढतो. परंतु इथे दिलेल्या युक्तीमुळे तुमच्या इंटरनेटचा वेग हा ५०० टक्क्यांनी नकीच वाढेल. त्यामुळे या पद्धतीने तुम्हाला संगणकावर इंटरनेट वापरताना कमी वेगाचा त्रास होणार नाही हे नक्की. आणी तुमचा अनुभव इथे सांगायला विसरू नका..!!

प्रतिक्रिया

अविनाशकुलकर्णी's picture

23 Feb 2013 - 7:39 pm | अविनाशकुलकर्णी

भ्या वाटते..मेक्यानिकल असल्याने व आय टी चे शश्प कळत नाहि ..मागे असाच म्यु तोरेन्ट साठी वाचुन प्रयोग केला व हात पोळाले.
असो शांपणे विचार करुन देवाचे नाव घेतो व ट्रायतो..
ओपेरा च वापरावा लागतो का?

यशोधन वाळिंबे's picture

23 Feb 2013 - 8:02 pm | यशोधन वाळिंबे

आणी झोल होऊ नये म्हणुन सिस्टम रीस्टोर मार्क करून ठेवा कि..
हिकडे दिलया त्यो कसा करायचा त्ये.. नाहीतर करा डायरेक्ट काय बी नाय व्हाणार तुमच्या संगणकाला..!!

लागणार ना?संगणकावर मोबाइल व्हर्जनचा एक्सप्लोरर वापरुन स्पीड मिळत असेल तर तो वापरताना काही कमतरता असेल कि?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Feb 2013 - 8:28 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

च्यायला, पाचशे टक्क्यांनी इंटरनेटची स्पीड वाढेल म्हणून हजाराच्या स्पीडने सर्व प्रोसीजर करुन पाहिली.
आयुष्यात अनेक अपेक्षाभंगाचे प्रसंग आले, त्यात ही एक भर इतकेच. धन्यवाद.

अजून येऊ द्या.

-दिलीप बिरुटे

आनंदी गोपाळ's picture

23 Feb 2013 - 8:32 pm | आनंदी गोपाळ

पाव इंची नळाच्या कनेक्सनला २॥ इन्ची तोटी लावली म्हनून पाणी बदाबदा कसं गळावं हो?
ही त्यातलीच गत..

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Feb 2013 - 8:38 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

खरंय.....!!!

माझ्या हावरटपणाचीही बरी खोड मोडली, बाकी काय ! :)

-दिलीप बिरुटे

दादा कोंडके's picture

23 Feb 2013 - 11:02 pm | दादा कोंडके

तेनला वाटलं मोटर आसल.

दादा कोंडके's picture

23 Feb 2013 - 8:35 pm | दादा कोंडके

:))

१ एप्रिलला तरी धागा टाकायचा की.

उगा काहितरीच's picture

23 Feb 2013 - 8:52 pm | उगा काहितरीच

+1 :( :( :(

धन्या's picture

23 Feb 2013 - 8:55 pm | धन्या

म्हणजे तुम्ही याच न्यायाने सात महिन्यांत दुप्पट तीप्पट वगैरे पैसे देणार्‍या योजनांमध्ये पैसे टाकले असणार.

=))
बाकी आनंदी गोपाळ यांच्याशी सहमत.
आडातच नसेल तर पोहर्‍यात यायचं कुठुन म्हणतो मी.

पैसा's picture

23 Feb 2013 - 9:04 pm | पैसा

म्हणजे तो ब्राउझर मोबाईल साईट्स ओपन करत असणार. त्यांचा आकार लहान असतो. त्यामुळे स्पीड वाढल्यासारखे वाटेल एवढेच. खरी स्पीड वाढवायची तर तुमच्या ब्रॉडबँडची स्पीड आणि कॉम्प्युटरची रॅम वाढवायला पाहिजे बरोबर ना?

