Skip to main content

फसवणूक..

लेखक वेणू यांनी शनिवार, 24/11/2012 17:45 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्ही, तुम्ही असलेलं जगाला फारसं आवडत नाही... मग त्याला हवं तसं घडवण्यात वर्षे लोटतात... आता तुम्ही प्रिय असता, कारण तुम्ही जगासारखे असता... मग कधी निवांत क्षणांत, तुमचं खरं रूप हळूच बाहेर येतं, शेजारी येऊन बसतं... ते लाडकं असतं- फक्त तुम्हाला! त्याची आर्त नजर तुम्हाला छेदून जाते.. थोडीशी खूडबूड झाली, की त्या आर्त नजरेला ओलांडून जगाशी सामना करायला तुम्ही पुन्हा तयार... पण तरीही, 'तोतया' शब्दाचा अर्थ मनाला पटत नाही... (स्फूटंलेखन) -वेणू
लेखनविषय:

वाचने 2367
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

त्या आर्त नजरेचा गळा घोटण्याची हिंमत झाली तरच या जगांत 'यशस्वी' म्हणून मिरवता येते.