आधीची पेन्सिल माध्यमातील व्यक्तिचित्रे
नमस्कार,
पिडांकाका मागे जेव्हा भारतात आले होते तेव्हा ते अमेरिकेवरून माझ्यासाठी खास स्टॅटमोर चा प्रोफेशनल कागद घेऊन आले होते. त्या ब्लॉकवर हे पहिले पेन्सिल-शेडिंग आहे. हे चित्र पिडांकाकांसाठी.. धन्यवाद काका, कागदांसाठीही व मला पुन्हा एकदा पेन्सिल शेडिंगकडे वळण्यास उत्तेजन दिल्याबद्दल. :)
"ब्लू"
(मूळ प्रतिमा आंतरजालावरून साभार)
प्रतिक्रिया
16 Dec 2012 - 11:53 pm | जेनी...
मस्त .
डोळ्यात कसले भन्नाट भाव आहेत .
एकदम चंचल होउन उठावं ... आणि सावलितल्या आपल्याच प्रतिमेला
आपणच स्पर्शाचं गुपित विचारावं ...
सुंदर .
16 Dec 2012 - 11:57 pm | सुहास झेले
निव्वळ अप्रतिम.... :)
17 Dec 2012 - 12:07 am | कवितानागेश
अतिशय सुंदर.
17 Dec 2012 - 12:14 am | हिरवळ
काय रेखीव अन सजीव आहे हे चित्र..
17 Dec 2012 - 12:16 am | अत्रुप्त आत्मा
झकास..........!
17 Dec 2012 - 12:56 am | गणपा
खत्तरनाक !
बोटात जादु आहे हो तुमच्या.
17 Dec 2012 - 2:27 am | प्रभाकर पेठकर
अप्रतिम. दुसरे शब्द नाही सुचत. अभिनंदन.
17 Dec 2012 - 4:29 am | आनन्दिता
अगदी अप्रतिम.....
तुमच्या चित्रातली प्रत्येक रेष अर्थपुर्ण आहे
पेन्सिलचा एक एक फटकारा बोलका आहे ,,,,,,
आवडेश ब्वॉ आपुन्को,,,,!!
17 Dec 2012 - 4:29 am | आनन्दिता
अगदी अप्रतिम.....
तुमच्या चित्रातली प्रत्येक रेष अर्थपुर्ण आहे
पेन्सिलचा एक एक फटकारा बोलका आहे ,,,,,,
आवडेश ब्वॉ आपुन्को,,,,!!
17 Dec 2012 - 5:17 am | पिवळा डांबिस
चित्र अतिशय आवडलं.
विशेषतः चित्रातल्या स्त्रीचे डोळे विलक्षण रेखाटले आहेत. नजर एकदम खिळून रहाते.
जियो!!
17 Dec 2012 - 3:28 pm | सस्नेह
डोळे खूपच मस्त आलेत.
17 Dec 2012 - 6:11 am | किसन शिंदे
झक्कास!
डोळ्यातले भाव सुंदर रेखाटले आहेत.
17 Dec 2012 - 8:51 am | चौकटराजा
अगदी उत्तम प्रयत्न आहे ! आपल्यासाठी एक लिंक देतो- त्यावर काही भन्नाट अशक्य पेन्सील वर्क दिसेल. www.xaxor,com.
17 Dec 2012 - 9:04 am | ह भ प
नादखुळा काम आहे हो..!!
हे चित्र मला माझ्या घ्ररात फ्रेम करून ठेवायला आवडेल.. पण तुमी दिलं तरच.. द्याल का हो?? ;)
17 Dec 2012 - 9:12 am | श्री गावसेना प्रमुख
सुपर्ब आहे ह चित्र
डोळ्यात पाणी आल तुमचा प्रामाणीक पणा बघुन ह भ प साहेब्,बाकी फ्रेम कुठ लावताय हाफीसात की घरी ,
17 Dec 2012 - 10:17 am | ह भ प
पाणीदार डोळ्यांच्या चित्राला पाणीदार अभिप्राय वाचून डोळ्यात पाणी येणं साहजिकचं आहे श्रीजी.. :)
(बाकी सगळे ३जी वापरतात आम्ही श्रीजी वापरतो.. ;))
पण फ्रेम हापिसात नको.. घरीच लावेन.. पण मुळ कलाकाराची संमती असेल तरच ना पण..
