गोव्याचे पक्षी

पांथस्थ's picture
पांथस्थ in कलादालन
7 Jan 2013 - 6:49 pm

२०१२ नाताळाच्या सुट्टीत गोव्याला जाउन आलो तेव्हा काढलेली हि पक्षांची छायाचित्रे. हि छायाचित्रे वागातोर, साळीगाव, पर्रा आणी डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्य, चराओ बेट इथे काढलेली आहेत. हा माझा पक्षी चित्रणाचा पहिलाच प्रयत्न असल्याने छायाचित्रे हवी तितकी शार्प आलेली नाहित.

१. Green Bea-eater / वेडा राघू
Green Bea-eaters

२. Great White Egret / बगळा
Great White Egret in flight

३. Common Hoopoe / हुदहुद्या
Common Hoopoe

४. Brahminy Kite / बहिरी ससाणा
Bramhiny Kite in flight

५. Black Kite / घार
Black Kyte Full Wing Span

५.१ Resting Black Kite / विसावलेली घार
Black Kite on pole

६. Black Drongo / कोतवाल
Black Drongo

७. Oriental Magpie-Robin / दयाळ
Oriental Magpie-Robin

छायाचित्रण

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

7 Jan 2013 - 7:46 pm | प्रचेतस

अप्रतिम छायाचित्रे.
ही छायाचित्रे झूम क्रॉप केली असतीत तर बॅकग्राउंड स्पेस कमी होऊन पक्षी अधिक सुस्पष्ट दिसले असते.
बाकी कॅमेरा डिटेल्स काय? फिल्टर्स बहुधा वापरले असावेत.

पक्षी चित्रणाचा पहिलाच प्रयत्न चांगलाच जमून आला आहे की गुरुदेव.
बाकी जाणकार मंडळी यथा योग्य उपापोह करतीलच.
आमच्या डोळ्यांना मात्र सर्व चित्रे भावली.

प्रीत-मोहर's picture

7 Jan 2013 - 8:53 pm | प्रीत-मोहर

फोटो आवडॅश.
फकस्त एक सांगावेसे वाटते ते बेट चोडण बेट आहे . चराओ नाही. स्पेलिंग chorao अस असल तरी ते चोडण आहे.

स्पेलिंग chorao अस असल तरी ते चोडण आहे.

आँ? म्हणजे "कुलकर्णी" असं लिहीलेलं असताना "अल्बुकर्क" असा उच्चार करायचा??

प्रीत-मोहर's picture

8 Jan 2013 - 3:25 pm | प्रीत-मोहर

खीक्क . हो. ते कसय ना चोडण असा उच्चार पोर्तुगीजांना येत नसल्यामुळे ते चोराव झाले. पण स्थानिक उच्चार चोडण आहे.

हो आणि फक्त सलीम अली बर्ड सेंचुरीच नव्हे तर पुर्ण चोडण बेटावर या दिवसात स्थलांतरीत पक्षी येतात. इतकी. सुंदर दृश्ये क्यामेरात कैद न केल्याचे दु:ख चरचरत आहे

कैद न केल्याचे दु:ख चरचरत आहे

दु:ख चडचणत आहे असं म्हणायचं आहे का??

यशोधरा's picture

7 Jan 2013 - 9:45 pm | यशोधरा

फोटो आवडले. किंचित क्रॉप चालेल असं वाटलं.

पैसा's picture

7 Jan 2013 - 9:56 pm | पैसा

सगळे आवडले.

श्रिया's picture

7 Jan 2013 - 10:30 pm | श्रिया

सुरेख आहेत छायाचित्रं.

संजय क्षीरसागर's picture

8 Jan 2013 - 12:47 am | संजय क्षीरसागर

मस्त मूड पकडलाय.

विकास's picture

8 Jan 2013 - 2:43 am | विकास

एकदम आवडली. इंग्रजी आणि त्याबरोब्रर मराठी नावे दिल्याबद्दल धन्यवाद!

जेनी...'s picture

8 Jan 2013 - 4:46 am | जेनी...

:)

शुचि's picture

8 Jan 2013 - 5:05 am | शुचि

छानच

सगळे फोटू चांगले आलेत पण क्र. २ च्य फोटूतलं नीळं पाणी भारी दिसतय.