असो. मिपावर स्वागत आहे. लिहीत चला!

jaypal's picture

23 Feb 2013 - 9:22 pm | jaypal

तुझी कामेंट वाचुन बोलती बंद झाली. तु एव्हडी टेक्नोसेव्ही आहेस माहीत नव्हत.
ईंग्लीश-व्हिंगलीश मधल्या श्री देवीची आठव्ण झाली. __/\__
sh

पैसा's picture

23 Feb 2013 - 9:23 pm | पैसा

:D

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Feb 2013 - 11:05 pm | डॉ सुहास म्हात्रे

आत्ताआत्ताच हा धागा आला होता ना? ___/\___

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

23 Feb 2013 - 11:20 pm | निनाद मुक्काम प...

मी किनई खूप हुशार आहे
असे धागे पहिले की सर्व प्रथम प्रतिसाद वाचतो.
बिरुटे सरांचा प्रतिसाद वाचला आणि मूळ लेख न वाचता हा प्रतिसाद लिहिला.
काही लेखाचे शीर्षक वाचून जाणकार मिपाकर पहिले प्रतिसाद वाचतो.

अविनाशकुलकर्णी's picture

23 Feb 2013 - 11:31 pm | अविनाशकुलकर्णी

एक शंका ..या मुळे ओपेराचा स्पीड वाढतो का म्यु तोरेन्त वरुन डाऊन लोड चा स्पिड पण वाढतो??

परिकथेतील राजकुमार's picture

26 Feb 2013 - 12:24 pm | परिकथेतील राजकुमार

त्यापेक्षा थोडे कष्ट करून, चार पैसे जास्त मिळवून अधिक वेगवान कनेक्शन का लावून घेत नाही ?

शैलेन्द्र's picture

26 Feb 2013 - 4:28 pm | शैलेन्द्र

:).. काय्यपण काय बोलता..

आदिजोशी's picture

27 Feb 2013 - 1:15 pm | आदिजोशी

पुणेकर मंगळावर गेले तरी आपला अंगभूत खवचटपणा आणि हलकटपणा सोडत नाहीत. (का सोडावा?)
हलकट शिरोमणी परा शास्त्रींचा विजय असो.

(प्रतिसाद परा बद्दल असल्याने खवचट आणि हलकट ऐवजी प्रत्येकाने आवडीची विशेषणं टाकून घ्यावीत.)

यशोधन वाळिंबे's picture

26 Feb 2013 - 5:22 pm | यशोधन वाळिंबे

@ वेताळ यांस,
संगणकावर मोबाइल व्हर्जनचा एक्सप्लोरर वापरुन स्पीड मिळतो अर्थात त्यात थोडी नाही तर बरीच गम्मत केली असते म्हणुन आपल्याला वेग मिळतो. पण हि गम्मत दृश्य स्वरुपात नसते. म्हणजे १००० पिक्सलसच्या छायाचित्रात काटछाट करून ५० ते ६० पिक्सलस मध्ये दाखवला जातो. परंतु मी पैज लाऊन सांगु शकतो कि तुम्ही तो फरक ओळखु शकणार नाही. जावास्क्रिप्टस आणी इतर बाबतीतही तीच गम्मत..

@ प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांस,

हजाराच्या स्पीडने सर्व प्रोसीजर केलीत पण थोडासा संयम राखुन सांगितल्याप्रमाणे केली असती तर आज तुमची प्रतिक्रिया वेगळी असती. आणी पुढील आयुष्यात अपेक्षाभंग टाळण्यासाठी देखील संयम पाळाल अशी आशा..!!

@ आनंदी गोपाळ यांस,
अहो आपण तोटी नाही, मोटर लावण्याची गोष्ट करत आहोत..

@ पैसा,

होय ज्या साईटस मोबाईल वर्जन सपोर्ट करतात त्या तेच पान उघडतात परंतु जर मी.पा सारख्या साईटस उघडल्या तर मला वाटत नाही काही अडचण उद्भवेल.

@ निनाद,

आपल्या विद्वत्तेला नमस्कार करून एका मित्राची आठवण सांगू इच्छितो,

तो सगळ्या वर्तमानपत्रातील लेखांची नावे एका कोऱ्या कागदावर लिहून काढायचा, आणी प्रत्येक लेखाखाली उत्तम, अप्रतिम, अशा पानभर प्रतिक्रिया पाठवायचा आणी तो आजतागायत तसे करतो, विशेष म्हणजे त्याच्या प्रतिक्रिया बऱ्याच वर्तमानपत्रात छापून येतात. खरी गम्मत म्हणजे त्याने एकही लेख वाचला देखील नाही. त्याचा हा लबाडीपणा उघड का होत नाही हा प्रश्न मी त्याला विचारल्यावर तो म्हणाला 'कोणत्याही लेखाबद्दल चांगले लिहिण्यासाठी तो वाचावा लागत नाही पण जर वाईट काही लिहायचे असेल तर बारकाईने अभ्यास करावा लागतो.. असो

@ अविनाश कुलकर्णी,
यामुळे फक्त ओपेराचा वेग वाढतो. डाउनलोडचा वेग वाढवण्यासाठी इंटरनेट डाऊनलोड मॅनेजर उत्तम पर्याय आहे.

