पराभव...

चन्द्रशेखर गोखले's picture
चन्द्रशेखर गोखले in जे न देखे रवी...
3 Nov 2012 - 2:33 am

मी जेव्हा उभा रहातो स्वतः विरुद्ध लढायला..
तेव्हा लक्षावधी विचारांच्या झुंडीच्या झुंडी घेरतात मला
निमिषार्धात..
मी एकटा केविलवाणा दुर्बल..
सुळावर चढवलं जातय मला...
विचारांचा एक एक बोचरा खीळा ठोकला जातोय माझ्या मेंदुत
हृदयात, शरीराच्या प्रत्येक संवेदनशील भागावर
प्रचंड अत्याचार...!!
सुटण्याची असहाय्य धडपड..!!!
त्यागर्दीत लुप्त झालाय माझा आवाज
माझा मलाच ऐकु येत नाही माझा आक्रोष..
मी घाबरलेला भेदरलेला अखेर शरण जातो
विचारांच्या मुर्दाड झुंडी पुढे
नको नको हा सूळ ,उतरवा मला खाली
माझा अगतीक विलाप..
पुन्हा विद्रोह न करण्याच्या अटीवर अखेर
उतरवलं जातं मला सूळावरुन...
रडतोय मी ढसढसा...
पराभावाचे शूळ अजून अजून सलताहे मला
नाही नाही जमलं मला ख्रिस्त होणं..
आपुले मरण
असहाय्य डोळा
विद्रोहाचा खीळा
नको मज..... :(

कविता

प्रतिक्रिया

अत्रुप्त आत्मा's picture

3 Nov 2012 - 7:18 am | अत्रुप्त आत्मा

ब्वार...ब्वार... ठिक आहे. ;-)

चन्द्रशेखर गोखले साहेब, अप्रतिम कविता.
आशय फार सुंदर आहे तितकाच मन सुन्न करणारा आहे.
एक सुरेख कविता.

निरन्जन वहालेकर's picture

3 Nov 2012 - 9:32 pm | निरन्जन वहालेकर

पराभावाचे शूळ अजून अजून सलताहे मला
नाही नाही जमलं मला ख्रिस्त होणं..
आपुले मरण
असहाय्य डोळा
विद्रोहाचा खीळा
नको मज.....

सुन्दर ! आवडली कविता ! !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Nov 2012 - 9:38 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आवडली.

-दिलीप बिरुटे

सावकार स्वप्निल's picture

5 Nov 2012 - 6:15 pm | सावकार स्वप्निल

सुंदर

आवडली बुवा आपल्याला!

कवितानागेश's picture

5 Nov 2012 - 6:29 pm | कवितानागेश

आवडली.

अनन्न्या's picture

5 Nov 2012 - 8:14 pm | अनन्न्या

वाचताना अंगावर काटा आला. सुंदर कविता.

राघव's picture

8 Nov 2012 - 11:30 am | राघव

बोचलं.

राघव