17 Dec 2012 - 9:41 am | बहुगुणी
'पाणीदार डोळ्यांनी बोलणं' म्हणजे काय ते अप्रतिमरीत्या दर्शवलंय. तुम्हाला पेन्सिल शेडिंगकडे वळायला उद्युक्त केल्याबद्दल पिडांचे आभार. आता वळलाच आहात तर थांबू नका. तुमच्या आणखी करामती येऊ द्या.
17 Dec 2012 - 11:12 am | नि३सोलपुरकर
झक्कास!...अतिशय सुंदर
17 Dec 2012 - 11:25 am | खबो जाप
या साठी अप्रतिम , लाजवाब आणि खटक्यावर बोट जाग्यावर पलटी ..........
अरे हो आणखी एक गाणे आठवले " इन आखो कि मस्ती के मस्ताने हजारो है ........."
17 Dec 2012 - 11:30 am | संजय क्षीरसागर
या अप्रतिम रेखाटनाबद्दल मनःपूर्वक कौतुक, लगे रहो!
17 Dec 2012 - 11:30 am | अनन्न्या
शब्द्च सुचत नाहीत...
17 Dec 2012 - 11:35 am | मृत्युन्जय
अप्रतिम
17 Dec 2012 - 12:00 pm | ५० फक्त
अजिबात शब्द नाहीत, वरच्या कौतुकाच्या प्रत्येक प्रतिसादाला +१.
17 Dec 2012 - 12:26 pm | सुधीर
काय भारी कला हाय भौ तुझ्याकडं!
17 Dec 2012 - 12:31 pm | परिकथेतील राजकुमार
एक नंबर रे दाद्या. मस्त आले आहे चित्र.
बाकी,
ह्याचा तिव्र णिषेध !
17 Dec 2012 - 1:23 pm | स्पंदना
मस्त काढलय. मला नॅशनल जीओग्राफिच्या हाँटींग आइज फोटोची आठवण आली हे डोळे पाहुन.
17 Dec 2012 - 1:33 pm | झकासराव
कातील :)
17 Dec 2012 - 1:33 pm | येडगावकर
कसले पाणीदार डोळे आहेत. जबरद्स्त! हॅटस ऑफ टु यु!
17 Dec 2012 - 3:31 pm | गवि
अत्यंत सुंदर आहे हे चित्र.. अशीच आणखी चित्रं आम्हाला दाखवत रहा..
17 Dec 2012 - 3:40 pm | बॅटमॅन
ती पाहताच बाला, कलिजा खलास झाला!!!!!!!!!!!!!
एक नंबर चित्र हो स्वॅप्सभौ. डोळ्यांतले भाव अप्रतीम!!!!!!!
17 Dec 2012 - 3:44 pm | गवि
अधिक तपशिलात पहावे तर ओठ /जिवणी जुही चावलासारखे दिसतात.
17 Dec 2012 - 11:00 pm | सोत्रि
जुही....
गवि, बर्याच तपशिलात गेलात हो ;) तरी बरें अधिक तपशिलात जाण्यासारखे काही नव्हते :))
- (जुहीप्रेमी) सोकाजी
18 Dec 2012 - 11:10 pm | एस
जुहीच्या खळखळून हसण्याच्या मोहात तिचे ओठ बारकाईने पहायचे राहूनच गेले... गवि, बादवे ह्या चित्रात डोळ्यांपेक्षा तिचे ओठच सर्वात सुंदर आले आहेत. तुमच्या निरीक्षणाला +१
17 Dec 2012 - 3:47 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कसलं खत्रा काढलंय राव चित्र. एकदम झकास. डोळे एकदम भारी. [नाकाचा उजव्या बाजूने एकदोन रेघोट्या पाहिजे होत्या की काय असे वाटले, म्हणजे नाकात गडबड आहे की काय असे, की असेच काही तरी. असो.]
>>> हे चित्र पिडांकाकांसाठी.