@ परिकथेतील राजकुमार,
आपल्या सर्वात बहुमुल्य प्रतिक्रियेसाठी शतशः आभार.

परिकथेतील राजकुमार's picture

26 Feb 2013 - 5:26 pm | परिकथेतील राजकुमार

यामुळे फक्त ओपेराचा वेग वाढतो. डाउनलोडचा वेग वाढवण्यासाठी इंटरनेट डाऊनलोड मॅनेजर उत्तम पर्याय आहे.

शिर्षकात ' संगणकावर इंटरनेटचा वेग ५०० टक्क्यांनी कसा वाढवाल' मध्ये मग ' संगणकावर ओपेराचा वेग ५०० टक्क्यांनी कसा वाढवाल' असे करुयात काय?

बाकी हा वेग नक्की ५००% च वाढतो ह्याचा काही विदा / पुरावा मिळेल काय ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Feb 2013 - 9:29 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>> हजाराच्या स्पीडने सर्व प्रोसीजर केलीत पण थोडासा संयम राखुन सांगितल्याप्रमाणे केली असती तर आज तुमची प्रतिक्रिया वेगळी असती. आणी पुढील आयुष्यात अपेक्षाभंग टाळण्यासाठी देखील संयम पाळाल अशी आशा..!!

प्रिय वाळिंबे साहेब, आपण सांगितल्या प्रमाणे अगदी व्यवस्थित अशी नेटची स्पीड वाढविण्यासाठीची प्रक्रिया पार पाडली अजिबात स्पीड वाढत नाही. मला आठवतंय मी माझ्या नोकिया फोनसाठी वॅप साइट्स संगणकावर उघडल्या पाहिजेत त्यासाठी एक अ‍ॅप्लीकेशन टाकलं होतं. 'युजर एजंट बहुतेक' तेव्हा संगणकावर असं एक ब्राऊजर उघडायचं त्यातलाच हा प्रकार. बाकी, काही विशेष नाही.

आपण अजूनही आपल्या मतावर ठाम असाल तर पाचशे टक्के स्पीड वाढते असं सिद्ध करणारं एकेक छायाचित्र दाखवा. आपण आता म्हणता की ऑपेरा ब्राऊजरचा स्पीड वाढतो. डाऊनलोडसाठी डाऊनलोड म्यानेजर टाका. शीर्षक काय ? सांगता काय ? हे सर्व कै च्या कै आहे.

-दिलीप बिरुटे

धन्या's picture

27 Feb 2013 - 9:58 pm | धन्या

हजाराच्या स्पीडने सर्व प्रोसीजर केलीत पण थोडासा संयम राखुन सांगितल्याप्रमाणे केली असती तर आज तुमची प्रतिक्रिया वेगळी असती. आणी पुढील आयुष्यात अपेक्षाभंग टाळण्यासाठी देखील संयम पाळाल अशी आशा..!!

सर, आता आंतरजालावरुन व्हीआरेस घ्या. ;)

आनंदी गोपाळ's picture

27 Feb 2013 - 10:28 am | आनंदी गोपाळ

@ आनंदी गोपाळ यांस,
अहो आपण तोटी नाही, मोटर लावण्याची गोष्ट करत आहोत..

अभ्यास वाढवा.
इंटरनेटचा स्पीड वाढवणे म्हणजे माझ्या कांपुटरात येणार्‍या डेटाचा स्पीड वाढवणे असे होते.
१००० पिक्सेलचे चित्र ५० पिक्सेलमधे बसते अन क्वालीटीतील फरक ध्यानी येतच नाही असे तुमचे होत असेल, तर तुम्हाला तुमचे डोळे व अनेक इतर महत्वाचे अवयव तपासून घेणे गरजेचे आहे असे माझे प्रोफेशनल ओपिनियन आहे ;)

अन त्या स्वाक्षरीतली माहिती जरा कमी बटबटीत करा. इरिटेटिंग प्रकार आहे तो.

