समजत नाही...

५० फक्त's picture
५० फक्त in जे न देखे रवी...
14 Feb 2013 - 2:51 pm

प्रेरणा - http://www.misalpav.com/node/23918

क्रांतीतैची परवानगी घेउन हा प्रयत्न सादर करत आहे,मला गझलच काय कविता सुद्धा करता येत नाही,तरीसुद्धा पण हा एक प्रयत्न , मुड बदलाचा.

त्या दोन आसवांना मज हुलकावयास आले
आनंदले एवढे की त्याचे अश्रु टाळता न आले

सलावे काटे दु:खाचे, कितीदा मनात आले
कमलवेलींतुन सुखांच्या मज निसटता न आले

निंमिषात नाती अतुट भंगली आरश्यापरी
निमिषात कवड्श्यांच्या रंगात दंगले मी

जगण्याचा मुखवटाच फसवा,जेंव्हा कळाले मला
मृत्युच्या उत्तुंग क्षणाची वाट पाहणे आवडले मला

अनुकुलता प्रतिकुलता हे व्दंद पाहिजे टाळले
सूचना अन आर्जवांचे गजरे मी हरदिनी माळले

असण्याहुनी सुखाचे नसणेच असावे ठीक
सुख भोगुनी वाटताना मज हे ब्रम्हज्ञान झाले

या सागरी सुखाच्या लाटा अमाप उठती
ना नव्या ना जुन्या वेदना सांभाळणे न जमले.

हा नव्हे प्रयत्न विडंबनाचा माझा खरेच आहे
पा-याची टा़ळुन बाजु मी आरशांत पाहे.

५० फक्त....

मराठी गझलजीवनमान

प्रतिक्रिया

स्पा's picture

14 Feb 2013 - 3:12 pm | स्पा

चान चान

नानबा's picture

14 Feb 2013 - 3:15 pm | नानबा

जाम भारी... :)

सूड's picture

14 Feb 2013 - 3:44 pm | सूड

बात जमीं नहीं।

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

14 Feb 2013 - 3:46 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

५० रावचे लिखाण काव्य विभागात बघितले आणि जरा आश्चर्यच वाटले.
पण तुम्ही चांगलाच धक्का दिलात ५० राव

जगण्याचा मुखवटाच फसवा,जेंव्हा कळाले मला
मृत्युच्या उत्तुंग क्षणाची वाट पाहणे आवडले मला

व्वाह!!
ते वृत्तबित्त मरु दे तिकडे, पण काय सही मांडणी केलीये, वाह.
अजुन लिहा ओ.

हा नव्हे प्रयत्न विडंबनाचा माझा खरेच आहे
पा-याची टा़ळुन बाजु मी आरशांत पाहे.

हे नसतं तरी चाल्लं असतं. बाकी कविता चांगली आहे, तुम्ही मनावर घेतल्यास कथांची सफाई यातही येईल हेवेसांनल.

वेगळाच अ‍ॅटिट्युड! चांगलं जमलंय :)

सुहास..'s picture

14 Feb 2013 - 4:46 pm | सुहास..

काही कडवी मस्तच !

पैसा's picture

14 Feb 2013 - 5:00 pm | पैसा

भावना चांगल्या प्रकारे व्यक्त झाल्यात. वृत्त आणि छंद ही काहीशी कारागिरी म्हटली तरी चालेल. तालात म्हणून बघ. तुलाच जास्त योग्य शब्द सुचतील.

तरीही उत्तेजनार्थ मात्र नक्किच दिला पहिजे... तुमच्या ओरिजनल कवितांच्या तिव्र प्रतिक्षेत.

क्रांतीतैंच्या लिखाणाची बातच और आहे |
५० फक्त मात्र शब्द योजुनी प्रतिभा वाहे...||

प्रचेतस's picture

14 Feb 2013 - 5:47 pm | प्रचेतस

मस्त ओ ५०,

बाकी ती कथामालिका का उगा अडवून ठेवलीय? लवकर येऊ द्यात पुढचे भाग.

बॅटमॅन's picture

14 Feb 2013 - 5:59 pm | बॅटमॅन

+१००००००००.

लौकर लौकर!!!

मोदक's picture

15 Feb 2013 - 12:49 am | मोदक

मी काय म्हन्तो वल्ली...

कुणी कुणी कोणते कोणते लेख अपुरे ठेवलेत त्याची यादी करूया का रे..?

सुरुवात ब्याटम्यानापासून.. ;-)

बॅटमॅन's picture

15 Feb 2013 - 12:57 am | बॅटमॅन

हरामी मोदक!!!

अभ्या..'s picture

15 Feb 2013 - 1:01 am | अभ्या..

क्रमश: लिहायला विसरलास बॅट्या ;)

मोदक's picture

15 Feb 2013 - 1:05 am | मोदक

:-))

क्रान्ति's picture

14 Feb 2013 - 9:17 pm | क्रान्ति

छान जमली आहे कविता.

जगण्याचा मुखवटाच फसवा,जेंव्हा कळाले मला
मृत्युच्या उत्तुंग क्षणाची वाट पाहणे आवडले मला

अनुकुलता प्रतिकुलता हे व्दंद पाहिजे टाळले
सूचना अन आर्जवांचे गजरे मी हरदिनी माळले

असण्याहुनी सुखाचे नसणेच असावे ठीक
सुख भोगुनी वाटताना मज हे ब्रम्हज्ञान झाले

हे खासच लिहिलं आहेस!

अभ्या..'s picture

14 Feb 2013 - 9:24 pm | अभ्या..

अरे वा. कविता आणि चक्क पन्नासरावांची. मस्तच
एकदम छान जमलीय दादा.
अजून येऊ दे. :)

५० रु . याच्या क्षमतेला काय झालय ???
मला तरि निदान हि कविता कम गझल बोर्डावर टाकण्या इत्पत रुचली नाहि .
५० फक्त तुमच्याकडनं अजुन चांगल्या अपेक्षा आहेत ओ ...

पण त्यातल्या भावना मात्र नक्कीच भावल्या. :)

किसन शिंदे's picture

14 Feb 2013 - 11:16 pm | किसन शिंदे

आपल्याला तर आवडली ब्वॉ ही कविता.

तेवढं ते कथेचंही मनावे घ्या जरा.

मालोजीराव's picture

15 Feb 2013 - 12:55 am | मालोजीराव

असण्याहुनी सुखाचे नसणेच असावे ठीक
सुख भोगुनी वाटताना मज हे ब्रम्हज्ञान झाले

विरक्तीकडे वाटचाल ?