✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

संगणकावर इंटरनेटचा वेग ५०० टक्क्यांनी कसा वाढवाल ?

य
यशोधन वाळिंबे यांनी
Sat, 02/23/2013 - 19:26  ·  लेख
लेख
संगणकावर इंटरनेट वापरताना बर्याच वेळा आपल्याला अपेक्षित वेग मिळत नाही आणी त्यामुळे आपली निराशा होते. इंटरनेट वर आधीच उपलब्ध असलेल्या युक्त्या वापरून आपल्याला इंटरनेटचा वेग वाढवला तरी देखील तो २० ते ३० टक्क्यांनीच वाढतो. परंतु इथे दिलेल्या युक्तीमुळे तुमच्या इंटरनेटचा वेग हा ५०० टक्क्यांनी नकीच वाढेल. त्यामुळे या पद्धतीने तुम्हाला संगणकावर इंटरनेट वापरताना कमी वेगाचा त्रास होणार नाही हे नक्की. आणी तुमचा अनुभव इथे सांगायला विसरू नका..!!
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
14707 वाचन

💬 प्रतिसाद (59)

प्रतिक्रिया

भ्या वाटते..मेक्यानिकल

अविनाशकुलकर्णी
Sat, 02/23/2013 - 19:39 नवीन
भ्या वाटते..मेक्यानिकल असल्याने व आय टी चे शश्प कळत नाहि ..मागे असाच म्यु तोरेन्ट साठी वाचुन प्रयोग केला व हात पोळाले. असो शांपणे विचार करुन देवाचे नाव घेतो व ट्रायतो.. ओपेरा च वापरावा लागतो का?
  • Log in or register to post comments

भ्यायचं काय बी कारन नाय बगा..

यशोधन वाळिंबे
Sat, 02/23/2013 - 20:02 नवीन
आणी झोल होऊ नये म्हणुन सिस्टम रीस्टोर मार्क करून ठेवा कि.. हिकडे दिलया त्यो कसा करायचा त्ये.. नाहीतर करा डायरेक्ट काय बी नाय व्हाणार तुमच्या संगणकाला..!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी

पन मला एक सांगा ह्यासाठी फक्त मोबाइल ऑपेरा ब्रॉझरच वापरावा

वेताळ
Sat, 02/23/2013 - 20:12 नवीन
लागणार ना?संगणकावर मोबाइल व्हर्जनचा एक्सप्लोरर वापरुन स्पीड मिळत असेल तर तो वापरताना काही कमतरता असेल कि?
  • Log in or register to post comments

धन्यवाद.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 02/23/2013 - 20:28 नवीन
च्यायला, पाचशे टक्क्यांनी इंटरनेटची स्पीड वाढेल म्हणून हजाराच्या स्पीडने सर्व प्रोसीजर करुन पाहिली. आयुष्यात अनेक अपेक्षाभंगाचे प्रसंग आले, त्यात ही एक भर इतकेच. धन्यवाद. अजून येऊ द्या. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

बिरूटे सर,

आनंदी गोपाळ
Sat, 02/23/2013 - 20:32 नवीन
पाव इंची नळाच्या कनेक्सनला २॥ इन्ची तोटी लावली म्हनून पाणी बदाबदा कसं गळावं हो? ही त्यातलीच गत..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हम्म, खरंय....!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 02/23/2013 - 20:38 नवीन
खरंय.....!!! माझ्या हावरटपणाचीही बरी खोड मोडली, बाकी काय ! :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

नाय वो...

दादा कोंडके
Sat, 02/23/2013 - 23:02 नवीन
तेनला वाटलं मोटर आसल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

हा हा...

दादा कोंडके
Sat, 02/23/2013 - 20:35 नवीन
:)) १ एप्रिलला तरी धागा टाकायचा की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

+1

उगा काहितरीच
Sat, 02/23/2013 - 20:52 नवीन
+1 :( :( :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हायला...