इरसाल's picture

27 Feb 2013 - 12:01 pm | इरसाल

अन त्या स्वाक्षरीतली माहिती जरा कमी बटबटीत करा. इरिटेटिंग प्रकार आहे तो.

म्हणजे बटबटीत राहु द्या असेच म्हणायचे आहे ना तुम्हाला ;)

आनंदी गोपाळ's picture

28 Feb 2013 - 8:19 pm | आनंदी गोपाळ

समजावणीच्या सुरात सांगलं तं उपेग झाला का नी?

वेताळ's picture

26 Feb 2013 - 5:37 pm | वेताळ

अद्रुश्य असते.

माझीही शॅम्पेन's picture

26 Feb 2013 - 5:50 pm | माझीही शॅम्पेन

...........................धन्यवाद

एकंदरीत एक्सप्लोरर हा वेगात / भासमान वेगाताला अतिशय महत्वाचा घटक असलयाने - ही युक्ती काम करत असावी असे वाटते

करून बघतो आणि सांगतो

माझीही शॅम्पेन's picture

26 Feb 2013 - 6:00 pm | माझीही शॅम्पेन

............. मला ब्राउझर म्हणयचय :)

अविनाशकुलकर्णी's picture

26 Feb 2013 - 6:09 pm | अविनाशकुलकर्णी

देवाचे नाव घेतले व आपल्या ब्लोग मधे सांगितले तसे केले पण हे नशिबाला आले काय करावे??काहि उपाय?

..

परत केले पण हाच मेसेज येत आहे

नगरीनिरंजन's picture

27 Feb 2013 - 11:05 am | नगरीनिरंजन

इंटरनेटचा (म्हणजे इंटरनेटवरून डेटा ट्रान्स्फरचा) वेग Million Bits Per Second अर्थात Mbps मध्ये मोजतात.
तुम्ही दिलेली 'युक्ती' वापरून १ Mbps चा ५ Mbps वेग होणार आहे का?
नसेल तर दिशाभूल करणारे शीर्षक वापरू नका.

खबो जाप's picture

27 Feb 2013 - 11:07 am | खबो जाप

हावरट पानाचा कळस आहे.
हे वाचा

"Opera Mobile Emulator is the desktop version of Opera’s smart phone browser.

Opera Mobile Emulator renders pages as close as you can get to how it would look on a real phone. It can be paired with Opera Dragonfly for an effective testing environment before taking it to the physical phone."

"It’s a small, native application that’s easy to install on your desktop machine and runs exactly the same code as its mobile phone version — that way, you can be assured that what you’re seeing on your test environment is practically identical to the experience your end users will get."

म्हणजे हा एक इमुलेतर आहे जो आपल्याला मोबाईल वर लोड होनाऱ्या वेब साईट्स दाखवतो, ज्याने डेवलपर आपल्या साईट्स मोबाईल वर नक्की कशा दिसतील हे पाहता येते.
राहील स्पीड बद्दल ह्या application वर लोड होणार्या सगळ्या साईट्स ह्या मोबाईल व्हर्जन असल्यामुळे त्या मुळातच खूप कमी डेटा वापरतात त्यामुळे लवकर लोड होतात आणि स्पीड वाढल्याचा भास होतो.

योग्य माहिती इथे दिल्याबद्दल धन्यवाद..

हाहाहा.. लेख वाचून करमणून झाली. मुळात आडात नसेल तर पोहर्‍यात कुठून येणार.. त्याबद्दल ननिशी १००% सहमत..

वेताळ's picture

27 Feb 2013 - 11:21 am | वेताळ

सगळ्या बाबतीत पार्टटाईम आहेत. ते लेखक कम वाचक कम संशोधक कम मेकॅनिक कम टिकाकार कम संगणकतज्ञ कम विद्यार्थी कम शिक्षक ..........इत्यादी कामे ते एकट्यानी करतात.

