धूळ - एक आठवण !!!
खोली नवी करण्याचा अट्टाहास धरलाय ,
किती दिवस झाले खटाटोप चाललाय ,
जुन्या गोष्टींची जागा नव्यांनी घ्यायला हवी ....
सगळ्या कोपऱ्यातली धूळ आता झटकायला हवी ...!!!
वेगळे रंग घेऊन नवे पडदे सजले ,
नवा उजळपणा घेऊन कार्पेटहि आले ,
स्टाईल पण बदलली आहे खोलीची साजेशी ....
तरी.... एका कोपऱ्यात अजूनही धूळ आहे जराशी ..!!
हितचिंतक बरेचसे येउन गेले ,
बदलांचे कौतुक व सुधारणाही सांगून गेले ,
हसऱ्या चेहऱ्याने सगळे क्षण साधून घेतले ....
बरे ...त्या धुळी कडे कुणाचे लक्ष नाही गेले ...!!!
झटकण्याच्या प्रयत्नात डोळे चिंब होत आहेत ,
पाणी शिम्पडुनहि जखमाच ओल्या होत आहेत ,
दुर्लक्षित केली तरी नव्याने खपली निघत आहे ...
ही कोपऱ्यातली धूळ फार त्रास देत आहे ...!!
मुखवटा घालून मी नव्याने हसते आहे ,
पाणावलेले डोळे माझे की ती पुसते आहे ,
आता नव्या खोलीत अनोळखी मीच ...
आणि जुन्या कोपऱ्यात ओळखीची तीच ...!!!!
प्रतिक्रिया
20 Feb 2013 - 10:09 am | तिमा
कल्पना आवडली.
21 Feb 2013 - 2:12 am | श्रीरंग_जोशी
हेच म्हणतो.
20 Feb 2013 - 12:36 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
फिझा अॅट हर बेस्ट!!
21 Feb 2013 - 1:50 am | अभ्या..
वाव. ग्रेट.
फिझा तुम्ही खूप खूप छान लिहिता
21 Feb 2013 - 2:10 am | कवितानागेश
अतिशय सुंदर रचना. फार आवडली. :)
21 Feb 2013 - 8:19 am | फिझा
धन्यवाद !!! प्रतिसादांना !!!