Skip to main content

गोव्याचे पक्षी

लेखक पांथस्थ यांनी सोमवार, 07/01/2013 18:49 या दिवशी प्रकाशित केले.
२०१२ नाताळाच्या सुट्टीत गोव्याला जाउन आलो तेव्हा काढलेली हि पक्षांची छायाचित्रे. हि छायाचित्रे वागातोर, साळीगाव, पर्रा आणी डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्य, चराओ बेट इथे काढलेली आहेत. हा माझा पक्षी चित्रणाचा पहिलाच प्रयत्न असल्याने छायाचित्रे हवी तितकी शार्प आलेली नाहित. १. Green Bea-eater / वेडा राघू Green Bea-eaters २. Great White Egret / बगळा Great White Egret in flight ३. Common Hoopoe / हुदहुद्या Common Hoopoe ४. Brahminy Kite / बहिरी ससाणा Bramhiny Kite in flight ५. Black Kite / घार Black Kyte Full Wing Span ५.१ Resting Black Kite / विसावलेली घार Black Kite on pole ६. Black Drongo / कोतवाल Black Drongo ७. Oriental Magpie-Robin / दयाळ Oriental Magpie-Robin
लेखनविषय:

वाचने 28455
प्रतिक्रिया 41

प्रतिक्रिया

अप्रतिम छायाचित्रे. ही छायाचित्रे झूम क्रॉप केली असतीत तर बॅकग्राउंड स्पेस कमी होऊन पक्षी अधिक सुस्पष्ट दिसले असते. बाकी कॅमेरा डिटेल्स काय? फिल्टर्स बहुधा वापरले असावेत.

पक्षी चित्रणाचा पहिलाच प्रयत्न चांगलाच जमून आला आहे की गुरुदेव. बाकी जाणकार मंडळी यथा योग्य उपापोह करतीलच. आमच्या डोळ्यांना मात्र सर्व चित्रे भावली.

फोटो आवडॅश. फकस्त एक सांगावेसे वाटते ते बेट चोडण बेट आहे . चराओ नाही. स्पेलिंग chorao अस असल तरी ते चोडण आहे.

In reply to by प्रीत-मोहर

स्पेलिंग chorao अस असल तरी ते चोडण आहे.
आँ? म्हणजे "कुलकर्णी" असं लिहीलेलं असताना "अल्बुकर्क" असा उच्चार करायचा??

In reply to by गवि

खीक्क . हो. ते कसय ना चोडण असा उच्चार पोर्तुगीजांना येत नसल्यामुळे ते चोराव झाले. पण स्थानिक उच्चार चोडण आहे. हो आणि फक्त सलीम अली बर्ड सेंचुरीच नव्हे तर पुर्ण चोडण बेटावर या दिवसात स्थलांतरीत पक्षी येतात. इतकी. सुंदर दृश्ये क्यामेरात कैद न केल्याचे दु:ख चरचरत आहे

एकदम आवडली. इंग्रजी आणि त्याबरोब्रर मराठी नावे दिल्याबद्दल धन्यवाद!

एकदम इंप्रेसिव्ह! मला मुळातच सर्वच पक्क्षी आवडतात त्यात ही सुंदर सुंदर छायाचित्रे. आणखी फोटो येऊ द्या.

एकदम इंप्रेसिव्ह! मला मुळातच सर्वच पक्क्षी आवडतात त्यात ही सुंदर सुंदर छायाचित्रे. आणखी फोटो येऊ द्या.

कम्माल! बगळा आणि त्याच्याखालचं निळं पाणी खूपच आवडलं.

