तुम्ही, तुम्ही असलेलं जगाला फारसं आवडत नाही...
मग त्याला हवं तसं घडवण्यात वर्षे लोटतात...
आता तुम्ही प्रिय असता,
कारण तुम्ही जगासारखे असता...
मग कधी निवांत क्षणांत, तुमचं खरं रूप हळूच बाहेर येतं, शेजारी येऊन बसतं...
ते लाडकं असतं- फक्त तुम्हाला!
त्याची आर्त नजर तुम्हाला छेदून जाते..
थोडीशी खूडबूड झाली, की
त्या आर्त नजरेला ओलांडून जगाशी सामना करायला तुम्ही पुन्हा तयार...
पण तरीही, 'तोतया' शब्दाचा अर्थ मनाला पटत नाही...
(स्फूटंलेखन)
-वेणू
प्रतिक्रिया
24 Nov 2012 - 5:58 pm | जेनी...
ह्म्म्म
24 Nov 2012 - 9:31 pm | अमृत
स्वागत आहे.. स्फुट आवडलं..
25 Nov 2012 - 11:16 am | ५० फक्त
आवडलं, खुप छान लिहिलंय एकदम साधं सोपं. धन्यवाद.
25 Nov 2012 - 12:50 pm | अत्रुप्त आत्मा
घुमा फिरा के मारा है.... लेकिन जो भी मारा है.... सही है बॉस ... --^--^--^--
25 Nov 2012 - 1:13 pm | पियुशा
+१११ टु अत्रुप्त आजोबा ;)
25 Nov 2012 - 1:19 pm | अत्रुप्त आत्मा
@अत्रुप्त आजोबा >>> =)) अबाबाबाबाबा....
25 Nov 2012 - 3:56 pm | वेणू
सर्वांची आभारी आहे दोस्तहो.. :-)
25 Nov 2012 - 4:26 pm | तिमा
त्या आर्त नजरेचा गळा घोटण्याची हिंमत झाली तरच या जगांत 'यशस्वी' म्हणून मिरवता येते.
26 Nov 2012 - 3:56 pm | अनिल तापकीर
छान आहे