मला नै आवडलं असं पिडाकाकाचं कौतुक. हे चित्र जर पिडाकाकासाठी असेल तर आमच्यासाठी काय मग ? :)
-दिलीप बिरुटे
17 Dec 2012 - 4:01 pm | Dhananjay Borgaonkar
कातील आहेत डोळे. अप्रतिम. चेहर्यावरचे भाव खुपच भाव खाऊन गेलेत ;)
17 Dec 2012 - 4:08 pm | स्मिता.
अत्यंत सुरेख रेखाटलंय! डोळे... डोळे तर असे काही मंत्रमुग्ध करणारे आहेत की नजर फक्त त्यांच्यावरच खिळून राहतेय. नंतर भानावर येवून बाकीचं चित्र पहिलं जातंय. मस्तच.
17 Dec 2012 - 4:43 pm | अभ्या..
छान.
मला थोडीशी गडबड वाटतेय खालच्या ओठात. पण डोळे अप्रतिम आलेत.
पावडर शेडींग करा की ट्राय. मस्त रिझल्ट मिळतो.
17 Dec 2012 - 4:49 pm | प्यारे१
मस्तच.....
17 Dec 2012 - 8:12 pm | निवेदिता-ताई
अतिशय सुंदर !!!!!!
17 Dec 2012 - 8:20 pm | पैसा
डोळे काय भारी तर्हेने रेखाटलेत! वा!!
17 Dec 2012 - 10:46 pm | एस
सर्वांचे मनःपूर्वक आभार... हे चित्र (आधीच्या चित्रांच्या मानाने) काहीसे घाईत पूर्ण केले आहे. एकच लेअर आहे. पुनःपुन्हा हात दिलेला नाही. त्यामुळे ज्याला डायनॅमिक रेंज म्हणतात ती इथे तशी दिसत नाहीये. हा कागद ग्लॉसी फिनिश चा नव्हता, त्यामुळे खूप जास्त बारकावे दाखवता आले नाहीत, पण तिच्या वस्त्राचा पोत मात्र छानपैकी जमून आला. हे चित्र कमी वेळेत पूर्ण करू शकण्यास कारणीभूत मला अपघातानेच सापडलेली स्मजिंगची एक युक्ती.. त्याबद्दल पुन्हा केव्हातरी. हे चित्र ट्रेसिंगचा वापर करून काढलेले नाही. (ट्रेसिंग करण्यात वाईट काहीही नाही. फक्त मी ते केलेले नाही.) समोर फोटो ठेऊन दृश्यस्मरणशक्तीचा (Visual Memory) जास्तीत जास्त वापर केला आहे. समोर मॉडेल बसवून जसे आपण पेन्सिल व अंगठा धरून अंतराची अंदाजे मोजमापे घेतो तसेच केले आहे. त्यामुळे कधीकधी अंदाज चुकत होता. :) असो. तरीही चित्र बरे आले हे चांगले. तिचे डोळे रेखाटनं सर्वात सोपं गेलं. आणि सर्वात अवघड तिच्या आउट-ऑफ्-फोकस बोटांची सटल्टि (subtlety) दाखवणे. प्रो चित्रकार अशा वेळी एक खास संदर्भपट्टी वापरतात जिच्यावर तुमच्या पेन्सिलीने काढता येऊ शकणारा सर्वात गडद ते सर्वात फिकट आणि मधल्या थोड्या थोड्या फरकांच्या क्रमशः छटा असतात. (मी आळशी, असल्या फंदात पडलो नाही :P सरळ जे दिसलं ते काढलं ;) )
आता पुढचे चित्र कधी? माहीत नाही.. बघू, पुन्हा अशी एखादी 'प्रेरणा' मिळाली की नक्की काढेन!
(अवांतर - संपादक मंडळास, मला माझ्या आधीच्या चित्रांच्या लेखांचे दुवे द्यायचे होते, पण धाग्यांवर गेल्यावर काहीच दिसत नाहीये, त्यामुळे बेत रहीत केला.. जुने लेख, प्रतिसाद वगैरे ठराविक काळानंतर अदृश्य केले जातील असे नवीन धोरण आहे काय? तसे असेल तर ठीक आहे. असो.)