गब्रिएल's picture

27 Feb 2013 - 11:54 am | गब्रिएल

म्हनजे तुमाला वाळिंबे सायेब लेखक आणि बाकी सर्व कम (= हिंदी "कम" = मराठी "कमी") आहेत अस म्हणायच आहे काय? ;) :))

संजय क्षीरसागर's picture

27 Feb 2013 - 1:40 pm | संजय क्षीरसागर

यशोधन प्र. वाळिंबे, प्रथम वर्ष (वाणिज्य) - चालु , सर परशुरामभाऊ महाविद्यालय (पुणे), व्यवसाय - विद्यार्थी

सदर आयडी स्वतःच्या ट्रायलसाठी इतरांना कामला लावण्याचा उद्योग करतोय. त्याच्या कोणत्याच पोस्टमधे स्वतःचं काहीही काँट्रिब्यूशन असणं शक्य नाही.

तुमच्याकडे आर्टिकलशिपला घ्या त्यांना... :)

असे प्रयोग कामात केले की मलाच पुन्हा आर्टिकलशिप करावी लागेल!

प्रसाद१९७१'s picture

27 Feb 2013 - 2:42 pm | प्रसाद१९७१

यशोढ्न बाळ - थोडे दमाने घे. आधी आपले शिक्षणाची नाव किनार्‍यावर लाव, मग असले तारे तोड.

यशोधन वाळिंबे's picture

27 Feb 2013 - 8:52 pm | यशोधन वाळिंबे

@ अविनाशकुलकर्णी,
तुम्हाला आलेली अडचण ही तांत्रीक आहे. ह्या दुव्यावर भेट द्या आणी दिल्याप्रमाणे अनुसरण करा.

बाकी उपस्थित विद्वान लोकांपुढे ह्या अज्ञानी बालकाने काही बोलणे उचित नाही..!!

यशोधन वाळिंबे's picture

27 Feb 2013 - 9:34 pm | यशोधन वाळिंबे

तुम्हाला आलेली अडचण ही तुमच्या संगणकातील तांत्रीक अडचण आहे.

यशोधन वाळिंबे's picture

27 Feb 2013 - 9:32 pm | यशोधन वाळिंबे

लेखक कम वाचक कम संशोधक कम मेकॅनिक कम टिकाकार कम संगणकतज्ञ कम विद्यार्थी कम शिक्षक

उर्फ पुणेकर ..

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Feb 2013 - 9:37 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वाळींबे, इन्फोबल्ब : ज्ञान हे सर्वोच्च आहे, माहिती तंत्रज्ञान, सामान्य ज्ञान व इतर माहिती देणारा ब्लॉग. हा जाहिरातीचा फलक जरा बारक्या फाँट मधे घेता येऊन त्याचा झोका जरा कमी करता येईल काय ? लैच बटबटीत वाटतं राव.

-दिलीप बिरुटे

तर्री's picture

27 Feb 2013 - 9:51 pm | तर्री

ती एक सौम्य , सुखकारक , तळटीप आहे. तुम्हांला त्रास होत असेल तर डोळे तपासून घ्या एकदा. मी घेतले आणि चर्मचक्षु (आणि अंत:चक्षु दोनीही) मध्ये बिघाड सापडला - स्पीड कमी आहे म्हणतात. मोठया बाहुली चा स्पीड कमी आहे ५०० पट वाढ होणे अपेक्षित आहे - इति डॉ.

अविनाशकुलकर्णी's picture

27 Feb 2013 - 9:52 pm | अविनाशकुलकर्णी

तुम्हाला आलेली अडचण ही तुमच्या संगणकातील तांत्रीक अडचण आहे.
==============================================
म्हनजे बहुतेक विंडो परत लोड करावि लागणार

आता घ्या देवाचं नांव आणि काय. एक म्हण आहे `नीम हकीम, जान खतरेमे!

च्यायला आमचा कोदा कुठे असतो हल्ली देव जाणे. ईथे त्याचा गुरु आला आहे.

शैलेन्द्र's picture

27 Feb 2013 - 10:55 pm | शैलेन्द्र

काहीही काय..
कुठे कोदा- कुठे यदा (यशोधन दादा)

भडकमकर मास्तर's picture

28 Feb 2013 - 5:29 am | भडकमकर मास्तर

अहा.. तुमच्या त्या लिन्कांमुळे ते जुने दिवस परत आठवले...