धन्या
Sat, 02/23/2013 - 20:55 नवीन
म्हणजे तुम्ही याच न्यायाने सात महिन्यांत दुप्पट तीप्पट वगैरे पैसे देणार्‍या योजनांमध्ये पैसे टाकले असणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बाकी आनंदी गोपाळ यांच्याशी

गणपा
Sat, 02/23/2013 - 21:20 नवीन
=)) बाकी आनंदी गोपाळ यांच्याशी सहमत. आडातच नसेल तर पोहर्‍यात यायचं कुठुन म्हणतो मी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मोबाईल ब्राउझर

पैसा
Sat, 02/23/2013 - 21:04 नवीन
म्हणजे तो ब्राउझर मोबाईल साईट्स ओपन करत असणार. त्यांचा आकार लहान असतो. त्यामुळे स्पीड वाढल्यासारखे वाटेल एवढेच. खरी स्पीड वाढवायची तर तुमच्या ब्रॉडबँडची स्पीड आणि कॉम्प्युटरची रॅम वाढवायला पाहिजे बरोबर ना? असो. मिपावर स्वागत आहे. लिहीत चला!
  • Log in or register to post comments

हायला पैका ताय

jaypal
Sat, 02/23/2013 - 21:22 नवीन
तुझी कामेंट वाचुन बोलती बंद झाली. तु एव्हडी टेक्नोसेव्ही आहेस माहीत नव्हत. ईंग्लीश-व्हिंगलीश मधल्या श्री देवीची आठव्ण झाली. __/\__ Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

:)

पैसा
Sat, 02/23/2013 - 21:23 नवीन
:D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: jaypal

आत्ताआत्ताच हा धागा आला होता ना?

डॉ सुहास म्हात्रे
Sat, 02/23/2013 - 23:05 नवीन
आत्ताआत्ताच हा धागा आला होता ना? ___/\___
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

मी किनई खूप हुशार आहे

निनाद मुक्काम …
Sat, 02/23/2013 - 23:20 नवीन
मी किनई खूप हुशार आहे असे धागे पहिले की सर्व प्रथम प्रतिसाद वाचतो. बिरुटे सरांचा प्रतिसाद वाचला आणि मूळ लेख न वाचता हा प्रतिसाद लिहिला. काही लेखाचे शीर्षक वाचून जाणकार मिपाकर पहिले प्रतिसाद वाचतो.
  • Log in or register to post comments

एक शंका ..या मुळे ओपेराचा

अविनाशकुलकर्णी
Sat, 02/23/2013 - 23:31 नवीन
एक शंका ..या मुळे ओपेराचा स्पीड वाढतो का म्यु तोरेन्त वरुन डाऊन लोड चा स्पिड पण वाढतो??
  • Log in or register to post comments

मी काय म्हणतो..

परिकथेतील राजकुमार
Tue, 02/26/2013 - 12:24 नवीन
त्यापेक्षा थोडे कष्ट करून, चार पैसे जास्त मिळवून अधिक वेगवान कनेक्शन का लावून घेत नाही ?
  • Log in or register to post comments

.. काय्यपण काय बोलता..

शैलेन्द्र
Tue, 02/26/2013 - 16:28 नवीन
:).. काय्यपण काय बोलता..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

हलकट

आदिजोशी
Wed, 02/27/2013 - 13:15 नवीन
पुणेकर मंगळावर गेले तरी आपला अंगभूत खवचटपणा आणि हलकटपणा सोडत नाहीत. (का सोडावा?) हलकट शिरोमणी परा शास्त्रींचा विजय असो. (प्रतिसाद परा बद्दल असल्याने खवचट आणि हलकट ऐवजी प्रत्येकाने आवडीची विशेषणं टाकून घ्यावीत.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

र र रिप्लाय चा..