(अजून एक - पावडर शेडिंगबद्दल काही माहीत नाही. वेळ मिळाला तर जरूर प्रयत्न करेन. पेन्सिलशेडिंगसुद्धा कधीतरी कुणी काढलेले एक चित्र पाहून माहीत झाले. सहज प्रयत्न केला तर मलापण हे येतं हे कळलं :D )
आणि हभप, सॉरी. पिडांकाकांना विचारा. मी काढलेले एकही चित्र माझ्याकडे नाही ( :( ) नाहीतर दुसरे एखादे दिले असते..
18 Dec 2012 - 10:54 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>> जुने लेख, प्रतिसाद वगैरे ठराविक काळानंतर अदृश्य केले जातील असे नवीन धोरण आहे काय ?
नाय रं बाबा...! असं काहीही धोरण नाही. तांत्रिक अडचणींमुळे असे जुने काही धागे दिसत नाहीत.
>>>मला माझ्या आधीच्या चित्रांच्या लेखांचे दुवे द्यायचे होते
कोणत्या धाग्यांचे दुवे द्यायचे होते, मला किंवा अन्य संपादकांना कळवा. धाग्यात पूर्वीचे धागे व्यवस्थित करुन टाकून देऊ.
-दिलीप बिरुटे
(संपादक)
18 Dec 2012 - 11:00 pm | एस
धन्यवाद प्राडॉ..
तुम्हांला खरड टाकली आहे.
18 Dec 2012 - 10:27 am | यशोधरा
सुरेख जमले आहे चित्र.
18 Dec 2012 - 10:37 am | दीविरा
रेखिव कलाक्रुती!!
18 Dec 2012 - 1:01 pm | जयवी
अप्रतिम !!
डोळे कसले बोलके आलेत. सलाम !!!!!!!!!
19 Dec 2012 - 12:41 pm | सौरभ उप्स
शेडींग खूप छान केलय....
डोळ्यातले भावही खूप छान जम्लेय्त...
फक्त उजवा डोळ्याची पोझिशन किंचित सरकल्यासारखी वाटतेय अनाटोमी वाईज....
आणि हातावर किंचित स्किन टेक्ष्चर दाखवल असत तर खूपच सुंदर वाटल असत "कागद ग्लॉसी फिनिश चा नव्हता" म्हणताय तर आरामात जमू शकल असत...
अर्थात बोलण सोप्प आहे म्हणा, चित्र अजून छान व्हाव यासाठी सांगितल......
19 Dec 2012 - 12:51 pm | त्रिवेणी
खूप छान
19 Dec 2012 - 12:56 pm | इरसाल
डोळ्यात वाच माझ्या तु गीत भावनांचे !!!!!
बादवे... तुम्ही तुमच्या बदकांचें काय केलेत?
19 Dec 2012 - 10:51 pm | एस
कुठली बदकं?
19 Dec 2012 - 12:58 pm | इरसाल
सौताला संपादन करता येत नाय वो ......
वरील गवि आणी सोत्रींच्या प्रतिसादाशी सहमत.
(गर्लफ्रेंड जुही सारखी दिसणारी असलेला) इरसाल
19 Dec 2012 - 1:23 pm | टुकुल
तुमच्या बोटांमधे जादु आहे
--टुकुल
20 Dec 2012 - 9:22 am | इरसाल
कस्चं कस्चं,
कसली जादु नी कसल काय, स्वसंपादन करता येत नाय म्हणुन तो दुसरा प्रतिसाद त्यात जादु कस्ली आलीय.
अहमदाबाद.
20 Dec 2012 - 8:23 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
लाय मंजे लय मंजे लय भारी. जादु जादु म्हणतात ती हिच बहुतेक. कसले कमालीचे भाव आहेत तिच्या डोळ्यात. 'प्रेरणा'स्त्रोत छान आहे बरं का :)
20 Dec 2012 - 9:29 pm | प्रीत-मोहर
अप्रतिम!!!!!
21 Dec 2012 - 6:51 pm | प्रभो
खल्लास!!!
2 Jul 2021 - 2:28 pm | उत्खनक
ज ब र द स्त!
2 Jul 2021 - 2:51 pm | गुल्लू दादा
अप्रतिम. धन्यवाद.
2 Jul 2021 - 6:34 pm | मदनबाण
के व ळ अ प्र ति म . . .
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Vaathi Raid Lyric + Vaathi Raid Video :- Master