यातील सगळे पक्षी मुंबई व पुणे अश्या दोन्ही ठिकाणी दिसतात, बघितले आहेत. मात्र टिपायचे राहून जाते. फोटो चांगले आले आहेत. पहिला दोन वेड्या राघुंचा तर क्लास! या व्यतिरिक्त या दोन्ही शहरांत अनेकदा दिसणारे तांबट, सातभाई, नाचरे, मैना, कबुतरं, पारवे, कावळे-डोमकाव‍ळे, चिमण्या, शिंपी, निकेलचा फुलटोच्या, हळद्या, कोंबडी-कोंबडा, वेगवेगळी बदके, बुलबुल (लालगाल्या आणि लालगां* असे दोन्ही), घारी, शहरी बगळे, चिमण्या, पाकोळ्या, वटवाघळे, पोपट यांचे फोटोही काढून ठेवायला हवेत असे त्यांची कमी होणारी संख्या पाहता वाटु लागले आहे. चौथा फोट बहिरी ससाण्याचा नसावा. ती ब्राह्मणी घार आहे (इंग्रजीत बरोबर लिहिले आहे). बहिरी ससाणा मी पाहिलेला नाही मात्र त्याचे पोट/छाती फक्त पांढरी असते बाकी स्पॉटेड असतो असे ऐकले आहे. तळकोकण-गोवा-उत्तर कर्नाटकातील किनार्‍यावरील पाणथळ जागेत तपकिरी करकोचे दिसतात त्यांना टिपता आले का? या व्यतिरिक्त गोव्यात खंड्या (बाटलीवरला नव्हे खर्राखर्रा ;) ) अनेकदा दिसतो तो मिसिंग आहे

In reply to by ऋषिकेश

व्यतिरिक्त गोव्यात खंड्या (बाटलीवरला नव्हे खर्राखर्रा smiley ) अनेकदा दिसतो तो मिसिंग आहे
१-२ दिवस पाळतीवर होतो...विजेच्या खांबावर/तारेवर बसलेला असायचा...जरा जवळ गेले की उडुन दुरवर निघुन जायचा :(

In reply to by शैलेन्द्र

काहिश्या थरथरत्या प्रयोगातही हा इतका सुंदर - राजबिंडा दिसतो आहे. उगाच नाही काहि राजे याला मनगटावर घेऊन पोज देत शायनिंग मारायचे असे वाटते!! व्वा! नॉईज नसता तर फोटोसाठी 'नेमकी' मोमेंट होती.. बेटर लक नेक्स्ट टाईम!

In reply to by ऋषिकेश

नॉईसपेक्षाही त्याच्या वेगापुढे माझा वेग कमी पडला असे म्हणेन.. कॅमेरा त्याच्या पायावर व खालच्या दगडावर फोकस झाला, चुक दुरुस्त करेपर्यंत तो उडाला.

हुदहुद्या लिहिलं आहे तो सुतार आहे. भिंतीवरच्या / कातळावरच्या भेगेतलं त्याचं घरटं पहायचा योग गेल्यावर्षी भुतानला आला होता. अंडी पहाण्यासाठी मात्र आम्ही जवळ सरकु लागलो तसा हा आमच्या भोवती हल्ल्याच्या पवित्र्यात आवाज काधत घिरट्या मारू लागला आणि आम्ही मागे सरलो,

In reply to by ऋषिकेश

नमस्कार, प्रतिसादाबद्दल धन्यवाद. पण तो हुदहुद्याच आहे. इथे जास्त माहिती आहे - http://birds.thenatureweb.net/commonhoopoe.aspx आणी हे आहे सुतार पक्ष्याचे छायाचित्र - Sutar

पक्षी निरिक्षण हा एक चान्गला छन्द आहे. वेगवेगळे पक्षी ओळखता येणे आणी त्यान्ची मराठी-ईन्ग्रजी नावे कळणे हे तुमचे भाग्यच आहे. खुप खुप तिव्र निरिक्षण शक्ती आणी सय्यम लागतो असे छायाचित्र काढायला..

खूप आवडले आहेत फोटो. छानच आहेत.

मस्तच आलेत फोटो. त्या शेवटच्या फोटोतला दयाळ निळा कसा काय दिसतोय?

पक्षांची इंग्रजी ते मराठी नावे येथे पाहता येतील http://birds.thenatureweb.net/marathibirdnames.aspx तशी आमालापन एक निलीमा नुकतीच गावली व्ह्ती..बनेश्वरच्या जंगलात.. Tickle's Blue FlyCatcher लईच डेरींगबाज पाखरू वो.. निवांत बागडत व्हतं.

खूपच सुंदर प्रकाशचित्रे आहेत. ३ र्‍या चित्रातल्या पक्षाचे मराठी नाव "सुतार" असे आहे.