श्रावण.

रामदास's picture
रामदास in जे न देखे रवी...
2 Jul 2008 - 9:25 am

पाहुणा पहाटे
अचानक धसमुसळा
जागवून गेला.
पाकळीवर ओल्या
भार .
थेंबाचा.
कोवळ्या सोवळ्या
पोरी सरीला,
उभंलावणं
भरजरी उन्हाचं.

कविता

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

2 Jul 2008 - 4:56 pm | विसोबा खेचर

छान आहे कल्पना...

परंतु कविता थोडीशी अपुरी वाटली. त्यामुळे मजा आली नाही...

धनंजय's picture

2 Jul 2008 - 5:11 pm | धनंजय

आवडले. थोडक्या शब्दात आशय सांगतात.

मेघना भुस्कुटे's picture

2 Jul 2008 - 9:22 pm | मेघना भुस्कुटे

बरोब्बर, अगदी हायकूचीच आठवण झाली. अप्रतिम.

श्रीकृष्ण सामंत's picture

3 Jul 2008 - 7:42 am | श्रीकृष्ण सामंत

आम्हाला पण कविता अपुरीच वाटली
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

मुक्तसुनीत's picture

3 Jul 2008 - 8:18 am | मुक्तसुनीत

रामदास यांच्या लिखाणातल्या अस्सलपणाने स्तिमित व्हायला होते.

रामदास , तुम्ही इतकी वर्षे नावाजलेल्या प्रकाशनांमधे लिखाण केले नाही याचे मला प्रचंड आश्चर्य वाटते आहे ! मिसळपाववर तुम्ही लिहीणे म्हणजे आमच्याकरता दुधात साखर !

सहज's picture

3 Jul 2008 - 8:45 am | सहज

असेच म्हणतो. मुक्तसुनित व नंदन यांना एखादी गोष्ट "अस्सल" वाटते यालाच सर्वोच्च दाद समजली जाते. बर्‍याचदा इट इज नेक्स्ट टु इंपॉसीबल की कुठले साहीत्य त्यांना अजुन कशासारखे वाटत नाही. या दोघांच्या नजरेतुन एक गोष्ट सुटेल तर शपथ. ;-)

कविता छान आहे पण तहान भागली नाही अजुन हवी. :-) एखादी सर सुरू झाली समजायच्या आत थांबावी असे..

रामदास's picture

3 Jul 2008 - 10:43 am | रामदास

जिवण तोंडावर
घट्ट दादरा
बांधून माय म्हणते.
मोठी झाली बाय माझी.
येता जाता अंधारात
माजघराच्या
लपू नको आता.

अशा छोट्या कविता लिहून बघण्याचा प्रयोग केला होता त्याचा एक नमुना.

रामदास's picture

3 Jul 2008 - 7:00 pm | रामदास

ढगाच्या काळ्या
मनात
लोळ विजेचा
कपटी.
कोवळे झाड
बेचिराख.
पहिल्या आषाढात.

अशा बर्‍याच कविता होत्या. पण प्रसिद्ध केल्या नव्हत्या.
आता माध्यम उपलब्ध आहे म्हणून काहीकाही आठवतो आहे.

सर्किट's picture

4 Jul 2008 - 1:22 am | सर्किट (not verified)

रामदास,

तिन्ही कविता सुंदर !!!

- सर्किट

धनंजय's picture

4 Jul 2008 - 4:27 am | धनंजय

मिताक्षरी मोती

मुक्तसुनीत's picture

4 Jul 2008 - 1:33 am | मुक्तसुनीत

खूप आवडल्या.

काही प्रश्न :

जिवण , दादरा म्हणजे नेमके काय ?

मला वाटते त्या फडक्याला बरणीच्या तोंडाशी चिंधीने किंवा दोरीने करकचून बांधतात.

बांधायचे फडके.

जिवण? माहीत नाही.

चतुरंग

दुसर्‍या दोन्ही समजल्या. (जिवण शब्द सोडून).
त्या दोनही कविता निखळ रत्नं आहेत!
रामदास, त्या दोन्ही कवितात शब्द तुमच्यासमोर चालत आलेत आणि मनाच्या कागदावर तुम्ही त्यांना उमटवले आहे.
कुठल्या कुठल्या अनुभवांचे मोती मनाच्या तळात सूर मारुन वर काढता पण ते काढताना गाळ ढवळला जाणार नाही ह्याची काळजीही घेता!
हीच प्रतिभा! जियो!!

चतुरंग

रामदास's picture

4 Jul 2008 - 6:25 am | रामदास

दोन ओठांनी तयार होणारा तोंडाचा भाग. जिवणी, जिवण तोंड.

विजुभाऊ's picture

26 Jul 2012 - 2:38 pm | विजुभाऊ

रामदासभू.......... बरेच दीस जाहले
तुमचे काव्य शब्द मिपावर नाही आले