यशोधन वाळिंबे
Tue, 02/26/2013 - 17:22 नवीन
@ वेताळ यांस, संगणकावर मोबाइल व्हर्जनचा एक्सप्लोरर वापरुन स्पीड मिळतो अर्थात त्यात थोडी नाही तर बरीच गम्मत केली असते म्हणुन आपल्याला वेग मिळतो. पण हि गम्मत दृश्य स्वरुपात नसते. म्हणजे १००० पिक्सलसच्या छायाचित्रात काटछाट करून ५० ते ६० पिक्सलस मध्ये दाखवला जातो. परंतु मी पैज लाऊन सांगु शकतो कि तुम्ही तो फरक ओळखु शकणार नाही. जावास्क्रिप्टस आणी इतर बाबतीतही तीच गम्मत.. @ प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांस, हजाराच्या स्पीडने सर्व प्रोसीजर केलीत पण थोडासा संयम राखुन सांगितल्याप्रमाणे केली असती तर आज तुमची प्रतिक्रिया वेगळी असती. आणी पुढील आयुष्यात अपेक्षाभंग टाळण्यासाठी देखील संयम पाळाल अशी आशा..!! @ आनंदी गोपाळ यांस, अहो आपण तोटी नाही, मोटर लावण्याची गोष्ट करत आहोत.. @ पैसा, होय ज्या साईटस मोबाईल वर्जन सपोर्ट करतात त्या तेच पान उघडतात परंतु जर मी.पा सारख्या साईटस उघडल्या तर मला वाटत नाही काही अडचण उद्भवेल. @ निनाद, आपल्या विद्वत्तेला नमस्कार करून एका मित्राची आठवण सांगू इच्छितो, तो सगळ्या वर्तमानपत्रातील लेखांची नावे एका कोऱ्या कागदावर लिहून काढायचा, आणी प्रत्येक लेखाखाली उत्तम, अप्रतिम, अशा पानभर प्रतिक्रिया पाठवायचा आणी तो आजतागायत तसे करतो, विशेष म्हणजे त्याच्या प्रतिक्रिया बऱ्याच वर्तमानपत्रात छापून येतात. खरी गम्मत म्हणजे त्याने एकही लेख वाचला देखील नाही. त्याचा हा लबाडीपणा उघड का होत नाही हा प्रश्न मी त्याला विचारल्यावर तो म्हणाला 'कोणत्याही लेखाबद्दल चांगले लिहिण्यासाठी तो वाचावा लागत नाही पण जर वाईट काही लिहायचे असेल तर बारकाईने अभ्यास करावा लागतो.. असो @ अविनाश कुलकर्णी, यामुळे फक्त ओपेराचा वेग वाढतो. डाउनलोडचा वेग वाढवण्यासाठी इंटरनेट डाऊनलोड मॅनेजर उत्तम पर्याय आहे. @ परिकथेतील राजकुमार, आपल्या सर्वात बहुमुल्य प्रतिक्रियेसाठी शतशः आभार.
  • Log in or register to post comments

यामुळे फक्त ओपेराचा वेग वाढतो

परिकथेतील राजकुमार
Tue, 02/26/2013 - 17:26 नवीन
यामुळे फक्त ओपेराचा वेग वाढतो. डाउनलोडचा वेग वाढवण्यासाठी इंटरनेट डाऊनलोड मॅनेजर उत्तम पर्याय आहे.
शिर्षकात ' संगणकावर इंटरनेटचा वेग ५०० टक्क्यांनी कसा वाढवाल' मध्ये मग ' संगणकावर ओपेराचा वेग ५०० टक्क्यांनी कसा वाढवाल' असे करुयात काय? बाकी हा वेग नक्की ५००% च वाढतो ह्याचा काही विदा / पुरावा मिळेल काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधन वाळिंबे

