Skip to main content

धूळ - एक आठवण !!!

लेखक फिझा यांनी बुधवार, 20/02/2013 09:16 या दिवशी प्रकाशित केले.
धूळ - एक आठवण !!! खोली नवी करण्याचा अट्टाहास धरलाय , किती दिवस झाले खटाटोप चाललाय , जुन्या गोष्टींची जागा नव्यांनी घ्यायला हवी .... सगळ्या कोपऱ्यातली धूळ आता झटकायला हवी ...!!! वेगळे रंग घेऊन नवे पडदे सजले , नवा उजळपणा घेऊन कार्पेटहि आले , स्टाईल पण बदलली आहे खोलीची साजेशी .... तरी.... एका कोपऱ्यात अजूनही धूळ आहे जराशी ..!! हितचिंतक बरेचसे येउन गेले , बदलांचे कौतुक व सुधारणाही सांगून गेले , हसऱ्या चेहऱ्याने सगळे क्षण साधून घेतले .... बरे ...त्या धुळी कडे कुणाचे लक्ष नाही गेले ...!!! झटकण्याच्या प्रयत्नात डोळे चिंब होत आहेत , पाणी शिम्पडुनहि जखमाच ओल्या होत आहेत , दुर्लक्षित केली तरी नव्याने खपली निघत आहे ... ही कोपऱ्यातली धूळ फार त्रास देत आहे ...!! मुखवटा घालून मी नव्याने हसते आहे , पाणावलेले डोळे माझे की ती पुसते आहे , आता नव्या खोलीत अनोळखी मीच ... आणि जुन्या कोपऱ्यात ओळखीची तीच ...!!!!
लेखनविषय:

वाचने 1241
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

कल्पना आवडली.

In reply to by तिमा

हेच म्हणतो.

फिझा अ‍ॅट हर बेस्ट!!

आता नव्या खोलीत अनोळखी मीच ... आणि जुन्या कोपऱ्यात ओळखीची तीच ..
वाव. ग्रेट. फिझा तुम्ही खूप खूप छान लिहिता

धन्यवाद !!! प्रतिसादांना !!!