श्रीरंग_जोशी's picture

28 Feb 2013 - 12:00 am | श्रीरंग_जोशी

वेग पाचपटीने वाढेल ऐवजी वेग ५०० टक्क्यांनी वाढेल असे वाक्य एकदम लक्षवेधी बनते.

बाकी अधिक वेगापेक्षा जाहिराती कमी बघाव्या लागाव्या म्हणून चतुरभ्रमणध्वनीकरिता बनवलेल्या संस्थळांना मी भेट देतो. जसे मटा ऐवजी मटा-मोबाईल.

तर्री's picture

28 Feb 2013 - 8:26 am | तर्री

चतुरभ्रमणध्वनीकरिता :)

सन्कु's picture

28 Feb 2013 - 12:06 am | सन्कु

इथे तुम्ही इंटरनेटचा वेग तपासु शकता...

यशोधन साहेब, तुमचं खुपच कौतुक वाटतं. वाणिज्य पदवीच्या प्रथम वर्षाला असूनही तुम्ही आयटी क्षेत्रात जी प्रगती केली आहे तिने आमचा ऊर भरुन आला आहे.

तुमच्यासारखाच आमचा एक जुना मित्र होता जो नेहमी तुमच्यासारखाच जगाला येस वी आर अशा खणखणीत आवाजात चार बोल सुनवायचा. आम्हीही आपुलकीच्या नात्याने त्याला चार शब्द ऐकवले होते.

असो. तुमच्या माहितीसाठी,

हजाराच्या स्पीडने सर्व प्रोसीजर केलीत पण थोडासा संयम राखुन सांगितल्याप्रमाणे केली असती तर आज तुमची प्रतिक्रिया वेगळी असती. आणी पुढील आयुष्यात अपेक्षाभंग टाळण्यासाठी देखील संयम पाळाल अशी आशा..!!

हे तुम्ही ज्यांना वर एका प्रतिसादात लिहिलं आहे त्यांनी स्वाध्याय परीवारावर पिएचडी केलेली असून मराठीचे प्राध्यापक आहेत. माणूस नुसताच शिक्षणाने आणि पदाने मोठा नाही तर माणूस म्हणूनही तितकाच मोठा आहे. मला वाटतं तुम्ही लहान तोंडी खुप म्हणजे खुपच मोठा घास घेतला आहे.

अभ्या..'s picture

28 Feb 2013 - 1:13 am | अभ्या..

आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे धनाजीराव एक गोष्ट आहे. प्रा.डॉ. बिरुटे सरांचे नवनवीन तंत्रातले अद्यावत ज्ञान नवीन पीढीलाही लाजवेल असे आहे. त्यांची नवनवीन फंडे वापरुन बघायची उत्सुकता कायमच असते त्यामुळेच त्यांना असे वाक्य लिहिणार्‍या आयडीने खरोखरच लहान तोंडी मोठा घास घेतला आहे

यशोधन वाळिंबे's picture

28 Feb 2013 - 12:50 pm | यशोधन वाळिंबे

खेद..!!

कसला खेद वाटतोय तुम्हाला? तुमच्यासारख्या प्रज्ञावान माहिती तंत्रज्ञान तज्ञाची तुलना एका मराठीच्या प्राध्यापकाशी केली याचा का?

दोन चार शब्द जास्त लिहिले असते तर आम्हा मंदबुद्धी वाचकांच्या डोक्यात प्रकाश पडला असता.

(च्यायला, पराशेठने याच लेखकाच्या दुसर्‍या धाग्यावर "आपला माजोरीपणा अतिशय आवडला." असा प्रतिसाद दिला आहे तो योग्यच आहे. एव्हढं रामायण लिहिल्यानंतर साहेब फक्त "खेद" हा एव्हढा एकच शब्द लिहितात म्हणजे माजोरीपणाचा कळस आहे.)

लवकरच खुलासा करा. :)

अद्द्या's picture

28 Feb 2013 - 5:19 pm | अद्द्या

हे असलं काही
सातवी आठवीतल्या पोरांना . .
सांगायला छान वाटतं . .
इंटरनेट / प्रोसेसर स्पीड वाढवणे . . . वगेरा वगेरा .

बाकी . . . . entertaining I must say