>>>> हजाराच्या स्पीडने सर्व

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 02/27/2013 - 09:29 नवीन
>>>> हजाराच्या स्पीडने सर्व प्रोसीजर केलीत पण थोडासा संयम राखुन सांगितल्याप्रमाणे केली असती तर आज तुमची प्रतिक्रिया वेगळी असती. आणी पुढील आयुष्यात अपेक्षाभंग टाळण्यासाठी देखील संयम पाळाल अशी आशा..!! प्रिय वाळिंबे साहेब, आपण सांगितल्या प्रमाणे अगदी व्यवस्थित अशी नेटची स्पीड वाढविण्यासाठीची प्रक्रिया पार पाडली अजिबात स्पीड वाढत नाही. मला आठवतंय मी माझ्या नोकिया फोनसाठी वॅप साइट्स संगणकावर उघडल्या पाहिजेत त्यासाठी एक अ‍ॅप्लीकेशन टाकलं होतं. 'युजर एजंट बहुतेक' तेव्हा संगणकावर असं एक ब्राऊजर उघडायचं त्यातलाच हा प्रकार. बाकी, काही विशेष नाही. आपण अजूनही आपल्या मतावर ठाम असाल तर पाचशे टक्के स्पीड वाढते असं सिद्ध करणारं एकेक छायाचित्र दाखवा. आपण आता म्हणता की ऑपेरा ब्राऊजरचा स्पीड वाढतो. डाऊनलोडसाठी डाऊनलोड म्यानेजर टाका. शीर्षक काय ? सांगता काय ? हे सर्व कै च्या कै आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधन वाळिंबे

हजाराच्या स्पीडने सर्व

धन्या
Wed, 02/27/2013 - 21:58 नवीन
हजाराच्या स्पीडने सर्व प्रोसीजर केलीत पण थोडासा संयम राखुन सांगितल्याप्रमाणे केली असती तर आज तुमची प्रतिक्रिया वेगळी असती. आणी पुढील आयुष्यात अपेक्षाभंग टाळण्यासाठी देखील संयम पाळाल अशी आशा..!!
सर, आता आंतरजालावरुन व्हीआरेस घ्या. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

@ आनंदी गोपाळ यांस,

आनंदी गोपाळ
Wed, 02/27/2013 - 10:28 नवीन
@ आनंदी गोपाळ यांस, अहो आपण तोटी नाही, मोटर लावण्याची गोष्ट करत आहोत..
अभ्यास वाढवा. इंटरनेटचा स्पीड वाढवणे म्हणजे माझ्या कांपुटरात येणार्‍या डेटाचा स्पीड वाढवणे असे होते. १००० पिक्सेलचे चित्र ५० पिक्सेलमधे बसते अन क्वालीटीतील फरक ध्यानी येतच नाही असे तुमचे होत असेल, तर तुम्हाला तुमचे डोळे व अनेक इतर महत्वाचे अवयव तपासून घेणे गरजेचे आहे असे माझे प्रोफेशनल ओपिनियन आहे ;) अन त्या स्वाक्षरीतली माहिती जरा कमी बटबटीत करा. इरिटेटिंग प्रकार आहे तो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधन वाळिंबे

आयला

इरसाल
Wed, 02/27/2013 - 12:01 नवीन
अन त्या स्वाक्षरीतली माहिती जरा कमी बटबटीत करा. इरिटेटिंग प्रकार आहे तो.
म्हणजे बटबटीत राहु द्या असेच म्हणायचे आहे ना तुम्हाला ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

इर्सालभौ,

आनंदी गोपाळ
गुरुवार, 02/28/2013 - 20:19 नवीन
समजावणीच्या सुरात सांगलं तं उपेग झाला का नी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल

गंमत आहे बाबा ती

वेताळ
Tue, 02/26/2013 - 17:37 नवीन
अद्रुश्य असते.
  • Log in or register to post comments

..........................

माझीही शॅम्पेन
Tue, 02/26/2013 - 17:50 नवीन
...........................धन्यवाद एकंदरीत एक्सप्लोरर हा वेगात / भासमान वेगाताला अतिशय महत्वाचा घटक असलयाने - ही युक्ती काम करत असावी असे वाटते करून बघतो आणि सांगतो
  • Log in or register to post comments

............. मला ब्राउझर

माझीही शॅम्पेन
Tue, 02/26/2013 - 18:00 नवीन
............. मला ब्राउझर म्हणयचय :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माझीही शॅम्पेन

देवाचे नाव घेतले व आपल्या

अविनाशकुलकर्णी
Tue, 02/26/2013 - 18:09 नवीन
देवाचे नाव घेतले व आपल्या ब्लोग मधे सांगितले तसे केले पण हे नशिबाला आले काय करावे??काहि उपाय? Image removed. परत केले पण हाच मेसेज येत आहे
  • Log in or register to post comments