दीपा माने's picture

8 Jan 2013 - 7:32 am | दीपा माने

एकदम इंप्रेसिव्ह! मला मुळातच सर्वच पक्क्षी आवडतात त्यात ही सुंदर सुंदर छायाचित्रे. आणखी फोटो येऊ द्या.

दीपा माने's picture

8 Jan 2013 - 7:32 am | दीपा माने

एकदम इंप्रेसिव्ह! मला मुळातच सर्वच पक्क्षी आवडतात त्यात ही सुंदर सुंदर छायाचित्रे. आणखी फोटो येऊ द्या.

लई भारी, विषेषतः बसलेली घार जाम भारी.

सुकामेवा's picture

8 Jan 2013 - 9:07 am | सुकामेवा

हेच म्हणायचे होते.

पांथस्थ's picture

8 Jan 2013 - 12:46 pm | पांथस्थ

धन्यवाद!

अजुन थोडी छायाचित्रे इथे आहेत - http://www.flickr.com/photos/sunilkashikar/sets/72157632469846390/

सहज's picture

8 Jan 2013 - 12:49 pm | सहज

छानच

नगरीनिरंजन's picture

8 Jan 2013 - 1:38 pm | नगरीनिरंजन

कम्माल!
बगळा आणि त्याच्याखालचं निळं पाणी खूपच आवडलं.

ऋषिकेश's picture

8 Jan 2013 - 2:03 pm | ऋषिकेश

यातील सगळे पक्षी मुंबई व पुणे अश्या दोन्ही ठिकाणी दिसतात, बघितले आहेत. मात्र टिपायचे राहून जाते.
फोटो चांगले आले आहेत. पहिला दोन वेड्या राघुंचा तर क्लास!

या व्यतिरिक्त या दोन्ही शहरांत अनेकदा दिसणारे तांबट, सातभाई, नाचरे, मैना, कबुतरं, पारवे, कावळे-डोमकाव‍ळे, चिमण्या, शिंपी, निकेलचा फुलटोच्या, हळद्या, कोंबडी-कोंबडा, वेगवेगळी बदके, बुलबुल (लालगाल्या आणि लालगां* असे दोन्ही), घारी, शहरी बगळे, चिमण्या, पाकोळ्या, वटवाघळे, पोपट यांचे फोटोही काढून ठेवायला हवेत असे त्यांची कमी होणारी संख्या पाहता वाटु लागले आहे.

चौथा फोट बहिरी ससाण्याचा नसावा. ती ब्राह्मणी घार आहे (इंग्रजीत बरोबर लिहिले आहे). बहिरी ससाणा मी पाहिलेला नाही मात्र त्याचे पोट/छाती फक्त पांढरी असते बाकी स्पॉटेड असतो असे ऐकले आहे.

तळकोकण-गोवा-उत्तर कर्नाटकातील किनार्‍यावरील पाणथळ जागेत तपकिरी करकोचे दिसतात त्यांना टिपता आले का? या व्यतिरिक्त गोव्यात खंड्या (बाटलीवरला नव्हे खर्राखर्रा ;) ) अनेकदा दिसतो तो मिसिंग आहे

व्यतिरिक्त गोव्यात खंड्या (बाटलीवरला नव्हे खर्राखर्रा smiley ) अनेकदा दिसतो तो मिसिंग आहे

१-२ दिवस पाळतीवर होतो...विजेच्या खांबावर/तारेवर बसलेला असायचा...जरा जवळ गेले की उडुन दुरवर निघुन जायचा :(

शैलेन्द्र's picture

8 Jan 2013 - 10:33 pm | शैलेन्द्र

बरोबर .

बहिरी ससाणा टीपायचा माझा एक फसलेला प्रयत्न..

sasaanaa

पांथस्थ's picture

8 Jan 2013 - 11:38 pm | पांथस्थ

बेटर लक नेक्स्ट टाईम! पक्षी मात्र मस्त आहे!