इंटरनेटचा (म्हणजे इंटरनेटवरून

नगरीनिरंजन
Wed, 02/27/2013 - 11:05 नवीन
इंटरनेटचा (म्हणजे इंटरनेटवरून डेटा ट्रान्स्फरचा) वेग Million Bits Per Second अर्थात Mbps मध्ये मोजतात. तुम्ही दिलेली 'युक्ती' वापरून १ Mbps चा ५ Mbps वेग होणार आहे का? नसेल तर दिशाभूल करणारे शीर्षक वापरू नका.
  • Log in or register to post comments

हावरट पानाचा कळस आहे.

खबो जाप
Wed, 02/27/2013 - 11:07 नवीन
हावरट पानाचा कळस आहे. हे वाचा "Opera Mobile Emulator is the desktop version of Opera’s smart phone browser. Opera Mobile Emulator renders pages as close as you can get to how it would look on a real phone. It can be paired with Opera Dragonfly for an effective testing environment before taking it to the physical phone." "It’s a small, native application that’s easy to install on your desktop machine and runs exactly the same code as its mobile phone version — that way, you can be assured that what you’re seeing on your test environment is practically identical to the experience your end users will get." म्हणजे हा एक इमुलेतर आहे जो आपल्याला मोबाईल वर लोड होनाऱ्या वेब साईट्स दाखवतो, ज्याने डेवलपर आपल्या साईट्स मोबाईल वर नक्की कशा दिसतील हे पाहता येते. राहील स्पीड बद्दल ह्या application वर लोड होणार्या सगळ्या साईट्स ह्या मोबाईल व्हर्जन असल्यामुळे त्या मुळातच खूप कमी डेटा वापरतात त्यामुळे लवकर लोड होतात आणि स्पीड वाढल्याचा भास होतो.
  • Log in or register to post comments

योग्य माहिती इथे दिल्याबद्दल

पिंगू
Wed, 02/27/2013 - 11:28 नवीन
योग्य माहिती इथे दिल्याबद्दल धन्यवाद..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खबो जाप

हाहाहा.. लेख वाचून करमणून

पिंगू
Wed, 02/27/2013 - 11:15 नवीन
हाहाहा.. लेख वाचून करमणून झाली. मुळात आडात नसेल तर पोहर्‍यात कुठून येणार.. त्याबद्दल ननिशी १००% सहमत..
  • Log in or register to post comments

वाळिंबे साहेब

वेताळ
Wed, 02/27/2013 - 11:21 नवीन
सगळ्या बाबतीत पार्टटाईम आहेत. ते लेखक कम वाचक कम संशोधक कम मेकॅनिक कम टिकाकार कम संगणकतज्ञ कम विद्यार्थी कम शिक्षक ..........इत्यादी कामे ते एकट्यानी करतात.
  • Log in or register to post comments

म्हनजे तुमाला...

गब्रिएल
Wed, 02/27/2013 - 11:54 नवीन
म्हनजे तुमाला वाळिंबे सायेब लेखक आणि बाकी सर्व कम (= हिंदी "कम" = मराठी "कमी") आहेत अस म्हणायच आहे काय? ;) :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ

मी आत्ताच प्रोफाईल पाहिला

संजय क्षीरसागर
Wed, 02/27/2013 - 13:40 नवीन
यशोधन प्र. वाळिंबे, प्रथम वर्ष (वाणिज्य) - चालु , सर परशुरामभाऊ महाविद्यालय (पुणे), व्यवसाय - विद्यार्थी सदर आयडी स्वतःच्या ट्रायलसाठी इतरांना कामला लावण्याचा उद्योग करतोय. त्याच्या कोणत्याच पोस्टमधे स्वतःचं काहीही काँट्रिब्यूशन असणं शक्य नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गब्रिएल

तुमच्याकडे आर्टिकलशिपला घ्या

आदूबाळ
Wed, 02/27/2013 - 22:00 नवीन
तुमच्याकडे आर्टिकलशिपला घ्या त्यांना... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

त्यानं पाळण्यातच इतके पाय मारलेत की बोलता सोय नाही!