काहिश्या थरथरत्या प्रयोगातही हा इतका सुंदर - राजबिंडा दिसतो आहे. उगाच नाही काहि राजे याला मनगटावर घेऊन पोज देत शायनिंग मारायचे असे वाटते!!

व्वा! नॉईज नसता तर फोटोसाठी 'नेमकी' मोमेंट होती.. बेटर लक नेक्स्ट टाईम!

प्रचेतस's picture

10 Jan 2013 - 8:34 am | प्रचेतस

हा घ्या देव ससाणा (Commom Kestrel)
a

शैलेन्द्र's picture

10 Jan 2013 - 11:37 am | शैलेन्द्र

नॉईसपेक्षाही त्याच्या वेगापुढे माझा वेग कमी पडला असे म्हणेन.. कॅमेरा त्याच्या पायावर व खालच्या दगडावर फोकस झाला, चुक दुरुस्त करेपर्यंत तो उडाला.

हुदहुद्या लिहिलं आहे तो सुतार आहे. भिंतीवरच्या / कातळावरच्या भेगेतलं त्याचं घरटं पहायचा योग गेल्यावर्षी भुतानला आला होता. अंडी पहाण्यासाठी मात्र आम्ही जवळ सरकु लागलो तसा हा आमच्या भोवती हल्ल्याच्या पवित्र्यात आवाज काधत घिरट्या मारू लागला आणि आम्ही मागे सरलो,

पांथस्थ's picture

8 Jan 2013 - 4:14 pm | पांथस्थ

नमस्कार,

प्रतिसादाबद्दल धन्यवाद. पण तो हुदहुद्याच आहे. इथे जास्त माहिती आहे - http://birds.thenatureweb.net/commonhoopoe.aspx

आणी हे आहे सुतार पक्ष्याचे छायाचित्र -

Sutar

पांथस्थ's picture

8 Jan 2013 - 4:15 pm | पांथस्थ

सुताराचे चित्रे मराठी विकिपेडिया वरुन साभार....

केदार-मिसळपाव's picture

8 Jan 2013 - 3:13 pm | केदार-मिसळपाव

पक्षी निरिक्षण हा एक चान्गला छन्द आहे. वेगवेगळे पक्षी ओळखता येणे आणी त्यान्ची मराठी-ईन्ग्रजी नावे कळणे हे तुमचे भाग्यच आहे. खुप खुप तिव्र निरिक्षण शक्ती आणी सय्यम लागतो असे छायाचित्र काढायला..

पांथस्थ साहेब, मस्त फोटो आहेत.

अभ्या..'s picture

8 Jan 2013 - 10:39 pm | अभ्या..

खूप आवडले आहेत फोटो. छानच आहेत.

कवितानागेश's picture

8 Jan 2013 - 11:42 pm | कवितानागेश

मस्तच आलेत फोटो.
त्या शेवटच्या फोटोतला दयाळ निळा कसा काय दिसतोय?

वरुन दुसरा फोटो विशेष आवडला !!

जातवेद's picture

22 Jan 2013 - 10:53 pm | जातवेद

पक्षांची इंग्रजी ते मराठी नावे येथे पाहता येतील
http://birds.thenatureweb.net/marathibirdnames.aspx
तशी आमालापन एक निलीमा नुकतीच गावली व्ह्ती..बनेश्वरच्या जंगलात..
Tickle's Blue FlyCatcher
लईच डेरींगबाज पाखरू वो.. निवांत बागडत व्हतं.

हुकुमीएक्का's picture

26 Jan 2013 - 10:04 pm | हुकुमीएक्का

फोटो खुप मस्त आलेत. . .सर्व फोटो आवडले. . .

टवाळ कार्टा's picture

27 Jan 2013 - 12:58 am | टवाळ कार्टा

अपेक्शाभंग ;)

पांथस्थ's picture

27 Jan 2013 - 1:08 am | पांथस्थ

हा हा हा :)

श्रीगुरुजी's picture

27 Jan 2013 - 5:02 pm | श्रीगुरुजी

खूपच सुंदर प्रकाशचित्रे आहेत. ३ र्‍या चित्रातल्या पक्षाचे मराठी नाव "सुतार" असे आहे.