संजय क्षीरसागर
Wed, 02/27/2013 - 23:30 नवीन
असे प्रयोग कामात केले की मलाच पुन्हा आर्टिकलशिप करावी लागेल!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

यशोढ्न बाळ - थोडे दमाने घे

प्रसाद१९७१
Wed, 02/27/2013 - 14:42 नवीन
यशोढ्न बाळ - थोडे दमाने घे. आधी आपले शिक्षणाची नाव किनार्‍यावर लाव, मग असले तारे तोड.
  • Log in or register to post comments

र र रिप्लाय चा..

यशोधन वाळिंबे
Wed, 02/27/2013 - 20:52 नवीन
@ अविनाशकुलकर्णी, तुम्हाला आलेली अडचण ही तांत्रीक आहे. ह्या दुव्यावर भेट द्या आणी दिल्याप्रमाणे अनुसरण करा. बाकी उपस्थित विद्वान लोकांपुढे ह्या अज्ञानी बालकाने काही बोलणे उचित नाही..!!
  • Log in or register to post comments

चूक दुरुस्ती

यशोधन वाळिंबे
Wed, 02/27/2013 - 21:34 नवीन
तुम्हाला आलेली अडचण ही तुमच्या संगणकातील तांत्रीक अडचण आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधन वाळिंबे

र र रिप्लाय चा..

यशोधन वाळिंबे
Wed, 02/27/2013 - 21:32 नवीन
लेखक कम वाचक कम संशोधक कम मेकॅनिक कम टिकाकार कम संगणकतज्ञ कम विद्यार्थी कम शिक्षक

उर्फ पुणेकर ..

  • Log in or register to post comments

ब बटबटीचा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 02/27/2013 - 21:37 नवीन
वाळींबे, इन्फोबल्ब : ज्ञान हे सर्वोच्च आहे, माहिती तंत्रज्ञान, सामान्य ज्ञान व इतर माहिती देणारा ब्लॉग. हा जाहिरातीचा फलक जरा बारक्या फाँट मधे घेता येऊन त्याचा झोका जरा कमी करता येईल काय ? लैच बटबटीत वाटतं राव. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधन वाळिंबे

कै च्या कै मागणी .

तर्री
Wed, 02/27/2013 - 21:51 नवीन
ती एक सौम्य , सुखकारक , तळटीप आहे. तुम्हांला त्रास होत असेल तर डोळे तपासून घ्या एकदा. मी घेतले आणि चर्मचक्षु (आणि अंत:चक्षु दोनीही) मध्ये बिघाड सापडला - स्पीड कमी आहे म्हणतात. मोठया बाहुली चा स्पीड कमी आहे ५०० पट वाढ होणे अपेक्षित आहे - इति डॉ.
  • Log in or register to post comments

तुम्हाला आलेली अडचण ही

अविनाशकुलकर्णी
Wed, 02/27/2013 - 21:52 नवीन
तुम्हाला आलेली अडचण ही तुमच्या संगणकातील तांत्रीक अडचण आहे. ============================================== म्हनजे बहुतेक विंडो परत लोड करावि लागणार
  • Log in or register to post comments

म्हनजे बहुतेक विंडो परत लोड करावि लागणार!

संजय क्षीरसागर
Wed, 02/27/2013 - 23:34 नवीन
आता घ्या देवाचं नांव आणि काय. एक म्हण आहे `नीम हकीम, जान खतरेमे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी

च्यायला आमचा कोदा कुठे असतो

धन्या
Wed, 02/27/2013 - 22:12 नवीन
च्यायला आमचा कोदा कुठे असतो हल्ली देव जाणे. ईथे त्याचा गुरु आला आहे.
  • Log in or register to post comments

काहीही काय..

शैलेन्द्र
Wed, 02/27/2013 - 22:55 नवीन
काहीही काय.. कुठे कोदा- कुठे यदा (यशोधन दादा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या
  • 1
  • 2
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा